Skip to content Skip to sidebar Skip to footer

Bitcoin : जाणून घ्या बिटकॉईन म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? (bitcoin in marathi)

जाणून घ्या बिटकॉईन म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? | bitcoin in marathi

क्रिप्टोकरन्सी म्हणजे अगदी साध्या सोप्या शब्दात मांडायच झालं तर आभासी चलन(virtual currency). आता याला आभासी अस का म्हणायचं तर यामध्ये मुळात कुठलाच physical म्हणजे प्रत्यक्षात चलनाची देवाणघेवाण होतच नाही. चला तर बघू या हे बिटकॉइन , क्रिप्टोकरन्सी ह्या संकल्पना म्हणजे नक्की काय? (bitcoin in marathi) आणि ह्या कशा अस्तित्वात आल्या.  

 

1. नोटबंदी आणि भारतात अस्तित्वात आलेला डिजिटल व्यवहार | Demonetization

८ नोव्हेंबर २०१६ ..दिवस आठवतो आपल्याला? “आज रात्री ८ नंतर ५०० &१००० रुपयांच्या नोट चलनातून वगळण्यात येतील” भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी एकदम ही घोषणा करून आपल्या सर्वसामान्यांना दिलेला धक्का. आता नियोजन काय होत? त्यांचे परिणाम काय झाले? हा दुसरा चर्चेचा विषय झाला. पण हा दिवस आणि ही घोषणा आपल्या सामान्यांच्या कायम लक्षात राहिली. आणि त्यानिमित्ताने या घोषणेचे त्वरित दिसणारे परिणाम सामोरे यायला लागले.सर्वसामान्य भारतीय नागरिक बँकेत नोट बदलून घेण्यासाठी रांगेत थांबलेले दिसून येऊ लागले.अर्थव्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला दिसून येऊ लागला.ठिकठिकाणी वादाचे प्रसंग घडून येताना दिसू लागले.आणि आपल्या गप्पांमध्ये चलनावर पर्याय हा विषय आवडीने चर्चिला जाऊ लागला.

सरकारने BHIM UPI सारखे पर्याय देऊन डिजिटल व्यवहार करण्यास चालना दिली. आणि हळू हळू जी गर्दी बाहेर ए. टी. एम. समोर दिसू लागली ती थोडी थोडी कमी व्हायला लागली. पण या डिजिटल व्यवहारांमुळे येणारी सुलभता पाहून सामान्य माणूस इतर पर्यायांचा शोध घेऊ लागला.आणि आणखी एक नाव ऐकिवात येऊ लागलं ते म्हणजे बिटकॉइन (bitcoin).

 
2. बिटकॉईन म्हणजे काय? | bitcoin in marathi

Bitcoin ही एक क्रिप्टोकरन्सी आहे. क्रिप्टोकरन्सी म्हणजे अगदी साध्या सोप्या शब्दात मांडायच झालं तर आभासी चलन(virtual currency). आता याला आभासी अस का म्हणायचं तर,यामध्ये मुळात कुठलाच physical म्हणजे प्रत्यक्षात चलनाची देवाणघेवाण होतच नाही. जे काही चलन आहे ते डिजिटली होत. यामध्ये आपले रुपये हे जस एक देवाणघेवणाचे चलन आहे तसाच फक्त आभासी चलनात व्यवहार होतो. म्हणजे हे चलन रुपया, अमेरिकी डॉलर, ब्रिटिश पौंड सारखं असतं नाही.हे फक्त व्हर्चुअल चलन आहे. कोणत्याही देशाचं सरकार हे चलन डीस्ट्रीब्युट करत नाही, किंवा छापत नाही.हे फक्त डिजिटली उपलब्ध असतं.आज जगभरात जसे डॉलर,रुपया सारखी चलन आहेत तसेच जगात बिटकॉईन सारखी वेगवेगळी क्रिप्टोकरन्सी सुद्धा आहेत उदा. रीपल, इथेरियम, लाईटकॉइन, झेडकॅश.

बिटकॉइन हे फक्त डिजिटल वॉलेट मध्ये साठवता येत.त्याला कोड चा वापर करून encrypt केलेलं असतं म्हणजेच लॉक केलेलं असतं. ज्याप्रकारे आपण बँकेतून नोटा मिळवतो तसाच हे चलन आपण आपल्या पैश्याच्या मध्मातून ऑनलाइन विकत घेऊ शकतो.आणि ते आपल्या क्रिप्टो च्या वॉलेट मध्ये साठवणूक करता येते. अशी वेळोवेळी खरेदी केल्यानंतर एक नवा ब्लॉक तयार होतो आणि यालाच मयनिंग अस म्हणल जात. आणि या साठवणुकीच्या पद्धतीला ब्लॉक चैन अस सुद्धा म्हणतात. ब्लॉक चैन म्हणजे असे क्रिप्टोकरन्सी चे साठवलेले ब्लॉक. पुढे ते सविस्तरपणे सांगितलेलं आहे.जितके जास्त व्यवहार या ब्लॉक चैन माध्यमातून होतील तितकी जास्त ब्लॉक बनतील आणि अधिक मायनिंग होईल.

२०२० पर्यंत कित्येक सुपरमार्केट चैन, मोठ्या दुकानदारांनी बिटकॉइन व्यवहारांना मान्यता दिली आहेच. भारतात इन्फोसिस पिनाकल या कंपनीने ब्लॉक चैन मध्मतून व्यवहार करण्यासाठी ११ बँकेसोबत प्रायोगिक तत्त्वावर करार केला आहे. शेअर बाजारांवर ज्या प्रकारे नियमन संस्थांच लक्ष असतं .चालवणारे संस्था वेगळे असतात पण इथे अस असतं नाही. बिटकॉइन व्यवहार ऑनलाइन चालतात आणि त्यावर इतर कोणाचं नियंत्रण असतं नाही.हा व्यवहार फक्त त्या दोन व्यक्तींमध्ये ब्लॉक चैन मधमातून होतो.या मध्ये कुठलाही मध्यस्थी किंवा तिसरी व्यक्ती असतं नाही. 

बिटकॉइनचेदोन प्रकार आहेत,एक म्हणजे क्लासिक बिटकॉइन(BCT) आणि दुसरा म्हणजे हार्टफोर्ड बिट कॉइन कॅश (BCH). यामध्ये BCT चा वापर नियमितपने अगदी सर्रास केला जातो.

3. बिटकॉईन आणि डिजिटल व्यवहार आणि त्याचे फायदे | Benefits of Bitcoin

जेव्हा एखादा मोठा व्यवहार आपल्याला करायचा असतो उदा. घर विकत घेत आहात किंवा सोने इत्यादी, अशा वेळी एक मोठी रक्कम आपल्याला बाळगावी लागते.जे काही प्रमाणात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोकादायक आहे. अगदी ऑनलाइन व्यवहार सध्या करत असलो तरी त्यावर सुद्धा वेगवेगळे खर्चाचे बंधन आढळून येतात.एक मर्यादा ओलांडल्यानंतर बँक काही प्रमाणात शुल्क आकारत असते. पण समजा आपल्याला या कसल्याच गोंधळाची गरजच नाही पडली तर? फक्त एक ट्रान्स्फर आणि तुमचा व्यवहार पूर्ण. ऑनलाईन बँकिंग मध्ये येणाऱ्या सर्व्हर डाउन चा प्रॉब्लेम नाही की अतिरिक्त शुल्क आकारणी नाही, अगदी 24 तास कधीही कुठेही व्यवहार. कुठे ब्लॉक होणार नाहीत ,दोघांपैकी कोणाला अतिरिक्त शुल्क भरायला लागणार नाही आणि सगळ्यात मुख्य म्हणजे रक्कम घेऊन फिरताना येणारा दबाव किंवा चोरीचा धोका इत्यादी,सगळं गायब..! यामुळेच बिटकॉइन वापरावर आजची पिढी जास्त प्रमाणात खेचली जात आहे.हे bitcoin चे फायदे म्हणता येतील ,यामध्ये कुठली रेग्युलेटरी बॉडी नाहीये त्यामुळे तुमच्या कुठल्या व्यवहारावर नियंत्रण येत नाही आणि तुम्ही अगदी काही क्षणात व्यवहार करून मोकळे.

