Ritbhatmarathi

Search
Close this search box.

बी पॉझिटिव (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा_जाने_२२

©️®️ सौ.प्रतिभा परांजपे

अंजलीने वार्षिक परीक्षेच्या वह्यां मधून नंबर रजिस्टरमध्ये नोट केले. पहिला, दुसरा, तिसरा नंबर वाल्या मुलांची नावे लिहून प्रिन्सिपल सरांच्या खोलीत गेली.
सर फोनवर कोणाशी बोलत होते..
अंजलीने घड्याळात पाहिले अकरा वाजत आले . पाच-दहा मिनिटाचे काम आहे एकदा सरांची सही झाली कि ती घरी पोहोचेल ….

शाळेत जायचं म्हणून सकाळची कामे पटापट उरकली, पोळ्या व कुकर लाऊन , चार शिट्या झाल्या की गॅस बंद करा असे सासूबाईंना सांगून, मोठ्या मुलीला, चिंगीला, “छोट्या चिनुला संभाळ ,,रडवू नको-_– मी येताना गंमत घेऊन येईन—-असे गोड आश्वासन देत ती शाळेत आली होती.”…
सरांचे बोलणे झाले तशी तिने आपले रजिस्टर त्यांच्या समोर केले, सरांनी हात सॅनटाइज करुन
रिजल्ट पहात त्याच्यावर सही करून रिमार्क लिहित विचारले
“मॅडम चहा घेणार का”?
नो थँक्स सर,
घरी कधी पोहोचते असे अंजलीला वाटत होते पण— प्रिन्सिपल सरांचे बोलणे थांबतच नव्हते .नाईलाजाने यस सर ,नो सर करत ती बसून राहिली.
बारा वाजून गेले होते तेवढ्यात एक मॅडम अजून आल्या नी अंजली ची सुटका झाली…
घरी येता येता वाटेत अंजलीने एका दुकानातून आंबे व पनीर घेतले.
घरी पोहोचताच मास्क,हात सैनेटाईज करून ती सरळ बाथरूमात शिरली.
व्यवस्थित अंघोळ करून सरळ स्वयंपाक घरात . आणलेले फळ पाण्यात स्वच्छ धुवून
पटापट तिने मुलींना आवडतो म्हणून आंब्याचा रस काढून दोघी पोरींना जेवायला वाढले, सासुबाई ना ही जेवायला चला म्हणून आवाज दिला . खरंतर भूक व ऊन लागल्याने डोके दुखायला लागले प–ण तिकडे दुर्लक्ष करून अंजलीने पनीर पसंदा भाजी बनवून ताट वाढून अजयच्या खोलीत पाठवले त्यांचे ऑनलाईन काम सुरू होते.
भूक लागली होती पण जेवायला बसल्यावर जेवण जाईना कसेबसे पहिले वाढलेलं खाऊन ती उठली.
कोरोनाच्या लॉक डाउन मुळे सर्व जण घरी ,
छोट्या चिनुला खरेतर यावर्षी माँटेसरी स्कूल ला घालायचे होते. प—ण सर्वच फिसकटल…
सर्व कामे उरकेपर्यंत दोन वाजले. चिनुला झोपवताना तिला जाणवले डोके गरगरते आहे, शरीर पण कसकसत आहे गरम झाल्या सारख वाटतय…

रात्रीपर्यंत अंजुला ताप आल्यासारखे वाटू लागले तिने अजय जवळ क्रोसिन मागितली….

सकाळी जाग आली पण फ्रेश वाटत नव्हते बिछान्यातून उठताना घसा खवखव करतो आहे व ताप ही अजून आहे .मला काय होते आहे तिने अजय ला आवाज दिला.
अजय व तिने टेस्ट करायला जायचे ठरवले,चीनू, चिंगी ला घरातच खेळा, बाहेर जाऊ नका म्हणून सांगितले
आजचा स्वयंपाक अजय व सासूबाईंनी मिळून केला तिला भूक तर लागत होती पण जेवणाला काहीच चव लागत नव्हती झोप खुप येत होती .
रात्री चिनुला अजयने स्वतःजवळ झोपवले…
झोपेत तिला वाटत होते आपण एका काळोख्या भुयारातून चाललो आहोत. अवकाशात ग्रह ,नक्षत्र जसे फिरत असतात तसे कोरोना चे विषाणू आपल्या चारी बाजुला गोल गोल फिरत येऊन चिकटत आहे.ती
सुटायचा प्रयत्न करते आहे. कुठेही उजेड दिसत नाहीये .जीवाच्या आकांताने ती एकटीच धावते आहे.

तेवढ्यात…. डोळ्यांवर उजेडाची तिरीप आली ,तिनेडोळे उघडले.
अजय तिला आवाज देत होते….
ब्रश करून तिने चहा घेतला प-ण त्यानेही तिला मळमळायला लागले…
अजय”,वेक्सिन करता रजिस्ट्रेशन केलं होतं त्याचं काय झालं”?
“अजून स्लॉट नाही मिळाला”, कालच पाहिले होते.
अंजली चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला .
काळजी घेत होती, तरी पण,— मुलींना दूर ठेवणे, स्वतःला आयसोलेट करणे कसे काय जमणार???
अंजली ला रडूच यायला लागले पण मुलींना पाहून तिने स्वतःला सांभाळलं

अंजलीने छोट्या बहिणीला, अलका ला फोन लावला.
अलका म्हणाली, “ताई तू काळजी नको करू तुला काही होणार नाही. मुलींना माझ्याकडे पाठव मी अजय सोबत जेवण पाठवते” असे म्हणून अलकाने धीर दिला. तरीही अंजलीच्या जीवाला चैन नव्हते.
तिला भीती वाटत होती ,ती नाही बरी झाली तर?? इतक्या लवकर सर्व वाइंडअप करायचे?
चिनू किती लहान आहे अंजलीला आपले बालपण आठवले.
आई अशीच आजारपणात गेली, मावशीने लहानाचे मोठे केले अलका तर अगदी तान्ही होती.
“माय मरो आणि मावशी जगो” नियतीने परत तोच प्रसंग आणला. मावशीने किती जरी प्रेमाने सांभाळले तरीही आईची कमतरता नेहमीच जाणवत राहील .
डोळे रात्रभर पाझरत होते… परिणामी तब्येत आणखिन बिघडली
कोविड सेंटर लाAdmit केले.

दवाखान्यात एकदोन सोडून सर्व वयस्क पेशंट होते.डाक्टर दोन्ही वेळा पाहून गेले. औषधा पेक्षा उपदेशाचे डोस दिले, तरीही तिथल्या वातावरणात मनावर एक दडपण आले.
तुम्हाला काही होणार नाही, Be Positive, ताप कमी होत होता,पण मन कशातच लागत नव्हते एक मोबाईल च होता त्यावर आप्तेष्टांचे मैसेज , काळजी करू नकोस.

संध्याकाळी नर्स आली, प्रेग्नेंट होती सात महिन्याची, तिनेही घाबरू नका सर्व ठीक होईल म्हणत ऑक्सीजन लेवल चेक केला.
, 94आहे म्हणजे बॉर्डरवर.
“घरची फार काळजी करता तुम्ही. नका करू, स्वतःच्या तब्येतीवर कॉन्सन्ट्रेट करा, खोल श्वास घ्या, प्राणायाम करा.”
हिला काय ,काळजी कशी नको करू ? माझ्या दोन्ही मुली किती लहान आहे.तुझ बाळ तर जवळच आहे असे मनात येत होते तोच तिने एका लहान मुलीचा फोटो दाखवला माझी मोठी लेक, घरीच असते.

रात्री चीनू,चींगी चा फोन , खूप चिवचिवत होत्या.
“आईतू कशी आहे? आमची काळजी नको करू, मावशीने खुप खुप व्हिडिओ गेम दिले , स्टोरी पण सांगितली.”….
…. तुला सांगू??
चिनू गोड आवाजात गोष्ट सांगू लागली.
गोष्ट ऐकता ऐकताअंजलीला झोप लागली.अर्धवट झोपेत तिला दिसलं,
एक मोठं रांजण दुधाने भरलेलं ठेवलं आहे . त्या रांजणात ती वाकून पाहत आहे. अचानक ती त्यात पडते.
घाबरून ती हात-पाय मारू लागते.
आता तिला ती उंदरा सारखी दिसू लागली. दुधात गटांगळ्या खाऊ लागली जीव घाबरायला लागला मग ती गोल गोल फिरायला लागली. अचानक चिनू चा आवाजकुठून तरी आला आणि तिच्यात एक वेगळीच शक्ती आली पूर्ण ताकदीने ती गोल गोल फिरत राहते एक मोठा लोण्याचा गोळा तयार झाला त्यावर मुश्किलीने चढते व बाहेर उडी मारते.

पडल्यासारखे वाटताच अंजलीला जाग आली. ऊर धपापत होते हातात फोन ठेवूनच ती झोपली होती.
तिने फोन चालू केला तशी आवाज येऊ लागला.
मम्मा अगं मावशीने स्टोरी च मॉरलMoral सांगितलाय “घाबरू नये ,जो करेज दाखवतो तोच जिंकतो.”
आमच्या स्कूलच्या मॅडम पण म्हणतात मध्येच चिंगी चा आवाज!!! कोरोना से नही डरना फाईट करना.
ऐकून अंजलीला वाटले खरंय माझ्या दोघी मुली किती स्ट्रॉंग आहे आणि मी त्यांची आई , पण मला त्या माॅरल सपोर्ट देतात .
मला त्यांच्यासाठी बरे व्हायचेच मी आपल्या मुलींना सोडून नाही जाणार.
जसा जसा विचार मनात पक्का होत गेला अंजलीचे मन शांत होत गेले व शरीर निद्रा धीन झाले.
सकाळी जाग आली, नर्स अंजलीला ऑक्सीमिटर लावून चेक करत होती.
अरे वा –आज तर ऑक्सिजनचे पर्सेंटेज ९६ व पल्स रेट 72 एकदम परफेक्ट. अंजली मॅडम तुम्ही ठीक आहात.
चेहरा पण आनंदी दिसतोय काय घरी जायचं ना??
हो नक्कीच ,ओके— तुमच्या मिस्टरांना फोन लावू या दोन दिवसांनी डिस्चार्ज देऊ. अंजलीला मनातून हायस वाटलं, आनंदाने तिने नर्स चा हात धरून थॅंक्यू सिस्टर म्हंटले.
“पण घरी गेल्यावर सगळे पथ्य सोशल डिस्टंसिंग वगैरे नीट पाळायचे व मुख्य म्हणजे..”…

नर्स ला मध्ये थांबवत,अंजली हसून म्हणाली…”.. बी–पॉझिटिव्ह”

लेखन-सौ.प्रतिभा परांजपे

=========================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Share your love
Facebook
Twitter