Skip to content Skip to sidebar Skip to footer

चंद्र आहे साक्षीला

©️®️ गीता गरुड

नवराबायकोच्या भांडणाला जवाएवढं निमित्तही पुरेसं असतं.

तसंच झालं काहीसं.

क्षुल्लक गोष्टीवरनं दोघांमधे हमरीतुमरी झाली आणि सुरू झाला अबोला.

आधी कोण बोलणार? मीच का नेहमी नमतं घ्यायचं. तिला गरज असेल तर येईल बोलायला..तो विचार करी.

तर

बाईनंच नेहमी नमतं का घ्यावं. मीही नोकरी करते..त्याच्या बरोबरीने कमवते. मनात आणलं तर कधीही याला सोडचिठ्ठी देऊन एकटी राहू शकते. आजकाल स्त्रिया कोणत्याच गोष्टीत मागे नाहीत..हा तिचा विचार.

 दोघंही वेगवेगळा स्वैंपाक करुन जेवायचे. तिचा ती करायची. त्याचा तो. आताशा घरात भांडणं होतच नव्हती. ती बेडरुममधे तर तो हॉलमधे निजायचा.

त्याची आई आजारी म्हणून सासऱ्यांचा तिला फोन आला.  नेमका तो कुठेतंरी ऑफीस टुरवर..त्याला फोन लागेना. ती तशीच गेली सासरच्या गावी. सासूला तापाने उठताबसता येत नव्हतं.जाम अशक्तपणा आला होता. तिने आठवडाभर सासूची देखभाल केली. न्हाऊमाखू घातलं, खाऊपिऊ घातलं. याची टूर संपताच हा आला. याचे आईवडील कौतुक करत होते याच्या बायकोचं.

आता आम्हाला नातवंड आणा रे खेळवायला..सासू म्हणाली खरी..हिच्या डोळ्यात पाणी तरळलं, जे त्याच्या डोळ्यांनी हेरलं. त्याचेही डोळे डबडबले.

अरे झालं काय रडता कशाला?आईवडिलांनी विचारलं.

बोलत नाही आम्ही एकमेकांशी. चार महिने उलटले. तो म्हणाला. ती अधिकच स्फुंदू लागली तसं त्याच्या वडिलांनी नजरेनेच त्याला खूण केली तो तिच्याजवळ जाऊन बसला नि तिच्या पाठीवर हात फिरवू लागला..डोळ्यातल्या अश्रुंवाटे नात्यातला कचरा दूर झाला. सासूसासऱ्यांचा विचार न करता तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं व हमसू लागली.

सासू म्हणाली..अरे पोरांनो किती प्रेम करता एकमेकांवर! भांडणं ती व्हायचीच नवराबायकोंत म्हणून काय हाडवैऱ्यासारखं वागायचं. जा बघू निजा जा.

त्या रात्री गुलाबी मिठीत दोघांतले मतभेद दूर झाले. पुन्हा भांडलो तरी असा जीवघेणा अबोला धरायचा नाही, दोघांनी चंद्राच्या साक्षीने कबुल केलं.

===================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: