Skip to content Skip to sidebar Skip to footer

अशा पद्धतीने गणपतीला दुर्वा वाहिल्यास तुमची इच्चपूर्ती नक्कीच होईल

benefits of durva grass:

विष्णवादिसर्वदेवानां दूर्वे त्वं प्रीतिदा यदा।
क्षीरसागर संभूते वंशवृद्धिकारी भव।।

याचा अर्थ असा की.. “हे दुर्वा! तुझा जन्म क्षीरसागरातून झाला आहे. तू  विष्णु आदि सर्व देवांना प्रिय आहेस.”

दुर्वा ही गवत जातीची वनस्पती आहे. ही भारतात सर्वत्र पहावयास मिळते.

●दुर्वा बाराही महिने उगवते. अगदी थोड्या जागेत लावलेली ही हरयाळी जमिनीवर सर्वत्र पसरते. गुरासोरांचे हे आवडते खाद्य आहे.

● ह्यामध्ये प्रोटीन्स व कर्बोदके विपुल प्रमाणात असल्याने त्या पौष्टीक आहेत.

● वर्षातनं दोनदा सप्टेंबर,ऑक्टोबरमधे व फेब्रुवारी, मार्चमधे दुर्वांना फुले येतात.

● दुर्वा देवांना प्रिय आहे. तसेच मनुष्याला व प्राण्यांनाही दुर्वा प्रिय आहे.

●उन्हाळ्यात जेंव्हा इतर गवत, वनस्पती पाण्याअभावी वाळतात तेंव्हा दुर्वांची मुळे मात्र जमिनीखाली जीवंत असतात. जमिनीतील अत्यल्प पाणी, हवा शोषून घेऊन जिवित रहाण्याची क्षमता दुर्वांमधे असते.

● वर्षाऋतुचं आगमन झालं आणि पर्जन्यधारा बरसू लागल्या की दुर्वांच्या मुळांना कोंब येतात. लुसलुशीत हिरव्यागार दुर्वांनी सडे सजतात. दुर्वांचा मऊमखमली शालूच जणू वसुंधरा पांघरते.

●दुर्वांच्या या गुणविशेषांमुळे त्यांना चिकाटीचे, सहनशीलतेचे व वंशवृद्धीचे प्रतिक मानले आहे.

● फार पुर्वीच्या काळापासनं ऋषीमुनींनी दुर्वांना धार्मिक विधींमधे महत्वाचे स्थान दिले आहे जेणेकरून मानवजातीशी दुर्वांचा संपर्क होत रहावा आणि मानवाने दुर्वांच्या प्रत्येक अंगाचे फायदे जाणून त्यांचा उपयोग करून घ्यावा.

●दुर्वांमधे गणेशतत्व आकर्षित करण्याची शक्ती असते.

●नेहमी स्वच्छ जमिनीवरील दुर्वा खुडाव्यात.

●दुर्वा स्वच्छ धुवून मगच त्यांच्या जुड्या बांधाव्यात
दुर्वांच्या तीन, पाच, सात अशा विषम पटीत जुड्या कराव्यात.

● अशा एकत्रित दुर्वांचा गंध जास्त वेळ टिकून रहातो त्यामुळे गणेश तत्व दुर्वांच्या जुड्यांकडे अधिक वेगाने आकर्षित होते व गणेशमुर्तीत ते टिकून रहाते.

● दुर्वा वहाताना पात्यांचा भाग आपल्याकडे व देठांचा भाग मुर्तीकडे असावा, त्यामुळे श्रीगणेशतत्व आपल्या दिशेने प्रक्षेपित होते.

१. समुद्रमंथनाच्या वेळी अम्रुतकलशातील अम्रुताचे काही थेंब तेथील गवतावर पडले व त्या गवताच्या दुर्वा झाल्या अशी श्रद्धा आहे.

२. पुर्वीच्या काळी अनलासूर नावाचा असूर देवांना, ऋषींना फार त्रास देत होता. तापट, तामस गुणाच्या राक्षसाने देवांचे, साधुंचे जीणे मुश्कील करून सोडले होते. सर्व देव व साधू भगवान विष्णुंना शरण गेले तेंव्हा भगवान विष्णुंनी गणरायाचे स्मरण केले. गणपती प्रकट झाला. विष्णुने गणरायाला अनलासूराचा बंदोबस्त कर म्हणून सांगितले. अनलासूर गणपतीवरही धावून आला मात्र गणपती स्थिर राहिला. अजिबात डगमगला नाही. आपल्या सिद्धीसामर्थ्याने त्याने अवाढव्य रुप घेतले. गणरायाचं डोकं आकाशाला टेकलं तर पावलं थेट पाताळात पोहोचली. गणरायाने अनलासूरास गिळलं.

अनलासूराचा नाश झाल्याने सर्व देवांनी, ऋषींनी गणरायाचे आभार मानले पण अनलासूराच्या तापसी व्रुत्तीमुळे गणरायाच्या पोटात दाह होऊ लागला. त्वचेचाही प्रचंड दाह होऊ लागला. पार्वतीमाता चिंतीत झाली. शिवशंकराने आपल्या गळ्यातला नाग त्याच्या गळ्यात ठेवला जेणेकरून दाह शांत होईल. वरुणदेवाने गणोबावर पर्जन्यवृष्टी केली. इंद्रदेवाने त्याच्या मस्तकी चंद्र ठेवला पण काही उपयोग झाला नाही. शेवटी ऋषीमुनींनी हरीत दुर्वांच्या एकवीस एकवीस दुर्वा करून  त्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या तेंव्हा कुठे गणरायाच्या त्वचेचा,उदरातील दाह शांत झाला.

——————

तेंव्हा गणपती म्हणाला, यापुढे जो कोणी माझ्या चरणी दुर्वा वाहील त्याला सौख्यप्राप्ती होईल. त्याच्या प्रगतीच्या मार्गातली विघ्ने दूर होतील. अशाप्रकारे गणपतीला दुर्वा प्रिय झाल्या . एकवीस दुर्वांची जुडी अगर एकवीस दुर्वांच्या जुड्या दोऱ्यात बांधून केलेला हार गणरायाला घातला की गणरायाचं ते हिरवाईनं नटलेलं नितांतसुंदर रुप पाहून डोळ्यांचं पारणं फिटतं.

३. अजून एक आख्यायिका अशी आहे..एकदा सापांनी गरुडराजाच्या भार्येस व पुत्रास  त्यांचे गुलाम बनवले होते. गरुडराजाने सर्पराजास त्यांना सोडण्यास सांगितले. सर्पराज म्हणाला,”तू मला स्वर्गातला अम्रुतकुंभ आणून दे. मी तुझ्या बायकोमुलाची सुटका करतो.

गरुडराज विष्णुदेवांकडे गेला. त्याने त्याची अडचण श्रीविष्णुंना कथित केली. श्रीविष्णुंनी त्याला दोन कानमंत्र दिले. अम्रुतकुंभ घेऊन गरुडराज सर्पराजाकडे आला व म्हणाला,”आता तरी माझ्या बायकोमुलास मुक्त कर.” सर्पराज खूष झाला. त्याने गरुडराजाच्या बायको व मुलास मुक्त केले. सर्पराज अम्रुत प्राशन करणार तोच विष्णुच्या सांगण्याप्रमाणे गरुडराज म्हणाला,”अम्रुत प्राशन करण्यापूर्वी शुचिर्भूत झालेले योग्य.” सर्पराजाला ते पटले. सगळे साप अंघोळीला गेले.

जाणून घ्या तुळशीचे आध्यात्मिक आणि आयुर्वेदिक महत्त्व आणि फायदे

सुख, समृद्धी, सफलता, भरभराट मिळवण्यासाठी श्रीसूक्त स्तोत्राचे रोज पठण करा – श्रीसूक्त स्तोत्र मराठी अर्थासहित

लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री सुक्ताबरोबरच लक्ष्मी सूक्त ह्या स्तोत्राचेही पठण करा. श्री लक्ष्मी सूक्त पठण

इकडे इंद्रदेव आला व अम्रुतकुंभ स्वर्गात घेऊन आला. साप अंघोळीहून आले. अम्रुतकुंभ गायब झालेले पाहून ते क्रोधीत झाले. गरुडराज आपल्या बायकोमुलांसह उडून गेला. जिथे ते अम्रुतकुंभ होते तिथल्या गवताच्या दुर्वा झाल्या, त्यांवर सापाने आपले अंग घासले असता तो चिरतरूण राहिला म्हणून साप वेळोवेळी कात टाकतो म्हणतात.

दुर्वांचा उपयोग आयुर्वेदिक औषधींत फार पुर्वीपासून केला जातो (benefits of durva grass). एंटी फंगल, एंटी वायरल, एंटी सेप्टिक गुणांनी युक्त दुर्वा आरोग्यासाठी जणू संजिवनी आहेत.

१. दुर्वांना हरित रक्त असेही म्हणतात. दुर्वा रसांच्या नित्य सेवनाने रक्तातील हिमोग्लोबीनची पातळी वाढते म्हणून पंडुरोगावर(एनिमिया) दुर्वांचा रस गुणकारी आहे.

२. दुर्वांमधे प्रोटीन्स,कर्बोदके असे पौष्टिक घटक असल्याकारणाने ताज्या दुर्वांचा रस नियमित सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

३. दुर्वारसाच्या सेवनाने रक्तातील शर्करा नियंत्रित रहाण्यास मदत होते त्यामुळे दुर्वांकुराचा रस हा मधुमेहावरही गुणकारी आहे तसेच शरीरात साचलेल्या चरबीचेही तो विघटन करतो. ताणतणाव कमी करतो त्यामुळे ह्रदयासाठीही गुणकारी आहे.

४. नाकातून घोणा फुटून रक्त येत असल्यास, दुर्वांचा रस खडीसाखर घालून दिल्याने रक्तस्राव थांबतो.

५.लघवी अडत असल्यास दुर्वांच्या रसाच्या सेवनाने लघवी साफ होते. मुतखडयावरही गुणकारी आहे.

६. उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक त्वचाविकारांवरही दुर्वांकुराचा रस हा गुणकारी आहे.

७. ताप डोक्यात चढू नयै याकरता दूर्वा व तांदूळ एकत्र वाटून त्याचा लेप कपाळाला लावल्यास ताप मस्तकात चढत नाही.

८. नियमित दुर्वांचा रस प्याल्यास शरीर तंदुरुस्त रहाते. पित्त शमन होते. निद्रानाशाच्या तक्रारी दूर होतात. शांत झोप लागते.

९. दुर्वांमध्ये ‘फ्लॅवोनाईड्स’ या अतिशय पोषक घटकांचा समावेश असतो. दुर्वा पाण्यात रात्री भिजत घालून त्या पाण्याने गुळण्या केल्यास तोंडातील जखमा भरून येतात, तोंडातून दुर्गंध येत नाही. हिरड्या निरोगी रहातात.

१०. दुर्वारस दह्यासोबत घेतल्यास मुत्रमार्गातील अडथळे दूर होतात. मुळव्याधीत आराम मिळतो.

=========================

प्रिय वाचकहो, उत्तम बोधकथा/moral stories in marathi, प्रेम कथा, रहस्य कथा, कथामालिका, भारतातील संस्कृतीचे विविध पैलू, पर्यटन, खाद्यसंस्कृती, फॅशन, पॅरेंटिंग, लाईफस्टाईल ब्लॉग्स वाचायचे असतील तर रीतभातमराठीला नक्की भेट द्या.

Leave a Comment

error: