कोरोनाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी घ्यावयाची खबरदारी

१. कोरोनाविषयी संक्षिप्त माहिती
आपल्या वैद्यक शास्त्रामध्ये विषाणूंचे अनेक गट पडतात त्यातला कोरोना व्हायरस हा एक विषाणूंचा गट आहे. या विषाणूमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध प्रकारचे रोग होतात.तर मानवामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार हा श्वसन मार्गातून होतो. तसं पाहायला गेलं तर आपण कोरोना विषाणूचा प्रसार २०१९ या साली झाला पण हा विषाणू सर्वात आधी १९६० च्या दशकात सापडला. तर सर्वात आधी कोंबड्यांमध्ये सापडलेल्या विषाणूंमध्ये एक ब्रॉन्कायटिस विषाणू आढळला. या विषाणूमुळे होणाऱ्या रोगाला ब्रॉन्कायटिस असे नाव देण्यात आले. हा रोग श्वसन संस्थेशी निगडित असल्याने कोरोना या विषानुसारखा ब्रॉन्कायटिस या आजाराचा विषाणू असतो म्हणूनच कोरोना हा विषाणू १९६० च्या दशकात सापडला असं म्हणता येईल.कोरोना म्हणजे एक असं युद्ध जे आपल्या सारख्या सामान्य माणसांना घरात राहून जिंकायचं होतं. SARS कोवी-२ म्हणजेच कोरोना व्हायरस. ज्या विषाणूचा आकार हा एक कंद आकारासारखा दिसतो.ज्याचा आकार हा अत्यंत लहान असतो जो सूक्ष्म कणांपासून खूप साऱ्या पेशी तयार होतात.
हा विषाणू हा गोलाकार असतो ज्याच्या सभोवती खूप सारे काट्यासारखी आवरण असतात,म्हणजेच ते प्रोटीन पासून बनलेले असतात.हेच प्रोटीनचे नॉब आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या पांढऱ्या पेशी गिळंकृत करतात आणि मानवी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ही संपुष्टात येते. सर्वात आधी हा विषाणू शरीरातील रक्ताभिसरण करणाऱ्या अवयवांवर आघात करतो जसे कि फुप्पुसे आणि किडनी. जेणेंकरून रक्तभिसरण न होऊन दूषित रक्त संपूर्ण शरीरात पसरेल आणि शरीराला हानी पोचते म्हणूनच कोरोना विषाणू संदर्भात काही लक्षणे आढळली तरी आपल्याला सतर्क राहावे लागले.
या विषाणूला कोरोना हे नाव कसे देण्यात आले..? तर कोरोना या विषाणूचा आकार असतो तो गोल आणि त्याला किंवा त्या विषाणूच्या पृष्ठभागावर असंख्य काटे असतात तर एकंदरीत एका मुकुटाप्रमाणे आपल्या हा विषाणू सूक्ष्मदर्शीकेखाली दिसतो तर ग्रीक भाषेत मुकुटाला कोरोना म्हणतात परंतु इंग्रजी भाषेत मुकुट म्हणजे क्राउन पण ग्रीक भाषेत असलेलं नामकरण याठिकाणी वापरात आला म्हणजे कोरोना…म्हणूनच य आजाराला कोरोना असं नामकरण करण्यात आलं
२. कोरोना विषाणू भारतात कसा आला ?
भारतामध्ये कोरोना संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला तो म्हणजे ३० जानेवारी २०२० रोजी केरळ या राज्यात.बाधित झालेली व्यक्ती व्हुहान या चीनमधील शहरामधून आलेली होती. त्यानंतर परदेशात असलेले भारतीय नागरिक यांनी भीतीपोटी मायदेशात पलायन केलं…तरी जे भारतीय नागरिक परदेशामधून आले सोबत कोरोना नावाचा विषाणूही घेऊन आले म्हणूनच भारतात कोरोना बाधित लोकांची संख्या वाढली.केरळ पाठोपाठ महाराष्ट्र,कर्नाटक ठिकठिकाणी कोरोनाचा विषाणू शिरकाव करू लागला.