४. बिटकॉईन चे तोटे

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात.इथे सुद्धा बिटकॉइन वापराची दुसरी बाजू आहेच. सगळयात मोठा प्रश्न येतो तो म्हणजे आजसुद्धा डिजिटल व्यवहार विश्वास जिंकण्यात तितकेसे सफल झालेले नाहीयेत. नोटबंदी नंतर डिजिटल व्यवहार प्रोत्साहित झाले होते अगदी पर्याय नसल्यामुळे सामान्य लोक तिकडे वळले आणि हळू हळू हे व्यवहार नियमित झाले.पण आज सुद्धा केवळ ६० टक्के लोक हे व्यवहार करताना दिसतात आणि त्यात बिटकॉइन सारखे डिजिटल व्यवहार करण्यासाठी मंडळी धाजवतील का हाच मोठा प्रश्न आहे. भरपुर लोक ही करन्सी एक गुंतवणूक म्हणून वापरताना दिसत असतात.पण याचे मूल्य कमी अधिक होत असल्यामुळे हे वापरण्यात थोड्या प्रमाणात गोंधळ सुद्धा उडताना दिसतो.

हेही वाचा 
म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी?
ब्लॉग म्हणजे काय? स्वतःचा ब्लॉग कसा सुरु करावा? जाणून घ्या याविषयी संपूर्ण माहिती
५. भारतात बिटकॉईन ला मान्यता आहे का?

हा मात्र सगळयात महत्त्वाचा मुद्दा आहे.सुप्रीम कोर्टाने २०२० मध्ये क्रिप्टोकरन्सी च्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी परवानगी दिली आहे. एप्रिल २०१८ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने या crypto currency ट्रेडिंग वर सरसकट बंदी घातली होती.मात्र इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने त्याला सुप्रीम कोर्टात आवाहन दिले .आजरोजी अनेक देशांनी crypto currency ट्रेडिंग ला परवानगी दिलेली आहे इतकाच काय तर स्वतःची एक क्रिप्टो करन्सी लॉन्च देखील केली आहे अस या संघटनेचे म्हणणं होत. यावर सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूने निकाल देत व्यवहारांचा मार्ग खुला केला.हे एक साधारण सामान्य चलन नाहीये त्यामुळे तुमचा टॅक्स याने भरता येणार नाही.पण हे आभासी चलन आहे.त्यामुळे व्यवहार गुप्त पद्धतीने होतात.यावर कोणत्या सरकारच किंवा संस्थांचे लक्ष ,नियंत्रण नसते त्यामुळे गैरव्यवहार होण्याची शक्यता असते.

६. सरकार समोरची आवाहने

भारत सरकार समोर या करन्सी किंवा व्यवहाराला मान्यता देण्यात एकच समस्या आहे की याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते. याद्वारे ड्रग्स रॅकेट सारख्या गोष्टी समोर पटकन उघड येऊ नाही शकतं. या गोष्टींवर नियंत्रण ठेवता येणार नाही.शिवाय दहशतवाद फोफवण्याची शक्यता जास्त आहे.त्यांचा फंडींग पोहोचवण्यासाठी या मार्गाचा उपयोग केला जाऊ शकतो.अगदी नक्षलवाद्यांना सुद्धा या द्वारे वेळोवेळी आर्थिक मदत पोहोचवली जाईल आणि अंतर्गत सुरक्षेचा मुद्दा उपस्थित होईल.शिवाय विविध व्यवहारांवर सरकार टॅक्स आकारत असते. हे व्यवहार गोपनीय पद्धतीने होऊ घातल्याने या राष्ट्रीय उत्पन्न स्त्रोताला सरकारला मुकावे लागेल.भ्रष्टाचार बळावण्याची सुद्धा शक्यता आहे.यामुळे हे एक अतिशय अवहनात्मक बाब आहे.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.