चांदबीबी – दक्खनची लढवय्यी राणी….!

१. कोण होती चांदबीबी ?
chand bibi mahal: दक्खनची राणी म्हंटल कि आपल्यासमोर अनेक राण्यांची नावे येतात. ‘ मेरी झांसी नाही दूंगी…’ असं म्हणाऱ्या राणी लक्ष्मीबाई,पुण्यशोक अहिल्याबाई होळकर,राजमाता जिजाऊ,ताराराणीसाहेब अशा अनेक राण्या पण यामध्ये ‘सुलतान चांदबीबी ‘ यांचं नाव लोक अजूनही अग्रस्थानी घेतात. चांदबीबी ही अहमदनगरच्या हुसेन निजामशहाची मुलगी आणि अहमदनगरचा सुलतान बुऱ्हाण निजामशहा याची बहीण.म्हजेच चांदबीबी एक मुस्लिम भारतीय योद्धा होती. चांदबीबी एक योद्धा तर होतीच पण त्याचबरोबर एक उत्तम भाषातज्ञ ही होती चांदबिबीला मराठीबरोबर बऱ्याच भाषा अवगत होत्या.
अरबी,पर्शिअन,तुर्की,कन्नड,हिंदी आणि मराठी अशा भाषा अवगत होत्या,त्याचबरोबर चांदबीबी एक उत्तम सतारवादकही होती.एक कलाकार म्हणूनही चांदबीबी कमी पडली नाही विविध पक्ष्यांची,फुलांची चित्रे काढायला चांदबिबीला आवडत असे.ज्यावेळी चांदबीबी वीणा वाजवत त्यावेळी त्यांचे हात वीणेवर अशा पद्धतीने फिरायचे जसे कि त्यातून सगळ्या आसमंताला मंत्रमुग्ध करणारे सूर बारसायचे. राजकीय सल्लागार म्हणूनही चांदबिबीचा नावलौकिक होता.अत्यंत हुशारीने संकटाचा सामना करण्याचं कसब सुलतान चांदबीबी यांच्यात होते. इ.सन १५९६ ते १५९९ पर्यंत त्या अहमदनगरच्या रिजेंट होत्या.
२. चांदबिबी आणि अली आदिलशहा
चांदबिबीचा विवाह विजापूर सल्तनतच्या पहिल्या अली आदिलशहा याच्याशी झाला सुलतान आदिलशहा एक श्रीमंत आणि प्रसंगपूर्वक जीवन जगणारा धर्माभिमानी मुसलमान होता.चांदबीबी सारखी कत्रबगार स्त्री आपली बायको आहे याचा सुलतान आदिलशहाला अभिमान होता. तरीही विजापूर सल्तनतची राणी म्हणूनही चांदबिबीने कार्यभार सांभाळला.आपल्या पतीबरोबर शिकारीला जाणेही चांदबिबीला पसंत होते. याच दरम्यान म्हणजे इ.सन १५८० ते १५८६ या दरम्यान आली आदिलशहा याच्याशी विवाहबद्ध झाल्यापासून ते आदिलशहाच्या मृत्यू पर्यंत चांदबीबी यांनी विजापूर सल्तनत च्या रिजेंट म्हणून कार्यभार सांभाळला.
३. चांदबिबीच्या कार्यकाळाचा आढावा
४. चांदबीबी ने गाजवलेले पराक्रम
घोडेस्वारी लहानपणापासूनच अवगत असल्यामुळे चांदबीबी आली आदिलशहा यांच्याबरोबर युद्धामध्ये सामील व्हायची. युद्धकौशल्यामध्ये निपुण असल्याने चांदबिबीच्या नावावर असे खूप पराक्रम आहे. इ.सन १५६४ साली चांदबीबी अली आदिलशहा पहिला याच्याशीही विवाहबद्ध झाल्यानंतर विजापूर सल्तनत ला बहुमोल अशी मदत केली. अली आदिलशहा आणि चांदबीबी आपल्याला मूल होऊ शकत नाही म्हणून अली आदिलशहा यांचा पुतण्या असलेल्या इब्राहिम आदिलशाह याला तख्तावर बसवण्यात आले.
नऊ वर्ष वय असलेला इब्राहिम गादीवर बसला खरा पण विजापूरचा सगळा कारभार चांदबीबी अगदी नेटाने पाहत असे.स्वतः न्यायनिवाडा ती करत असे म्हणूनच अगदी अल्पावधीतच चांदबीबी विजापूरच्या रयतेच्या मनात घर करून राहिली.पुढे मग १५८२ साली बंडखोर सरदार किश्वर खान याने चांदबिबीला कैद करून साताऱ्यात असलेल्या किल्ल्यात ठेवले,पण तिच्याच सैन्याने चांदबिबीची सुटका केली.
