सुंदरा वयात आली तसं तिला ह्या व्यवसायाची थोडीफार कल्पना आली. आपण अनाथ आहोत आणि आक्काने आपल्याला स्वीकारलं हे देखील माहिती झालं होतं. तमाशा सुरू असताना आक्काकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांचा तिला…
अरुंधती केबिनमधे आली आणि तिने एसी ऑन केला.प्रचंड उकाडा होता.मार्च महिना असून उन्हाचा तडाखा चांगलाच होता.तिने ग्लासमधे पाणी ओतलं.
अरुंधती एक प्रख्यात,यशस्वी मानसोपचारतज्ञ होती.तिच्या हाताला यश होतं. कितीतरी तरुण मुला,…
भक्तीला आज उठायला जरा उशीरच झाला. सकाळी अलार्म बंद केला आणि परत तिचा डोळा लागला.त्यामुळे रोजचं वेळेचं गणित चुकलं.तिने स्वतःच सगळं पटपट आवरल. सुधाताईंसाठी स्वयंपाकाचं काय काय करायचं ते टेबल…
शशीताईंना रोजच्या सारखीच पहाटे पाचला जाग आली.कोकिळेचा रियाज अगदी जोरजोरात सुरू होता.खरं तर त्यानेच जाग यायची.रात्री वयोमानानुसार लवकर झोप लागत नसे, त्यामुळे पहाटे गाढ झोप लागायची.पण झोपही सावध, त्यामुळे पाखरांचा…
मुग्धा गाडीतून उतरली.शाळेची इमारत बघून तिचा ऊर भरून आला. खूप बदल झाला होता.पंचवीस वर्षानंतर ती आज शाळेत येत होती.बाहेर शाळेपाशी नवीन दुकान झाली होती.ओळखू न येण्याइतका बदल.रविवारच्या सुट्टीचे औचित्य साधून,आज…
पृथाने मनीषचा टिफिन त्याच्या ऑफिस बॅगमधे टाकला आणि ती बॅग मनीषला द्यायला आली.
“टिफिन ठेवलाय ह्यात.आज तुझ्या आवडीची फ्लॉवरची भाजी दिलीय.” ती किचनमधे जायला वळणार इतक्यात…
लक्ष्मीपूजनाची साखर देऊन कृष्णाने सगळ्या मोठ्या व्यक्तींना वाकून मनोभावे नमस्कार केला.दिवसभर त्या भरजरी साड्या, एवढे दागिने घालून कृष्णाला आता जड व्हायला लागलं.हेवी मेकअप मुळे घाम यायला लागला होता.
सत्यनारायणाची पूजा झाली आणि विक्रांत,सुखदा प्रसादाचा शिरा आणि तीर्थ द्यायला उठले.विक्रांत यामिनीकडे वळला.
“वहिनीआई,प्रसाद घे.”
“अरे विक्रांत, घरात इतकी ज्येष्ठ मंडळी आहे,त्यांना आधी दे.” यामिनी म्हणाली.
महेशचा आज फॅक्टरीत साहेबांच्या हस्ते सत्कार होणार होता.प्रामाणिकपणे आणि सचोटीने काम केल्याबद्दल त्याला अवॉर्ड मिळणार होतं. त्याने मोबाईल ठेवायला ऑफिसची बॅग उघडली आणि त्याचा आईबाबांबरोबर गावच्या जत्रेत काढलेला हसरा फोटो…