Ritbhatmarathi

Search
Close this search box.

आदित्य ने दरवाजा उघडण्याचे ऐकताच त्याची नजर कृत्तिकाकडे पडली तिचा आश्चर्यचकित झालेला चेहरा बघून त्याला हसू आलं कारण तिच्या सुंदर डोळ्यांनी त्याला टक लावून पाहत होते.

एक वेळ ……. सुंदर ……

आदित्यने पुन्हा एकदा तिच्याकडे पाहिले आणि मनातल्या मनात स्वतःची समजूत घालत म्हणाला

‘हो सुंदर पण माझी टाईप नाही.’

तो आता आत बोलवण्याची वाट बघत बसला पण कृत्तिकामात्र त्याच्याकडे भूत पहिल्या गत बघत बसली. जसं काही ने आदित्य सारखा देखना माणूस कधी पाहीलच नाही. तिचे वागण्याला कंटाळून एक एक पाऊल पुढे टाकत ” मला आ बोलवणार नाहीस का???” असं भुवया उंचावत आदित्यने विचारलं.

तोच स्वतःच्या विचारातून बाहेर येताच

* नाही….. नाही प्लीज आत ये ना असं म्हणत ती त्याला घरात घेऊन आधी.

आदित्य घराकडे एक नजर फिरवताच सर्व कसं छान नीट सर्व वस्तू मांडलेल्या आहेत हे बघून त्याला छान वाटल. घरातील रंग सुद्धा डोळ्यांना आकर्षित करणारा होता, भिंतींवर वेगवेगळ्या पेंटिंग्स लावलेल्या होत्या त्यामुळे घराची शोभा अधिकच खुलून गेली होती.

आदित्यने तिच्या आईला जिन्यावरून खाली येताना बघत बघताच तो उठून उभा राहिला आणि तिच्या आईला नमस्कार केला. आदित्यला बघताच कृत्तिकाची आई खुश होऊन त्याच्या पाठीवरून तिने हात फिरवत त्याला बसण्याची खूण केली.

खुर्चीवर बसताच आदित्य ” मी कृत्तिकाला बाहेर फिरण्यासाठी घेऊन जात आहे. असं म्हणत तो इथे आणण्याचं कारण त्यानी स्पष्ट केलं. यावर मिसेस निता खुश होऊन म्हणाल्या ” हो ना जा तुम्ही दोघं काही वेळ बाहेर आणि आम्ही मग तुम्हाला जॉईन करतो कारण आम्हाला लग्नासाठी खरेदी करायची आहे मग तुम्ही पण आमच्या सोबत या. “

बाहेर फिरायला जायचं आहे याचा विचार करून कृत्तिका पळत तिच्या रूममध्ये गेली तोंड हात पाय धुऊन स्वतःचे कपडे चेंज करून ती पुन्हा खाली आली ती पायऱ्या उतरत असताना आदित्य तिच्याकडे एकटक पाहत होता.

‘चला काकू आम्ही येतो.” असं म्हणत त्याने त्याच्या कारची चावी घेऊन बाहेर निघाला आणि त्याच्या मागोमाग कृत्तिका सुद्धा.

कार मध्ये बसताच कृत्तिकाने त्याला विचारलं ” आपण कुठे जात आहोत????” यावर उत्तर देत आदित्य ” माझ्यासाठी कपडे घेण्यात घेण्यासाठी ” यावर तिने आपली मान हलवत होकार दर्शवला.

ते दोघं आता एका शानदार कपड्यांच्या दुकानाबाहेर उभा होते. ते आत जाताच त्यांना राजेशाही पद्धतीची वागणूक मिळत होती. तिथे आदित्य माणसांचे कपडे मिळतात त्या युनिटमध्ये गेला आणि काही वेळातच स्वतःसाठी काही शर्ट आणि पेंट त्यानी निवडले आणि थोड्याच वेळात ते दोघेही त्या दुकानातून बाहेर पडले.

आदित्य शांत होता पण कृत्तिकाच्या पोटात मात्र कावळे ओरडत होते म्हणून तिने हॉटेल मध्ये जाण्यासाठी विचारले. त्याने हि होकार दिला कारण त्यालाही असं जाणवलं की त्याला सुध्दा भयंकर भूक लागले आहे.

