Skip to content Skip to sidebar Skip to footer

Arranged Marriage – भाग ८

कृत्तिका मनभरून आठवणींमध्ये जाऊन त्या रात्रीच्या गोंडस क्षणांनचा आस्वाद घेत होती. त्या आठवणी जणू तिच्यासाठी स्वप्नच ते.

त्या रात्री कृत्तिका आणि आदित्य आपल्या भावना कृतीतून व्यक्त करत होते. तो क्षण त्यांच्यासाठी फार नाजूक होता. त्या दोघांनाही आपले प्रेम व्यक्त करायचे होते. त्या आठवणींचा ओलावा अजूनही कृत्तिका च्या मनात साठून राहिला होता.

बोटीत दोन दिवस राहिल्यानंतर आदित्य आणि क्रतिका पहलगामला गेलो. कृत्तिका ला काश्मीरचे हे सौदर्य पाहून तीचे मन मोहून गेले होते.

तिचे ते पाणीदार डोळे या भोवतालच्या निसर्गाला आपल्यामध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते.

” वाव ……किती सुंदर आहे हे ” कृत्तिका ह्या वातावरणामध्ये आपले भान विसरून गेली होती.

” हे काश्मीरमधील एक प्रसिध्द हिल स्टेशन आहे, इथे सर्वत्र बर्फाच्छादित पर्वत आहेत आणि शहरातून वाहणारे अनेक प्रवाह आहेत. ” आदित्य तिला समजावून सांगत होता.

सर्वत्र बर्फाने माखलेल्या पर्वताला पाहून कृत्तिका चकित झाली होती. दूरवरून हे शहर बर्फाच्या चादरी खाली झाकून गेले आहे असे वाटत होते. वातावरणामध्ये एका प्रकारची विलक्षण गारवा जाणवत होता.

कृत्तिका आणि आदित्य यांनी जरी अलग प्रकारचे स्वेटर अंगावर चढवले असले तरी त्यांना या गारव्याची अनुभूती होत होती. कृत्तिका चे नाक थंडीने लाल होऊन गारठले होते.

लिडर ओढ्याच्या बाजूला अनेक लोक तंबूत राहतात. हे तंबू असलेले शहर दिसते.

आम्ही पहलगाम शहराच्या आजूबाजूच्या डोंगरावर चढत गेलो. वर डोंगरावर त्यांना एक बर्फाचा पूल सापडला, तो पूल चमकत्या हिऱ्या सारखा नजरेत भासत होता.

कृत्तिका ने खाली वाकून पाहिले तर तिला त्या पुलाखाली एक शुभ्र पाण्याचा झरा वाहताना दिसला . त्या वाहत्या झऱ्याची झुळझुळ कानांना हवीशी वाटत होती.

त्या ठिकाणी कृत्तिका ने अनेक फोटो काढले. आदित्य कृत्तिका चां प्रत्येक क्षण त्याच्या कॅमेरा made बंदिस्त करून ठेवत होता. कृत्तिका चे ते निरागस पने हसणे आदित्यला तिचा कडे अजून आकर्षित करत होते.

खळखळणाऱ्या पाण्याचा स्त्रोत इथे सर्वत्र पाहायला मिळत होता. हे पाणी खडकां न मधून विशाल डोंगरातून त्यांचा पाठलाग करत होते. पहलगा मध्ये अस एक ही ठिकाण नव्हत जिथे आपल्या दृष्टीस पाणी येत नाही.

आदित्य आणि कृत्तिका आता फिरून थकले होते.

” आदित्य मला भूक लागली आहे ” अस म्हणत कृत्तिका ने त्याचा हाथ खेचला.

” हो ग जान मला पण भूक लागली आहे चल काहीतरी खाऊ.” अस म्हणत आदित्य आता चालत असताना एका चांगल्या हॉटेलच्या शोधत होता.

ते दोघेही एका छोट्याश्या पण सुंदर हॉटेल मध्ये शिरले. ते दोघे खिडकी जवळच्या एका कोपऱ्यात असलेल्या टेबल वर येऊन बसले. आदित्यने मेनू कार्ड कृत्तिका कडे देत ” घे ऑर्डर कर ” अस म्हणाला.

” नको तू कर ” कृत्तिका ने नकार दिला.

” अरे पण….”

” कर ना तुला जे आवडते ते आदित्य “

” ठिक आहे “

आदित्यने मेनू कार्ड वाचत ऑर्डर दिली. आणि ते दोघे जेवण येई पर्यंत दिवसभर पाहिलेल्या ठिकाना बद्दल गप्पागोष्टी करत होते. त्याचे ऑर्डर वेटर ने त्याच्या टेबल वर मांडले आणि आपल्या जेवणाचा आस्वाद घेत असताना

” कृत्तिका तुला आधी पासूनच फॅशन डझायनर बनायचं होत का???” आदित्यने तिला प्रश्न केला.

” हो …मला आधीपासूनच ड्रॉइंग ची आवड होती आणि म्हणून मग मी हे क्षेत्र करिअर म्हणून निवडले.” कृत्तिका त्याला समजावत होती.

” छान …तुला फॉरेन मध्ये कुठे कुठे फिरायच आहे???”
आदित्यच्या या प्रश्नावर कृत्तिका विचारात पडली.

” अम….मला ना कोरिया ला भेट द्यायचं आहे “

” का बरं कोरिया ???”

” कारण मला तिथले सिंगर आणि अॅक्टर आवडतात. मला एकदा तरी तिथे जायचं आहे …..आणि तिथे प्रसिद्ध असेले ठिकाण पाहायचे आहे “

” ओके …जाऊया मग आपण फ्युचर मध्ये” आदित्य आपल्या चेहऱ्यावर मोहक हास्य फुलवत म्हणाला.

” खरच ….जाऊया आपण तिकडे ” कृत्तिका आपल्या ओठांवर गोंडस स्मित करत म्हणाली.

” तुला कुठे जायचं आहे ???” कृत्तिका ने आदित्य ला विचारले.

” मला लॉस एंजेलिस ला भेट द्यायची आहे ….”

” वाव”

” आणि ते आपण सोबत करू ” आदित्य आपल्या मोहक हास्याने तिला आकर्षित करू पाहत होता.

अश्या अनेक गप्पागोष्टी करत त्या दोघांनी पोटभरून जेवण केलं आणि ते बिल भरून हॉटेल बाहेर पडले.

सूर्यास्ताची वेळ होत होती, अथांग असलेले ते आभाळ आता इंद्रधुष्याच्या रंगामध्ये विलीन झाले होते. सुर्यास्ताचा तो अप्रतिम सौंदर्याने नटलेला तो क्षण आदित्य आणि कृत्तिका ने मनभरून आपल्या डोळ्यांमध्ये टिपला.

त्या रात्री दोघेजण एका हॉटेल मधे गेले जे आदित्यने आधीच बुक करून ठेवलं होत. रूम मध्ये जाताच कृत्तिका ने बाथरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिने आपल्या अंगावर काही मऊ कपडे घातले.

आदित्य ही फ्रेश होऊन त्यानेही आपले कपडे बदलले.
कृत्तिका बेड वर लोळून होती हे पाहताच तो तिच्या बाजूला जाऊन पडला.

” आजचा दिवस छान होता ना..” अस म्हणत त्याने तिचा हाथ आपल्या हातात घेऊन त्यावर आपल्या ओठांनी हळुवार चुंबन केले.

” हो…मला खूप मजा आली. जगात बघण्यासारखं किती काही सुंदर आहे ना ……” अस म्हणत तीने त्याच्या कडे तोंड फिरवले.

आदित्यने तिला कुशीत ओढत तिच्या कपाळावर चुंबन केले. आणि ते दोघे एकमेकांना बिलगून आपल्या सप्नांच्या दुनियेत हळूहळू विलीन झाले.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.