Skip to content Skip to sidebar Skip to footer

बांके बिहारी लाल मंदिराचं रहस्य.. ह्या मूर्तीला कुणीच २ मिनिटापेक्षा जास्त न्याहाळू शकत नाही.

banke bihari mandir : बाके बिहारीजी मंदिर

भारत देशातील उत्तरप्रदेश राज्यातील मथुरा नगरी सर्वपरिचित आहे, ती श्रीकृष्णाचे जन्मस्थान म्हणून. मथुरेपासून पंधरा कि.मी अंतरावर वृन्दावन आहे जेथे नंंद,यशोदेच्या छायाछत्राखाली श्रीकृष्णाचे बालपण गेले. भगवान श्रीकृष्णाच्या रासलीलांसठी वृन्दावन सर्वदूर परिचित आहे.

येथील सारा परिसर हा श्रीकृष्ण भक्तीने भारलेला आहे. येथे श्रीकृष्ण व राधेची जवळपास ५५०० मंदिरे आहेत. त्यांतील मुख्य आकर्षण ठरते ते बांके बिहारीचे मंदिर.

स्वामी हरीदास म्हणून एक थोर श्रीकृष्ण भक्त होते. ते सदासर्वकाळ राधेश्याम भक्तीत रममाण असायचे. संसार, राग, लोभ हे सारे मोहमाया आहे व खरा तो एकच गिरीधरगोपाल. त्या श्यामसुंदराची, बन्सीधराची गीतं ते गायचे. भजनांतून श्रीकृष्णाची थोरवी गायचे.

अकबर बादशहाच्या दरबारातील प्रसिद्ध गायक तानसेन हे स्वामी हरीदास यांचेच शिष्य होते. त्यांना एकदा अकबराने विचारलेही होते की तू का बरं स्वामी हरीदासांसारखं गाऊ शकत नाहीस! यावर तानसेन म्हणाला होता,”जहापनाह, मी अकबर बादशहासाठी गातो. माझे गुरु स्वामी हरीदास तर विश्वाचा पालनकर्ता भगवान श्रीकृष्ण याच्यासाठीच फक्त गातात, त्याचीच महिमा गातात. फरक तर असणारच.”अकबराला तानसेनाचे म्हणणे पटले होते.

हरीदास राधाकृष्णच्या भक्तीत इतके तल्लीन असायचे की भगवान राधेश्याम स्वतः त्यांना दर्शन द्यायचे.
वृन्दावनातील लोकांनाही भगवान श्रीकृष्णाचे दर्शन घेण्याची अतीव इच्छा झाली व त्यांनी हरीदास जेथे नीधिवनात भजन गायचे तेथे जाऊन आपली इच्छा स्वामी हरीदासांना सांगितली.

हरीदास ध्यान लावून बसले. त्यांनी भक्तांचे मनोगत बन्सीधराला सांगितले तसे बन्सीधर तेथे राधेसह प्रकट झाले. साक्षात परमेश्वराला पाहून भक्तांच्मा डोळ्यांचे पारणे फिटले. भगवंतांनी भक्तांसाठी तिथेच रहायचा निश्चय केला. स्वामी हरीदास म्हणाले,”हे मुरारी, तुला मी वस्त्र देऊ शकेन पण रोज राधाराणीसाठी आभुषणे कोठून आणू!” तेंव्हा भगवंत हसले व राधा, श्याम दोघे एकमेकांत विलिन झाले. राधा व श्रीकृष्ण एकाच मुर्तीत स्थानापन्न झाले. संत हरीदासांनी या मुर्तीस बांके बिहारी असे नाव दिले.

बांके बिहारी हे श्रीकृष्णाचे रुप आहे. यात श्रीकृष्ण तीन कोनांत वाकलेले दिसतात. एक बासरी धरलेला, दुसरा कदंब व्रुक्षाला टेकलेला कोन व तिसरा एका पायात दुसरा पाय अडकवलेला कोन. अशा मुद्रेतल्या बन्सीधरास बांके बिहारीजी म्हणतात.

मंदिर स्थापना होईस्तोवर बांके बिहारीजीची पूजाअर्चा संत हरीदास व भाविकांनी निधिवनात केली. प्रशस्त असे मंदिर बांधून झाल्यावर बांके बिहारीजींची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली व मंदिर भक्तांना भगवंताच्या दर्शनाकरता खुले करण्यात आले. या मुर्तीत राधाकृष्ण एकत्रित असल्याने अर्ध्या मुर्तीला पुरुषाचा व अर्ध्या मुर्तीला स्त्रीचा श्रुंगार करण्यात येतो.

भाविक फक्त दोन मिनिट बांके बिहारीजीचे दर्शन घेऊ शकतात. येथे डोळे मिटून नमन करत नाहीत तर भाविक बांकेबिहारीजीच्या डोळ्यांत बघतात. त्यांच्या डोळ्यांत आकर्षक शक्ती आहे ज्याने बघणाऱ्याचे डोळे आपसूक पाझरू लागतात.

वैभवलक्ष्मी व्रताविषयी विषयी माहिती : लवकर फळ देणारे हे व्रत करून सर्व मनोकामना पूर्ण करून घ्या….

पुजारी फक्त दोन मिनिटेच बांकेबिहारीजींचे दर्शन घेऊ देतात व मुर्तीसमोरचा पडदा ओढून घेतात जेणेकरुन भाविकांना दोन मिनिटांहून जास्त वेळ मुर्ती दिसणार नाही यामागे असे कारण आहे की पुजाऱ्यांच्या मते, कित्येकदा बांकेबिहारीजी गायब झाले आहेत. बांके बिहारीजी फारच हळवे आहेत. नटखट आहेत. जो भक्त त्यांच्या नजरेत बघत रहातो व प्रार्थना करतो की भगवंत चला माझ्यासोबत ,त्याच्यासोबत बांके बिहारीजी चालू पडतात. याच कारणासाठी बांके बिहारीजी मंदिर सोडून कोठे जाऊ नये म्हणून पुजारी दोन मिनिटे भक्तांनी दर्शन घेताच पडदा ओढून घेतात.

एकदा काय झालं, बांके बिहारीजींची भक्त भक्तीमती ही आपल्या पतीसोबत बांके बिहारीजींचे दर्शन घ्यावयास आली. भगवंताच्मा सानिध्यात रहावे म्हणून चांगले आठवडाभर व्रुंदावनात ते दांपत्य राहिले तरी भक्तीमतीची हौस फिटेना.

बांके बिहारीजी आता पहावयास मिळणार नाहीत, त्यांना सोडून जावे लागतेय म्हणून ती रडू लागली. कसेबसे तिच्या नवऱ्याने तिला टांग्यात बसवले व प्रस्थान केले. भक्तीमतीची व्याकुळ अवस्था पाहून बांके बिहारीजींचे ह्रदय द्रवले. त्यांनी छोट्या मुलाचे रुप घेतले व घोड्यावर बसून त्या दांपत्यामागे जाऊ लागले.

इकडे मंदिरात पुजारी पुजेला आला. बघतो तर काय बांके बिहारीजी गायब. त्याच्या लक्षात सारा प्रकार आला. तोही मंदिराबाहेर ते दांपत्य गेले त्या दिशेने जाऊ लागला. भगवंतांना वाटेत गाठून विनवणी करुन परत मंदिरात घेऊन आला.

राजस्थानच्या राजकुमारीच्या भक्तीने प्रभावित होऊन बांके बिहारीजी तिच्या मागूनही गेले होते. शेवटी पुजाऱ्यांनी ही पडद्याची युक्ती शोधून काढली जेणेकरून भाविकांना दोनच मिनिटे हळव्या बांके बिहारीजींचे दर्शन देता येणे शक्य झाले. हे भक्तांमागून सारखे जाऊ लागले तर पुजारी शोधणार कुठे कुठे यांना!

या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या कोणत्याही कोनातून बांके बिहारीजींकडे बघा, ते आपल्याकडेच पहात आहेत असं वाटतं नि भावनेने कधी डोळे भरून येतात नि झरझर वाहू लागतात ते कळत नाही. अशावेळी सभोवतालचा विसर पडतो . फक्त बांके बिहारीजी आणि भाविक अशी ती झपूर्झा अवस्था असते.

बांके बिहारीजींच्या मंदिरात दूरवरून भक्तगण दर्शनासाठी, आशीर्वाद घेण्यासाठी येतात. या मंदिरात घंटा नाही. राधे राधे या ध्वनीने भक्त बांकेबिहारीजीचे आवाहन करतात. संपूर्ण मंदिरात राधे राधे राधे राधे ध्वनी उमटत असतो.

फक्त अक्षय तृतीयेला बांके बिहारीजींच्या चरणांचे दर्शन घ्यावयास मिळते.

विक्रम संवत 1562 मध्ये मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला स्वामी हरिदास यांच्या सघन-उपासनेचे फलस्वरूप म्हणून बांकेबहारीजी निधिवनात प्रकट झाले.

बांकेबिहारीजींचा प्रकटदिन हा विहारपंचमी म्हणून साजरा करतात. यादिवशी बांके बिहारीजींना अभिषेक करतात,५६ प्रकारचे भोग दाखवले जातात. भजनकिर्तन होते. स्वामी हरीदासांची महिमा गायली जाते. त्यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढून त्यांना बांकेबिहारीजींच्या मंदिरात आणतात. व्रुंदावनात हा सण मोठ्या जल्लोषात साजरा होतो. दिव्यांची रोषणाई करतात. रांगोळ्या काढतात.

या मंदिरात मंगलाआरती वर्षातून फक्त एकदा ती म्हणजे जन्माष्टमीला होते. त्यादिवशी भाविकांची तुफान गर्दी असते. बांकेबिहारीजींच्या दर्शनाने सर्व चिंता,क्लेष दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.

समाप्त

– ©️®️ गीता गरुड.

===========

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: