Skip to content Skip to sidebar Skip to footer

माहेरपण…तेही पुरुषांचं…

प्रिय…वाचक मित्रहो..ऐकून थोडं विचित्र वाटलं असेल…पुरुषांचं कधी माहेरपण असत का ? आपण स्वतःला एकविसाव्या शतकातलं समजतो…पण स्त्री-पुरुष समानतेच्या बाबतीत अजूनही पारडं रिकामंच वाटतं…चांगलं उदाहरण द्यायचं झालं तर माहेरपण…हे माहेरपण प्रत्येक लग्न करून सासरी गेलेल्या मुलीच्या नशिबात असतंच असत…मग आपली मैत्रीण असो…आपल्या नणंदबाई असोत, आपली भावजयी  असो किंवा मग आपली आई असोत प्रत्येकीनं अगदी हक्काने आपलं माहेरपण मागून घेतलंय…मग आपल्या पुरुषांनीच काय घोड मारलाय या बाबतीत..स्त्री-पुरुष समानता म्हणवता पण…पुरुषांचही माहेरपण व्हावं…त्यासाठी हा लेखनप्रपंच…पहिल्यांदाच पुरुषांच्या बाजूने लिहिलंय निदान सगळ्या पुरुषांनी तरी लाईक, शेअर आणि कंमेंट करायला विसरू नका….          

स्मिता म्हणजे अंकिताच्या नणंद बाई… आपल्या नवऱ्याला घेऊन माहेरी खास १०-१२ दिवसांसाठी आल्या होत्या…अंकिताचे नंदावे म्हणजेच स्मिताचे मिस्टर स्वभावाने अतिशय मनमिळाऊ…मिलिंद त्यांचं नाव…त्याचबरोबर अंकिताची भाचेमंडळीही आलेच होते…त्यामुळं घराचं अगदी गोकुळ झालं होतं… …म्हणून अंकिताही मस्त रमून गेली होती…स्मिता मुळात कोल्हापूरला राहायला असल्याने…पुण्याला आपल्या माहेरी फारच कमी वेळा येत असे…सासूबाई आणि सासरे अपघातात गेल्याने सगळी जबाबदारी स्मिता कसोशीनं एकटी पेलवत असे…. मिलिंदरावांची सारखी बदली होत असल्याने मुलांच्या शाळा आणि इतर जबाबदाऱ्या एकटी समर्थपणे पार पडत असे…स्मिता खूपच लाडाकोडात वाढलेली असल्याने स्वयंपाकाचे काही इतके कौशल्य अवगत नव्हते म्हणूनच मिलिंदरावांची कधी कधी खाण्या-पिण्याच्या बाबतीत फार नाही पण थोडीशी कुरकुर होतच असे…स्मिता अगदीच स्वयंपाकात अडाणी नव्हती आमटी-भात, भाजी-पोळी आणि भाकरी एवढं व्यवस्थित जमत असे…पण तरीही तुझ्या हाताला चव नाही..अशी प्रेमळ रूपात तक्रार ते स्मिताला नेहमी करत असे…तरीही जे येईल ते गोड मानून घेतल्याने …संसार एकूणच सुखाचा होता..

घरात मस्त पैकी उकडीच्या मोदकाचा सुगंध दरवळत होता…एकीकडे पालक-भजी चा बेतही रंगत होता…मस्तपैकी पुऱ्या तळण्याचाही वास येत होता…एकूण काय घरी साग्र-संगीत जेवणाचा बेत होता…मिलिंदराव मस्तपैकी चहाचा आस्वाद घेत दिवाणखान्यात बसले होते…त्यादिवशी अंकिताही लगबगीने सगळं पाहुण्यांचं यथासांग करतच होती …सगळ्यांचं अगदी मनमुराद जेवण रंगलं…जेवणानंतर खास बनारसी पान मागवलं होत…तेही अंकिताच्या सांगण्यावरून म्हणून सुनबाईंच्या पाहुणचाराचं कौतुकच होत होत…अंकिताच्या सासूबाई म्हणजे अलकाताई स्वयंपाकाच्या बाबतीत अगदीच सुगरण…पन्नास माणसांचा स्वयंपाक एकट्या करत…म्हणून अंकितालाही बरंचसं शिकायला मिळत असे…तरीही एवढ्या सगळ्यांचं करायचं म्हणजे अंकिता दिवसभर दमल्यासारखीच असे…म्हणून एक दिवस रात्री अंकिता आपल्या नवऱ्यापाशी प्रेमळ तक्रार करत होती…

अंकिता  – विराज…किती दिवस असं..सगळ्यांच्या फर्माईशी पूर्ण करणार मी…

विराज    – किती दिवस म्हणजे..?

