Skip to content Skip to sidebar Skip to footer

Arranged Marriage – भाग २

© royancharm

मिसेस सुजातांचा आवाज ऐकताच ते दोघे पण रूमच्या बाहेर पडले आणि डायनिंग हॉलमध्ये येऊन बसले.

आदित्यच्या डोक्यात नक्की काय विचार चालू होते याची कृत्तिकाला काडीमात्रही कल्पना नव्हती. तिने एक सुस्कारा सोडला. आणि त्या विचारांकडे दुर्लक्ष केलं. जेवणाच्या टेबलावर पोहोचताच कृत्तिका तिच्या आई-वडिलांना शेजारी जाउन बसली आणि आदित्यला अगदी शांत चेहऱ्याने त्याच्या आई-वडिलांसोबत बसलेलं बघितलं.

कृत्तिकाने आदित्यच्या चेहऱ्याकडे बघण्यासाठी मान वळवली आणि त्याचा चेहरा तिला भावना विरहित दिसला.

आदित्य खुर्चीवर मागे रेटून बसला होता आणि त्याचा चेहरा भावनाशून्य होता म्हणून तो नक्की काय विचार करत आहे याचा कोणाला अर्थ लागत नव्हता.

कृत्तिका त्याच्या सुंदर छायांकित असलेल्या चेहर्याचा आणि मोहक डोळ्यांच्या निरीक्षण करायला सुरुवात केली आणि तोच आदित्य आणि तिची नजरानजर होताच तिने दुसरीकडे नजर फिरवली.

तो आता एकटक कृत्तिकाच्या चेहऱ्याकडे बघत होता आणि त्याच असं बघन तिला जरा अस्वस्थ करत होतं.

आदित्य शांतपणे त्याच्या तीक्ष्ण नजरेने कृत्तिकाला न्याहाळून पाहत होता पण त्याचं लक्ष त्याच्या आईच्या बोलण्याकडे गेलं.

मिसेस सुजाता “ठीक आहे तुम्ही दोघे लग्न पर्यंत सोबत फिरायला शॉपिंगला वगैरे जाऊ शकता म्हणजे तुमची चांगली ओळख होऊन जाईल ” असं म्हणताना त्यांच्या चेहर् यावर आनंद उजळून निघाला होता, यावर कृत्तिका हसून ” नक्की असा होकार दिला.

त्या कल्पनेशी सहमत होण्याशिवाय तिच्याकडे काही पर्यायच नव्हता. मुळात लहानपणापासुन कृत्तिका ही खूप शांत स्वभावाची गोंडस आणि प्रामाणिक होती. पुढे आपल्याला फॅशन डिझायनिंगमध्ये आवड आहे असं जाणवतं तिने त्याला आपलं करिअर म्हणून बघायला सुरुवात केली. आपलं शिक्षण यशस्वीपणे पूर्ण करत तिने एका नावाजलेल्या कंपनीत जॉब ही मिळवला.

मिस्टर रूपेश यांची इच्छा होती की कृत्तिकाने त्यांचा बिझनेस सांभाळावा पण तिच्या उत्कट भावना व आत्मविश्वास बघून त्यांनी तिच्यावर आपल्या स्वप्नांचं ओझं लादलं नाही.

मिस्टर रूपेश आणि मिस्टर अभिनव हे बिझनेस पार्टनर आहेत आणि चांगले जिगरी दोस्त ही म्हणून त्यांनी आपले

संबंध अजून घट्ट करण्यासाठी हे लग्न जमावे अशी दोघांचीही इच्छा आहे.

पोटभर जेवणानंतर जुन्या गप्पा आणि गोष्टींमध्ये कसा वेळ निघून गेला हे कोणाला कळलंच नाही आणि सरतेशेवटी पाटील परिवार आपल्या घरी परतले.

कृत्तिका आपल्या प्रिय बिछान्याला भयंकर पणे मिस करत होती. ति इतकी थकली होती की चालणे सुद्धा तिला जड झाले होते. तिच्या आई-वडिलांना गुड नाईट म्हणून ति रूम मध्ये पोहोचली रूम मध्ये जाताच तिने पटकन आंघोळ वगैरे करून काही आरामदायक कपडे घातले आणि बेडवर उडी मारली अंगावर ब्लांकेट ओढत ” आजचा दिवस तर गेला उद्या काय होईल काय माहिती” असं म्हणत तिने डोळे बंद केले. तिच्या मेंदूला आणि मनाला उद्यासाठी पुन्हा शक् ती आणण्यासाठी तिला विश्रांती घेणं गरजेचं होतं.

दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजताच कृत्तिकाने डोळे उघडले, तिला अजून थोडं झोपू वाटत होतं पण तिने तिचा आळस बाजूला सारून ती बेडवरून उतरली. सकाळच्या सगळ्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीज करून झाल्यावर तिने आपल्या अंगावर एक जीन्स आणि गुलाबी रंगाचा टी-शर्ट चढवला. स्वयंपाक घरात येताच डायनिंग टेबल वर मिसेस निता यांनी ठेवलेलं कॉफी मग घेऊन ती हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसली.

एक कॉफीचा एक घोट घेत असतील ना जरा रिलॅक्स वाटू लागलं होतं. कॉफीचा अजून एक घोट घेईल तोच दरवाजा ठोठावन्याचा आवाज तिच्या कानी आला.

काय यार .. आता मी माझी कॉफी पण शांतपणे घेऊ शकत नाही असं म्हणत त्रासदायक चेहऱ्याने तिने कप खाली ठेवला आणि पटकन दरवाजा कडे निघाली. समोर उभी असलेली व्यक्ती बघताच तिचे डोळे विस्फारले गेले तिच्या समोर आदित्य होता आणि तो तिच्या घरी का आला होता हे तिला कळेना..

आदित्य त्याच्या कार मध्ये दीर्घ उसासा टाकून ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि कार थेट कृत्तिकाच्या घराच्या दिशेने चालवण्यास सुरुवात केली. कार चालवत असताना आदित्य मात्र त्याच्या आईने सांगितलेली गोष्ट आठवत होता.

मिसेस सुजाता यांना मुळात लहानपणापासूनच कृत्तिका आवडत होती आणि आज त्यांचे ते स्वप्न देखील पूर्ण होण्याच्या मार्गावर होतं. आदित्यने त्याच्या आईला वचन दिलं होतं की तो त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करणार. त्यांचं त्यांच्या आईवर खूप प्रेम होतं आणि म्हणून तो कृत्तिकाशी लग्न करण्यासाठी सहमत झाला..

आदित्य कृत्तिकाच्या घरी पोहोचताच त्याची कार पार्क केली आणि तो घराच्या दरवाजा जवळ येऊन उभा राहिला. बाजूला बघत असताना त्याची नजर छोटीशी बागेवर पडली. ति रंगीबिरंगी फुलांनी सजलेली होती आणि त्यावर काही फुलपाखरे खेळत होती ते सुंदर दृश्य बघून ज्यांच्या ओठांवर हसू उमटले आणि त्याला क्षणभर विसर पडला की तो कशासाठी इथे आला होता. त्यांनी डोअर बेल वाजवली आणि कोणीतरी दार उघडेल याच्या अपेक्षेत तो वाट बघत उभा राहिला.

क्रमश:

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.