Skip to content Skip to sidebar Skip to footer

भेट

ऑगस्टीन व अर्चनाचा आंतरधर्मीय प्रेमविवाह. ऑगस्टीन ख्रिश्चन तर अर्चना हिंदू. दोघांच्याही घरुन त्यांच्या लग्नाला विरोध होता.

ऑगस्टीनची मम्मा येशूवर निस्सीम प्रेम करणारी तर अर्चनाचे आईवडील श्रीगणेशाचे उपासक. एकुलत्या एक मुलीकडे त्यांनी गेली पंचवीस वर्षे पाठ फिरवली होती.

काल मात्र वर्तमानपत्रात, प्रत्येक न्यूजचेनलवर युपीएससीत देशात प्रथम आलेल्या चिन्मयचा फोटो होता. त्याला पेढा भरवताना दिसत होते त्याचे आईवडील ऑगस्टीन व अर्चना.

 मुलाखतीत चिन्मय सांगत होता की माझ्या आईवडीलांचा माझ्या जडणघडणीत फार मोठा वाटा आहे.

 दोघंही आपापल्या क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर असुनही मला सांभाळण्यासाठी माझ्या बाबांनी काही वर्षांसाठी करिअरब्रेक घेतला होता. माझ्या आईला तिला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं ते माझ्या बाबांमुळेच.

ख्रिश्चन आणि हिंदू हे दोन्ही धर्म मला प्रिय आहेतच त्याशिवाय इतरही धर्मांवर प्रेम करण्याची शिकवण मला आईबाबांनी दिली. आता या वळणावर तरी आईबाबांच्या आंतरधर्मीय प्रेमविवाहाने नाखूष झालेले माझे दोन्हीकडचे आज्जीआजोबा त्यांचा राग विसरतील व माझ्या आईबाबांना पुन्हा छातीशी धरतील.

दोन्हीकडच्या आजीआजोबांचं ह्रदय भरून आलं व ते मुलांना, नातवाला भेटायला निघाले.

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: