Ritbhatmarathi

Search
Close this search box.

®️©️राधिका कुलकर्णी.

गेल्या महिन्याभरापासून काही ना काही व्यापात ईतकी गुंतून पडलेली आशू की प्रसादला फोन करायचे करायचे म्हणून राहूनच चालले होते.
आज तिला सतत त्याचीच आठवण येत होती.
काय झालेय? आज का आपल्याला त्याची इतकी आठवण येतेय?
कसा असेल तो?
आपण बोलत नाही ह्याचा काही वेगळा अर्थ काढून रागावला तर नसेल ना?
छे ! हे विचारांचे काहूरच माणसाला छळते सतत.
खरी कथा काहीतरी वेगळीच असते पण मन एकदा एका दिशेने विचार करायला लागले की मग मनाचा वारू त्याच दिशेने अशी बेफाम घोडदौड करू लागतो की विचारांच्या खोल गर्तेत कसे फसत जातो आपले आपल्यालाच कळत नाही.
आपण प्रसादच्या बाबतीतही हिच चूक तर करत नाही आहोत ना?
विचारांचे वारू चौफेर उधळून पुन्हा मनात नको त्या शंकाचे काहूर माजवण्या अगोदरच कृती करायला हवी..
मनाने स्वगत करतच आशूने नंबर डायल केला.आणि आश्चर्याने उडालीच ती.
प्रसादचा फोन चक्क बंद!!!??
हे काय?
पून्हा लावला,तरी तेच.
“तूझा फोन लागत नाहीये.वेळ झाला की फोन कर.” आशू.
मेसेज लिहून मी आता त्याच्या फोन किंवा मेसेजची वाट बघत बसले.

मेसेज लिहून तब्बल 2 दिवस होवून गेले होते पण कोणताच प्रतिसाद नाही.ह्या पद्धतीने तो ह्या आधी कधीच वागला नव्हता. काय करावे सुचत नव्हते.मनात भलभलत्या शंकांनी थैमान घालायला सुरवात केली होती.
काय म्हणावे ह्या मुलाला? किती बेजावाबदार वागणे हे?
चीड,राग,संताप आणि काळजी ह्या सगळ्या भावना आलटून पालटून मनाचा कब्जा घेत होते.
काही म्हणता काहीच सुचत नव्हते.
सारखा उठसूठ मनिषला फोन करून चौकशी करणेही बरे नसते दिसले.
मग कसा संपर्क करू ह्याला?
“आई,जेंडर म्हणजे काय ग?
काऊ मेल की फिमेल?”
ऋषीच्या ह्या प्रश्नांनी मी भानावर आले.
“बाळा,काऊ फिमेल आणि बुल मेल.”
थँक्यू आई.आज दादाने मला शिकवले काऊ ईज फिमेल.
आणि तू शिकवलेस की बूल ईज मेल.

तो बडबडतच गेला उड्या मारत.
आणि लगेच कल्पना आली मेल?!!
मेल करू शकते ना.
तो तर मिळेलच की.

व्वा! काय पण गोड लेक आहे माझा.जाताजाता माझ्या प्रश्नाचे उत्तरही सोपे करून गेला.
मी लगेच तोच मेसेज मेल केला.

दूपारचे चार वाजलेले.साधारणपणे ऑफीस चालू असण्याची वेळ म्हणजे ॲटलिस्ट मेल तर पोहोचेल.
बघू काय होते.

आता एक समाधानाचा सुस्कारा सोडत ती दूसऱ्या कामाला लागली.
चहा मुलांची खाणी ,सोहमचा स्विमिंगचा क्लास आणि ऋशीचा स्केटींग क्लास. सगळे उरकून सातला आम्ही सगळेच घरी आलो.आल्याआल्या आधी मेल चेक केला
आणि जीव भांड्यात पडला.
प्रसादने एक मेल केला होता,
“उद्या खाली दिलेल्या नंबरवर फोन कर.”

दूसरा दिवस कधी उजाडतो ह्याचीच वाट पहात दिवस बूडाला होता.

दूसऱ्या दिवशी नेहमीपेक्षा जास्तच उत्साहात आशूची सकाळ उगवली.आज प्रसादशी फायनली बोलणे होणार ह्या विचारातच तिने घाईघाईत सगळी कामे उरकली. सुट्ट्यांमूळे मुलांच्या विविध मागण्या पूऱ्या करता करता जीव मेटाकुटीला येत होता नुसता.
श्रीला मात्र कितीही काहीही बनवा शेवटी रोजची पोळी भाजी भात वरण लागायचे. सगळ्यांचे सगळे नखरे पूरे करता वेळ कसा जात होता कळतच नव्हते.

आज तर मूलांनी पिझ्झाची डिमांड केली होती.मग काय मुलांचा पिझ्झा,श्रीची पोळी भाजी असे सर्व सांग्रसंगीत कार्यक्रम उरकत कधी मोकळी होते असे झाले आशूला. कारण अर्थातच प्रसादशी बोलायला मोकळा वेळ हवा होता तिला. खूप बोलायचे होते. तिच्या ट्रीपची मज्जा त्याच्याशी शेअर करायची होती.
त्याचेही खूप काही ‘अनकही बाते’ सगळ्याला वेळ तर हवाच होता.

