Skip to content Skip to sidebar Skip to footer

Arranged Marriage – भाग १४

” आदित्य आपण काही महिने जे सोबत घालवले ते सर्वात सुंदर दिवस होते माझ्या आयुष्यातले. पण आता मला तुझ्यावर विश्वास नाहीये तू जे केलं ते फार चुकीचं केलं. तू मला अंधारात ठेवलं. मी हे असल्या गोष्टी सहन करू शकत नाही. हो माणूस मला असा विश्वासघात करत असेल त्यांच्यासोबत मी माझ आयुष्य नाही काढू शकत. मी हे घर सोडून जात आहे आणि मी जिथे कुठे असेल सुरक्षित असेल. तू मला शोधण्याची गरज नाही तू तुझ आयुष्य सुखात रहा आणि मलाही राहुदे. “

आदित्य ते पत्र वाचून थंडगार झाला होता. त्याला त्याची चुकी समजली पण त्याला आता त्याची माफी मागायची वेळ निघून गेली होती.

तो बराच वेळ सोफ्यावर शांतपणे विचार करत होता. त्याचे मन अनेक गोष्टींनी भरून गेले होते. त्याने एक सुस्कारा सोडला आणि तो त्याची कार ची चावी घेऊन घराबाहेर पडला.

” मला प्रिया सोबत या बद्दल चर्चा करावी लागेल.” अस मनात बोलून आदित्य थेट प्रियाच्या घरी निघाला.

त्याने आपली कार प्रियाच्या घरासमोर उभी केली. त्याच्या डोळ्यातले ते वादळ अजूनही शांत झाल नव्हत.
तो हळू चालत दरवाजा समोर उभा राहिला. तो बेल वाजवणार तेवढ्यात त्याचं लक्ष घरातून येणाऱ्या आवाजाकडे गेलं. घरातून एका मुलीचा आणि मुलाचा हसण्याचा आवाज येत होता.

आदित्यने कमीतकमी हालचाल करून आपले कान दरवाज्यावर टेकवले. दरवाजा बाजूची खिडकी उघडी असल्याने घरातील माणसांचा बोलण्याचा आवाज स्पष्ट येत होता.

” प्रिया मी तुला काहीतरी विचारू का??”

” हो बोल ना…”

” तुझ आणि तुझ्या त्या बॉस आदित्य च काय चालू आहे ..???”

” कोण माझा बॉस अरे मी फक्त त्याचा कंपनी मध्ये काम करते…”

” ठिक आहे पण मला अस ऐकण्यात अल आहे की तुझ आणि त्याच रिलेशन काहीतरी वेगळं आहे….”

” राज अरे अस काही नाहीये …ते तर फक्त त्यांच्यासोबत गोड राहावं लागते करण मला प्रमोशन पाहिजे. बाकी काही नाही. “

” मला अस वाटते की तू तुझ्यासोबत फक्त त्याची कलिग म्हणून राहावी. “

” हो रे जान समजल मला.”

” ओके “

आदित्यने हळूच खिडकीतून डोकावून पाहिलं तर ते दोघे एकमेकांच्या मिठीत होते.

ते पाहून आदित्यची पायाची आग मस्तकात गेली. त्याच्या डोक्यात एक तिडीक गेल्यासारखे वाटू लागले. काही क्षणासाठी त्याला सगळ्या गोष्टींचा राग येत होता.
त्याला प्रियाचा फार राग येत होता. आदित्यचा राग अनावर झाला आणि त्याने दरवाजे जोराने ठोठावला.

घरामध्ये मिठीत बसलेले राज आणि प्रिया एकदम दचकून गेले. प्रिया धावत जाऊन तिने दरवाजा उघडला.

” हाय प्रियु …..” आदित्य ओठांवर हसू खेळवत म्हणाला तरी त्याच्या डोळ्यात राग हा दिसून येत होता.

” कोण आहे प्रिया ….” अस विचारत राज समोर आला.
आदित्य ला पाहून तो जरा चकितच झाला.

” तुझ काय काम आहे इथे??” राजने आपल्या कडक आवाजात विचारले.

” अरे अस काय बोलत आहे ….बॉस आहे ते माझे …” प्रिया आपल्या चेहऱ्यावर निरागस असल्याचा भाव आणत म्हणाली.

” अच्छा तर मी आता आदू नाही बॉस आहे का तुझा….” आदित्य ज्या प्रकारे बोलत होता त्यावरून राज ला नक्कीच काहीतरी आहे जे त्याला माहित नाहीये अशी जाणीव त्याला झाला.

” प्रिया तुझ्या ह्या असल्या खोट्या नाटकामुळे माझं काय नुकसान झाले ते माहीत असूनही तू इथे तुझ्या सो कॉल्ड बॉयफ्रेंड सोबत मस्त गूलूगूलुगुलू करत आहे…..”

” मी काय केलं आहे???” प्रिया अजूनही तिचे नाटक करत होती.

” ही पोरगी ज्या मुलीसोबत आहे ना तू राज ती एक नंबरची खोटारडी आहे…..तिने मला फसवल आहे आणि आता तुलाही फसवत आहे…” आदित्य चिडून बोलत होता.

” मी काही तुला फसवल नाहीये आदित्य …..तूच माझ्यासोबत गोड गोड बोलत होता. मी नव्हते तुला माझ्याशी मैत्री कर म्हणून….” प्रिया सुध्दा आता मोठ्याने बोलत होती.

” इतकाच होत तर का मग आज कृत्तिका आली तेव्हा आमचं एकमेकांवर प्रेम आहे अस बोलली??? आणि काय गरज होती तुला माझ्या डेस्क वर येऊन बसायची आणि माझ्या गळ्यात हात घालुन बसायची????”

” काय …..तुमचं दोघांचं काय चालू आहे?? प्रिया हे सगळ खर आहे का???” राज ला ह्या गोष्टी माहीत करुन घ्यायच्या होत्या.

” राज मी फक्त यांच्यासोबत चांगली वागत होती आणि हा त्या गोष्टीचा गैरफायदा घेत होता. ” प्रिया आपले डोळे पाणावात म्हणाली.

” काय गैरफायदा?? आणि माझ्याकडून गोड बोलून तू जे कपडे आणि मेकप च सामान खरेदी करून घेतल ते??? ते काय होत??? मी तुला सांगतो राज ही एक नंबरची खोटारडी आणि स्वार्थी मुलगी आहे….”

” काय चालू आहे …..एक मिनिट तुमच्या दोघांपैकी कोण खर बोलत आहे???” राज वैतागून म्हणाला.

” मी” आदित्य आणि प्रिया दोघांनीही सोबत उत्तर दिलं.

” मला वाटल नव्हत की ती असल्या प्रकारची मुलगी असेल म्हणून….” आदित्य आपले तोंड वेडेवाकडे करत म्हणाला.

” आणि तुझ काय??? घरात बायको असतानाही तुला दुसऱ्या मुली हव्या असतात??? तुला काय म्हणावं….इतकाच धुतल्या तांदळासारखा असता तर कधी फालतू लफडी करायची विचारच नसता केला तू….” प्रिया आपला राग अनावर करत म्हणाली.

कितीही झालं तर आदित्यने जे केलं त्यासमोर प्रिया काहीच नव्हती. प्रियाचे ते शब्द ऐकून आदित्यच्या कानाखाली वाजवल्या सारखी झाली. त्याचा आवाज नमला. त्याला त्याच्या चुकीचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावर फोडून काहीच होणार नव्हत. कृत्तिका वापस येणार नव्हती.

” हो पण तू जे मला फसवल आहे त्याचं काय???? आणि तू आता तुझ्या बॉय्रेंडला पण फसवणार आहे का?? राज मी तुला सांगतो ….प्रिया आणि मी रिलेशशिपमध्ये होतो….आणि मी आत्ताच हिच्यासोबत ब्रेकअप पण करतो कारण मला हिच्यासोबत एकही संबंध ठेवायचे नाहीये.”
आदित्य आपला सगळा राग आपल्या शब्दात काढत म्हणाला.

आदित्यला हे जाणून फार वाईट वाटले की ज्या मुलीसोबत तो इतका चांगला राहत होता. जिला तो आपला सगळा वे देत होता….प्रिया सोबत बाहेर फिरायला जाणे, जेवणे, खरेदी करणे ……तिच्यासोबत फार चांगल्या आठवणी आहेत ….आणि ती मुलगी त्याला अश्या प्रकारे फसवत आहे हे आदित्यला सहन झाले नाही.

” आणि तू आपल्या बायकोला असा धोका देत आहे त्याचा काय??? शेवटी तिला तुझे हे फालतू लफडी समजली ना…..तू खरतर खोटारडा आणि लफडेबाज माणूस आहे….” प्रिया चे ते शब्द चाकू सारखे आदित्यच्या काळजाला चिरत गेले.

आदित्यला आपले अक्ष्रू अवरले नाही….आपला चेहरा खाली करत तो त्याला कार च्या दिशेने निघाला.

” हे काय होत प्रिया…आणि तू मला खोटं बोलली ?? मी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू??” राज हे सगळ पाहून चिडला होता.

” जान ऐकुन घे प्लीज ….तो माणूस खोटारडा आहे….त्याचं लग्न झालं असून सुद्धा तो मला त्याच्या जाळ्यात अडकवत होता.

” प्रिया अजून किती खोटं बोलशील तू ??? ” राज प्रियाच्या त्या नाटकामुळे वैतागला होता.

” ऐकुन तर घे….” प्रिया त्याला समजावणीच्या स्वरात म्हणाली.

” बस मला तुझ काहीही ऐकायचं नाहीये….” राज काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. काही वेळा पूर्वी त्याने तिला याबद्दल विचारल आणि प्रिया सरळ सरळ खोटं बोलली….. राज ने तिला या बद्दल विचारले कारण त्याला प्रिया आणि आदित्यची गोष्ट त्याच्या एका मित्राकडून कानावर आली. त्याचा ह्या गोष्टीवर विश्वास नव्हता कारण प्रिया त्याचं मनापासून प्रेम होत. आणि आज आदित्यच्या तोंडून हे सगळ ऐकुन त्याचं डोक्यात प्रिया बद्दल राग निर्माण झाला. काही क्षणात प्रियासाठी असलेले ते प्रेम रागात रूपांतरित झाले.

आदित्यला आणि प्रिया ची भांडणं चालू असल्याचा आवाज येत होता पण आदित्यचे लक्ष तिकडे नव्हते. त्याचे मन दुखत होते. तो आल्या कार मध्ये येऊन बसला.

त्यानें आली कार आपल्या घराकडे वळवली. कार चालवताना त्याला आपले अश्रू आवरले नाही आणि ते अलगद त्याच्या गालावरून ओघळत होते.

” मला इतकं वाईट वाटत आहे तर कृत्तिका ला कस वाटत असेल….ती मला माफ करेल की नाही…..” अस म्हणत त्याने आपले डोळे पुसले.

खरतर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आदित्यची चुकी होती. तो प्रियाच्या गोड शब्दांना भुलला आणि तिच्या जाळ्यात नकळत अडकला. त्याने हे नको करायला पाहिजे होते आणि त्याने जे केले ती एक मोठी चूक होती. त्याला त्याची चूक समजली होती पण आता माफी मागायची वेळ निघून गेलेली होती.

आदित्य घरी परत आला आणि येऊन समोर हॉल मध्ये बसला. त्याने आपले डोळे मिटले, लांब श्वास घेत आपल जड झाले डोकं शांत करण्याचा प्रयत्न तो करत होता.

डोळे मिटताच कृत्तिका चा चेहरा आणि त्यांनी घालवलेले ते काश्मीर मधील गोड क्षण त्याच्या डोक्यात गुंफेर धरू लागले. त्याने कृत्तिका सोबत जे काही केले ते फार वाईट केले.

” मी अस नाही करायला पाहिजे होत…माझ्या हातून खूप मोठी चूक झाली, मला ह्या गोष्टीचा पश्चात्ताप होत आहे ….देवा मला माफ कर ….मला कृत्तिका सोबत राहायचं आहे…मला माहित आहे की ती मला कधीच माफ करणार नाही…जर मी कृत्तिका कडे गेलो तर ती मला स्वीकार करेल का?? ती माझी माफी स्वीकारेल??? आणि जर तिने नाही केलं तर?? मी काय करणार ….मला आज समजल आहे की ती किती प्रामाणिक पने प्रेम करत होती …..आणि की तिच्या सोबत असा वागलो….मला ह्या गोष्टीचा खूप त्रास होत आहे आता……”
त्याने कृत्तिका सोबत जे काही केले ते फार वाईट केले. तिला काय वाटतं असेल. ती कुठे असेल?? कशी असेल?? हे प्रश्न त्याच्या डोक्यात वादळासारखे घोंघावत होते.

त्याने ते पत्र पुन्हा वाचले आणि ह्यावेळी त्याचा अश्रूंचा बांध फुटला. हुंदके देत तो कृत्तिका सोबत वाईट वागल्याची माफी मागत होता. त्याचं जग उध्वस्त झालं होत.

काय आदित्य कृत्तिका ला शोधणार ?? काय आदित्य तिला माफी मागणार?? काय कृत्तिका त्याला माफ करणार??

लवकरच तुमच्या भेटीला घेऊन येतो आहे “Arranged Marriage” पर्व २

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.