ते दोघे एका शानदार हॉटेल मध्ये गेले तिथे त्यांनी आपल्या टेबल बुक केला. कृत्तिकाने मेनूकार्ड बघत मेनू ऑर्डर केला. जेवत असताना ते दोघं गप्पा मारत होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की त्या दोघांनाही नेटफ्लिक्स वरच्या मुव्हिज बघायला फार आवडते आणि हळूहळू त्या गप्पागोष्टींचा रुपांतर मैत्रीमध्ये होत गेलं.

जेवणानंतर आदित्य बिल भरण्यासाठी गेला आणि त्याच्या मागून मांजरी सारखी हळूच पावले टाकत कृत्तिका त्याच्या समोर उभी राहिली. तिने तिचा हात पुढे केला. आदित्य मात्र तिच्याकडे आश्चर्य नजरेने बघत होता कारण नक्की तिला काय म्हणायचंय ते त्याला कळले नाही.

” गाडीची चावी ” असं जेव्हा कृत्तिका म्हणाली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की तिला आता गाडी चालवायची इच्छा आहे तोही थकला आहे दिवसभर इकडे तिकडे फिरून म्हणून काहीही हरकत न घेता त्यांनी आपल्या खिशातली चावी काढून तिला दिली.

कारची चावी मिळताच कृत्तिका पार्किंग स्लॉट कडे गेली कार मध्ये बसली आणि कार स्टार्ट केली. हळूहळू पार्किंग स्लॉट मधून मेन रोड कडे चालवायला सुरुवात केली. तिने कार हॉटेल समोर आणत चुकून तिच्या कडून रिव्हर्स गिअर गेला आणि गाडी अचानक मागच्या बाजूस सरकवली गेली. तिचा अंग जोरात पुढे लोटला गेलं आणि तिला असं जाणवलं की तिची गाडी कुठल्यातरी वस्तूला धडकली गेली आहे. मागे बघत असताना तिला लक्षात आलं कि ती खूप महागडी कार आहे.

.. अरे देवा . आता मी काय करू ???????? खूप महागडी दिसते ती…… आता मी काय करू ?????? त्या गाडीच्या मालकाने माझ्यावर कम्प्लेंट केली तर ??????? ” या सगळ्या विचाराने बिचारी कृत्तिका खूप गोंधळलेली झाली.

तेवढ्यात तिला आदित्य येताना दिसला तिने पटकन त्याला मोठ्याने आवाज दिला आणि तिला काहीतरी झालं’ या विचाराने तो पटकन पळत पळत येऊन गाडीत बसला त्याने विचारलं काय झालं???”

त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता कृत्तिकाने गाडी सरळ जोरात पळवली. तिच्या दृष्टीस तो कारचा मालक त्यांच्या मागे मागे येतांना दिसला म्हणून तिने अधिकच गाडी जोरात चालवायला सुरुवात केली.

ड्रायव्हिंग करताना तिने आदित्यची कान ठीक आहे कि नाही हे सुद्धा तपासले नाही. आणि तिला हेही माहीत नव्हतं जेव्हा ति आदित्यला नक्कि काय घडले ते सांगेल तेव्हा त्याच्यि काय प्रतिक्रिया असेल.

आदित्य मात्र गोंधळलेला होता, कृत्तिका इतक्या वेगाने काय ड्राव्हिंग करत होती की आदित्यला धडकि भरली. काय झाले ???? हळू गाडी चालव. असं चिडून बोलत होता पण कृत्तिकावर मात्र त्याचा काहीही परिणाम होत नव्हता.

काही वेळाने तिच्या कानांवर समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकताच तिने कार थांबवली आणि दूरवर कुठेतरी समुद्र आहे असं समजताच तिने त्या मार्गी आपली गाडी वळवली तिथे गाडी पार्क केल्यानंतर ते दोघेही कारमधून उतरले.

आदित्यमात्र अजूनही रागात होता आणि त्याला अजुनही त्याच हृदय जोरात धडधडत आहे असं जाणवत होतं. बिचारी

कृत्तिका त्याच्यासमोर येऊन सॉरी म्हणत जे काही घडले ते सर्व काही त्याला प्रामाणिकपणे सांगत बसले.

काय ..एका कारला तु जाऊन धडकली??????? आणि काहीही न बोलत तू तिथून फरार झाली ?????” आदित्य त्याचं हसू आवरत म्हणाला.

मी यापुढे तुला कधीच कार चालवू देणार नाही असं तो खडक आवाजात म्हणाला. कृत्तिकाचा चेहरा मात्र केविलवाणा झाला होता.

मोबाईलचा गजर वाजताच कृत्तिकाला जाग आली आणि ती बेडवर उठून बसली कालचा दिवस धावपळीचा होता आणि आजही तिला तिच्या आई सोबत लग्नासाठी ची खरेदी करण्यास बाहेर जायचं होतं. आदित्य सोबत संध्याकाळी जेवायला हि तिने एक दीर्घ उसासा टाकून पलंगावरून उतरली आणि थेट बाथरूम कडे वळली. सकाळचे सर्व दैनंदिनी क्रिया केल्यानंतर तिला थोडं फ्रेश वाटू लागलं.

थोड्याच वेळात ती आणि तिची आई तिच्यासाठी कपडे खरेदी करण्यासाठी एका आलिशान दुकानांमध्ये गेल्या. तिथे अनेक प्रकारचे डोळ्यांना आकर्षित करणारे वस्त्र दालनांमध्ये सुंदर पद्धतीने सजवून ठेवले होते.

त्यातीलच काही वस्त्र मिसेस निता यांनीनी कृत्तिकाला घालून बघण्यासाठी सांगितले. खूप वेळ घालवला नंतर सरतेशेवटी त्यांनी काही नऊवारी साडी निवड केली.

संध्याकाळ होताच कृत्तिकाला आदित्यचा फोन आला आणि त्याने तिला तयार होण्यासाठी सांगितले. ते दोघेजण सुद्धा एका दिमाखदार हॉटेलमध्ये होते. आपला मेनू ऑर्डर केल्यानंतर ते दोघे एकमेकांशी आज दिवसभरात काय केलं याविषयी चर्चा करत होते. ते हळूहळू एकमेकांना जाणून घेऊ लागले होते त्यांच्या लहानपणाच्या गोष्टी आठवत आपले बालपण किती सुंदर गेले हे एकमेकांना सांगत होते.

हॉटेलचे बिल पे करण्यासाठी आदित्य गेला असताच त्याच्या मागून हळूच कृत्तिका उभी राहिली. तिचा चेहरा त्रासलेला होता आणि तिचा एक हात तिच्या पोटावर तिच्या चेहऱ्यावर वेदना असल्याचा भाव निर्माण झाला.

कृत्तिकाकडे पाहिल्यावर नक्की काहीतरी झाले आहे असा विचार करून आदित्यनी तिला विचारलं

“तू ठीक आहेस ना ???” यावर कृत्तिका हळू आवाजात

‘मला पिरेड्स आहे” असं सांगताना तिचा चेहरा केविलवाणा झाला.

यावर आदित्य तिच्या चेहऱ्याकडे एकदा पाहतो आणि दुसऱ्याच क्षणी हॉटेलमधून बाहेर पडतो.

कृत्तिकाला काही सुचेना म्हणून हॉटेलच्या वॉशरूम मध्ये जाऊन थांबली. तिला आता असह्य वेदना होत होत्या.

थोड्याच वेळात त्या वॉशरूम मध्ये एक मुलगी आली आणि तिने कृत्तिकाकडे सॅनिटरी नॅपकिन्स देताना “तुझ्या मित्राने मला ही द्यायला सांगितले.” असं म्हणत तिथून निघून गेली.

हे बघितल्यानंतर कृत्तिकाच्या मनातलं दडपण कमी झालं. ती संकटात असताना ज्या प्रकारे आदित्यने तिची मदत केली याचा खूप आनंद तिला झाला.

थोड्याच वेळात वॉशरूम मधून ती बाहेर आली. स्मित हास्य करत” थैंक्यु ” म्हणून तिने मनापासून आभार मानले.

