Skip to content Skip to sidebar Skip to footer

Arranged Marriage – भाग ७

सकाळी आदित्यचा डोळा उघडताच त्याचा नजरेस निरागस चेहऱ्याची कृत्तिका शांतपणे झोपलेली दिसली. तिचे सौंदर्य पाहून तो विचलित झाला आणि त्याचा ओठांवर हसू आलं.

” कृत्तिका उठ….आपल्याला जायचं आहे ” अस म्हणत तो कृत्तिका ला उठवण्याचा प्रयत्न करत होता.

” हो फक्त पाच मिनिट ” आपल्या हाताची पाची बोटं फिरवत तिने आदित्य ला इशारा केला.

” ओके मी होतो आधी फ्रेश तू झोप तोपर्यंत ” अस म्हणत आदित्य बाथरूम मध्ये गेला.

काही वेळात तो तयार होऊन बाहेर आला आणि कृत्तिका त्याला तीचे कपडे बॅग मधून काढताना दिसली.

आदित्यला बाहेर येताच बघून ” झालं तुझ मी पटकन आवरते मग” अस म्हणत ती लगेच बाथरूम मध्ये शिरली.

थोड्या वेळात कृत्तिका तयार होऊन बाहेर आली. आदित्य त्याच्या मोबाइलवर काहीतरी पाहत होता आणि त्याच लक्ष कृत्तिका कडे गेलं. कृत्तिका ने पिवळ्या रंगाचा टॉप आणि काळया रंगाची जीन्स परिधान केली होती. आदित्य तिच्या सौंदर्याला न्याहाळून पाहत होता. त्याची नजर तिच्या वर खिळली होती.

आदित्य आपल्याकडे एकटक पाहत असल्याचे बघून कृत्तिका चे गाल लाजेने लाल झाले होते.

आदित्य बेड वरून उठला ” कृत्तिका तुला माहित आहे ….” अस तिच्या जवळ जात म्हणाला.

” काय ???”


” तू खूप छान दिसत आहे. ” आदित्यच्या चेहऱ्यावर मोहक हास्य तरळले.

आपली तारीफ ऐकून कृत्तिका ल अजूनच लाज दाटून आली. तिच्या ओठांवर मंदहस्य उमटले.

आदित्य आणि कृत्तिका श्रीनगरचा दल सरोवर, हाऊसबोट, शिकार आणि बाग या ठिकाणी भेट देण्यास निघाले होते. सकाळी ते दोघेही लवकर तयार होऊन हॉटेल मध्येच नाश्ता करून ते श्रीनगरच्या अनेक सुंदर ठिकाणी भेट देण्यास आपल्या मार्गावर निघाले.

तिथे शिकारावर दाल लेकच्या आसपास जात असताना अनेक सुंदर कलाकृती चे स्टॉल्स लावण्यात आले होते . त्यावर विविध प्रकारच्या वस्तू विकण्यासाठी ठेवल्या होत्या. तिथेच आदित्यने काही काश्मिरी कपडे कृत्तिका साठी विकत घेतले. कृत्तिका आदित्यच्या या गोड वागण्याला मोहित झाली होती. तिचे मन आनंदाने विव्हळत होते.

आदित्य आणि कृत्तिका दिवसभर मनसोक्त भटकंती करत तिथल्या सौंदर्याचा आस्वाद घेत होते. त्यांनी अनेक फोटो ही काढले. कृत्तिकाचा आनंद चेहऱ्यावरच्या स्पशपणे झळकत होता.

आदित्यने तिथे प्रसिद्ध असलेल्या हाऊसबोट मध्ये रूम बुक केली. ते दोघे रात्री त्या हाऊसबोटमध्ये राहिले. त्यांच्या साठी तो क्षण फार अमूल्य होता. ती एक आरामदायी खोल्या असलेली बोट होती. कृत्तिका हे सर्व नविन जग बघून ती अतिशय आनंदित होती. त्यांच्या साठी नदीमध्ये
बोटीत राहणे हा एक खास अनुभव होता. त्यांची हाऊसबोट पंजाब आणि काश्मीर हॉटेल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुलाजवळ झेलम नदीत होती.

या हाऊसबोटी मध्ये गरजेचं सर्व सामान पुरव्ल्या जात होत. ते दोघे जेवण केल्यानंतर बोटीच्या खिडकी मधून चांदण्यांचा आनंद घेत होते.

रात्रीचे आभाळ स्थिर आलेल्या नदीमध्ये प्रतिबिंबित झाले होते. त्या विशाल आकाशात असंख्य टीम टीम नारे तारे चमकत होते. ही निळसर असलेली नदी चंदेरी चंदरप्रकाशात उजळून निघाली होती.

आदित्य आणि कृत्तिका निसर्गाचे हे रम्य दृष्य आपल्या डोळ्यांमध्ये टिपत होते. कृत्तिका ह्या ट्रीप वर येऊन खूप आनंदित होती आणि खासकरून आदित्य तिच्या सोबत आहे याचा तिला जास्त आनंद होता.

” हे किती सुंदर आहे आदित्य “

” हो ना बर झालं आपण इकडे आलो हनिमून ला नाहीतर हे सगळ आपल्याला एन्जॉय करता नस्त आलं. “

” आजचा हा चंद्र किती सुंदर दिसत आहे….”

” हो ना माझा चंद्र पण खूप सुंदर दिसत आहे. ” अस आदित्य कृत्तिका कडे पाहत म्हणाला.

” कृत्तिका तुला एक सांगायचं आहे मला ….”‘

” काय ??? बोल ना. “

” खूप दिवसांपासून इच्छा होती, आज आपण इथे एकठे आहोत आणि हे खूप छान वातावरण आहे या शांत वातावरणामध्ये मला तुला माझ्या मनातली गोष्ट सांगू वाटत होती. ”
कृत्तिका आता त्याच्या बोलण्यावर लक्ष देऊन होती.

” कृत्तिका मला तुझ्यावर प्रेम आहे, ज्या दिवशी मी तुला पाहिलं तेव्हा पासून मला तुझ्यात आवड निर्माण होती. मी स्वतःला फक्त तपासून पाहत होतो मला जाणून घ्यायचं होत की मला खरच तू आवडत आहे की ते फक्त एक आकर्षण होते. “

कृत्तिका ने आपले ओठ स्मिहास्य करत ” मला पण तू आवडतो आदित्य. मला वाटल नाही की तू पण माझ्यासारखा विचार करत असणार.” हे सांगताना कृत्तिका चा चेहरा लाजेने लालबुंद झाला होता.

आदित्यने हळूच तिचा हाथ आपल्या हातात घेतला आणि कृत्तिका ने त्याच्या खांद्यावर आपले डोके टेकवले.

आदित्यने तिचा गाल हळुवारपणे कुरवाळत तिचा चेहरा आपल्या हातात घेऊन त्याच्या मधील अंतर कमी करत त्याने आपले ओठ तिच्या नाजूक ओठांना मिळवले.
आदित्य हळुवारपणे तिला चुंबन करत होता.

आदित्यने आपला चेहरा मागे घेत तिच्यापासून दूर होत त्याने तिच्या आकर्षक डोळ्यांमध्ये पाहिले. कृत्तिका च्या चेहऱ्यावर लाली दाटून आली होती. तिचे ते लाजून हळूच हसणे आदित्यला तिच्याकडे अजून आकर्षित करत होते.
एकमेकांच्या डोळ्यात पाहून त्यांनी आपल्या अबोल भावना नजरेतून व्यक्त केले आणि कृत्तिका ने आदित्यला घट्ट मिठी मारुन तिचा चेहरा लपवला.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.