हेही वाचा
गड आला पण सिंह गेला” असे उद्गार शिवाजी महाराजांच्या तोंडातून का निघाले
जाणून घ्या सप्तशृंगी मातेच्या मुखात पानाचा विडा का ठेवला जातो
चांदबीबी विजापुरात नसल्याने किश्वर खान याच्या शासनाखाली सर्व विजापुरात झोटिंग बादशाही माजली होती त्यावेळी विजापुरात सर्व अमीर,उमराव सर्वांनी किश्वर खानाला पिटाळून लावले आणि साताऱ्यातुन चांदबिबीला परत आणले आणि त्याकाळात झालेली सगळी बंडे मोडून काढली आणि आदिलशाहीला परत किश्वर खानाच्या जाचातून सोडवले. आपला जोडीदार म्हणजेच अली आदिलशहाचा मृत्यू झाल्याने परत चांदबीबी अहमदनगर म्हणजे आपल्या माहेरी परतली,ते साल होतं १५८४-८५ अहमदनगरला येऊनही बंडाळी माजली गेली असल्याने चांदबीबी परत विजापुरास गेली.
मुरादच्या नेतृत्वाखाली मोगल सैन्य पुन्हा नगरवर चालून आले त्यावेळी निजामी सरदारांनी चांदबिबीला परत बोलावले बहादुरशहा निजामाचा पक्ष घेऊन मोगल सैन्याशी चांदबीबी निकराने लढली….त्यावेळी मुरादच्या सैन्याने किल्ल्याला एक मोठे भगदाड पाडले त्या खिंडारामधून सैन्य किल्ल्यामध्ये येऊन किल्ला ताब्यात घेणार पण चांदबिबीला याची खबर लागताच एका रात्रीमध्ये किल्ल्याच्या पडलेल्या खिंडाराची डागडुजी करून ते बुजवून टाकले. बुजवलेले खिंडार पाहून मुघल सैन्याला किल्ल्यामध्ये शिरकाव करण अशक्य झालं सैन्याला खबर झाली कि आपला शत्रू सावध आहे चांदबिबीचा सावध पवित्रा पाहून मुघल सैन्य मागे फिरलं आणि चांदबिबीची फत्ते झाली.चांदबिबीने दाखवलेल्या या साहसी पराक्रमामुळे मुघल असलेल्या मुरादनें चांदबिबीला ‘सुलताना चांद’ हा किताब दिला.
६. अहमदनगर साम्राज्य
सन १५८५ मध्ये अहमदनगर आणि विजापूर येथील बादशहाचा पुन्हा शरीरसंबंध जोडण्याचा योग आला म्हणजेच चांदबिबीचा भाऊ मुर्तिजा निजामशहा व इब्राहिम आदिलशाहची बहीण खुदीजा बेगम यांचा निकाह त्यावेळी ठरवण्यात आला.हे लग्न उरकून राहिलेले आपले आयुष्य स्वस्थपने ईश्वराची सेवा करण्यात घालवावे अशी तिची इच्छा होती.परंतु त्याचवेळेस नगर येथील दरबारात कलह सुरु झाले होते.चांदबीबी मात्र नगरच्या या परिस्थितीला कंटाळून पुनः विजापूरला गेली.
तिथे गेल्यावर चांदबिबीचा सत्कार विजापूरच्या रयतेने केला.पण नगरमध्ये मात्र राज्यक्रांती होऊन रक्तपात व मारामाऱ्या चालू झाल्या अखेरीस मुर्तिजाचा पुतण्या बहादुरशहा याला सिंहासनावर बसवण्यात आले. त्यावेळी मियाँ मंजू नावाचा एक मुत्सद्दी पुढे आला व त्याने अहमदशहा म्हणजेच मुर्तिजाचा मुलगा असलेल्या शहजादा अहमदशहा याही बाजू उचलून धरली. पण मुघल सैन्य ज्यावेळी अहमदनगरवर चाल करून आले त्यावेळी मियाँ मंजू या मुत्सद्द्याचे डोळे उघडले आणि अमीर उमरावांचा सल्ला घेऊन चांदबिबीला परत नगरमध्ये बोलावण्याचे प्रयोजन आखले. आपल्या वडिलांच्या साम्राज्याची विस्कटलेली घडी पाहून उदार अंतःकरणाने राज्यकारभाराची घडी पुन्हा व्यवस्थित बसवण्याचे मान्य केले आणि राज्यसूत्रें आपल्या हातात घेतली. तिथल्या सर्व सैनिकांना हाताशी घेऊन किल्ल्याची तटबंदी ठीकठाक केली.
