
चेरी व्हॅनिला केक बनवायला अतिशय सोपा आहे आणि चविष्ट लागतो. बरोबर प्रमाणात जर सगळे जिन्नस वापरले, तर केक परफेक्ट स्पॉंजी आणि मऊ होतो.
चेरी व्हॅनिला केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
मैदा – २ कप
पिठी साखर – १ ५ कप
तेल – १/२ कप (कुठलेही वासाचे तेल टाळावे)
दूध – १/२ कप
बटर – १/२ कप
चेरी – आवडीनुसार
बेकिंग पावडर – १ टेबलस्पून
बेकिंग सोडा – १/४ टीस्पून
व्हॅनिला एसीन्स – १ टेबलस्पून (किंवा आवडीनुसार )

चेरी व्हॅनिला केक बनवण्याची कृती:
सर्वप्रथम सगळे वेट जिन्नस एकत्र मिसळून घ्यावे. त्यात प्रथम एका खोल भांड्यात बटर आणि तेल टाकावे. त्यानंतर पिठी साखर चाळून घ्यावी आणि बटर मध्ये मिक्स करावी. मिश्रण छान पैकी हलवून एकजीव करून घ्यावे. मिश्रणात गुठळ्या राहणार नाही याची काळजी घ्यावी.
त्यानंतर साखरेच्या मिश्रणात मैदा, बेकिंग पावडर , बेकिंग सोडा चाळणीने चाळून घेऊन मिक्स करावे. त्यानंतर त्यात व्हॅनिला एसीन्स टाकावे. त्यानंतर हळू हळू मिश्रणात लागेल तसे दूध घालावे आणि मिश्रण चांगले एकजीव करावे. मिश्रणास जास्त हलवू नये मिश्रणात परफेक्ट प्रमाणात दूध पडले कि एका स्प्याचुला च्या मदतीने विडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे ‘कट अँड फोल्ड ‘ मेथड ने मिश्रण मिक्स करावे.
केक च्या भांड्याला बटर पेपर लावावा आणि त्यावर थोडा तेल लावावं. त्यानंतर केकच्या भांड्यात मिश्रण टाकावे. त्यानंतर केकमोल्ड टॅप करावा, जेणेकरून मिश्रणात काही एअर बबल असतील तर ते निघून जातील. त्यानंतर त्यावर चेरी टाकावी.
केक ओव्हन मध्ये जर बनवत असाल तर ओव्हन १५ मिनिटे २०० °C वर प्रीहीट करून घ्यावे .ओव्हन प्रीहीट झाला कि मग केक बेक करण्यास ठेवावा (१८० °C वर साधारण ४५ मिनटांसाठी)
आणि कढई अथवा कूकर मध्ये बनवत असाल तर सेम प्रोसेस करावी. कढई अथवा कूकर (कूकर ची शिटी आणि रिंग काढून घ्यावी ) १५ मिनिटे झाकण लावून प्रीहीट करावा आणि त्यानंतर ४५ मिनिटासाठी केक बेक करून घ्यावा.
४५ मिनीटानंतर केक शिजला कि नाही हे चाकू अथवा टूथपिक ने चेक करावे.
चेरी व्हॅनिला केक तयार आहे. नक्की ट्राय करून बघा. खूप चविष्ठ होतो आणि लहानमुलांना तर विचारूच नका!!!! एका दिवसात फस्त होईल तुम्ही बनवलेला केक.

टीप : कुठलाही केक बनवताना , केकच्या ब्याटरची कॉन्सिस्टंसी महत्वाची असते केकचं मिश्रण जास्त पातळ असेल तर केक कच्चा राहण्याची शक्यता असते आणि केकचं मिश्रण घट्ट असल्यास केक बेक होताना त्याला भेगा पडून तो तुटू शकतो त्यामुळे केकचं मिश्रण परफेक्ट आहे हे कसं कळेल तर मिश्रण एका दुसऱ्या भांड्यात टाकताना त्याची शिडी (लैडर) पडते। असे परफेक्ट मिश्रण असेल तर कुठलाही केक स्पॉंजी आणि मऊ होतो
===============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.