BharatPay founder Ashneer Grover information in marathi आई वडिलांचा पाठिंबा नसतानाही चांगली नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला

BharatPay founder Ashneer Grover information in marathi. व्यवसाय करणे आणि त्यात यश मिळवणे ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. पण हे म्हणणे आपल्या भारतीय लोकांनी खोटे ठरवले आहे. जी गोष्ट हवी आहे ती जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवून दाखवली आहे आपल्या भारतीय व्यावसायिकांनी.
उत्तम शिक्षण आणि काहीतरी वेगळं करण्याची जिद्द असलेल्या अशनीर ग्रोवर यांनी, घरातील आई वडिलांचा पाठिंबा नसतानाही चांगली नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या पाठिंब्यावर ते व्यवसायात उतरले आणि घवघवीत यश मिळवून दाखवले. आज ते शार्क टँक इंडिया मधील सर्वात श्रीमंत जज म्हणून ओळखले जातात. तब्बल ७०० कोटी संपत्तीचे मालक असलेल्या ग्रोवर यांच्या विषयी आज जाणून घेऊया.
- १. भारत पे चे संस्थापक अशनीर ग्रोवर बद्दल थोडक्यात माहिती (BharatPay founder Ashneer Grover information in marathi)
- २. अशनीर ग्रोवर ह्यांचे कौटुंबिक जीवन (Family Background of Ashneer Grover)
- ३. करिअर
- ४. अशनीर ग्रोवर ह्यांनी व्यवसायाची सुरुवात कशी केली
- ५. भारत पे ची सुरुवात ते संस्थापक प्रवास (Journey of BharatPe)
- ६. शार्क टॅंक इंडिया मधून नावारूपाला आले (Shark Tank India Judge)
१. भारत पे चे संस्थापक अशनीर ग्रोवर बद्दल थोडक्यात माहिती (BharatPay founder Ashneer Grover information in marathi)
२. अशनीर ग्रोवर ह्यांचे कौटुंबिक जीवन (Family Background of Ashneer Grover)
ग्रोवर यांचा जन्म १४ जून १९८२ मध्ये नवी दिल्ली येथे झाला. त्यांचे वडील चार्टरड अकाऊंटंट होते. तर त्यांच्या आई मुलांना शिकवण्याचे काम करत असत. त्यामुळे त्यांचे कुटुंब आर्थिक दृष्टीने चांगलेच सक्षम होते. तसेच ग्रोवर यांचे आई वडील उत्तम शिकलेले असल्याने कुटुंब सुशिक्षित देखील होते. ग्रोवर यांचे सुरुवातीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर नवी दिल्लीतील आयआयटी कॉलेजमधून त्यांनी सिव्हील इंजिनियरिंग केले. त्यानंतर त्यांनी बी.टेक पूर्ण केले. बी.टेक नंतर अभ्यास करण्यासाठी फ्रान्स मधील इन्साल्योन विद्यापीठमध्ये एका वर्षासाठी गेले. हा एक एक्सचेंज प्रोग्राम होता. आणि त्यासाठी आयआयटी कॉलेजने इतर पाच विद्यार्थ्यांसह ग्रोवर यांची निवड केली होती. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांचे आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते भारतात परत आले. त्यासाठी अहमदाबाद मधील आयआयएम येथे प्रवेश घेतला. इथूनच २०१६ मध्ये एमबीए ची पदवी घेतली. ४ जुलै २००६ रोजी माधुरी जैन यांच्या सोबत ग्रोवर विवाह बंधनात अडकले. त्यांना दोन अपत्य असून मुलाचे नाव एव्ही आणि मुलीचे नाव मन्नत आहे.
हेही वाचा
करोडो रुपयांची नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. आज नवऱ्यासोबत चालवतेय स्वतःची कंपनी
३. करिअर
एम.बी.ए पूर्ण केल्यावर त्यांनी पहिली नोकरी केली. ती म्हणजे कोटक इंवेस्टमेंट बँकिंग मध्ये. तिथे त्यांनी सात वर्ष काम केले. त्यानंतर २०१३ मध्ये अमेरिकन एक्स्प्रेस कंपनीत कॉर्पोरेट संचालक म्हणून जॉईन झाले. नोकरी करत असताना त्यांना त्यांच्या कामातून समाधान मिळत नव्हते. त्यांना स्वतःचे काहीतरी वेगळे करायचे होते. स्वतःचा व्यवसाय करायचा होता. त्यामुळे त्यांनी ही अमेरिकन एक्स्प्रेस मधील नोकरी सोडली आणि व्यवसायाच्या दृष्टीने ग्रोवरमध्ये सामील झाले. पण त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांच्या आई बाबांना मान्य नव्हता. ज्या कामात किंवा नोकरीत तुझे भविष्य सुरक्षित आहे असेच काम तू करावेस असे त्यांना वाटत होते.त्यामुळे व्यवसायाच्या निर्णयात त्यांचे आई बाबा त्यांच्या पाठीशी उभे नव्हते. पण त्यांच्या पत्नी माधुरी जैन यांनी मात्र ग्रोवर यांना खूप पाठिंबा दिला. आपण आपले स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकतो. आणि ते पूर्ण करण्यासाठी मी सगळ्या परीने तुमच्या सोबत असेन असे त्या म्हणाल्या. त्यांच्या पाठिंब्या मुळेच २०१५ मध्ये ग्रोवर मध्ये त्यांनी मध्यस्थी केली.
