“बघ अनिता, तुला काही जमणार आहे का? तुझी मजल फक्त घर ते भाजी मंडई पर्यंत. तेही चालत जातेस. रिक्षा, बस किंवा गाडीने जाणे तुला कधीच जमणार नाही. आधीच केवढ ट्रॅफिक…
वर्षा आपल्या दुसऱ्या बाळंतपणासाठी माहेरी निघाली होती. तिच्या सासुबाईंनी बरेच पौष्टिक पदार्थ आणि खाऊ तिच्यासोबत बांधून दिला. तिच्या डोक्यावरून हात फिरवत त्या म्हणाल्या,
सुमित बाथरूममधून बाहेर पडला आणि ओला टॉवेल त्याने तसाच बेडवर टाकून दिला. इतके दिवस “ओला टॉवेल बेडवर का टाकतोस?” म्हणून ओरडणारी त्याची बायको श्रुती, आज शांत राहून कपाटात काहीतरी शोधत…
रेवतीच्या डोहाळ जेवणाची तारीख ठरल्याने नीताताई खूप आनंदात होत्या. मालतीबाईही उत्साहाने कामं करत होत्या. त्यांच्या मदतीला श्वेता आली होती. दोघींनी मिळून सारे अंगण सजवले.
लग्न मोडल्याची बातमी रेवतीपर्यंत पोहोचली आणि ती लगबगीने माहेरी आली. मुलाकडील मंडळींच्या अवास्तव मागण्या ऐकून तिलाही धक्काच बसला. तात्या आणि नीताताई नाराज होते
“नीता माझंही चुकलचं. आपली मुलगी परस्पर लग्नाचा निर्णय घेते, म्हणून दुखावलो होतो मी. वाटायचं हे प्रेम वगैरे सारं काही खोटं असतं. आपल्यावेळी असं होतं तरी कुठे?
रेवतीने नोकरीसाठी अर्ज केला आणि तिला मुलाखतीसाठी बोलावणं आलं. पहिलीच मुलाखत आल्याने रेवती थोडी अस्वस्थ झाली. नाही म्हणता म्हणता सारंग तिला ऑफिसमध्ये सोडायला गेला.
रेवती आणि सारंग तिथेच चार दिवस राहिले पण अबोला घेऊनच. एकमेकांच्या सोबत असूनही नसल्याप्रमाणे. रेवती कधी कधी सारंगशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होती. मात्र सारंग तिच्याशी बोलत नव्हता.
चार दिवस कसे पट्कन निघून गेले. रेवती श्वेताला सोबत घेऊन आपल्या सासरी गेली. मालतीबाईंनी श्वेताचे छान स्वागत केले. आपल्या अल्लड, अवखळ स्वभावाने श्वेता तिथे रमली.