चांदबिबीच्या येण्याने मुरादची नजर परत दक्खनमध्ये असलेल्या नगरवर पडली त्यावेळी चांदबिबीच्या शूर-वीरतेने मुरादनें चांदबिबीला ‘ सुलतान चांद ‘ हा किताब देऊन सन्मानित केले. ही घटना १५९६ मध्ये घडली आहे. त्यानंतर मात्र चांदबीबी मुघलांना फितूर झालीय असा गैसमज तिच्याच सहकाऱ्याने निजाम सरदारांमध्ये पसरवला आणि त्याच वेळी चांदबिबीला एकटीला घेरून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मात्र मुघलांनी या परिस्थितीचा फायदा उचला आणि अहमदनर साम्राज्याची सत्ता आपल्या हातात घेतली. तिथेच मग निजामशाही संपुष्टात आली.
७. सलाबतखान कबर/चांदबिबीचा महाल
सलाबतखानच्या थडग्याला चांदबीबी महाल असे संबोधले जाते. तर या ठिकाणी सलाबतखानची कबर असून आता हा महल चांचबीबीचा महाल म्हणून ओळखला जातो.सलाबतखानाचे दुसरे थडगे या महालावर असलेले आपल्याला दिसत.महाराष्ट्राच्या अहमदनगर शहरापाऊसन १३ किलोमीटर अंतरावर टेकडीच्या कळसावर ही दगडी रचना आपल्याला दिसते. इमारत अष्टकोनी असून किल्ल्याच्या भिंतींना दगडी छिद्रे आहेत जेणेकरून सूर्यप्रकाशाची किरणं महालात जाऊन महालाचा अंतरभाग प्रकाशित होत असे . अशाप्रकारची रचना महालाची असे.
सलाबतखान आणि त्याच्या पत्नीची कबर अष्टकोनी तळघरात आहे.सलाबत खान दुसरा हा चौथा निजामशाहाचा मंत्री होता आणि मुर्तझा जो १५६५ मध्ये सिंहासनावर बसला होता.तर सलाबत खानला १५७९ मध्ये मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते.ही कबर सलाबतखानची कबर म्हणूनही ओळखतात.
८. चांदबीबी महल रचना
चांदबीबी महाल हा अहमदनगर शहरापासून १३ किमी अंतरावर आहे. सलाबतखानची कबर किंवा यालाच आजूबाजूच्या स्थानिक रहिवाशांनी चांदबिबीचा महाल असे नाव दिले आहे. हा महाल निजामशाही वास्तुकलेचा एक उत्कृष्ट असा नमुना आहे. हि वास्तू अष्टकोनी असून चारही बाजूनी हवेशीर असलेले हे ठिकाण आहे. वास्तूची रचना अशी केली होती कि जेणेकरून उन्हाळ्यामध्येही या ठिकाणी हवेशीर आणि प्रसन्न वाटले पाहिजे. अशा पद्धतीने वास्तूची रचना केली होती. जमिनीपासून चांदबिबीचा महाल हा ९०० फूट उंचीवर शाह डोंगरावर वसलेला एक टॉवर प्रमाणे भासतो. तरीही या वास्तूची अशी तीन खास वैशीष्ट्येय आहे. ते म्हणजे अष्टकोनी प्लॅटफॉर्म,टोकदार कमानी आणि महालाची गॅलरी.
पर्यटकांसाठी खूप आकर्षक असणार हे ठिकाण आहे.४ मार्च १९०९ रोजी हा महाल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.
९. चांदबीबी महालासंदर्भात विचारले जाणारे प्रश्न | FAQ
प्रश्न १: चांदबीबी महाल कुणी बांधला?
उत्तर – दुसरा सलाबत खान याने हा महाल बांधला.
प्रश्न २) महालावर पाण्याची सोय आहे का?
उत्तर – चांदबीबी महाल असलेल्या ठिकाणावर दोन तलाव आहेत. महालात तळघरात जाताना पायऱ्या उतरल्यानांतर दोन्ही बाजूना कोनाडे आहेत.त्यापैकी डाव्या बाजूच्या कोपऱ्यात छिद्रे असून त्यात पाण्याची सोय केली गेली आहे.निजाम काळात खापरी नळाने पाण्याची सोय केलेली होती.
प्रश्न ३) महालाची रचना इतक्या उंचीवर करण्याची कारणे?
उत्तर – महालाची रचना उंच करण्यात आली याचे कारण म्हणजे अहमदनगर चे हवामान उष्ण आणि कोरडे असून या हवामानापासून थोडा दिलासा मिळावा म्हणून महालाची रचना उंचीवर करण्यात आली.
=================