Ritbhatmarathi

Search
Close this search box.

जन्मनोंदणीसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

               birth certificate maharashtra online: जन्मनोंदणी करणे ही बाब सध्याच्या काळात फार महत्वाची ठरत आहे याचे कारणही तितकेच मनावर घेण्यासारखे आहे. कारण आपण आपल्या आजोबांना विचारले की तुमची जन्मतारीख काय आहे ? यावर कित्येक आजोबांचं उत्तर असे कि माहित नाही किंवा एखादी आवडीची दिनांक सांगून ते मोकळे व्हायचे जी त्यांची जन्मतारीख नसायचीही. त्यामुळे व्हायचे असे कि वयाचं अंतर आपल्याला समजत नसे. त्यामुळे कित्येक कामे रखडली जात. त्यामुळे सध्याचा काळ हा प्रत्येक पालकाने आपल्या बालकासाठी जबाबदारीने काळजी घेण्याचा काळ आहे. तर जबाबदारी घेण्याची सुरुववात अगदी बालकाच्या जन्मापासूनच सुरु होते असे म्हणावयास हरकत नाही. म्हणूनच आपल्या पाल्याची अथवा बालकाच्या जन्माची नोंद करणे अनिवार्य आहे. आता या लेखामध्ये आपण आपल्या बालकाच्या जन्माची नोंद कशी करावी याबद्दल जाणून घेणार आहोत.

-आपल्या बालकाच्या जन्माची नोंद करणे कायद्याने आवश्यक आहे ग्रामीण किंवा शहरी भागात बाळाचा जन्म झाल्या झाल्यावर एकवीस दिवसांच्या आत सर्व माहितीची नोंद करणे गरजेचे आहे. तर या दिलेल्या मुदतीत आपण माहितीची नोंद केली तर आपल्याला मोफत जन्माचे प्रमाणपत्र मिळते.

– जन्माची नोंद मुदतीत न केल्यास आपल्याला विलंबशुल्क भरावा लागतो.

– लहान मुलाची सुरुवात ठरल्याप्रमाणे शाळेपासूनच होते म्हणून मुलाचे वय सर्वात आधी विचारात घेतले जाते. त्याचप्रमाणे जन्मठिकाण, नागरिकत्व याचाही विचार केला जातो. तेव्हाच त्या मुलास शाळेमध्ये प्रवेश दिला जातो त्यामुळे जन्माचे  प्रमाणपत्र म्हणजेच जन्माची नोंद केली गेली पाहिजे.

– मुलाचे एकदा का शिक्षण झाले की पुढे नोकरीचा प्रश्न येतोच त्यावेळी मुलाखतीदरम्यान आपले वयही विचारात घेतले जाते. कारण याठिकाणी निवृत्ती घेताना वयही पहिले जाते ज्याप्रमाणे नोकरीसाठी रुजू होताना वयाची अट बंधनकारक आहे त्याचप्रमाणे निवृत्ती घेतानाही वय पाहिले जाते किंबहुना कायद्याने वयाची अट बंधनकारक केलेली आहे.

– विमा उतरवतानाही त्या व्यक्तीच्या वयाचा विचार केला जातो त्यावेळीही जन्माचे प्रमाणपत्रक असणे गरजेचे असते.

– राष्ट्रीयत्व ठरवताना म्हणजेच आपण ‘नॅशनॅलिटी सर्टिफिकेट’ साठी ज्यावेळी अर्ज करतो त्यावेळी जन्माचे ठिकाण देश माहिती असणे गरजेचे आहे. कारण त्यावर त्या मुलाचे राष्ट्रीयत्व अवलंबून असते त्यावेळी जन्माचा दाखला असणे गरजेचे आहे.

– प्रत्येक नागरिकाला सरकारने १८ वर्षानंतर मतदानाचा हक्क प्राप्त करून दिलेला आहे त्यामुळे वय १८ पूर्ण आहे किंवा नाही हे पडताळून पाहण्यासाठी जन्माचा दाखला असणे क्रमप्राप्त आहे.जन्माचा दाखला असेल तरच आपले वोटर आय डी आपल्याला मिळते.

– वेवेगळे लायसन्स मिळवताना आपल्याला जन्माचा दाखला मिळवणे गरजेचे आहे.

बँकेत न जाता अवघ्या २ मिनिटामध्ये उघडा बँकेचे खाते कसे उघडायचे?

पासपोर्ट काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहण्याचे दिवस आता गेले. पासपोर्ट काढणे आता झाले सोपे

आधार कार्डसाठी कसं अप्लाय करावं?

            नवजात बालकाची जन्मनोंदणी तात्काळ केली तर ती फायदेशीर ठरते त्यासाठी लागणारा फॉर्म हा त्या हॉस्पिटलमध्ये किंवा त्या प्रभागाचे वैद्यकीय अधिकारी आपल्याला देतात. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणांचे आरोग्य अधिकारी बालकाच्या जन्माची नोंद ठेवतात. जसे की, दिल्लीमध्ये दिल्ली महानगरपालिका, नवी दिल्ली महानगरपालिका किंवा दिल्ली कॅंटोन्मेंट बोर्ड जन्म प्रमाणपत्र देतात. शहरी भागात महानगरपालिका किंवा नगरपरिषद प्रमाणपत्र देते. तर ग्रामीण भागात तहसीलदार किंवा ग्रामपंचायत कार्यालय जन्मनोंदणीचे प्रमाणपत्र देते.

– पालकांचे विवाहप्रमाणपत्रक

– पालकांच्या ओळखीचा पुरावा ज्यात आधार कार्ड, मतदानकार्ड,ड्रायविंग लायसन याचा समावेश असतो.

– पालकांचे जन्मप्रमाणपत्रक

– हॉस्पिटलचे लेटरहेड असणारे कागद्पत्रक ज्यावर बालकाच्या जन्माची नोंदणी करण्यात येते.

१. सर्वात आधी crsorgi.gov.in या जन्मनोंदणीसाठीच्या  वेबसाईटला भेट द्यावी.

२. उजव्या बाजूला असलेल्या साईनप या टॅबवर क्लिक करावे.

३. नोंदणी करण्यासाठी जनरल पब्लिक साईनप या ठिकाणी क्लिक करावे.

४. यानंतर एक पॉप अप उघडेल ज्यामध्ये ‘वापरकर्त्याचे नाव’ म्हणजेच ज्याला आपण ‘युसर नेम’ असं म्हणतो त्याचप्रमाणे युसर आयडी, जिल्हा,शहर किंवा गाव,मोबाईल नंबर आणि बर्थ प्लेस म्हणजेच जन्मठिकाण यांची माहिती त्याठिकाणी भरावी लागेल.

५. सर्व तपशील भरल्यानंतर सर्व युसर नेम म्हजेच वापरकर्त्याच्या नावासकट यूनिट मध्ये दिसून येईल याचा अर्थ असा की आपला प्रदेश ऑनलाईन नोंदणीसाठी वैध आहे म्हणजेच कायदेशीररित्या सुरक्षित आहे.

६. आपण तयार केलेला सत्यापन कोड (Captcha) त्याठिकाणी टाकावा आणि नोंदणी (Register) बटणवर क्लिक करावे.

७. नोंदणीनंतर आपल्याला एक धन्यवाद असा संदेश मिळेल ज्यामध्ये आपला ई-मेल आयडी तपासला जातो.

८. त्यानंतर आपल्याला आपल्या मेल बॉक्स मध्ये जाऊन आपला मेल बॉक्स तपासावा लागेल. यांनतर आपल्या मेलवर जाऊन ‘सेट अप न्यू पासवर्ड’ या टॅबवर क्लिक करावे.

९. पासवर्ड सेट केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा साइन अप करावे लागेल

१०. साइन अप केल्यांनतर आपल्याला एक फॉर्म दिसेल ज्यामध्ये आपल्याला मुलाचे नाव, पालकाचे नाव आणि जन्मठिकाण अथवा स्थान लिहावे लागेल.

११. सर्व तपशील भरल्यानांतर चोवीस तासात आपल्याला तो फॉर्म सबमिट करावा लागेल. सबमीट झाल्यांनतर आपल्याला त्या फॉर्मची एक प्रिंट आऊट काढून घ्यावी लागेल.त्याचबरोबर एक सॉफ्ट कॉपी सेव्ह करून आपल्या लॅपटॉपवर किंवा एखाद्या पेनड्राईव मध्ये घ्यावी जेणेंकरून सॉफ्टकॉपी गहाळ झाल्यास दुसरी प्रिंट काढणे सोईचे ठरेल.

१२. यानंतर तो फॉर्म आपण ज्याठिकाणी रजिस्टर केंद्र आहे त्याठिकाणी जाऊन जरुरी कागद्पत्रकांसमवेत उपनिबंधकांकडून जोडून घ्यावा.

               भारताबाहेर जन्मलेल्या मुलांचे पालक जर परत भारतात येऊन स्थायिक होणार असतील तर त्यांच्यासाठी जन्मनोंदणी प्रक्रियेसाठीचा कालावधी हा ६० दिवस इतका आहे. कारण भारतीय मिशन नुसार असलेल्या कायद्यामध्ये १९५५-५६ च्या नुसार अशी तरतूद केलेली आहे. बाळाच्या आगमनानंतर ६० दिवसांच्या कालावधीत आपण जन्मनोंदणी करू शकतो.

१. मुलांसाठी जन्मप्रमाणपत्र मिळवण्यासाठी जन्मनोंदणी करणे गरजेचे आहे नोंदणी झाली तरच जन्मप्रमाणपत्र मिळते

२. ओळखीचा हाच पुरावा मुलांना हिंसा,अत्याचार,शोषण यांपासून वाचवू शकतो

३. जन्मप्रमाणपत्राशिवाय मुले आपले वय सिद्ध करू शकत नाही त्यामुळे श्रमिक दलात भरती होण्यापासून ते वंचित राहू शकतात.

४. जन्मप्रमाणपत्राशिवाय मुलांना लसी घेण्यात अडथळा येऊ शकतो

५. त्याचप्रमाणे जन्माचे प्रमाणपत्रक हे शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठीही महत्वाचे ठरू शकते.

             आपल्या पाल्याला भविष्यात अशा अडचणींना सामोरे जावे लागू शकते म्हणूनच मुलांची जन्मनोंदणी करणे गरजेचे आहे.   

====================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *