
शर्मिला आपल्या वडिलांची खूप लाडकी मुलगी…पाच वर्षांची असताना आपल्या आईच्या मायेला पोरकी झालेली तेव्हापासूनच आपली आईची उणीव वडीलच भरून काढत असे…वडील गणपतराव पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत असल्याने पाहिजे तितका वेळ शर्मिलाला देऊ शकत नसे..कारण आपल्या मुलीचं स्वप्न त्यांना सार्थक करायचं होत. नातेवाइकानी तर आधीच पाठ फिरवली होती…त्यामुळे आर्थिक मदतीसाठी कुणाचाच पुढाकार नव्हता..शर्मिलाच्या नावे गणपतरावानी फिक्स्ड डिपॉसिटी वर काही रक्कम जमा केली होती…अगदी लहानपणापासूनच सगळ्या गोष्टीचे व्यवस्थित असे प्लांनिंग त्यांनी करू ठेवले होते…शर्मिलाही लहानपणापासून खूप चुणचुणीत आणि हुशार होती…वर्गात नेहमी पहिला नंबर शर्मिलाने कधीच चुकवला नव्हता…शिष्यवृत्तीही नेहमी मिळत असे…म्हणून वरचेवर १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची चन चन गणपतरावाना भासली नाही…हळू-हळू उच्च शिक्षणासाठी पैशाची चन-चन भासू लागली…तरीही खचून न जाता गणपतरावानी सरकारी नोकरीच्या आधारे कर्ज काढलं… वडिलांच्या आपल्या मुलीबद्दल आशा-अपेक्षा वाढू लागल्या…आपल्या मुलीने संसाराच्या रहाटगाडग्यात पडून न राहता चांगलं नाव कमवाव एखादी मोठी ऑफिसर व्हावं असं गणपतरावाना मनापासून वाटत असे…आणि शर्मिलाही शिक्षणासाठी खूप मेहनत घेत होती…रात्रीचा दिवस करत होती..खूप मेहनतीनंतर शर्मिलाला सरकारमान्यताप्राप्त असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला…गणपतरावांना तर आकाश ठेंगणे झाले होते…आनंदाची बातमी कळताच आपल्या पोस्ट ऑफिस मध्ये शर्मिलाचा सत्कार करायचं ठरवलं…शर्मीलानेही आपल्या यशाचं श्रेय वडिलांनाच दिल म्हणून गणपतरावांना कृतकृत्य झालं…काही दिवसांनी शर्मिलाचं घर आणि कॉलेज असं खूप मस्त ट्युनिंग जमलं…संपूर्ण कॉलेज मधेही शर्मिलाने पहिला नंबर कधीच सोडला नाही…असाच पहिला नंबर कायम ठेवला आणि कॉलेजच्या फलकावर आपलं स्वतःच तर नाव झळकवलच शिवाय वडिलांचही नाव अगदी अभिमानाने झळकावले…
असेच दिवसामागून दिवस जात होते….शर्मिला आता आपल्या शेवटच्या वर्षाची पदवी मिळवणार होती तेही विशेष प्राविण्य म्हणून तिचा कॉलेज मध्ये वडिलांसमवेत गौरव होणार होता…वडीलही आपल्या लेकीला मस्तपैकी बक्षीस देणार होते…तेही गणपतरावांनी लेकीला सुखद धक्का देण्याचं ठरवलं…म्हणून हि बातमी त्यांनीही फोडली नाही…घरी आल्यावर…
गणपतराव – शर्मे…अगं शर्मे…डोळे उघडू नकोस…थांब इथं दारातच…
शर्मिला – हो…बाबा…नाही उघडत…आत्तापर्यंत पाळला न तुमचा शब्द…मग आत्ता नाही का पाळणार ?
गणपतराव – अगं…बेटा…तेवढा विश्वास आहे ग तुझ्यावर….[गणपतराव आरतीचं ताट घेऊन येतात]
शर्मिला – बाबा…झालं नाही का अजून…
गणपतराव – हम्म…बेटा उघड आता डोळे…!
शर्मिला – हे…हो काय बाबा…आरतीचं ताट…कशाला एवढं सगळं केलंत…
गणपतराव – बेटा….असू देत…तुझी आई असती तर मीठ-मोहरीने दृष्टच काढली असती ..माझ्याच्याने एवढं झालं
शर्मिला – बाबा…तुम्ही खूप केलंत माझ्यासाठी…आत्ता तुमचं बसून खाण्याचं वय आहे…आत्ता मात्र तुम्हाला माझं म्हणणं ऐकावच लागेल…
गणपतराव – बरं…आत्ता ऐकेल तुझं..पण तुलाही आत्ता परत डोळे बंद करावे लागतील…एक सर्प्राईस आहे तुझ्यासाठी…
शर्मिला – म्हणजे अजून काहीतरी आहे माझ्यासाठी…ठीक आहे करते डोळे बंद…[शर्मिला डोळे बंद करते आणि बाबा शर्मिलाला आतल्या माजघरात घेऊन जातात]
गणपतराव – उघड बरं…डोळे…आणि सांग कसं वाटलं सर्प्राईस…
शर्मिला – अय्या…बाबा तुम्हाला किती हो माझ्या मनातलं कळत….लॅपटॉप……खरंच बाबा…तुम्ही ग्रेट आहात….
