Skip to content Skip to sidebar Skip to footer

दिल ये नादान (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२

©️®️ संगीता देवकर

अभि मी घरी बोलले आपल्या बद्दल. जान्हवी कॉफ़ीचा कप उचलत म्हणाली. मग काय बोलले आई बाबा? अभि आपण चार वर्ष एकत्र आहोत तुला वाटते ना आपल लग्न व्हावे? म्हणजे मी लग्नाला नाही म्हणत आहे का? जान्हवी तू स्पष्ट बोल जो तुझा निर्णय असेल तो मला मान्य असेल. अभि रागातच म्हणाला.
हेच अभि तुला राग ही पटकन येतो तू समोरच्याला समजून घेत नाहीस.
हो रियली चार वर्षात आता ही गोष्ट तुला खटकु लागली .अभि
अभि वाटेल ते आरोप नको करू,लग्न करायचे तर काही तरी बेस हवा समजते का तुला?    जान्हवी.
सरळ सरळ सांग ना जान्हवी की मला नोकरी नाही. रादर मी काही ही कमवत नाही. चार ओळी लिहिनारा मी एक कफ़लल्क लेखक ,कवी, मला इतरां सारखा चार आकडी पगार नाही. एक पुस्तक छापले की मला नावा पुरते मानधन मिळणार .    अभि
अभि मी कधी तुला तुझ्या लिखाना बद्दल बोलले का? पण संसार असा कथा आणि कविता लिहून होत  नसतो. जरा प्रैक्टिकल विचार करून बघ.    जान्हवी.
लिसन,लिहिन हे माझ पैशन आहे आणि त्याच टाईपच काही काम मिळाले ना तरच मी नोकरी करेन. आदर वाइज  आहे त्या कंडीशन मध्ये आय एम हैप्पी .    अभि
अभि नोकरी करत करत साईंड बाय साइड तुझी हॉबी जपता येईल.      जान्हवी.
जान्हवी मला नोकरी करने जमनार नाही तुला माझ्या बंधनातून या रिलेशनशिप मधून मी मुक्त करतो. तसे ही तुझ्या आई बाबांना असा भंणग जावइ नकोच असेल हो ना. सो गुडबाय अण्ड बी हैप्पी जान…. सेकंदात अभि कैफे मधून बाहेर पडला. अभि ऐकून तर घे माझ अभि…जान्हवी त्याला आवाज देत होती पण अभिला आता काही ऐकू येत नव्हते. डोळयाच्या कड़ा हाताने पुसत त्याने बाइक सुरु केली.  ” गुंणत्यात तुझ्या गुंतुंन ,कधी अडकलो जरासा, नको आता हे उन्हाचे झळे,सावलयांनो या परतूनी पुन्हा.”

” कोई हो परेशानी, या दिल की नादानी.
उलझ गए हो,जिंदगी की उलझनो में,
रास्ता दिखाई देता हैं ना मिलती है मंजिल,
चाहिय दिल को सुकून ,तो खोल दो अपने दिल के राज, …….देने इश्क का मशवरा आ गया आर जे “राज”.
नमस्कार,हाय,हैलो कसे आहात? मस्त जानेवारी ची कुड़कुडनारी थंडी आणि उबदार रजई त पडून माझा शो ऐकत आहात. त्या बद्दल आभार आणि तुम्हा सर्वाचे स्वागत करतो मी तुमचा लाडका  लवगुरु ” आर जे राज.. आणि तुम्ही  ऐकत आहात रेड एफ एम . .. तयार ठेवा तुमचे प्रश्न आणि कॉल करा.  98……… नम्बर वर. कार्यक्रमाची सुरवात  करूया या सुंदर गान्याने.. ”  तुला पाहता आजही ,
हासते या मनी चांदणे
बहरुन प्रीत ये अशी
गाली पडे खळी जशी
साथ तुझी मला हवी जीवनी…..मुंबई पुणे 3

कसला भारी आवाज आहे याचा पण हा आवाज आणि अभि चा आवाज जरा सेम वाटतो ना? कस शक्य असेल पण नाही हा कोणी आर  जे राज आहे. मला भास होतोय फ़क्त. दोन वर्ष झाली आज ही अभि ला नाही विसरु शकले. त्या नन्तर त्याने काही कॉन्टैकट केला नाही. नम्बर ही चेंज केला. अभि एकदा तरी माझ ऐकुन घ्यायचे होते रे का असा  रागात निघुन गेलास. जान्हवी अभि च्या आठवणीत अश्रु ढाळत होती. फ़क्त या आर जे चा आवाज थोड़ा अभि सारखा वाटतो म्हणुन वेड्या सारखी रोज रात्री 10 वाजता “लवगुरु” हा  रेडियो शो ऐकत असायची. तिच्या मनात आज ही अभिच होता पण अभि च काय? तो कुठे आहे? काय करतो काही ही माहित नव्हते. आपल प्रेम अस सहजासहजी कोणी कस विसरु शकते. मागच्या महिन्यात माझा वाढदिवस होता तेव्हा वाटले अभि नक़्क़ी कॉल करेल आणि विश करेल पण नाही अभि पूर्णपणे मला विसरून गेला. तो कुठे असतो हे कोणालाच माहिती नाही. जान्हवी अभि च्या विचारात हरवून कधी तरी झोपी गेली.  जानू अग तुला माहित आहे का तो रेड एफ एम वाला  मुंबईचा आर जे राज पुण्यात येतो आहे. रेवा जान्हवी ला सांगत होती. ख़र सांगतेस का रेवा कुठे येतोय तो?  सिझनस मॉल ला येणार आहे त्याचा इंटरव्यूह आहे आणि एक सिंगिंग प्रोग्राम पण आहे. रेवा बोलली. रेवा पासेस मिळतात का बघ आपण जावु. ओके जानू बाय म्हणत रेवा ने  फोन ठेवला. आर जे राज त्याला कोणी ही अजुन पाहिले नव्हते ,आर जे म्हणुन गेल्याच वर्षी तो रेड एफ एम ला जॉइन झाला होता . त्याचा  दमदार आवाज आणि बोलण्याची स्टाईल या वर सगळ्याच तरुण मुली फिदा होत्या. तो त्याचे फोटोज कुठे ही पोस्ट करत नव्हता त्याच कारण त्यालाच माहित होत पण जसा त्याचा आवाज तसा तो ही दमदार होता दिसायला. आणि आता तो जवळ जवळ एक वर्षांनी पब्लिक समोर येणार होता त्याला बघायला मूल मुली सगळेच अधीर झाले होते. तरुण मुलां चा तो आवडता “लवगुरु ” होता. कोणत्याही लव रिलेशनशिप च्या प्रोब्लेम वर तो सोल्युशन देत असायचा. रात्री 10 वाजता त्याचा शो तूफान चालायचा.
रेवा ने महत प्रयासाने दोन पासेस मिळवले. ख़ुप कमी लोकांना पासेस दिले होते कारण जास्त क्रावूड नको होता बाकी ऑनलाइन सगळी कड़े जसे फेसबुक,इंस्टा वर तो शो लाइव्ह दाखवनार होते. रविवार होता आज राज चा प्रोग्राम होता. सांध्यकाळी शार्प सहा ला तयार रहा अस रेवाने जान्हवी ला सांगितले होते. प्रोग्राम सात ला होता. दोघी मस्त छान तयार होऊन सिझनस मॉल ला आल्या. मॉल च्या ग्राउंड फ्लोअर ला कार्यक्रम होता. रेवा आणि जान्हवी त्यांच्या जागेवर जावून बसल्या. अँकर बोलत होता. आज फर्स्ट टाईम आर जे राज आपल्या सर्वां समोर येणार आहेत. पण त्या आधी सिंगिंग चा कार्यक्रम होईल मग आर जे राज ची मुलाखत होईल. देन लेटस एन्जॉय द शो . मग सिंगिंग प्रोग्राम सुरु झाला. रेवा कीती भाव खातो ग हा आर जे राज. याची मुलाखत शेवटी आधी हा कार्यक्रम बघा भारी फंडा आहे यांचा जबर्दस्तीचा. जानू म्हणाली. जानू अग  कीती फेमस आहे तो. नुसत्या त्याच्या आवाजा वर लाखो मुली फिदा आहेत मग त्याच्यात काही तरी दम असेलच ना. रेवा म्हणाली. ह्म्म्म बघू कोण राजकुमार आहे तो अस बोलून जान्हवी गप्प बसली. एक तासांनी सिंगीग प्रोग्राम संपला. आता सगळ्याच्यां नजरा आर जे राज कड़े लागुन होत्या. अँकर पुन्हा आला ,आता मी जास्त वेळ तुमच्या पेशंसची परीक्षा नाही घेणार लेटस वेलकम द मोस्ट अडोरेबल,चार्मिंग  अँड जवाँ दिलो की धड़कन…. रेड एफ एम मुंबई की जान,और शान आर जे अभिराज….जोरदार तालियों के साथ उनका स्वागत कीजिए. अभिराज नाव ऐकुनच जान्हवी शॉक झाली. आणि डोळे फाडून बघू लागली येस्स तो तिचा अभि च होता. ब्ल्यू लायनिंग शर्ट आणि जीन्स शर्ट वर डेनिम जैकेट ,फ्रेंच कट बियर्ड एकदम हैंडसम आणि रूबाबदार दिसत होता. लोक त्याला बघुन जोर जोरात टाळया वाजवत होते. वॉव सो स्वीट , ऑसम,फँब्युल्स,अशा कमेंट्स मुली पास करत होत्या अभि ला. काही जणी तर फ्लाईग किस सेंड करत होत्या. काही जणी लव यू राज ओरड़त होत्या. कसे बसे अँकर ने सगळ्याना शान्त केले. जानू  माझा माझ्या डोळया वर विश्वासच बसत नाही ग की समोर अभि आहे. हो जान्हवी अश्रु भरल्या नजरेने अभि कड़े बघत म्हणाली. अँकर ने त्याची मुलाखत घेतली. त्याने आपण काहीतरी नाव कमवत नाही तो पर्यंत आपला फोटो पोस्ट करनार नाही अस ठरवले होते. त्याला त्याची स्व:ताची एक ओळख बनवायची होती म्हणुन तो मीडिया समोर येत नव्हता अस अभि म्हणाला. अँकर ने विचारले या मागे काही पर्सनल रीजन आहे का? तसा अभि म्हणाला  सॉरी मी माझ पर्सनल लाइफ कुठे ही शेयर करत नाही .रेवा आणि जानू सेकंड रो मध्ये बसल्या होत्या सो अभि ने जान्हवी ला बघितले होते. अँकर ने ख़ुप सारे प्रश्न राज ला विचारले. शेवटचा प्रश्न अँकर म्हणाला,आर जे राज आर यू सिंगल?  अभि जानु कड़े बघत म्हणाला, येस आय एम सिंगल. त्याच्या उत्तराने सगळ्या मुली वॉव अस मोठ्याने ओरडल्या.कार्यक्रम संपला रेवा आणि जान्हवी घरी जायला निघाल्या. जानु तू अभि ला भेटणार नाहीस का? रेवा ने विचारले कारण तिला यांच्या बद्दल सगळ माहित होत. नाही रेवा तो माझ काही ही न ऐकता निघुन गेला त्या नन्तर कधी ही मला कॉन्टैक्ट केला नाही. फोन नम्बर चेंज केला त्याने कारण मी कॉल करेन म्हणुन. माझ्या बर्थ डे ला त्याने विश ही नाही केले . प्रेम करत होता ना माझ्यावर मग अस प्रेम असते का रेवा मी कशी आहे,त्याच्या शिवाय जिवंत आहे की नाही हे पाहण्याची तसदी पन नाही घेतली त्याने. मला जान म्हणत होता आणि अस रिलेशन तोडून गेला ? एकदा ही त्याला मला विचारावेसे नाही वाटले का की माझ मत काय आहे? आई बाबा त्याच्या जागी बरोबर होते ग पण मी तर अभि च्या लिखाना वरच फिदा होते ना? आज ही त्याच्या कविता मी जपुन ठेवलया आहेत.त्याची डायरी आज ही माझ्या कड़े आहे. मी अभि वर ख़र प्रेम केल रेवा पण अभि …असा जानू रडत बोलत होती. मी ही खरे प्रेम केले होते जान अभि जानू च्या मागे उभा राहुन म्हणाला. अभि मग असा तड़काफड़की का निघुन गेलास? आपले प्रेम इतके कमकुवत होते का रे? अजिबात नाही जान उलट आपल्या प्रेमासाठीच मी तुझ्या पासून दूर गेलो आणि बघ आज हा लेखक कवी असणारा अभि रेड एफ एम चा फेमस आर जे बनला आहे. माझी आज एक स्वतंत्र ओळख आहे जान . तुझ्या आयुष्यात जर दूसर कोणी असेल तर सांग मी निघुन जाइन आनंदाने. मैड तुझ्या शिवाय माझ्या आयुष्यात दूसर कोणी असूच शकत नाही अभि. आय स्टिल लव यू. ओह्ह पण तुझ्या आई बाबांना चालेल का हा आर जे जावई ? आई बाबांचे सोड मला चालेल हा आर जे राज अस म्हणत जान्हवी त्याच्या कुशीत शिरली. वा अभि एकदम हटके आहे रे तुझी अन जानू ची लव स्टोरी. रेवा म्हणाली. ओह्ह एकदम  हटके आहे  अभिजान ची स्टोरी. अभि चा हात पकडून जानू मॉल मधून निघाली .सगळा क्रावुड त्यांना बघुन टाळया वाजवत राहिला.समाप्त.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.