३ कोरोना व्हेरिएंट / कोरोना विषाणूचे प्रकार आणि त्यांचे परिणाम
३.१. अल्फा कोरोना व्हायरस
हा व्हायरस म्हणजे सिंगल स्टेन्डेड आर.एन.ए असतात जे माणसांसह सस्तन प्राण्यांनाही संक्रमित करतात. मुख्यत्वे हा विषाणू (अल्फा आणि बीटा ) बॅटच्या म्हणजेच वटवाघुळाच्या जनुकांमधून आलेले आहेत. तर या विषाणूचे आकारमान साधारण १२० ते १६० nm इतके आहे. या विषाणूच्या पृष्ठभागावरती ग्लायकोप्रोटीन असतात आणि मानवी शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता पूर्णपणे शोषून घेण्याचे कार्य करत असतात. हा कोरोना विषाणूचा प्रकार अनेक नावानी ओळखला जातो यू.के च्या बाहेर काही वेळा या व्हायरसला यू .के व्हेरिएंट किंवा ब्रिटिश व्हेरिएंट असेही म्हंटले जाते.
३.२ . कोरोना अल्फा व्हेरिएंटची लक्षणे
अल्फा व्हेरिएंटची लक्षणे साधारण म्हणजे सततचा खोकला आणि ताप,नाकामधून पाणी येणे,वास घेण्याची क्षमता मंदावणे,अन्नपदार्थांची चव कळेनाशी होणे,अंग दुखणे,वारंवार जुलाब होणे,श्वास घेण्यास त्रास होणे.
– वारंवार झोप येणे,भूक न लागणे,डोळ्यांवरती झोप कायम राहणे,ओठांवर काळपटपणा येणे,झोपेतून जाग न येणे.
३.३ . अल्फा व्हेरिएंटचा भारतावर झालेला परिणाम
संपूर्ण जगावर या विषाणूने घाला घातला आहे. भारतामध्ये वैद्यकीय तंत्रज्ञान प्रणाली फारशी विकसित नाही याउलट परदेशामध्ये तंत्रज्ञान प्रणाली विकसित आहे तिथे मृत्युदर सुरुवातीला भारताच्या तुलनेत जास्त होता परंतु सुरुवातीपासून लॉकडाऊन आणि घेतलेली खबरदारी यामुळे परदेशात कोरोना काही प्रमाणात आटोक्यात आला.भारतात मात्र अजूनही कोरोनामुळे बळी गेलेल्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच हानी पोहोचली आहे. विविध क्षेत्राला कोरोनामुळे हानी पोहोचली आहे. याची सविस्तर माहिती आपण घेऊयात.
शैक्षणिक क्षेत्रात झालेला परिणाम:
सतत पडणाऱ्या लॉकडाऊनमुळे शाळेत जाऊन शिक्षण घेण्याचा आनंद मुलांना घेता येत नाही. काही गोष्टी विषयशिक्षकांशी बोलून समजावून घेऊन मग त्यावर विवरण करणे सोपे जाते परंतु सततच्या लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना या गोष्टी अवघड जात आहे. त्याहीपेक्षा चिंताजणक बाब म्हणजे घरी ऑनलाईन पद्धतीने अभ्यास असल्याने सतत एका जागी बसून राहून लहान वयातच मुलांना स्थूलतेला सामोरे जावे लागत आहे ज्याने आरोग्याच्या तक्रारी सुरु होत आहेत .ज्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेणे गरजेचे वाटतं आहे त्या विद्यार्थ्यांना कोरोना प्रादुर्भावामुळे परदेशात जाऊन शिक्षण घेता येत नाहीय परिणाम काय तर विद्यार्थ्यांचे करिअर कोरोनामुळे पुढे गती घेऊ शकत नाहीय.