हूश्श! एकदाची झाली बाई सुटका सगळ्या कामातून.
मूलेही आता टिव्ही पूढे बसून कारटुन चॅनेल बघता बघता पिझ्झावर ताव मारत होते.
आशूला काही ते लचके तोडणे आवडायचे नाही.
हो!लचकेच तोडणे.
किती ते चीझ चिकट आणि नंतर वात्तड होते अन् रबर खाल्लयागत लागते. थोडक्यात गोळा बेरीज काय तर पिझ्झा आशूला मुळीच आवडायचा नाही. मग तिने श्री साठी बनवलेल्यातली पोळी भाजीच खावून पोटपूजा उरकली.
श्री ऑफीसला गेला.तिलाही हवा तसा वेळ मिळाला तसा तिने प्रसादचा नंबर डायल केला पण परत एकदा त्याचा फोन स्विच्ड ऑफ..
” प्रसादला फोन का लागत नाहीये.कालही लागला नाही. “
काहीशा नाराजीनेच आशू मनातल्या मनात पुटपूटली.मन जरासे खट्टूच झाले.तेवढ्यात तिला कालचा मेल आठवला. एका नवीन नंबरचा त्यात उल्लेख केला होता प्रसादने.आणि उत्साहात तिने जूनाच नंबर डायल केला होता.

” अगं बाई! किती मी बावळट !”

स्वतःच स्वतःच्या मुर्खपणावर ताशेरे ओढत आशूने नवीन नंबर डायल केला.
“पण हा नवीन नंबर का? नंबर का बदललाय?”
तिकडे रींग जात होती आणि हिचे विचार काही थांबत नव्हते.
“असो,बोलल्यावर कळेलच.”
शेवटी एकदाचा फोन लागला.

“हॅलो ! कोण बोलतेय ?” इति प्रसाद.
ऑ ? आशूने आश्चर्यमिश्रीत प्रश्नांकीत भावनेनेच त्याला जवळपास ओरडूनच विचारले.
” अरे एऽऽ!! आता माझा आवाज पण विसरलास का ?
आशू बोलतेय.ओळख आहे की विसरलात मि. प्रसाद नगरकर..
उपरोधिक स्वरात आशू प्रसादला टोमणे मारत होती.
“अरेऽऽ ! तू होय !”
“सॉरी डिअर!”
“तुझ्या सॉरीच्याऽऽऽऽ काय चाललेय.? काय प्रकार आहे हा सगळा?
आणि जूना नंबर लागत का नाही? कितीदा कॉल केला मी.”
वैतागून आशूने भडास ओकली.

“अगं माझ्या सखेऽऽ. तूझे फायरींग थांबव आधी.”
“मला फक्त 10 मिनीट दे.जरा एक काम हातातले उरकतो आणि तूला मीच कॉल करतो.”
“You dnt know,how much I missed you.
wanna talk to you so much.just wait for some time.”

असे म्हणून फोन बंद केला. आशू अजुनच बुचकळ्यात पडली. एक महिन्यात किती जग बदललेय असे वाटायला लागले तिला.
पण वाट पाहण्याखेरीज पर्यायही नव्हता.

ठरल्या प्रमाणे बरोबर दहाव्या मिनटाला फोन खणखणला.
हो प्रसादचाच नविन नंबरहून फोन होता.
प्रसाद भेटल्यापासून तिने पाहिले होते की तो खूपच प्रॉम्ट होता शब्द पाळण्याच्या बाबतीत.
त्याचा हा एक गूण तिला खूप आवडायचा.
त्याने एखादी गोष्ट करतो म्हणला की तो ती करणार म्हणजे करणारच.

नाहीतर लोक शब्द देऊन पाळत नाहीत तेव्हा किती चीड येते ना ?
जेव्हा लोक कॉल करतो म्हणतात आणि करतच नाहीत.
किंवा खोटी प्रॉमिसेस,खोटे वागणे,खोटे बोलणे.

माणसांनी एकतर शब्द देऊ नये आणि दिलाच तर तो पाळावा.परंतु नेहमी आपल्या कामापुरता माणसांचा वापर करण्याच्या प्रवृत्तीतून मग असे खोटे वागणे बोलणे घडते. ह्या गोष्टींनी तात्पूरती वेळ निभते पण आयुष्यभराकरता लोकांचा विश्वास मात्र उडतो.
आणि मुख्य नुकसान हे की भविष्यात लोक नंतर तुम्ही कितीही खरे वागायचा बोलायचा प्रयत्न केलात तरी त्यावर ते विश्वास ठेवत नाही..
खरे ना !

(क्रमश:13)
®️©️राधिका कुलकर्णी.

प्रसादला इतके काय बरे सांगायचे असेल आशूला?
जाणून घ्यायला वाचत रहा वर्गमित्र चे पुढील भाग..

आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका.

धन्यवाद
@राधिका