४. अशनीर ग्रोवर ह्यांनी व्यवसायाची सुरुवात कशी केली
त्यानंतर ग्रोवर यांनी व्यवसायात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या लोकांना गोळा करायला सुरुवात केली. ग्रोवर यांना वेगळा व्यवसाय करायचा होता. आणि तो करण्यासाठी गुंतवणूकदार हवे होते. हे सगळे करत असताना ते ग्रोवरमध्ये काम करत होते आणि मग त्यांनी ते ही सोडण्याचा निर्णय घेतला. पुढे २०१७ मध्ये पीसी ज्वेलर्स लिमिटेड मध्ये प्रवेश केला. आणि तिथे पेमेंटची रणनीती विकसित करण्यात खूप मदत केली. इथूनच त्यांना भारत पे ची कल्पना सुचली. आणि त्यांच्या स्टार्ट अपची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
५. भारत पे ची सुरुवात ते संस्थापक प्रवास (Journey of BharatPe)
भारत पे हे ऑनलाईन आर्थिक व्यवहार करण्यासाठी वापरले जाणारे मोबाईल मधील एक ॲप्लिकेशन आहे. याचा वापर केवळ आर्थिक व्यवहार पुरता नाही तर अनेक गोष्टींसाठी केला जातो. ग्रोवर यांनी भारत पे सुरू केले तेंव्हा कर्मचाऱ्यांचे पगार देता येईल इतकेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. त्याच वेळी त्यांच्या पत्नी माधुरी जैन कंपनीत जाईन झाल्या. त्यांनी बँकिंग एच.आर आणि आर्थिक व्यवस्थापन संबंधित अनेक गोष्टींवर नियंत्रण ठेवले. या दरम्यान अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागले. पण पुढच्या एकाच वर्षात भारत पे ला खूप मोठे यश मिळाले. २०१८ मध्ये २० कर्मचाऱ्यांना घेऊन सुरू केलेल्या भारत पे मधील कर्मचाऱ्यांची संख्या एकाच वर्षात ५०० पर्यंत वाढली.
५.१. भारत पे चे यश आणि कंपनी एकूण महसूल (BharatPe total revenue)
आज अनेक भारतीय लोकांच्या स्मार्टफोन मध्ये ऑनलाईन व्यवहार करण्यासाठी हे ॲप आपल्याला दिसेल.
- आजचे भारत पे चे एकूण मूल्य २२५ दशलक्ष डॉलर्स इतके आहे.
- यातूनच दर महिन्याला ८३ दशलक्ष डॉलर्स ची देवाणघेवाण होते आणि यात सातत्याने वाढ अपेक्षित आहे.
- ग्रोवर यांनी भारत पे संस्थपणाच्या निमित्ताने कोडींग आधारे नवीन पेमेंट सुविधा सुरू करून दिली.
- अवघ्या तीन वर्षात भारत पे ला तीन अब्ज डॉलर्स ची कंपनी बनवले.
- भारत पे हे एक डिजिटल व्यवहार करण्यासाठी वापरले जाणारे प्लॅटफॉर्म आहे.
६. शार्क टॅंक इंडिया मधून नावारूपाला आले (Shark Tank India Judge)
सोनी टीव्ही वरील शार्क टँक इंडिया नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्या लोकांसाठी एक हक्काचे मंच आहे. यात ज्यांच्या व्यवसायाची आयडिया आवडेल अशांना निधी देण्यात येणार आहे. यात २० डिसेंबर २०२१ पासून ग्रोवर जज म्हणून काम करत आहेत. उपस्थित सर्व जज पैकी ग्रोवर सगळ्यात श्रीमंत जज म्हणून ओळखले जातात.
आज बँकेचे किंवा पैश्यांचे व्यवहार ही रोजची गरज झाली आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी बँकेत जाऊन व्यवहार करणे जमेलच असे नाही. मग हेच काम जर आपण मोबाईलद्वारे कधीही कुठेही करू शकत असू तर याचा फायदा लोक का घेणार नाहीत ??
हीच गरज ओळखून ग्रोवर यांनी ऑनलाईन व्यवहार करणारे भारत पे हे ॲप तयार केले. आणि आज कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचे मालक झाले. या कामात त्यांना अनेक अडचणी आल्या.
घरातल्या लोकांचा पाठिंबा मिळाला नाही, पण म्हणून ते डगमगले नाहीत. आपला मार्ग शोधत राहिले आणि त्यांच्या आई बाबांचे म्हणणे खोटे ठरवले.
आपण मनापासून एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न केले की यश हमखास मिळतेच. हेच ग्रोवर यांचा प्रवास आपल्याला सांगतो.
====================