लॅपटॉप पाहून शर्मिला खूपच खुश होते…आणि लगेच आल्या-आल्या वडिलांबरोबर सेल्फी काढते आणि लॅपटॉप वर …लगेच डेस्कटॉप स्क्रीन वर अपलोड करते…हे पाहून वडील गणपतराव हरखून जातात…शर्मिला म्हणते…
शर्मिला – बाबा…दोन दिवसांनी मला एका मुलाखतीला जायचंय…कॅम्पसथ्रूच आहे इंटरव्यू…पाहुयात काय होतंय ते…
गणपतराव – काय होणार…तुझीच निवड होणार..यात काहीच वाद नाहीय..
शर्मिला – तुमचे आशीर्वाद असल्यावर काहीही शक्य आहे…
गणपतराव – ते तर आहेच ग पोरी …बाकी बापाच्या नावाला बट्टा लावण्यासारखं कृत्त्य करू नकोस हा…
शर्मिला – मी स्वतःशी आणि तुमच्याशी सदैव प्रामाणिक राहूनच आपलं काम करणार आहे…तुम्ही अगदी निश्चिन्त राहा…
दोन दिवसांनी शर्मिला मुलाखतीला सामोरी जाते…यशस्वीरीत्या आपली मुलाखत पार पाडते आणि परत दोन दिवसांनी ऑफिस जॉइंन करते…अगदी आनंदात घर ते ऑफिस असं शर्मिलाचं रुटीन चालू असत…सुरुवातीला शर्मिलाला पाच आकडी पगार असतो…म्हणून घर आणि वडिलांचा पगार असं व्यवस्थित मॅनेज होत असत…वडिलांच्या डोक्यावर कर्ज असल्याने ते फेडण्यासाठीही शर्मिलाचा मोठा आधार मिळत असे म्हणून एकूणच परिस्थिती हळू-हळू सुधारत होती…शर्मिलाची ऑफिसमध्येही पोस्ट वाढत होती आणि पगारही…पगार वाढला कि कामाचा व्यापही वाढत असे…गणपतरावही वय झाले असल्याने थकत चालले होते…म्हणून घरी कामासाठी नोकर येत असे…हळू-हळू घरचेही रूप पालटले…
नोकरीच्या २ वर्षांतच शर्मिलाने सिविल सर्विसेस ची परीक्षा द्यायचं ठरवलं आणि त्यासाठी यंदाच्या वर्षीचा अर्ज देखील भरला. शर्मिलाने दिवस रात्र एक करून अभ्यास केला कारण पुढले कित्येक वर्ष तिला परीक्षा देण्यात वाया नव्हती घालायची आणि तिने कष्ट केल्याचं फळ तिला मिळालंच . पहिल्याच प्रयत्नात शर्मिला आय. ए. एस. ऑफिसर झाली… जवळपास एक वर्ष मसुरी मध्ये ट्रैनिंग मिळाल्यावर शर्मिला हिमाचल प्रदेशात पहिले डेप्युटी कलेक्टर म्हणून रुजू झाली आणि त्यानंतर ६ महिन्यांनी कलेक्टर. प्रशस्त असा बंगला तिला शासनाच्या वतीने देण्यात आला होता. आपल्या वडिलांसोबत दोघेही नवीन घरात स्थिर स्थावर झाले होते…गणपतरावानी स्वेच्छानिवृत्ती घेतली म्हणून त्यांना पेन्शन मिळत असे …हळू-हळू एकाकीपणा गणपतरावाना नकोसा वाटू लागला.. …म्हणून रोज सकाळी मॉर्निंग वॉक साठी जात असे…तिथेही गणपतरावांचा जुना मित्र त्यांना भेटतो…म्हणून एक विरंगुळाचं त्यांना मिळाला होता…एका सकाळी असेच दोघे मित्र गप्पा मारत बसले होते…गणपतरावही आपल्या लेकीचं कौतुक सांगत होते ….
गणपतराव – अरे…यशवंता…माझ्या पोरीनं बाकी नाव कमावलं माझं…कसली म्हणजे कसली कमी करत न्हाई माझी लेक…सगळं दिल मी तिला पण…आई नाही देऊ शकलो…
यशवंतराव – मग…काय या वयात लग्न करायचं आहे कि काय तुला…
गणपतराव – काहीही काय बोलतोस…या वयात कोण मला मुलगी देणारे…
यशवंतराव – अरे…मग मुलीचं लग्न झाल्यावर एकटा राहून काय करणार….मुलगी ती मुलगीच…कितीही म्हटलं तरी परक्याचे धन…
गणपतराव – यशवंता…अरे…लग्नासाठी मीही खूप तगादा लावलाय….पण शर्मीच म्हटली लग्न इतक्यात नको म्हणून…नवऱ्याचं करण्यापेक्षा वडिलांचं करण्यात खूप सुख वाटत मला…शेवटी नवरा तो नवराच…
यशवंतराव – बघ…पोरगी आत्ताच तुझ्या म्हणण्याला किंमत देत नाहीय…मग पुढं कसा काय सांभाळ करेल तुझा?
गणपतराव – [गणपतरावांचा फोन खणाणतो] हॅलो….हा…हा…शर्मे निघतो आलोच मी…येतच होतो अगं….अरे यशवंता निघतो मी…शर्मी वाट पाहतेय माझी…चल येतो…उद्या भेटू परत…
गणपतराव आपल्या मित्राचा घाई-घाईने निरोप घेऊन निघतात…पण घरी येत असताना मित्राचं बोलणं खूप मनाला लागत त्यांच्या…तेही मनातल्या मनात विचार करत घरी येतात …‘खरंच आपल्याला आपली शर्मी पुढे जाऊन किंमत नाही देणार…‘ म्हणून गणपतरावानी लेकीचा लॅपटॉप नकळत पाहिला…मेन स्क्रीन पाहून गणपतरावाना आश्चर्यच वाटले…ते मनातल्या मनात विचार करू लागले ” मेन स्क्रीनवर आम्हा दोघांचा फोटो होता पण आत्ता त्याजागी भलताच फुलांचा फोटो दिसतोय…खरंच शर्मी मला विसरली तर नाही ना..” अशा विचारांनी गणपतरावांच्या मनांत काहूर माजलं होत…म्हणून दुसऱ्याच दिवशी शर्मिलाला न कळवताच गणपतराव तिच्या ऑफिसमध्ये गेले…आपल्या लेकीला एक प्रशस्त कॅबिन मध्ये पाहून त्यांची छाती गर्वाने फुगली होती…पण कुठेतरी भीतीही वाटत होती…‘खरंच आपली मुलगी आपल्याला किंमत देईल ?’
थरथरत्या…हातात एक पिशवी आणि डोळ्यावरील चष्म्यात लपवलेले आपले अश्रू…घेऊन गणपतराव आपल्या मुलीच्या बाजूला जाऊन उभे राहिले …आणि शर्मिलाच्या डोक्यावर आपला हात ठेऊन एक प्रश्न विचारला..” शर्मिला…या इथे तुला आत्ता सगळ्यात श्रेष्ठ कोण वाटतंय…”? तितक्याच हजरजबाबी असलेल्या शर्मिलाने उत्तर दिले, ” बाबा…अर्थातच मीच आहे इथे श्रेष्ठ…” गणपतरावानी डोळ्यातले अश्रू खूप कष्टाने लपवले आणि त्यांना वाटणारी भीती खरी ठरली असं भासलं…दोन मिनिटांनी गणपतराव कॅबीनच्या दरवाजापाशी येऊन थांबले आणि तोच प्रश्न परत आपल्या लेकीला गणपतरावानी केला…” शर्मिला आत्ता सांगणार…कोण श्रेष्ठ आहे इथे?” शर्मिलाने परत तितक्याच तत्परतेने उत्तर दिले…” आत्ता मात्र श्रेष्ठ तुम्ही आहात…!” गणपतरावांना आश्चर्य वाटलं आपल्या मुलीचं उत्तर ऐकून आणि शर्मिलाला म्हणाले…” ते कसं काय मी कसं काय श्रेष्ठ? ” शर्मिला चेहऱ्यावर स्मितहास्य करत म्हणाली…” बाबा…थोड्यावेळापूर्वी मी स्वतःला श्रेष्ठ म्हणाले…कारण तुमच्या आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावर होता…पण आत्ता तुम्ही तो उदंड आशीर्वादाचा हात काढून घेतलाय मग मी श्रेष्ठ कशी असू शकेल…श्रेष्ठ तर तुम्हीच असाल ना…तुम्ही माझ्यासाठी नेहमी श्रेष्ठ होतात…श्रेष्ठ आहात..आणि श्रेष्ठ इथून पुढे तुम्हीच असणार…मी नाही…तुमच्या आशिर्वादाशिवाय मी काहीच नाहीय…”
आपल्या मुलीच्या उत्तराने…गणपतरावानी एवढा वेळ लपवलेले डोळ्यातले पाणी…परत त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागले आणि मुलीच्या नजरेत अजूनही आपली किंमत आहे याची जाणीव त्यांना झाली…प्रतिष्ठा…पद याच यत्किंचित गर्व मुलीला नाहीय याच समाधान गणपतरावांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होत…यातच आपलं सार्थक झालं..असं गणपतरावाना वाटू लागलं…आणि अभिमानाने त्यांचा चेहरा परत टवटवीत झाला…
===============
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.
2 Comments
Archana waikar
कथा खूप सुंदर आहे. मी तुमची कथा जर लाईव्ह सादर केली तर चालेल का?
RitBhatमराठी
Hi,
Mi tumhala personally tumchya email id var reply kela ahe. Please check.