आदित्यला तिचा साधेपणा आवडायला लागला होता. त्याच्या मनात कुठेतरी कृत्तिकाबद्दल भावना निर्माण व्हायला लागल्या होत्या. त्याने आजपर्यंत बऱ्याच मुली बघितल्या पण कृत्तिका तशी नव्हती, तिच्यात असं काहीतरी वेगळं होतं जे आदित्यला तिच्याकडे आकर्षित करत होतं.

हळू हळू त्यांच्या मैत्रीचं प्रेमामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात झाली होती. त्यांच्या या नवीन नात्याला हळू हळू भावनांचे अंकुर फुटत होते त्यांना नकळत ते एकमेकांकडे ओढले जात होते.

त्यानंतर आदित्यने कृत्तिकाला तिच्या घरी सोडल्यानंतर तो आपल्या घरी आला. तो सुद्धा धावपळीने थकून गेला होता म्हणून आपल्या रूम मध्ये जाताच फ्रेश कपडे बदलून त्याने आपले अंग बिछान्यावर टाकलं. डोळे मिटताच त्याला कृत्तिकाचा हसरा चेहरा दिसू लागला.

त्याच्या मनात अनेक विचार गुंफण घालत होते आणि ह्या सगळ्यांना दूर करून त्यांनी झोपण्याचा प्रयत्न केला.


जाधव आणि पाटील परिवार ज्या दिवसाची वाट बघत होते अखेरीस तो दिवस उजाडला होता. आज लग्नाचा दिवस होता. सर्वजण या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो ते. आज पर्यंत ची काही दिवस कसे धावपळीत निघून गेले याचा कोणालाही अंदाजा लागला नाही. सर्वजण खूप खूष होते.

हॉल मध्ये सर्वत्र प्रसन्न वातावरण होते. सनई चौघडे यांचा आवाज सर्वत्र दुमदुमत होता. लग्न सोहळा पार पाडण्यासाठी सर्वजण आनंदात उपस्थित होते. वातावरणामध्ये एकप्रकारचा विलक्षण आनंद सर्वत्र पसरत होता.

आदित्य आपला सूट घालून रूम मध्ये कधीपासून आरशात चा स्वतःच्या प्रतिबिंबाकडे बघत बसला.

थोड्याच वेळात तो स्टेजवर जाऊन उभा राहिला. त्याच्या समोर सर्व त्याचे नातेवाईक आणि मित्रमंडळी बसलेले होते. त्यांच्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. त्याच्या बाजूला त्याच्यापेक्षा थोडं मागे पंडित होते. आणि ते सर्व जण आता नवरी येण्याची वाट पाहत होते. आदित्यच्या ओठांवर स्मित हास्य झळकले जसं त्याने कृत्तिकाला तिने परिधान केलेल्या सुंदर वस्त्रांमध्ये येताना पाहिलं.

कृत्तिका अतिशय सुंदर दिसत होती. तिचे मोहक बादामी डोळ्यांमध्ये आदित्य हरवून गेला होता आणि दुसर् या क्षणी ति त्याच्या समोर उभी होती. ती अत्यंत सुंदर दिसत होती जणू ती आकाशातली परि आहे असं त्याला वाटत होतं. त्याचे डोळे कृत्तिकाला निरखून पाहत होते.

काही क्षणात लग्नविधी अनुक्रमे केल्यावर पंडित ने त्यांना नवरा बायको म्हणून घोषित केले.

त्यानंतर लग्नाचा समारंभ आटोपल्यानंतर सर्व मंडळी जेवणास सुरुवात केली जेवणामध्ये विविध प्रकाराचे खाद्यपदार्थ सजवलेले होते त्यातले काही खाद्यपदार्थ कृत्तिकाचे आवडते होते. जेवण झाल्यानंतर आदित्य कृत्तिकाला आपल्या मित्रांसोबत भेट करून देत होता आणि तसेच बाकी नातेवाईकांसोबत ही या लग्नाच्या धावपळीमध्ये दिवस कसा मावळला हे कोणाला उमजले ही नाही.

आणि अखेरीस आदित्य आणि कृत्तिका समाजमान्य विवाहित जोडपे झाले होते.

क्रमश: