
ती संध्याकाळ कृत्तिका साठी खूप सुखद होती. तिने आदित्य सोबत असलेल्या रम्यआठवणी जपून ठेवत होती. घरी परत आल्यानंतर ते दोघेही फ्रेश झाले आणि आपले कपडे बदलले. कृत्तिका ला आपल्या सासरची मंडळी मात्र अतिशय सुरेख भेटली होती. कृत्तिका वर कसलेही बंधन नव्हते आणि कसला सासुरवास ही नाही. तिला समजून घेणारी माणसे तिच्या नशीबाने जमून आली होती. रात्री कृत्तिका आणि आदित्य लवकच झोपी गेले.
नवीन दिवस उजाडताच कृत्तिका आपली सर्व कामं करण्यासाठी उत्साहाने सुरुवात केली. आज कृत्तिका ल तिच्या जॉब वरही जायचे होते. कृत्तिका ला लहानपापासूनच चित्रकलेची आवड होती आणि ती आवड तिने आपल्या करिअर साठी अनेक दिवस कष्ठ करून तिनं आपल्या हिम्मतीवर एका नावाजलेल्या फॅशन डझायनर कंपणी मध्ये जॉब मिळवला. तिथे तिने आपल्या हसतमुख व निर्मळ मनाने अनेक माणसे जोडून घेतली.
कृत्तिका आज सर्व काम आटोपून निघाली तोच आदित्य ने तिला थाबवले ” कृत्तिका …..मी सोडतो तुला ” अस म्हणत त्याने कार ची चावी घेतली आणि आपले सामान घेऊन घराबाहेर पडला. कृत्तिका ही त्याच्या मागोमाग आली. आदित्यने तिला तिच्या कंपनी जवळ सोडून तो त्याच्या कंपनी कडे गेला.
कृत्तिका आज खुशीने आपली काम करत होती. जणू तिला तिच्या कामाचं ओझ नसून तिला ते अगदी सहज सोपी वाटणारी गोष्ट होती. कृत्तिका आज तिच्या सर्व मित्रमैत्रिणी सोबत गपपागोष्टी करत आपली काम करत होती.
संध्याकाळ होण्याची वेळ होत होती आणि कृत्तिका ची जॉब टाईम ही संपत आला होता. ती कंपनी बाहेर निघेल तोच तिला आपला जिवलग मित्र शेखर दिसला. त्याला पाहून तिला अतिशय आनंद झाला. तिच्या चेहऱ्यावर अलगद हसू उमटले. आपला एक हाथ उचं हलवून ” शेखर ……..” अस म्हणत तिने त्याचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.
शेखर मुळात कृत्तिका का भेटायला आला होता.
” कृत्तिका कशी आहेस तू????” अस म्हणत त्याने हाथ मिळवला.
कृत्तिकाला जीन्स मध्ये ….पण गळ्यात मंगळसूत्र पाहून त्याला जरा गालात हसू च आल. आपली लहानपणाची मैत्रीण आता इतकी मोठी झाली ते बघून तो जरा भावूक झाला होता. शेखर साठी कृत्तिका मात्र लहान बहिणी सारखी होती. ते दोघं जवळच्याच एका कॉफी शॉप मध्ये जाऊन बसले आणि त्यांनी कॉफी ऑर्डर केली.
” खरच सॉरी कृत्तिका मला तुझ्या लग्नात सहभागी होता आलं नाही, मी माझ्या कामामुळे येऊ शकलो नाही. मला खूप वाईट वाटले पण प्लीज तू रागावू नाही…..तू मी आणि जिज्जू आपण मस्त फिरायला जाऊ एका दिवशी….मस्त एन्जॉय करू… ओके??” अस एक सलग म्हणत शेखर कृत्तिकाची माफी मागत होता.
कृत्तिका ने आपला चेहरा थोडा रागावलेला केला पण शेखरच ते गोड स्पष्टीकरण ऐकल्या नंतर तिने एक स्मितहास्य देऊन तिने त्याची माफी कबुल केली याचा इशारा केला. कृत्तिका आता आपल्यावर रागावलेली नाही हे पाहून शेखर ला ही थोड बर वाटल. दोघं मित्र आपल्या गपपागोष्टी मध्ये गुंतून गेले होते.
आदित्य आज कृत्तिका ला घेण्यासाठी थोडा लवकर ऑफिस मधून निघाला. तो कृत्तिकाच्या ऑफिस जवळ पोहचत असताना त्याला कृत्तिका आणि तिच्या सोबत आदित्यासाठी असलेला एक अनोळखी मुलगा एका कॉफी शॉप मधून बाहेर आलेले त्याला दिसले. कृत्तिकाला अस एका परपुरुषा सोबत पाहून त्याला थोड वेगळं वाटल. तो मुलगा कोण आहे याची त्याला जाणीव करून घेण्याची खूप इच्छा झाली.
आदित्यने आपली कार पार्क करत तो तिथे उभा राहिला. कृत्तिकाची आदित्यावर नजर पडताच ती शेखर सोबत चालत आदित्य जवळ पोहोचली. आदित्यला पाहून कृत्तिकाला फार आनंद झाला होता. तिला तिचे गाल गुलाबी रंगात न्हाऊन निघाले अस वाटल.
” आदित्य .. हा शेखर माझा बचपन का जिगरी दोस्त, आणि शेखर हे तुझे जिजू ” अस म्हणत कृत्तिका ने त्या दोघांची ओळख करून दिली.
” ओह … आदित्य तुला भेटून खूप छान वाटले. कधीतरी या मग माझ्या घरी ….मस्त एन्जॉय करू ” अस शेखर हस्तांदोलन करत म्हणाला.
” हो जरूर …मला पण खूप छान वाटेल ” अस म्हणत आदित्यने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.
” कृत्तिका चल उशीर होत आहे ” अस आदित्य म्हणाला. कृत्तिका ने होकार दिला आणि ती ” बाय शेखर काळजी घे तुझी . ” अस म्हणत ती कार मध्ये बसली.
आदित्य मात्र शांत होता. त्याला कृत्तिकाच अस कोणाशी भेटन आवडले नव्हते.
” तो तुझा बॉय फ्रेंड होता का???” अस त्याने थोड्या गंभीर स्वरात विचारले.
” काय ….मी तुला सांगितल की तो माझा लहानणापासूनचां मित्र आहे……तू का असं विचारत आहे मला??” अस कृत्तिका थोड आवाज चढवून म्हणाली. तिला आदित्य च तस वाईट विचार करणे आवडले नाही. का बरं आदित्य तसे म्हणाला हे कृत्तिका ला समजले नाही.
” अरे मी असच म्हणालो कृत्तिका …किती टेन्शन घेते तू लगेच .” अस आदित्य थोड खोडकर आवाजात म्हणाला. कृत्तिकाच्या चेहऱ्याचे बदलते भाव बघून त्याला जरा बरं वाटलं.
घरी पोहोचल्यावर ते दोघे ही फ्रेश होऊन जेवायला गेले. मिसेस सुजाता यांनी आपल्या लाडक्या सूनेसाठी तीच आवडीच जेवण केलं होत. आपल्या आवडतीच जेवण बघून कृत्तिका ला अतिशय आनंद झाला होता. रात्रीचे जेवण त्यांनी दिवसभरातल्या गप्पागोष्टी करत केले. कृत्तिका ने ती कसल्या प्रकारचे काम करत असते, आणि तिला अजून पुढे काय करायचं आहे हे सांगत होती. कृत्तिका च्या चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज होत, ते पाहून मिसेस सुजाता यांच्या ओठांवर समाधान असलेलं एक स्मितहास्य झलकले.
मस्तपैकी जेवण करून दिवसभराचा थकवा कृत्तिका ने निवांत आपल्या बेड वर लोळत उसासा सोडला. तिने आपले डोळे मिटून उद्याच्या दिवसासाठी पुन्हा आपले काम चोख पार पाडावे म्हणून झोप ही गरजेची आहे. ती झोपणारच तेवढ्यात आदित्य तिच्या बाजूला येऊन बसला.
” कृत्तिका ऐक ना मला एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे .” अस म्हणत आदित्यने कृत्तिका चे लक्ष वेधून घेतले.
” बोल ना ” कृत्तिका ने होकार दिला.
” तुझी कंपनी ची कोणती ब्रांच पुण्यात आहे का??? ” आदित्यने थोड गंभीर स्वरात विचारले.
” हो आहे ..” कृत्तिकाला काय महत्वाचं आहे त्याचं ती अंदाज घेत होती.
” मला पुण्यात ट्रान्स्फर करायचं आहे कृत्तिका पण तुला इथे सोडून मी एकठा नाही राहणार तिकडे. तू पण माझ्यासोबत ट्रान्स्फर करू शकते का???” आदित्यचा आवजामध्ये कृत्तिका ल तिच्या साठी असलेली काळजी जाणवली.
” म्हणजे आपण पुण्यात राहायचं ???” अस विचारताच आदित्यने मान होकारार्थी हलवली.
” हो मी बघते उद्या विचारून, पुणे एक छान ठिकाण आहे. आपण तिथे खूप काही एन्जॉय करू शकतो.” अस हसून म्हणत कृतिकाने आदित्यचा असलेला थोड टेंशन कमी करण्याचां प्रयत्न केला.
आणि त्या दोघांनी पुढे काय करायचं आहे याची चर्चा करत काही वेळाने ते दोघेही झोपून गेले.
कृत्तिका आता पुण्यात तीच नविन घर का असेल, नविन कंपनी, नविन माणसे ……या सागळ्यांची तिला खूप उत्सुकता होती. तिने तोच विचार करता करता तिला कधी झोप लागली हे तिला कळलेही नाही.
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.