Skip to content Skip to sidebar Skip to footer

Arranged Marriage – भाग ६

दुसऱ्यदिवशी सकाळी नाश्ता करत असताना पाटील परिवार पुण्यात शिफ्ट होण्याविषयी चर्चा करत असताना मिसेस सुजाता यांनी एक नवीन विषय छेडला.

” हो तुम्ही जा आरामात पुण्यात पण त्याआधी तुम्ही हनिमून ला नाही जाणार ???” अस गालातल्या गालात हसत मिसेस सुजाता म्हणाल्या. त्यांनी कृत्तिका कडे पाहिलं आणि तिचा चेहरा पार गुलाबी रंगाचे न्हाहून गेला होता.

” हो आई …आम्ही त्या बद्दल कस विसरू शकतो. ” आदित्य मात्र ऐटीत म्हणाला.

” तर तुम्ही काही विचार केला….कुठे जाणार म्हणून ????” मिसेस सुजाता यांनी प्रश्न केला. यावर कृत्तिका ने आपली मान हलवत नकारार्थी उत्तर दिले.

” कृत्तिका जम्मू काश्मीर का जाऊया का???” अस आदित्यने उत्साहित होऊन कृत्तिका कडे पाहत विचारले.

” कृत्तिका ऐक आज तू प्लीज एका हप्त्याची सुट्टी घे. आपण उद्या निघुया. “


” आदित्य उद्या निघायचं आहे तर आज सगळी पॅकींग आणि प्लानिंग करावं लागेल. “

” हो ना तर आज जाऊन तू हाफ डे पण घे आणि पुढच्या आठवड्याची सुट्टी पण घेऊन टाक ….लवकर घरी आलो की मग पुढचं प्लॅनिंग करू आरामात. ओके…??” अस बोलत असताना आदित्य मात्र आनंदी दिसत होता.
मिसेस सुजाता ही आपल्या लेकरांचा अनादी संसार पाहून त्यांचे मन भरून आले होते.

” पकिंग च काय घेऊन बसली आहे कृत्तिका ….मी आहे ना. मी करते तुमचं सगळी बॅग पॅक. तुम्ही फक्त सुट्टीच पाहा.” अस मिसेस सुजाता यांनी म्हणून कृत्तिका च मन शांत केलं.

आपल्याला अनेक मांडली आहे मदतीसाठी हे पाहून कृत्तिका ला फार बर वाटल. ती आनंदाने घरा बाहेर पडली.

कंपनी मध्ये जाताच कृत्तिका ने आपल्या मॅनेजर कडे जाऊन सुट्टीचा अर्ज सादर केला आणि तो मंजूरही झाला. हे पाहून तीचे मन अगदी उंच भरारी घेत होते. तिने फोन करून आपल्या आईवडिलांना ही बातमी सांगितली. मिसेस निता आणि मिस्टर रुपेश हे दोघे ही आपल्या मुलीचा संसार सुखाचा चालू आहे हे जाणून त्यांना अतिशय आनंद झाला होता.

कृत्तिका ने हाफ डे आणि पुढचे सात दिवसांची सुट्टी घेतली होती. कृत्तिका उत्सुकतेने घरी गेली. घरी जाऊन फ्रेश होऊन ती मिसेस सुजाता यांना सामान पॅक करण्यात मदत करत होती. हे सगळे काम करता करता कधी संध्याकाळ झाली हे तिला समजले नाही. वेळ कसा भिकान उडून जातो याचा प्रत्यय तिला आज आला. संध्याकळपर्यंत आदित्य घरी आला. तो फ्रेश होऊन त्याने सगळ्यांसोबत संध्याकाळचा चहा नाश्ता ही केला.

आता या सूर्य मावळणीच्या वेळी पाटील यांच्या घरात चर्चा सत्र रंगत आले होते. प्रत्येकजण आपापल्या परीने आपले मत मांडत होते. हसत खेळत सरतेशेवटी आदित्य आणि कृत्तिका ने जम्मू काश्मीर जाण्याचा निकाल लावला.

रात्रीचे जेवण करून आदित्य आणि कृत्तिका त्यांच्या रूम मध्ये शिरले. कृत्तिका ह्या छोट्या ट्रीप साठी खूप उत्सुक होती.

” उद्या आपण कधी आणि कस निघणार आहोत आदित्य???”

” आपण प्लेन ने जाणार आहोत. जम्मू काश्मीर मध्ये खूप सारी ठिकाणे पाहण्या सारखे आहे तर आपण ह्या हनिमुन चा चांगला फायदा घेऊ.” अस आदित्य आपल्या ओठांवर हसू खेळवत म्हणाला.

” हो “

” तर मग आता लवकर झोपुया उद्या आपल्याला लवकर निघायचं आहे ” अस म्हणत आदित्यने बेड वर उडी मारली. कृत्तिका ही त्याच्या बाजूला आडवी झाली.

कृत्तिका खूप उत्सुक होती आणि आदित्य पण. आदित्य आता कृत्तिका सोबत एकाच बेड वर झोपतो, त्यांच्यातला दुरावा आता प्रेमाने जवळ ओढल्या जात आहे . ते दोघेही एकमकांकडे आकर्षित होत असल्याची जाणीव कृतिका ला होत होती. पण आदित्य तिच्या बद्दल काय विचार करतो हे अजून ही तिला उमजले नव्हते.


दुसऱ्या दिवशी आदित्य आणि कृत्तिका एअरपोर्ट साठी रवाना झाले. मिसेस सुजाता आणि मिस्टर पाटील यांनी त्या दोघांना बेस्ट लक विश करून ते घरी परतले.
आदित्य आणि कृत्तिका श्रीनगर च्या प्लेन मध्ये बसले. फ्लाईट पोहोचे पर्यंत ते दोघे मोबाइलवर आपला वेळ घालवत होते.

काही तासांनी ते दोघे श्रीनगर ला पोहोचले. तेथे जाताच आदित्यने एक कॅब करून ते दोघे एका आलिशान हॉटेल मध्ये राहण्यासाठी गेले. तिथे त्यांनी जेवण केले आणि ते दोघे आपल्या रूम मध्ये आराम करण्यासाठी गेले.

कृत्तिका खिडकी बाहेर चे दृष्य पाहून तिला अतिशय आनंद होत होता. तिच्या चेहऱ्यावर अलगद हसू उमटले होते. ती स्वत:मधे इतकी गर्क होती की आदित्यने कधी तिच्या कमरेला मिठी मारत तिच्या खांद्यावर त्याची डोकं टेकवले.
त्याच्या अचानक स्पर्शाने तिला शहारे आले. तिने त्याची पकड सैल करण्याचा प्रयत्न केला पण आदित्य मात्र तिला घट्ट पकडून होता.

आदित्य आता हळुवार पने तिचा मानेवर चुंबनांचा वर्षाव करत होता. तिचा स्पर्श कृत्तिका ला शहारे देऊन एक वेगळा अनुभव देत होता. आदित्यने आपला गाल तिच्या गालावर हळुवार फिरवला. तो कृत्तिका ला आपल्यात सामावून घेण्याचा प्रयत्न करत होता. आदित्य आता तिच्या नाजुक गालावर चुंबन करत होता. कृत्तिका ला आले गाल गुलाबी रंगात मिसळून गेले असे तिला जाणवले.

आदित्यने कृत्तिका कडे पाहिलं, तिचा तो नाजूक लाजला चेहरा पाहून त्याला ती अतिशय आकर्षक वाटली. हळू हळू त्या दोघांचं अंतर कमी होत त्यांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. कृत्तिका ला मिठी मारुन खूप हलक वाटत होत. तिला त्याचा स्पर्श अजून हवाहवासा वाटू लागला. आदित्यचा सहवास आता कृत्तिका ला आवडू लागला होता.

आदित्यने आपल्या दोन्ही हातात कृत्तिका चा चेहरा अलगद पने पकडून तो तिच्या डोळ्यांमध्ये खोलवर शिरत आपले प्रतिबिंब पाहत होता. तो तिला परत चुंबन करणार तोच त्याचा मोबाईल जोराने वाजू लागला आणि त्याने एक रागात उसासा टाकत मोबाईल उचण्यासाठी गेला. कृत्तिका ला मात्र हसू आलं. ती आपले ओठ आपल्या हाताने दाबत आपला हसू रोखण्याचा प्रयत्न करत होती.

काही वेळाने कृत्तिका बेड वर लोळून गेली. आदित्य अजूनही काहीतरी महत्वाचं कॉल वर बोलत गॅलरी मध्ये उभा होता. कृत्तिका आजच्या प्रवासामुळे खूप थकून गेली होती. हळूहळू तीचे डोळे मिटून गेले आणि ती गाढ झोपेत स्वप्नांच्या दुनियेत गेली.

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.