
हि गोष्ट आहे नव्वदच्या दशकातील म्हजेच ज्या काळात बायकांना मान वर करून बोलण्याचा अधिकार नव्हता विशेष करून आपल्यासारख्या गृहिणी वर्गाना….तो अधिकार पुरुषप्रधान संस्कृतीने जमीनदोस्त केलेला होता पण तरीही अजूनही गृहिणी म्हंटल की त्या बाईला काडीचीही किंमत नसते हे ब्रीदवाक्य अजूनही बायकांच्या मनावर कोरले गेलेलं आहे…हेच ब्रीदवाक्य नव्वदच्या दशकात कथानायिका म्हजेच वेदिका ने कसं खोडून काढलं याची एक मजेशीर कथा…वाचकांनी नव्वदचे दशक आणि आताची परिस्थिती याच्याशी तुलना करू नये अजूनही अशा बायकांची या जगाला नितांत गरज आहे…
वेदिका आपल्या नवऱ्याच्या ऑफिसामधल्या केबिनमधून बाहेर पडते…दोन मुलं आणि नवरा असं चौकोनी कुटुंब मस्त मजेशीर रित्या राहत असतं…त्यादिवशी वेदिका अगदी हवेत पिसासारखी तरंगतच आपल्या केबिनमधून बाहेर पडली…काम तर वेदिकाच्या मनासारखं झालं होत म्हणून साहजिकच स्वतःवर आणि जगावर ती खूप खुश होती कारण नवरा गिरीशकडून काही कॅश मिळाली होती ना…! असो…तो तिच्या संसाराचा भाग असेलही पण वेदिका भलतीच खुश होती…म्हणून आपल्या खांद्यावरच्या मस्त शबनम पिशवीमधून चण्याची पुडी काढली…लिफ्टकडे जात असताना उघडपणे चणे खात असताना लोक काय म्हणतील अशा प्रकारचा विचार वेदिकाच्या मनाला जराही शिवला नाही या गोष्टीचं विशेष कारण तितकीच बिनधास्त आणि जगाची फिकीर न करणारी अशी वेदिका असते…नवरोबा गिरीश एक सरकारी अधिकारी असल्याने आणि उच्च पदावर कार्यरत असल्याने बायकोने आपल्या बुकांचा म्हणजेच पुस्तकांचा आणि फायलींचा तोल सांभाळावा बाकी कशातही डोकं चालवू नये या मताचा गिरीश असल्याने दोघांमध्ये प्रेमळ अशी बोलणी क्वचित कधीतरी होत असे…ती शबनम पिशवी वेदिकाच्या शिष्ट स्वभावाला शोभतही नव्हती तरी तिने ती लटकवलीच होती…एक चणा तोंडात टाकता टाकता तिने लिफ्टचं बटन दाबलं…पण बटनातला लाईट काही लागला नाही आणि त्या लिफ्टचा खाडखूड असा आवाजही कानी पडला नाही…तेव्हा चण्याची पिशवी परत पिशवीत कोंबून तेव्हा दोन्ही हातांनी अंगठ्याला अगदी रग लागेपर्यंत जोरात बटन दोन मिनिटे दाबून ठेवलं पण छे..! लिफ्ट काही चालू झाली नाही…सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे त्या सरकारी इमारतींमधल्या यंत्रणाही जागेवर नसण्याची किंवा वेळेवर कमी न येण्याची सवय नसावी…म्हणून कुणाचीच वाट न पाहता वेदिका जिन्याकडे वळली आणि जिना उतरवून जाण्याचं ठरवलं…चांगले चार-पाच मजले उतरून जायचे होते मड चांगला होता म्हणून आठवणीने शबनम पिशवीत टाकलेली चण्य्ची पिशवी बाहेर आली…आणि एक चणा तोंडात गेला…त्याचबरोबर एक गाणंही तोंडातून बाहेर आलं…’ खैके पान बनारसवाला…खुलं जाये बंद अकल का ताला…’ खरोखरच त्या सरकारी अधिकाऱ्याच्या अकलेचे टाळं उघडलं पाहिजे म्हंणून तर ते गाणं तिच्या ओठांवर आलं…काही मजले उतरून आली तसं सुप्त मनाचा आणखी एक कप्पा उघडला गेला आणि आणखी एक गाणं तिच्या ओठांवर आलं…” मेरा बाबू चैलछाबिला मे तो नाचूंगी…ओ मेरा बलमा रंगरंगीला मे तो नाचूंगी…” लग्नाला इतकी वर्ष झाली तरी आपल्या बाबू मध्ये किंवा आपल्या बल्मा मध्ये वेदिका ला जराही इंटरेस्ट नव्हता पण नाचावंसं वाटणाऱ्या परिस्थितीत ‘ में नाचूंगी…’ या ओळीवर अगदी आनंदात चारही मजले उतरून गिरक्या घेत अगदी आनंदाने बागडत आपल्या बस स्टोपवर येऊन पोचली…
त्या वेळी भर दुपार झाली होती रणरणती उन्ह अंगावर येऊनही तिला कशाचं काहीच वाटत नव्हतं..आणि त्या मनात आणखी एक सुप्त गाणं सुरु झालं….’ माझ्या प्रीतीच्या फुला…नको जाऊ कोमेजून…’ अशी गाणी आठवून आणि मनातल्या मनात गुणगुणत ती काळ्याभडक डांबरी रस्त्याने चालली होती…लग्न झाल्या झाल्या तिच्यावर असलेल्या बाळबोध संस्कारामधून पतीराज हाच आपला परमेश्वर….प्राणेश्वर इ इ असतो हे तिने मनाला बजावून बजावून सांगितलं होतं…प्रत्यक्षात मात्र सदासर्वकाळ ज्यात त्यात खोड्या काढून बायकोला नाउमेद करीत बावळट आणि मूर्ख ठरवत अधिकार गाजवणारा पुरुष नामक दोन पाय असणारा प्राणी म्हणजे पती हीच व्याख्या वेदिकाच्या डोक्यात फिट्ट होऊन बसलेली…त्यातल्या त्यात नवरा उच्च पदावरच्या खुर्चीत बसणारा म्हणून बायको म्हणजे एक कठपुतलीच जणू…नवऱ्याच्या कर्तृत्वाने धन्य धन्य होऊन त्याची पोसिशन डॅम न होऊ देता जिवाच्या कराराने ती पोसिशन नावाची सवत सांभाळत सुखाने राहावे एवढीच गिरीशची अपेक्षा म्हणून वेदिकाही कसलाच विचार न करता अगदी आंनदाने राहत होती…तरीही ‘ तू असलीस तर झाले असते उन्हाचे गोड चांदणे ‘ असल्या प्रेमकाव्याची अपेक्षा करणं म्हणजे एका डोंबकावळ्याकडून कोकीळगाणाची अपेक्षा असं वेदिकाला नेहमी वाटत म्हणून नवरोबांकडून प्रेमाच्या बोलाचीही अपेक्षा वेदिकाने केली नव्हती…तरीही नवऱ्यावर जीवापाड प्रेम असं वेदिकाचं मन….
किती वेळ झाला तरी बस काही येत नव्हती…नेहमी AC लावलेल्या फोरव्हीलर बंद गाडीमधून नवरोबांच्या शेजारी बसून तिला फिरायची सवय…जावं का टॅक्सी करून पटदिशी घरी असाही विचार वेदिकाच्या मनात येऊन गेला पण…पोटात कावळ्यांनी ओरडून ओरडून आकांडतांडव केलं होतं…म्हणून काही झालं तरी आपण आपली मनमानी इथे करायची त्यामुळे बाची रंग सोडून पटदिशी ती खाऊगल्लीमधल्या रांगेत शिरली…लाँच ब्रेक असल्याने फास्टफूड असलेल्या ठिकाणी भल्या मोठ्या रांगा लागल्या होत्या…म्हणून वेदिकाने वडापाव आणि गरमागरम रगडा पॅटिस वर ताव मारला…हॉटेल मध्ये बसून….एटीकेट्स पाळून जेवणारी वेदिका आता मात्र हातगाडीवरल्या खाण्यावर मस्त ताव मारत होती…त्यावेळी नवऱ्याची पोसिशन…आरोग्य…स्वच्छता सगळं खड्ड्यात गेलं असं म्हणून मस्त खात होती…नंतर मस्त गारेगार उसाचा रस पिऊन आपल्या बस स्टॉप वर गेली लगेच आपल्या मनगटात असलेल्या घड्याळाकडे पाहिलं…तर घड्याळाचा काटा तीन कडे सरकत होता…लगबगीने गर्दी असलेल्या बस मध्ये चढली…आणि काही वेळातच घरी येऊन पोचली…
बरोब्बर तीन दिवसांपूर्वी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दारावरची बेल वाजली होती पोस्टमनने एक खाकी लिफाफा दाराच्या फटींमधून टाकला होता आणि तो तसाच पडला होता….दारात आल्या आल्या लिफाफा वेदिकाला दिसला तर पाकिटाचा आकार साधारण एमटीएनएल कडुनलेलं असल्याचं तिला कळलं असं म्हणून ते उचलून पाहिलं तर तेच होतं…म्हणून वेदिकाने नीट काळजीपूर्वक तो लिफाफा गिरीशच्या टेबलावर नेऊन ठेवला…गाडीचा परिचित असलेला आवाज वेदिकाने ऐकला त्याचबरोबर हॉर्नचंही आवाज ऐकला आणि वैदिकांची खात्री पातळी की आपली पतिपरमेश्वरांची स्वारी आली आहे…घरात आल्याबरोबर मोज्यांचे बोळे बुटात कोंबून गिरीशने नेहमीच्या चिडक्या स्वरात विचारले…
गिरीश – आज पोस्टाने काय आलंय गं…?वेदिका – ते तिकडे तुझ्या टेबलवर ठेवलंय…बहुदा टेलिफोनचा बिल असणार…!
कपडे बदलायला म्हणून गिरीश बेडरूममध्ये गेला तर डोक्यावरचा फॅन फुल्ल स्पीडवर करून क्षणार्धात टेबलवर ठेवलेला तो लिफाफा वाऱ्याच्या जोरदार झोतासोबत कॉटच्या खाली जाऊन अडकला…तो असा अडकला की गिरीशला अदृश्य झाल्यासारखा सापडताही नव्हता…तेवढ्यात गिरीश ओरडला…
गिरीश – ए….टॉर्च आणून दे गं जरा…
वेदिका – आता दिवसाढवळ्या टॉर्च हवाय कशाला…?
गिरीश – पाय धू…म्हणे साखळ्या केव्हढ्याच्या…तुला कशाला पाहिजे नसत्या चौकश्या…आणून दे…टॉर्च…! वळणचं नाहीय…आता लवकर दे टॉर्च ते बिल गेलंय कुठच्या कुठे…सापडत नाहीय…
वेदिका – उठसुठ माझ्या माहेरच्या वळणावर कशाला जात तुम्ही…वळण तुम्हालाच नाहीय….एवढा जोरात फॅन सुरु करून ठेवतं का कुणी…फॅन जोरात चालू करून कागदं उडून जाणारच ना…एवढं साधं समजत नाही…
गिरीश – भाषण नको…टॉर्च दे पटकन…
पुन्हा एकदा जमिनीवर बसून आणि कॉटखाली पाहून झालं तर तो लिफाफा अडकला होता तो पार कॉटच्या खुराखाली जाऊन बसला होता…निघायचं नाव घेत नव्हता…झाडू,सळई, आजोबांची वाकडी काठी ता सगळ्या आयुधांनी त्याच्यापुढ्यात हार मानली….शेवटी वैतागून गिरीश म्हणला…
गिरीश – मक्खसारखी उभी राहू नकोस…इकडे ये कॉट हलवावी लागेल जरा हात लाव…
वेदिका – तरी मी सांगत होते…हि कॉट नको आणूस बॉक्सवली ही कॉट अगदी धुडंच आहे हत्ती आणला तरी हलायची नाही ढिम्म नुसती…आधी या कॉटच्या पोटातलं म्हणजेच बॉक्समधलं सामान बाहेर काढून त्याची डिलिव्हरी कर…मग पुढचं बाळंतपण करायला मी आलेच…
वेदिकाची विनोदबुद्धी वेळी अवेळी जागी झाल्याने गिरीशने काडीचंही प्रत्युत्तर तिला दिल नाही…आणि तितक्याच रुक्ष आवाजात गिरीश म्हणाला….
गिरीश – तू पण थांब ना इथे आपण दोघे बघुयात काय ते…
वेदिका – अडलंय माझं….[ खेटर शब्द तिने खूप प्रयासाने टाळला ] बरं…तू सामान तर काढ मी आलेच…[ असे म्हणत ती तिथून सटकली ]
गिरीश – अगं इकडे तर ये…हे बघ माझं निळं स्नो जॅकेट सापडत नव्हतं ना ते यात सापडलंय….पण यात कुणी टाकलंय…हे नक्की तुझंच काम असणार…
वेदिका – आता याच खापरही माझ्यावर फोडून मोकळा हो तू…एक तर स्वतःच्या वस्तू नीट ठेवत जा…आणि याचा तुला आनंद झालाय का स्नो जॅकेट सापडलं म्हणून….जर आनंद झाला असेल तर बिलकुल होऊ देऊ नको आनंद कारण हे घालून कुठे तू मला दार्जिलिंग,सिमला,मनालीला घेऊन जाणार आहेस….आठवत आहे का कधी घेतली होती रजा ते…फक्त काम नि काम…तुला नाही आठवणार…घरभर पसारा झालाय आता…पाय ठेवायला जागा नाहीय…
गिरीश – वेदिका…अगं हे बघ झाली रिकामी कॉट….चल हात लाव कॉट हलवायला…
पतीआज्ञेप्रमाणे वेदिका लगेच पुढे सरसावली…बजरंगबली की जय म्हणत दोघांनी कॉट हलवली खरी…पण पुढे काय झालं…? कॉट सरकवत असताना गिरीशचा पाय चुकून…मुलांच्या खेळण्यांमध्ये असलेल्या बॉल वर पडला…आता गिरीशला पटकन समजलं नाही की तिथे चेंडू आहे कारण त्यावर चादर लपेटली होती…म्हणून गिरीश धाडकन खाली पडला….
गिरीश – आयईई….गगग….आयईई …गं….
वेदिका – तरी मी सांगत होते…
वेदिका पटकन धावली आणि आपल्या गिरीशला एका हाताने पकडून सावरत….खुर्चीमध्ये नेऊन बसवलं…हा एवढं मात्र झालं…कॉटच्या धक्क्याने…तो अडकलेला लिफाफा बाहेर काढला गेला…आणि तो वेदिकाने उचलून कपाटात नेऊन ठेवला…तोपर्यंत वेदिकाने डॉक्टरांना बोलवून गिरीशच्या पायाला इलॅस्टिकचे बँडेज गुंडाळले….डॉक्टरांनी गिरीशला जागेवर बसून राहायची तंबी दिली कारण गिरीशच्या पायाचा घोटा चांगलाच सुजला होता…जायबंदी होऊन आडव्या पडलेल्या गिरीशने दुसऱ्या दिवशी तो लिफाफा उघडला आणि जिवाच्या आकांताने गिरीश ओरडला…
गिरीश – वेदिका….ए वेदिका…हे बघ काय…?
वेदिका – पाहू….पाहू काय ते…
एकम दशम करत ती बिलावरचे आकडे पाहून म्हणाली…
वेदिका – एवढं बिल कसं काय आलं…
गिरीश – हा मला प्रश्न कसा काय करू शकते तू…दिवसभर तू असते घरात…मी नाही…
वेदिका – [ महिषासुरमर्दिनी होते ] मला वाटत…आपल्या टेलिफोनच्या मुख्य अधिकाऱ्याला जाऊन बोललं पाहिजे..आणि खडसावून विचारतेच….तू फक्त तुझ्या सहीच खरमरीत पत्र लिहून दे बघ…मी पुढे काय करते ते…
गिरीश – पत्राने काय होणारे… मीच फोन करतो की आणि जाऊन चांगला जाबचं विचारतो उद्या….
वेदिका – उद्या कशाला आत्ताच विचार की…
गिरीश – [ गिरीश जी.एम. ला फोन लावतो ] हॅलो….आमची एक तक्रार आहे….एवढं बिल कसं लावता तुम्ही…हॅलो….हॅलो….[ गिरीश फोनवर बोलतानाच रागावून संतापत होता चिडत होता ]
वेदिका – ह्म्म्म….काय झालं एवढं चिडायला…आणि संतापायला….
गिरीश – [ रागाने फोन ठेऊन ] चिडू नको तर काय करू…मी काही सांगायच्या आत…मला म्हणतोय कसा…बिल लाखाचं असो वा कोटींचं…आधी बिल भरा मग तक्रार करा…बिल भरलं नाही तर टेलिफोन लाईन तोडली जाईन…याच्या बापानं ठेवलं होतं एवढं बिल…तशीच तणतण करत गिरीश दुखरा पाय घेऊन बसला…आणि एकूण परिस्थिती पाहता वेदिकालाही आपल्या नवरोबांच्या रागाचं कारण चांगलंच उमगलं वेदिका म्हणाली….
वेदिका – हम्म्म्म…आता शांत हो…रागावून,संतापून काही होणार आहे का…त्याने प्रश्न सुटणार आहेत का…घे पॅड,पेन आणि कागदं घे….तुला जे काही वाटतंय ते लिहून दे…म्हणजे आपल्याला काय त्रास होतोय हे लिहून दे…आणि टेलिफोनवाले काय त्रास देताय ते लिही…तुझ्या दुखऱ्या पायाबद्दल नको लिहूस…
गिरीश – तेवढं कळतं मला…तू सांगायला नकोय…[ वैतागून म्हणतो ]
वेदिका – अरे वाह…दुसऱ्याचं राग माझ्यावर नको काढूस हा…तू फक्त लिही मग मी स्वतः ते पत्र घेऊन जाते जी.एम च्या ऑफिसात…बघ मी काय करते ते…
गिरीशने एकदम चकित होऊन तिच्याकडे पाहिलं आपली ही अशी गृहिणीछाप बायको काय करणार तिकडे जाऊन या अविर्भावात गिरीशने पाहिलं…तेवढ्यात वेदिका चटकन म्हणाली…
वेदिका – तू लिही रे पटकन…वेळ वाया घालवू नकोस…
गिरीश आता लहान मुलाने सल्ला दिला असता तरीही त्याने ऐकला असता अशी अवस्था गिरीशची झाली होती…गिरीशनेही पटकन आपली टेलिफोनची तक्रार लिहून वेदिकाकडे तो कागदं सोपवला…दामिनी नावाची सीरिअल पाहणारी आपली बायको आता काय तो मोठा दिवा लावणार टेलिफोन ऑफिसमध्ये जाऊन म्हणून गिरीश परत विचार करत बसला…
वेदिका – गिरीश…कसला एवढा विचार करतोस….आगे आगे देखो होता है क्या…!
गिरीश – वेदिका…ती लोक तुला बोलूही देणार नाहीत बघ…कारण त्यांना जाम वटवट करायची सवय असते…त्यात तू ही अशी कुठेही भरकटणारी….तिथे कुठला स्वयंपाकाचा अंदाज नाही बांधायचाय एवढं लक्षात ठेव …
वेदिका – [ साडी नेसता नेसता आणि मेकअप करता करता म्हणते ] तू फक्त गप्प पडून राहा…मी येतेच…हे बघ चीजटोस्ट करून ठेवलेत मस्तपैकी खाऊन घे तू…
वेदिकाचा नूर काही वेगळाच होता…ते त्रासदायक बिल आणि गिरीशने लिहिले पत्र असं घेऊन वेदिका क्रिम कलरची साधी सिल्कची साडी नेसून गेली…आजवर कधीच न पाहिलेली आत्मविश्वासाची झळ वेदिकाच्या चेहऱ्यावर दिसत होती….आपल्या नवऱ्याला कुलुपात ठेऊन त्या अवजड बिलाचा शिवधनुष्य एकटीनं जिद्दीनं पेलवायचं तिने ठरवलं…आणि एक नवी उमेद घेऊन मोठ्या आत्मविश्वासाने टेलिफोन एक्सचेन्ज च्या अवाढव्य इमारतीसमोर येऊन उभी राहिली…तेवढ्यात गेटपाशी बसलेल्या खाकी कपडे घातलेल्या रखवालदाराने वेदिकाला अडवले…
रखवालदार – अंदर जाणा मना है…
वेदिका – अहो पण मला जी.एम. साहेबांना भेटायचंय…बहुत महत्वाचा काम आहे…
रखवालदार – बोला ना एक बार अंदर नाही जा शकता…समझता नही है क्या…?
वेदिका – हम क्या तुम्हारे जी.एम को खाता है क्या…अरे भाई…हम व्हेजिटेरियन है…हमारे बिल का बहोत मोठा लफडा हो गया है…उपरसें मेरे आदमी की एक टांग भी टुटी है…फिर से यहा आना जाणा…परवडेगा नही हमको…समझ जाओ भाई…
रखवालदार – [ आपल्या मिश्या गोल दुमडून म्हणाला ] ये लेओ फिर…यही से फोन घुमाओ…
जी .एम चा फोन नंबर तो रखवालदार लावून देतो…फोन लावताचक्षणी भीतीने वेदिका काय बोलली तीच तिला माहिती…एकूण वेदिकाची मेहनत वाया गेली नाही हे महत्वाचं…कारण भेटीची परवानगी तर मिळाली…म्हणून फळीतील एक युद्ध जिंकल्यासारखा भाव आणून अगदी प्रसन्न मुद्रेने वेदिका भव्य असणाऱ्या जी.एम साहेबांच्या केबिनमध्ये गेली…गोल गरगरीत जी.एम साहेब फिरत्या खुर्चीवर बसून आपल्या सेक्रेटरीला सूचना देण्यात मग्न होते….आणि वेदिकाची अवस्था एका पाण्याने भिजलेल्या मांजरासारखी अगदी चिडीचूप बसली होती…मागची सगळी बिल आणि ते मोठं त्रासदायक बिल आणि गिरीशने लिहिलेली तक्रार असं आपल्या हातात घट्ट पकडून ठेवलं होतं…सेक्रेटरी जाताच…जी.एम. ने फायलीतली कागदपत्र चाळत वर न पाहताच वेदिकाला विचारलं….
जी.एम. – येस…व्हॉट डू यु वॉन्ट…?
वेदिका – आय वॉन्ट जस्टीस इफ यु कॅन गिव्ह मी…
जी.एम – येस…गो अ हेड…[ फाईलमधून नजर वेदिकावर गेली ]
वेदिका – सर….लिसन माय केस सिरिअसली…एवढं मोठं बिल कसं काय आमच्या सारख्या सामान्य माणसांच्या गळ्यात मारता तुम्ही…एक मिनिट ऍक्टऊली माय प्रॉब्लेम इस आय राईट ऑन थिस पेज…प्लीस रीड इट….एवढं बिल तुमच्या बहिणीला भरायला लावलं असतं का हो तुम्ही…वरती बिल भरलं नाही म्हणून टेलिफोनची लाईन तोडण्याची धमकीही दिली असती का हो तुम्ही…
अगदी स्थिर नजरेनं जी.एम कडे पाहत वेदिका बोलत होती…जी.एम. सर म्हणाले…
जी.एम. – ठीक आहे…पाहतो मी काय करता येईल ते…उद्या किंवा परवा या भेटायला….
वेदिका – नको…नको…माझ्या नवऱ्याचा पाय मुरगाळलंय…त्यांना धड उभाही राहता येत नाहीय…घरात दुसरं कुणीच नाहिय…आत्ताच काय ते लेखी उत्तर द्या …
जी.एम. – हे बघा…मॅडम…हे सरकारी काम आहे…इथल्या यंत्रणेप्रमाणे प्रॉपर काम इथं होतं असतात…थोडा धीर धरा…
वेदिका – ते काही मला सांगू नका…तुमच्या कॉम्पुटर ऑपरेटरची चूक असेल…पण त्या चुकीपायी बसलेल्या मानसिक धक्क्यामुळे माझ्या नवऱ्याचं मानसिक संतुलन जाऊन त्यांचा पाय इलॅस्टिक बँडेज मध्ये आहे…उद्या प्लास्टर करायची वेळ येईल हो…आणि मी काही तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंटची बिल मागत नाहीय…तुमच्या दोन -चार ओळींनी काम होऊन जाईल फक्त तुम्ही लिहिलेलं रिग्रेट लेटर तुमच्या सहीनिशी लिहून द्या….मग तर झालं…कराल ना तुमच्या बहिणीसाठी तेवढं…
जी.एम. – जी.एम. – ठीक आहे…काही तांत्रिक अडचणींमुळे या या तारखेचा बिल चुकीचं दिल गेलं आहे आणि हे रहित केलं आहे…सुधारित बिल योग्य वेळी मिळेल आणि तसदीबद्दल माफी…या अशा आशयाचं लेटर मी तुमच्याकडे देतोय मग तर झालं…
वेदिका – थँकयू….थँक्यू…व्हेरी मच…
” भैया मेरे राखी के बंधन को निभाना….” असं गाणं म्हणत आणि ते ओवाळणी दिल्यागत रिग्रेट लेटर घेऊन वेदिका एका पिसासारखी उडत त्या केबिनमधून बाहेर आली….अगदी त्रिखंड जिंकल्याचा भाव चेहऱ्यावर आणत तिथून निघालीही…काही वेळातच नेहमीच्या बस स्टोपजवळ आली…तीन दिवसापूर्वी वाटलेली दुपार आणि आताची दुपार यात जमीन अस्मानाचा फरक तिला जाणवू लागला…तीन दिवसांपूर्वीची खालमान घातलेली आज्ञाधारक गृहिणी आज मान वर करून पाहत होती आणि म्हणत होती…” आज मैं उपर….अस्मान नीचे…” बस येताच क्षणी धुळीने माखलेली बसही तिला एका विमानासारखी भासू लागली….आनंदच तेवढा झाला होता ना तिला…अत्यंत आनंदात आणि प्रसन्न मुद्रेने आपल्या कोंडलेल्या पतीला सोडले…घरात पाय टेकवताच समोर बसलेला पेपर चाळत असलेला गिरीश वेदिकाला दिसला…वेदिकाही अगदी बेरकीपणा एकही शब्द न बोलता किचनमध्ये गेली आणि चहाचे दोन कप आणले…तेही चेहऱ्यावर एक मुखवटा चढवून….गिरीश हसतच म्हणाला…
गिरीश – काय मग….आलात का हात हलवत…बायको…वाटलंच होतं मला मी यावं…करेल नि त्याव करेल…आता काय झालं…मोठ्या फुशारक्या मारत गेली होतीस ना…
वेदिका – हे घे बघ मी काय आणलंय ते…जी.एम. चं रिग्रेट लेटर तेही त्यांच्या सहीनिशी…
गिरीशचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना…गिरीश म्हणाला…
गिरीश – कमाल आहे बुवा…माझ्या बायकोची…मानलं बाबा तुला…[ वेदिकाचा नाजूक हात आपल्या दणकट हातात घेत आपल्या भसाड्या आवाजात गिरीश म्हणाला…] बायको अशी हवी…..मला बायको अशी हवी…[ गिरीशच्या नाकाचा शेंडा आपल्या चिमटीत पकडत वेदिका म्हणते ]
वेदिका – आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे….म्हणजे अर्थात तुझ्या पाय मुरगळल्यामुळे…
आणि पुढची ओळ तिने मनात म्हंटली….’ इलॅस्टिक बँडेजमधला पाय प्लास्टर मध्ये जाऊ नये म्हणून ‘ …!
बोध – आपल्या बायकोला कधीच कमी लेखू नका…

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.