अंकिता  – अरे…म्हणजे…माझ्याही आवडीचं मी करून खाऊ शकतेच ना…आणि सग्ळ्यांनाही खाऊ घालू शकते ना…त्यांच्या आवडी किती दिवस जपणार मी…मी काही वाईट स्वयंपाक करत नाही हा…

विराज    – अंकिता…अगं तुला येतोच स्वयंपाक…प्रश्न आहे का काही त्यात…त्यांच्या आवडी तितक्याच महत्वाच्या ना…एक तर स्मिताला असं काही करून खाऊ घालायला वेळही मिळत नाही..आता आलीय तर…करू देत कि एन्जॉय…आणि तुही खा मस्तपैकी…स्मिता शिवाय स्वतःची नोकरी सांभाळून करत असते सगळं…तारेवरची कसरत करावी लागते…आता करू देत तिला तिच्या आवडीचं…तू कर कि नंतर…कोण अडवतंय तुला…माहेरी तर जातेच कि तू वरचेवर…तुझे लाड-कोड पुरवतच असतील सगळे…

अंकिता   – विराज…माझं माहेर खूप लांब म्हणजे मुंबईत आहे…मी काय अगदी महिना-महिनाभर नाही हो राहत..  इथे माझाही विचार व्हायला पाहिजे ना…

विराज    – अंकिता…आता स्मिताताईच सोड…ती मुलगी आहे तिला पाहिजे तसं…पाहिजे तेव्हा..ती करून खाऊ शकते आणि समोरच्यालाही देऊ शकते…आणि स्मिताताई मुलांना सुट्टी लागली कि मिलिंद दाजींना कोल्हापुरात एकट्याना सोडून येते नेहमी इकडे. मिलिंद दाजी फार समजूतदार. स्मिता म्हणेल तीच पूर्व दिशा त्यांच्यासाठी. ते कधी आपल्या खाण्याचे हाल होतील म्हणून स्मितापासून तिचं माहेरपण हिरावून घेत नाही. ते स्मिताताईला खुशालीने इकडे यायला होकार देतात. इतक्या वर्षात पहिल्यांदा मिलिंद दाजी स्मितासोबत १० दिवसांसाठी राहायला आले आहेत. त्यांनाही थोडासा चेंज हवा ना…पुरुषांचंही कधीतरी माहेरपण होऊ देत कि…

अंकिता  – ही…ही…ही…पुरुषांचं माहेरपण…वेड लागलं कि काय तुला…पुरुषांचं कधी माहेरपण असत का…?

विराज   – अगं हसू नकोस…खरंच सांगतोय मी…सद्य परिस्थितीच आहे तशी…पुरुषालासुद्धा सासुरवास असतोच असतो…

अंकिता – हे…पुरुष कसले सासुरवास सहन करतायत…आम्हा बायकांना धारेवर धरण्यात यांचं उभं आयुष्य गेलं…हे पुरुष काय मेले सासुरवास सहन करतायत…

विराज  – हा…मला उद्देशून मुद्दाम म्हणतीयस तू…कारण मला कुठल्याच प्रकारचा सासुरवास नाहीय…मला तर..तुझ्या या बालिशपणावर चिडायचंही नाहीय म्हणून शांतपणे समजावून सांगतोय मी…

अंकिता – बरं…सांग..ऐकते मी..

विराज   – मिलिंद भाऊजींचे आई-वडील गेले…हे तुला माहितीय…

अंकिता – हो…माहिती आहे…

विराज   – अगं मग…आई-वडीलच असे असतात कि ज्यांच्यासमोर आपण आपले मन मोकळे करू शकतो…मनावर मायेची फुंकर घालायला कुणीतरी हवं असत…आता तू म्हणशील आईच मनावर मायेची फुंकर घालू शकते …स्मिताताई का नाही घालू शकत…

अंकिता – हो…ते पण आहेच कि…कारण आईनंतर समजावून घेणाऱ्या स्मिताताईच आहेत कि…

विराज   – हो ते पण आहेच…पण आई-वडिलांची जागा कुणीच घेऊ शकत नाही…अगदी ताई सुद्धा…मग जेवणाचं म्हणशील…तर ताईला लहानपणापासून जेवण करण्यात रस नव्हता…पण तरीही न कंटाळता ती सगळं करते..मिलिंद दाजी गोड मानूनही घेतात…पण तेच -तेच खाऊन कंटाळा येत नसेल त्यांना?…मग आईच्या हातचं खावंसं वाटलं तर खाऊ देत कि…तुझा अपमान होणार आहे का काही…

अंकिता  – अपमानाचे…काय त्यात एवढे…मी कधी असं म्हटलंय का ?

विराज   – सद्य परिस्थितीचं सांगायचं झाल्यास…पुरुष बाहेरगावी कामानिमित्ताने राहतात आता….त्यात ते एकटे नसतात कारण…काही जण आपलं नवं बिऱ्हाडंही थाटतात…त्यात वेगळ्या संस्कृतीची बायको असली कि मग त्या पुरुषाची तारांबळ उडते…तिला समजावून सांगण्यात त्या पुरुषाचा किती वेळ वाया जात असेल..मग काही दिवस तसाच स्वयंपाक गोड मानून खावा लागतो त्याला…जसं नव्या नवरीला अड्जस्ट व्हायला वेळ लागतो…तसंच त्या पुरुषालाही समजून घेणारं कुणीतरी हवं असतं…खोल विचार केला तर..माहेर म्हणजे मायेचं माणूस मग ते कुणीही असोत…मी असो…आई असो…भाऊ असोत किंवा कुणीही असोत…उद्या मलाही माहेरपणाची गरज भासेल मग असायला नको कुणीतरी आपलं…मग घेऊन जाशील मला मुंबईला…

अंकिता  – का नाही…जरूर घेऊन जाईल…

विराज   – समजलं…तुम्हा बायकांइतकंच पुरुषांनाही माहेर असायला पाहिजे…मग स्त्री-पुरुष समानतेचं पारडं सारखं  होईल…. …. पूर्वीच्या काळी कसं आपण एकमेकांच्या घरी जायचो…मग आपल्याला आजी-आजोबा काही ना काही द्यायचे…पण आता तसं नाहीय…माया करण्याच्या नादात आपण हॉटेल, रिसॉर्ट वर जातो पण त्यात मायेचा ओलावा नसतो…मग असंच नातेवाईक आल्यानंतर त्यांना चांगलं-चुंगलं खाऊ घालण्यात, गप्पा मारण्यात दिवस कसा आनंदात जातो ते आपल्याला कळतंच नाही…मग तीच मायेची शिदोरी घेऊन आपण गेलो कि ती वर्षभर पुरते…आता माहेरपण काय फक्त पुरुष आणि स्त्रिया यांच्यापुरता विषय आहे का…नाही…कारण माहेरपण आई-वडिलांनाही हवं असत…

अंकिता  – हो…अरे देवा…

विराज    – काय झालं ?

अंकिता  – अरे…उद्याची काय तयारी करायची हे आईना विचारायचंच राहून गेलं…

विराज   – ठीक आहे ना…उद्याचं नियोजन तुझ्या मनाने होऊ देत…आईशी मी बोलतो…

अंकिता  – बरं…चालेन…

विराज   – हो…फक्त उद्याचं करायचं हा…त्यानंतर आईला करू देत…तेवढाच तिलाही विरंगुळा..

अंकिता  – बरं…

विराज घाबरल्याचं आव आणतो , हा…पण उद्याचं काय नियोजन आहे…म्हणजे सगळे खाऊ शकतील ना…म्हणजे पोटदुखीच औषध नाही ना खावं लागणार आम्हाला…

अंकिता  – मी एवढा काही वाईट स्वयंपाक करत नाही हा…

विराज   – अगं…पण करणार काय उद्या…ते तरी सांग…

अंकिता – डाळ-बट्टी, उडदाचे पापड तळेल, कोशिंबीर, थोडीशी रबडी करेल आणि सुक्की भाजी म्हणून राजमा करेल…चालेन ना..?

विराज  – सरस…पण नीट कर हा…बघ उद्याची होणारी अन्नपूर्णा आहेस तू…सगळं नीट कर…

अंकिता – तू काळजीच करू नकोस…उद्याचा दिवस माझा…

विराज  – एवढे १० दिवस आईच्या मनासारखं होऊ देत. तिला मिलिंद दाजींच्या आवडी निवडी चांगल्या माहित आहेत. आणि त्यांनाही आईच्या हातच्या चहापासून घावण, झुणक्यापर्यंत सगळं आवडतं. उद्या तुझ्या हातचंही आवडलं तर उत्तमच. मग आईनंतर तूलाच मिलिंद दाजींचं माहेरपण जपायचं आहे. सध्या आईकडून त्यांच्या आवडी निवडी शिकून घे. तशीही तू उत्तम सुगरण आहेस आमच्या स्मिताताई सारखी नाही रोज रोज समोर भाजी पोळी मांडायची.

अंकिता – अरे असं काय बोलतोय तू…त्या ऐकतील ना….अरे ठीक आहे रे..लग्नाआधी मला सुद्धा कधी चहा बनवायचा माहित नव्हता. पण इकडे आल्यावर आईंनी सगळं मस्तपैकी शिकवलं मला….तेही ताणताण नं करता…. पण स्मिता ताईंना कुणी नव्हतंच शिकवायला आणि नोकरी मुळे त्यांना वेळही नाही रे मिळत. तरी मी रोज बघते हा….रोज आई स्वयंपाक करताना आईपाशीच उभ्या असतात आणि सगळं शिकून घेतायेत. आणि तुझं खरं आहे उगाच कुठल्याही पदार्थाला “आईच्या हातचं” असं गुणगान नाही पडलं. आईच्या हाताची चव नाही येणार कशाला मग ती आई असो व सासू.

विराज अंकिताला जवळ घेतो,आता कशी माझी लाडोबाई बरोबर बोलली….मग मीही चलतो आता तुझ्यासोबत तुझ्या माहेराला….तुझी भावजय चिढचिढ तर नाही ना करणार….एक सिक्रेट सांगू का तुझ्या वहिनीने आपलं लग्न झालं तेव्हा पहिल्यांदा जेव्हा तुझ्या घरी गेलो होतो तेव्हा त्यांनी शेवयाची खीर केली होती. खीर चवीला विचित्रच लागत होती पण मी गपगुमान खाल्ली. सासूबाईंनी तुझ्या वहिनीला आत जाऊन विचारलं कि शेवया कुठून काढल्या तेव्हा कळालं कि मॅग्गी मसाला संपला म्हणून सासूबाईंनी नूडल्स एका डब्यात काढून ठेवल्या होत्या आणि तुझ्या वहिनीने शेवया समजून त्याची खीर केली होती…..बाब्बो आयुष्यात पहिल्यांदाच मॅग्गीची खीर खाल्ली होती हो…..

अंकिता – “काय म्हणजे तुला आई आत जाऊन वहिनीला जे काही बोलली ते ऐकू गेलं होतं? आणि तू मला हे आता सांगतोय? “

विराज – “हो म्हणजे अगं मला वाटलं उगाच कशाला धिंडोरा पिटायचा….आणि तुझ्या वहिनींचंही नवीनच लग्न झालं होतं…म्हटलं माझ्यामुळे उगाच त्यांना अजून बोलणी नको बसायला….होतात चुका माणसाकडून….आणि तुझ्या वहिनीने तर नवीन पदार्थ उदयास आणून कमालच केली होती…धन्य तुझी वहिनी आणि धन्य त्यांच्या हातची मॅग्गीची ती खीर…. “

अंकिता खिदळून  – “काय रे…बस ना आता….अजून किती हसवशील ..झोप आता उद्या सकाळी लवकर उठायचं आहे नाहीतर तुझ्या नादात मीही मिलिंद दाजींना असंच काहीतरी चुकून खाऊ घालेन आणि ते माहेरपण तर सोड पण सासुरवास समजून कधी इकडे येणारच नाही”

अंकिताच्या बोलण्यावर दोघेही खिदळतात आणि झोपी जातात. 

इकडे मिलिंद दाजी मात्र कधीच झोपलेले असतात आणि झोपेतच सासूबाईंनी खाऊ घातलेल्या पदार्थांची चव आठवत झोपेतच स्मितहास्य करतात आणि समाधानाचा एक ढेकर देतात.

================

प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.

https://www.facebook.com/ritbhatmarati/

तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.

ritbhatmarathi@gmail.com

फोटो साभार – गूगल

आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही

=============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.