Skip to content Skip to sidebar Skip to footer

वर्गमित्र (classmates)-अंतिम भाग-भाग २०

®️©️राधिका कुलकर्णी.

प्रसादच्या कारमधे बसुन कुठेतरी चाललोय एवढेच कळत होते.
जुन्या हिंदी गाण्यांची धुन कानावर पडत होती.
सफाईदार पणे गाडी चालवत सुंदरशा समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो होतो आता आम्ही.
अथांग पाण्यावर सुर्याची किरणे चमकत होती ऊन्हाने.
पाणी जणू सोनेरी साज ल्यायलेल्या नववधूगत दिसत होते.
हा परीसर मी ह्या आधी कधीच बघितला नव्हता.खूप शांत अगदी तुरळक माणसांची वर्दळ होती.
प्रसादने गाडी पार्क केली.खाली उतरून झाडाखालीच एका बाकावर बसलो. अजूनही तो शांतच होता.

मगाशी त्याच्यावर उगाचच भडकले म्हणून मलाही आता अपराधी वाटत होते.काय बोलावे सुचत नव्हते.

“छान वाटतेय ना इकडे? आलीएस कधी इकडे ह्या आधी?”
त्यानेच बोलायला सुरवात केली बरे झाले.

“हो ना.! खूपच सुंदर आहे ठिकाण. मी तर आजच बघतीय रे. बघ ना , इकडे राहूनही मला माहित नव्हते की मुंबईत इतनी सुकूनभरी जगह भी है।
थँक्यू आणि सॉरी पण.”

” का ग? कशासाठी? “

” अरे मी मगाशी उगीचच ओव्हर रीॲक्ट झाले.”

“चल जाऊ दे. आता इकडे नीटपणे बोलणे होईल,
होना ? “
इति प्रसाद.

” बर मग सांग बघू,काय सांगायचेय.?

” काही नाही गं ,तूला खूप दिवसापासून काहीतरी सांगायचेय पण निवांत वेळच मिळत नव्हता.”

“बर बोल ना मग.मी ऐकतीय..”

” काही महिन्यांपूर्वी एका कॉन्फरन्स मिटच्या निमित्ताने माझी एका कलिग लेडीशी भेट झाली.
नंतर मग मधूनअधून असेच थोडेफार बोलणे , कधी मेसेजेस मधून आमची मैत्री झाली.
का कुणास ठाऊक तिच्यात असे काय आहे की मला तिच्याशी सतत बोलावे वाटतेय आजकाल. पण मी ही गोष्ट बोलू नाही शकलोय तीला आजवर.
तूला तर माहितीच आहे ना की मी किती कमी बोलतो.त्यात स्वभाव असा भिडस्त पडला त्यामुळेच की काय शाळा कॉलेजात पण मला कधी कोणी मैत्रीणी नव्हत्या फारशा.मी अन माझा अभ्यास एवढेच विश्व होते माझे.
आताही मला हवे ते सगळे मिळालेय जीवनात मी खूप खूष आहे.
बायकोही खूप साधी सरळ आहे. मला समजून घेते. सगळे व्यवस्थित आहे. पण म्हणतात ना जीवनात सगळे असुनही एक कोणीतरी असे असावे ज्याच्यापाशी बोलून मन मोकळे करता यावे. कोणीतरी अशी व्यक्ती जिच्याशी काहीही बोलताना शरम वाटू नये लाज वाटू नये. मला आता ते सगळे तिला भेटून मिळालेय असे वाटायला लागलेय.
तुला ऩाही वाटत का असे कोणी असावे असे?

“हम् !!खूपच इंटरेस्टींग आहे हे सगळे.
पण मग आता तूला ह्यात माझी काय मदत हवीय ते सांग. आणखी एक प्रश्न.. , विचारू?

” मदत नाही गं सखे. मी विचार करतोय की ही गोष्ट तीला कशी समजावू?”

” ते तर आहेच पण ह्या नात्यात पडताना तुझ्या बायकोला काय वाटेल ह्याचा विचार केलास का प्रशू?

” काय बोललीस आत्ता ! पून्हा बोल.”

” हेच की तूझ्या बायकोला काय वाटेल ह्याचा विचार केलास का?”

” अग त्यानंतर काय बोललीस?”

” कुठे काय? “

” अग तू मला प्रसादऐवजी ‘प्रशू’ म्हणलीस आत्ता !
” हम्म… ते होय.. तुला आवडले नाही का?

” अगं गंम्मत सांगू , मला शाळेत असताना आमच्या एक ट्युशनच्या बाई होत्या त्या ह्या नावाने बोलवायच्या. त्यानंतर आज पहिल्यांदा हे नाव घेवून कोणीतरी बोलावतेय मला.
I liked it so much sakhe…

“बरं मुद्दा भरकटतोय आपला.”
आशूने आठवण करून दिली.

” बरं सखी,मग तू माझ्या जागी असशील तर कसे सांगितले असते की तूला एक व्यक्ति आवडतेय ?”

” अरे प्रशू तूला कळतेय का हे सांगणे खूप सोप्पे आहे पण त्या नात्याची जवाबदारी आयुष्यभर पेलण्याचे आश्वासन तू देवू शकणारेस का?
जर आज असलेली इंटेंन्सिटी काही दिवस,महिने किंवा वर्षानी संपल्यावर मग तू काय करशील?
ते नाते आहे काही वस्तू नाही की आवडली की वापरली अन मन भरले की टाकून दिले.
त्यामुळे मुळात असल्या कोणत्याही बंधनात तू स्वत:ला अडकवून घेवू नयेस हाच माझा पहिला सल्ला असेल.आणि जर तूला हेच करायचेय तर मग ते नाते निभवावे लागेल ही खात्री तिला तू द्यायला हवीस. “

” अग बाईऽऽ , काय बोलतीएस? मी काही तिला माझ्या बायकोची रिप्लेसमेंट म्हणून नाही बघत गं.
माझं आजही माझ्या बायकोवर नितांत प्रेम आहे.
मला तू समजतेस तसले आकर्षण पण नाहीये तिच्या बाबतीत.
फक्त मला तिच्यात एक सुंदर मनाची मैत्रिण दिसतेय जी आजवर मला कधी मिळाली नाही.
बाकी तीही तिच्या संसारात सुखी आहे आणि तशीच सुखी राहो हिच इच्छा आहे माझीही. फक्त ती अन् मी हेही एक सुंदर भावनिक नात्याचे जग असेल जिकडे फक्त मी अन् तीच असणार.”
“ती खूप छान बोलते आधार देते. काळजी घेते ते सगळे मला खूप आवडते.प्रसंगी रागावतेही वेळ आली तर…”

आणि मी ह्या नात्याचीही जवाबदारी स्विकारतोच आहे. मलाही ती सतत सोबत हवीय.”

“तू आज खरे तर इकडे माझ्याऐवजी तिलाच बोलावायला हवे होतेस प्रशू. जे सगळे मला सांगितलेस ते तिला सांगायला हवे होतेस. जे काही असेल ते उत्तर तूला इकडेच मिळाले असते ना. “

“अगंऽऽऽऽ तिलाच तर बोलावलेय ना !”

” काऽऽऽय ? “
विस्फारीत नजरेने आशूने त्याच्याकडे बघितले.
आता चक्कर खाण्याची वेळ आशूवर आली होती.
काय बोलावे कसे रिॲक्ट व्हावे काहीच समजत नव्हते.

आणि इतक्यावेळ तिला मूर्ख बनवण्याचा त्याने रचलेला खेळ ज्यात ती सहज गुरफटली गेली होती, तिचा पुरता मामू केला होता त्याने.

” ही काय मस्करी आहे प्रसाद?”

“अगं मस्करी नाही सखी, हे खरय आणि ती तूच आहेस जिच्याशी बोलून मला बरे वाटते. खरच गं सखे.आता तू सांग.तूला काय वाटते?”

” प्रसाद तुही माझा चांगला मित्र आहेसच की.
त्यात सांगायची गरज आहे का काही?
मग असे आडून आडून का बोललास?”
आशूने नाराजीतच विचारले. कारण त्याने तिला फूल टू उल्लू बनवले होते.

“अग् तूला माझे बोलणे आवडले नाहीतर तू चिडशील आणि कायमची बोलणे बंद करशील ही भीती वाटत होती मला. मला तूला गमवायचे नव्हते गं आशू.
मला हे मैत्रीचे सच्चे नाते कायम जगायचेय.
बाकी काही अपेक्षा नाहीयेत खरच. एक पवित्र मैत्रीचे नाते. विषयाची वासना नसलेले नाते. पण सच्चे हक्काचे प्रेमाचे नाते.”
“I really love you Sakhi.
तू बोलत का नाहीस काहीच? बोल ना.”

“काय बोलू. मती गूंग झालीय माझी.
खर सांगू आजवर मलाही कधीच कुणी जवळचा हक्काचा मित्र नव्हता. लग्न आणि संसारात इतकी गुरफटलेली होते की कधी जाणीवच नाही झाली की असे कोणीतरी असावे.
श्रीने आयुष्यातली हर कमतरता पुर्ण केली की कधी असा कोणी मित्र असावा ही गरजच वाटली नाही.

पण तू भेटलास आणि तुझ्या असण्याचीही सवय व्हायला लागली. मला खूप अभिमान आहे आपल्या नात्याचा ह्या पवित्र मैत्रीचा. पण असे काही शब्दात व्यक्त व्हावे असे कधी वाटलेच नाही रे.
तू मात्र हे सगळे बोलून आज मलाही विचार करायला भाग पाडलेस.”
“seriously proud to be ur frnd.
love you prashu…”

त्याचा हात हातात होता तो कधी हातात घेतला तेही कळले नव्हते तिला. पण आज खूप मोकळे मोकळे वाटत होते. काहीतरी अनमोल खजीना हाताला लागावा तसे काहीसे.
निशब्द झाले होते सगळे.

“चल निघायला हवे मला प्रसाद..”

” प्रसाद ??? डोळे मोठे करून त्याने विचारले..
तू मला ह्यापूढे फक्त ‘प्रशू’ म्हणायचे.”

“बर बाबा प्रशू… ओके! “

“हम आता करेक्ट आहे.”

“पण मला निघायला हवेय रे आता.”

“ए सखी, ह्या मैत्रीखातर माझी एक भेट स्विकारशील प्लिज ? प्रॉमिस कर की ती तू नाकारणार नाहीस?

“अरे काय गरज आहे? “

“ते मला माहीत नाही. ह्या सुंदर मैत्रीच्या क्षणांची साक्षीदार असणार आहे ही भेट. तुला नेहमी ह्या दिवसाची आठवण देइल.”

“बर दे,नाही म्हणून तू ऐकणार थोडीच.”

“ए पण मग मीही तूला काहीतरी द्यायला हवे. मी तर काहीच आणले नाहीये.”

“अग तू तर मला भेट दिलीएस की आधीच तुझ्या नकळत.”

“म्हणजे? मी समजले नाही. मी काय दिलेय ?.”

” इतके सुंदर नाव दिलेस की “प्रशू”.
“ह्याहून सुंदर भेट काय असू शकते सखी.”
Now its your turn to accept the gift.

प्रसादने एक छोटीशी डबी तिच्यासमोर धरली.
ती तीच डबी होती ज्यात पहिल्या भेटीत आणलेले कानातले होते.

” हे कानातले स्वीकार कर सखी आपल्या मैत्रीखातर.

ह्यावेळी माझ्या मनात कुठलाही संदेह नव्हता.जर ते नाते स्विकारलेय तर भेट का नाही?
कलत्या सूर्य़ाची किरणे सर्वांगाला केशरी करत होते. मनातली सर्व जळमटे पुसून नात्यांची नवीन परिभाषा समजावत होते मनाला.
स्पर्शाशिवाय मनाची मनाला समजणारी भाषा आज नव्याने शिकत होते..
मैत्रीचा खरा अर्थ आज कळला होता.
वर्गमित्र आज मनमित्र झाला होता.
हातात हात घालून चालताना वाळूत उमटणाऱ्या पावूलखूणा नविन नात्यांच्या खूणा पटवून देत होत्या.

गाडीने कधी पॅरेडाईज कॅफेपाशी पोहोचलो कळलेच नाही.
पुन्हा आता आल्या वाटेने घरी जायचे होते.
पण ह्यावेळी मी एकटी नव्हते.माझ्यासोबत माझा वर्गमित्र मनानी सोबत असणार होता कायम…
गाडी चालवताना कानातले लोलक वाऱ्याने हलत होते. त्यांची मंजूळ किणकीण आज मात्र नव्या नात्याची खूण सांगत होते.
अलगद हळूच जणू कानातली कानगोष्ट. फक्त आमच्या दोघांची.
प्रशू आणि आशूची
(कुठूनतरी गाण्याचे बोल कानावर पडत होते.
आज मात्र त्या ओळींचा खरा अर्थ गवसला होता

“हे नाते जूळले मनाशी मनाचेऽऽऽ…..)
~समाप्त.~

®️©️राधिका कुलकर्णी.

नमस्कार मंडळी,
आज वर्गमित्र कथा संपली.कशी वाटली कथा??बरेच जण रोजच प्रतिक्रीया देत होते पण अनेक सायलेंट रीडर्स असतील त्या सर्व वाचकांनाही विनंती की तुमचे फिडबॅक्सही मला जरूर द्यावेत.कथेबाबत काही सुचना असतील तर त्याचेही स्वागत आहे.तुमच्या सुचनांमुळेच आमचे लेखन सुधारण्यास मदत होते म्हणुन नि:संकोचपणे आपल्या प्रामाणिक प्रतिक्रीया द्याव्यात ही विनंती..
धन्यवाद तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या प्रतिसादाबद्दल.
पुढेही अशीच साथ द्याल ही अपेक्षा..
पुन:श्च आभार.
@राधिका कुलकर्णी.

 

 

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.