Skip to content Skip to sidebar Skip to footer

भाकर तुकडा

वर्षा चे दिवस भरत आल्यामुळे सुनीलने तिला तिच्या माहेरी आणून सोडले. गावातच माहेर असल्यामुळे अगदी शेवटापर्यंत ती सासरी राहिली होती .तिच्या सासूबाई नेहमी म्हणत बाईने अगदी शेवटापर्यंत काम करत राहावे म्हणजे बाळंतपण सुखाचे होते त्यामुळे बिचारीला ऑफिस, घर आणि हे भलेमोठे पोट सर्व सांभाळावे लागत.

आईकडे आल्यावर तिने रजा टाकली आणि जरा निवांत झाली.

दिवस भरले आणि नॉर्मल होऊन तिने दोन गोंडस मुलींना जन्म दिला.

सुनील फार खुश झाला पण सासूबाई म्हणजे राधाबाई जरा वैतागल्याच वंशाला दिवा नाहीच का? म्हणून आधी बोटे मोडली आणि मग मुलींना पाहिले अगोबाई ह्या तर एकदम वेगळ्याच दिसतात जुळ्या वाटतच नाहीत🤔.

डॉक्टरांनी समजावून सांगितले दोन वेगवेगळ्या दिसणाऱ्या असूच शकतात फक्त सिनेमात दाखवतात एकसारख्या दिसणाऱ्या 😄. बर बर म्हणून त्यांनी वेळ मारून नेली पण त्यांच्या डोक्यात शंका राहिलीच. नावं ठेवली धनश्री आणि भाग्यश्री.

धनश्री फारच गोड, गुबगुबीत, गोरीपान अशी होती तर भाग्यश्री निमगोरी किंचित बारीक पण तिचे डोळे फार छान अगदी हरिणीसारखे होते सुनील तर तिला हिराच म्हणत.

हळूहळू मुली मोठ्या होऊ लागल्या आज्जी धनश्री चे खुप लाड करत आणि भाग्यश्री ला जरा वेगळी वागणूक देऊ लागली मुली लहान असल्यामुळे त्यांच्या काही लक्ष्यात आले नाही . शाळेत देखील बाई म्हणत जुळ्या वाटत नाहीत हो🤔. साधारणपणे मुली पाचवीत असतील शाळेचा निकाल घेऊन मुली बागडत घरी आल्या धनश्री वर्गात 2री आणि भाग्यश्री वर्गात 5वी आली होती.

दोघींनी आज्जी ला निकाल दाखवला आज्जी चेष्टा करत म्हणाली धनू अगदी बाबासारखी आहे आणि ह्या भागू ला भाकर तुकडा देऊन आणला आहे ना म्हणून ढ आहे😄 असे भागूने खुप वेळा आज्जीकडून ऐकले होते आज तिची खात्रीच झाली की आपण यांचे नाही.

तिने रात्री आईला विचारले 😌 आईने जवळ घेऊन खात्री दिली की ती तीचीच आहे पण भागू च्या मनात ठिणगी पडली होती. आज्जी चे टोमणे काही कमी झाले नाहीत त्यामुळे त्यात भर पडत गेली.

हळूहळू भागू या घरापासून मनाने लांब जात राहिली .खरेतर आईबाबांनी दोघींच्यात कधीच भेदभाव केला नव्हता पण आज्जी चे बोलणे तिने फार मनाला लावून घेतले होते.

येणाऱ्या जाणाऱ्या प्रेत्येक भिकारणीत ती तिची आई शोधू लागली होती कारण भाकरतुकडा फक्त भिकारणीलाच देतात हे तिच्या बाल मनाला वाटत होते.

दोघीही चांगल्या शिकल्या भागू ने कार्पोरेट जगा मध्ये प्रेवेश केला आणि आपल्या हुशारीने चांगले नाव कमावले
तिने घरी संपर्क खुप कमी केला ती अशी का वागती हे आईबाबांसाठी एक कोडेच होते🤔.

एकदा भागू ची मुलाखत होती टीव्ही वर तिच्या क्षेत्रा समंधी त्या मध्ये तिला तिच्या फॅमिली बद्दल विचारले तर म्हणाली बहुतेक मला अनाथआश्रमातून आणले आहे, मला माझे असे कोणी नाहीत ज्यांनी आणले त्यांनी मात्र मला खुप छान सांभाळले हे ऐकून आईला तिथेच भोवळ आली.

आज्जी हे ऐकून सैरभैर झाली वडील घोंधळले कोणालाच काय करावे सुचेना आज्जी तर फार फार खजिल झाली तिने तिची चूक मान्य केली मुलासमोर आणि सुनेसमोर डोके आपटून घ्यायची वेळ आली ह्या दोघांवर, खुप खुप बोलले आज्जीला पण काय उपयोग 😌

ताबडतोब त्यानी धनू ला बोलावून घेतले आणि ते तिघेही भागू कडे गेले तिला ती त्यांचीच आहे याचे सर्व पुरावे दिले पण ती काही ऐकेना ऐका भाकर तुकड्यावर माला घेऊन तुम्ही माझ्यावर फार उपकार केलेत इतके शिकवलेत मी तुमची खुप ऋणी आहे 🙏 फार फार रडत होती भागू त्याबरोबर धनू पण शेवटी सगळ्यांनी तिला दवाखान्यात आणले चौघांचे ब्लड सॅम्पल घेतले आणि DNA टेस्ट केली मग तिला खात्री झाली की आपण यांचेच आहोत.

तिने आईला बाबांना धनू ला मनापासून मिठी मारली मला माफ करा मी तुमच्याशी हल्ली नीट वागत नव्हते त्याबद्दल.
पण तिने आज्जीला माफ केले नाही कारण तिच्या सतत च्या बोलण्यामुळे तिचे सगळे बालपण हरवले होते 😌

टीप …लहान मुलांच्या बरोबर कधीही मस्करी करू नये त्याची कुस्करी कधी होईल ते सांगता येत नाही

– विशाखा कित्तुर

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: