Skip to content Skip to sidebar Skip to footer

अस्वस्थ अश्वत्थ (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा _जाने_२२”

©️®️ लक्ष्मण द.देशपांडे

‘ मला तुझ्या कित्येक गोष्टी आवडत नाहीत,तुझं वागणं पसंत पडत नाही; पण काय करु-हर घडीला 

पचवून घेतो.सगळं काही गटागट गिळतो.’

नाना काकुळतीने अगतीक होवून म्हणाले. 

नानांचं असं अगतीक होणं- हतबल होवून हताश जगणं गेल्या पांच-सात वर्षांपासून सुरु होतं.

– नेहमीप्रमाणेच आजही कारण तसं क्षुल्लकच होतं. 

नाना त्यांच्या मोबाइलवर ट्रुकाॅलर अॅप डाउनलोड करण्यासाठी सांगत होते, आलेला काॅल कोणत्या स्थळाकडून आहे ते पाहण्यासाठी. 

‘ येत नाही स्वतःला तर मोठमोठ्या गप्पा करु नये. काही पहायचा नाही मोबाईल. गरज असेल तर स्थळावाले सांगतील. असा नालायक बाप आई आधीच मेला असता तर परवडला असता.”

– ‘ बाळा माझ्या हातात नाही ग ते ‘- नाना आंतडं तोडून. 

‘बाबा तुझ्यासारखेच स्थळ मला नाही पाहीजे. सगळं वाटोळं केलं तू माझं.माझ्या गोष्टी- वागणं आवडत नाही ना तुला तर घर सोडून निघून जा.’

– ‘ मागचं काय ऊकरतेस . तू स्वतःचं भवितव्य पहा नं. तुला एकटीला असं सोडून कसं जावू गं मी घर सोडून. आता एकदाच कायमचं जाणं आहे. वाट पाहतोय. ‘ 

नानांचे ह्रदय पिळवटले.ऊर भरुन आला. अनावर हुंदका आवरण्यासाठी ते  आंघोळीच्या बहाण्याने बाथरूम मध्ये गेले. नळ सुरू केला; अन् डोळ्यातल्या

आसवांचा कडेलोट झाला. भरुन आलेली छाती भात्यासारखी वरखाली होते होती. डोळे फक्त आसवं

गाळण्यासाठीच की काय, शिल्लक होती. पांच -सात वर्षांपासून हे असंच चालू होतं अव्याहत.मनानं पुरते खचून गेले ते.अगदी ” माळीण ” झालं होतं त्यांचं जीणं.पुरते कोसळून गेले ते. 

– का म्हणून स्विकारलं त्यांनी असं पॅरासाईटसारखं आयुष्य. रोजचंच असं घालुनपाडून बोलणं, पानउतारा

करुन तोंड गप्प करावयास लावणं नित्याचेच, क्लेशकारक.पण नानांनी ते अंगवळणी पाडून घेतलं होतं आपल्या. प्राक्तन म्हणून स्विकारताना त्यांचे अंतःकरण पिळवटुन निघे पण मूकरुदन करुन आतल्याआंत ते मुकाट सहन करत.

नानांना मुलगा नव्हता याची त्यांनी कधीच खंत केली नाही. सुमारे वीस वर्षांपूर्वी व्हिजनल डिलिव्हरी होवून 

पत्नी मरता-मारता वाचली. मुलगा झाला होता पण पोटातच गुदमरून जगात येण्या आधीच गेला. पत्नीला बी.पी.व शुगर उद्भवली. ती ठणठणीत असावी म्हणून त्यांनी पुन्हा मुलाचा हव्यास धरला नाही.ते स्वतःला निपुत्रिक समजत नव्हते. एकुलत्याएका मुली वरंच समाधानी होते. सध्याच्या 

वयोवृद्धांसोबतचा मुलांचा व्यवहार पाहून ते आपल्याला मुलगा नाही याचीच धन्यता मानत.

कुटूंबाचुटुंबातील नाते संबंधाची वीन दिवसेंदिवस

 विरळ होत चालल्याचे, आंतरिक जिव्हाळ्याची घडी विस्कटत असल्याचे,’ किनशिप कल्चर ‘चा  शनैःशनै -हास होवून तथाकथित आभासी

‘फेसबुक कल्चर’चा उदय नानांनी जवळुन पाहीला-अनुभवला होता. 

पत्नीच्या अकाली अनपेक्षित जाण्यानं नाना पुरते कोसळले होते. पण एकुलत्याएक लेकीसाठी त्यांनी तग धरली. आईविना पोर म्हणून तोंडदेखलं ‘ येतेस का’ एव्हढचं मुलीला आप्तेष्टांनी विचारलं.पत्नी-

सोबतचं त्यांचे संबंधही दुरावले कायमचे.नानांना तर

आपली अवस्था व्यक्त करण्यास जागाही नव्हती. अन

विश्वासाने मान ठेवून दुःख हलकं करण्यासाठी, खांदाही ऊरला नव्हता. कुठे फोडणार ते बांध!

               घरी एकुलत्याएक पोर. आई गेल्यानंतर कुशल गृहिणी प्रमाणे घरगाडा चालविला भक्कमपणे

ऊभे राहून सुग्रणीसारखा, अन् नानांना जगण्याची ऊमेद दिली.एकाकी राहून एक्कलकोंडेपणामुळे 

स्वभावात चिडखोरपणा आला. कोणी ऊसरामा- करण्यासारखे राहीले नाही, अन् कोणावर जोरा तरी 

का म्हणून करावा? नाना समजून सांगायचे. 

” अन टाळी एक हाताने नसते गं वाजत.सगळा दोष  ईतरांना देवून सगळं खापर त्यांच्यात कुटूंबा फोडणं मला नाही पटत. अन मागच्या त्याच त्या  गोष्टी ऊगाळुन अन त्या साठी त्रागा करुन काय मिळणार आहे मनःस्तापाशिवाय. जे ते आपल्या ठिकाणी सुखी आहेत, सुखी राहोत. तू तुझ्या आयुष्याचा, स्वतःच्या भवितव्याचा कधी गं विचार करशील? !अनेकवेळा विमनस्क अगतिक होवून नाना बोलत.कळवळून. 

                 घरात ईनमिन दोघंच जनं. नेहमी समोरा 

समोर सांगायला, समजावयास अन्य वडिलधारे कोणी

नाही. त्यातुन प्रत्येकांशी फटकारुन वागणं. घरची सर्व

जबाबदारी अंगावर पेलल्यानं चिडचिड व निर्माण झालेला अहंगंड ( की न्यूनगंड ?)

असल्या वातावरणात स्वभाव दुराग्रही- हट्टी होणार नाही तर काय? प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी अशी एकटोकाची भावना! नानांना हे पटत-पटत नव्हतं पण मुलीच्या सुखाखातर ते मूग गिळून बसायचे.अगदी क्षुल्लक कारणाबाबत नाना स्वतःचा

पानऊतार-ऊपमर्द सहन करत,ती दुखावु नये म्हणून. त्यामुळे ती अधिकाधीक आक्रस्ताळी बनत चालली.

कुठल्याही कारणास-घटनेला नानांना जबाबदार धरून त्यांना खावु कि गिळू करायची, धारेवर धरायची. नाना प्रेमापोटी असहनीय पीडेने आंतल्याआंत झुरुन, मुकाट सर्व सहन करत.नानांची अवस्था पाहून अंगणातला अस्वस्थ अस्वस्थ होई.सळाळुन  नानांप्रमाणेच आंतल्याआंत हेलावून जाई.

—–लक्ष्मण द.देशपांडे

============================

फोटो साभार – गूगल

तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.

हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.

विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.

पहिला विजेता – १००१/-

दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी

तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी

बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.

स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.

ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com

फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.