
कृत्तिका रात्रभर विचार करत जागी होती. आदित्य अस काही तिच्यासोबत करेल त्याचा तिने कधी विचारही केला नव्हता. तिला ह्या गोष्टीच फार वाईट वाटत होत की ती इतकी प्रामाणिक असूनही आदित्य जर तिला अस फसवत असेल तर ती त्याच्या सोबत राहू शकत नाही.
कृत्तिका फार निर्मळ मनाची आहे पण ती कोणत्या अश्या व्यक्ती सोबत तीच आयुष्य नाही काढू शकत जो तिला फसवत आहे. तिच्या डोक्यामध्ये विचारांचे वादळ घोंघावत होते. या सगळ्या गोष्टींमुळे तिला अस्वस्थ वाटू लागले.
या सगळ्या विचारात असताना कृत्तिका ला सकाळ कधी झाली याची जाणीव झाली नाही. ती रात्रभर निपचित आपल्या बेड वर पडून होती, तिच्या विचारांनी तिला गुरफटून ठेवलं होत. सकाळचा गजर वाजताच तिला सकाळ झाली आणि आपल्याला आपल्या नेहमीच्या कामं करायची वेळ झाली आहे हे तिचा मनी आले.
ती उठून बाथरूम मध्ये गेली आणि अंघोळ आणि बाकी गोष्टी आवरून ती रूम मध्ये आली. तिने काही आरामदायी कपडे घातले. रात्रभर जरी तिला डोळा लागला नसेल तरीही तिला थकवा जाणवत नव्हता कारण तिचे मन अजूनही त्या गोष्टींचा विचार करत होते.
तिने त्या दोघांचा नाश्ता आणि टिफीन तयार केले. ती त्यांचे टिफीन भरत असताना तिला आदित्य उठल्याची चाहूल लागली.
” गुड मॉर्निंग ” आदित्य बाथरूम मध्ये जात म्हणाला.
” गुड मॉर्निंग ” कृत्तिका तिचे खोटं हसू आणत म्हणाली.
काही वेळात आदित्य आवरून नाश्ता करायला बसला. त्याच्या सोबत कृत्तिका असताना त्याचं लक्ष मात्र त्याच्या मोबाईल मध्ये होत.
” काही महत्वाचं आहे का???” कृत्तिका त्याचं लक्ष वेधण्यासाठी म्हणाली.
” हो ते मीटिंग बद्दल होत थोड.” अस म्हणत आदित्य ने मोबाइल बाजूला ठेवला.
” आज तरी लवकर घरी येशील का???”
” कृत्तिका ……..आजकाल खूप प्रेशर असते कंपनी मध्ये……म्हणून मी उशिरा घरी येतो. “
” मग कल कुठे होता???” कृत्तिका ला सगळ्या गोष्टी mahit होत्या. जर आदित्यने तिला खर सांगितल तर ती त्यावर संशय घेणार नाही असा तिने मनात विचार केला होता.
पण तिच्या पदरी निराशाच आली ” कृत्तिका मी ऑफीस मध्ये होतो….काम करत होतो म्हणून उशीर झाला. ” आदित्य आता तिच्या अश्या प्रश्नांना कंटाळला होता.
” मग घरी आल्यावर तरी जेवत जा….बाहेरच नको खात जाऊ आणि……” कृत्तिका अजून काही बोलणार तोच आदित्यने तिला रोखले ” कृत्तिका प्लीज ….मी तिथे काम करत असतो …..मला भूक लागून जाते म्हणून मी बाहेर जाऊन जेवण करतो ……तू प्लीज मला आता प्रश्न विचारणे बंद कर…..”
तो उठला आणि त्याची बॅग आणि कार ची चावी घेऊन निघत असताना ” येतो मी मला उशीर होत आहे….” अस म्हणून निघून गेला.
कृत्तिका मात्र त्याच्या ह्या वागण्यामुळे खूप दुःखी झाली होती. तिला तिचे अश्रू आता आवरत नव्हते आणि ते अलगद त्याच्या गालावरून ओघळत होते. तिने हुंदके देत आपले डोळे पुसले.
तिला काही सुचत नव्हते नक्की काय करावे म्हणून ती काय तशीच तिथे बसून होती. या सगळ्या तणावामुळे तिचे लक्ष कोणत्या गोष्टीत नव्हते. समिधा तिच्याशी खोटं बोलणार नाही पण ती जे बोलली त्यावर कृत्तिका चा सहजासहजी विश्वास बसेना.
कृत्तिका च लक्ष अचानक तिने किचन मध्ये ठेवलेल्या टिफीन कडे गेलं. तिला लक्षात आलं की आदित्यने त्याचा डबा घरीच विसरून गेला आहे.
कृत्तिका उठली तिने तीचे कपडे बदलले आणि ती तिची बॅग आणि त्या दोघांचे टिफीन घेऊन निघाली. ” आधी मी आदित्यला डबा देते आणि मग माझ्या कंपनी कडे जाईल ” असा विचार करत ती थेट आदित्यच्या कंपनी कडे निघाली.
काही वेळात ती आदित्यच्या कंपनी जवळ पोहोचली. तिने रिसेपशनला आदित्यच्या ऑफीस बद्दल विचारले आणि ती त्या दिशेने निघाली.
कृत्तिका ला आदित्यच्या चेहऱ्यावरचे भाव पाहायचे होते. आपल्या लाडक्या बायकोने आपल्यासाठी ऑफीस मधे
डबा आणल्यवर तो काय म्हणेल त्याचा ती विचार करत तिच्या ऑफीस जवळ पोहोचली.
थंड धातूचा हॅण्डल पकडून तिने तो समोरच्या दिशेला लोटला आणि दरवाजा उघडल्या गेला. कृत्तिका चे डोळे समोरच दृष्य पाहून अविश्र्वासाने विस्फारले गेले. तिचे पाय जमिनीवर गोठले गेले आणि तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला. आदित्य त्याच्या खुर्चीवर बसून होता आणि त्याच्या टेबल वर एक मुलगी त्याच्या गळ्यात हाथ टाकून बसली होती.
” आदित्य…..” कृत्तिका रागाने म्हणाली.
आदित्य कृत्तिका ला त्याच्या ऑफीस मध्ये पाहून एकदम चकित झाला होता. तो त्या मुलीच्या मिठीतुन निघून ” कृत्तिका तू इथे काय करत आहे….” अस विचारत तो उभा राहिला.
कृत्तिका रागाने त्या दोघांकडे पाहत ” तू तर दिवसरात्र काम करत असतो ना इथे…. तू कंपनीची काम करतो की ही असली …….” अस म्हणत कृत्तिका त्या अनोळखी मुलीकडे पाहत म्हणाली.
” कृत्तिका त स काही नाहीये….” आदित्य तिला समजावून सांगायचा प्रयत्न करत होता.
” काहीही सांगायची गरज नाहीये……तू इतक्या खालच्या पातळीचा असेल अस मला वाटलं नव्हतं आदित्य. तुझ रोज घरी लेट येणं, रविवारी सुद्धा ऑफीस ला जाणं, हे सगळ्या गोष्टी तुला का वाटल मी सहज विश्वास ठेवेल?? मला एक सांग काल ज्या पार्टी ला तू गेला होता त्यात हीच मुलगी होती हो ना…???” कृत्तिका आपला सगळा राग बाजूला ठेवून तिच्या बोलण्यामध्ये फार संयम ठेवत होती.
” हो आम्ही गेलो होतो सोबत ….आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे ” अस ती मुलगी टेबल वरून खाली उतरत म्हणाली.
” तुझ्याशी तर माझा काडीमात्र संबंध नाहीये तेव्हा तू काही बोलूच नको… आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती तुझ्यावर विश्वास ठेवायची…..” कृत्तिका चे डोळे पाणावले आपल रडू सांभाळत ” तुला जर ही असली घाणेरडी काम करायची होती तर तू आधीच मला सांगायचं होत मी कधीच तुझ्यासोबत लग्न करायला तयार झाली नसती. “
” कृत्तिका प्लीज maz ऐकुन तर घे….” आदित्य ला काय बोलावं ते सुचेना.
” बस काय ऐकुन घ्यायचं बाकी आहे??? मी माझ्या नवर्यासाठी इथे डबा घेऊन आले कारण मला वाटल की तो उपाशीपोटी राहू नये आणि इथे माझा नवरा दुसऱ्या पोरिंसोबत मस्त मजा करत आहे……” कृत्तिका ने लांब श्वास घेत तिचा राग आवरण्याचा प्रयत्न केला.
” तू कर छान एन्जॉय मी तुझा मूड खराब करणार नाही…..काही दिवसांनी तुझ्याकडे डिव्होर्स पेपर्स पोहचून जातील. “
कृत्तिका चे ते शब्द ऐकून आदित्यच्या पायाखालची जमीन सरकली. ” कृत्तिका थांब माझ ऐकुन घे…..” तो तिला थांबवण्याचा प्रयत्न करत होता.
” आता काय बाकी आहे??? आपल नात संपल आदित्य, तुला इतकी पण अक्कल नाहीये की घरात हक्काची बायको असताना तू बाहेर असली काम करतो???? तुला नसेल कोणत्या गोष्टीची लाज पण मला स्वाभिमान आहे ……मी नाही राहू शकत असल्या माणसासोबत जो असा विश्वासघात करेल. तू माझ्या फॅमिली ची नको काळजी घेऊ …..करेल मी ते सगळ हॅण्डल. ” अस म्हणत कृत्तिका त्याला दूर करून ती तिच्या घराकडे निघाली.
आदित्य ला काही समजत नव्हते की काय करावे. ” आदु बघ ना तुझी बायको किती काही बोलून गेली…..तू तिला काही बोलत का नाही….”
” अन्वी प्लीज मला थोड एकटा सोड ” आदित्य त्या धक्यातून अजूनही बाहेर आलेला नव्हता. त्याचे मन फार अस्वस्थ झाले होते.
कृत्तिका तिच्या घरी आली आणि ती तीचे कपडे बॅग मध्ये भरत होती…तिने तिचे सगळे सामान आपल्या बॅग मध्ये भरून ती समोरच्या घरात एक पत्र लिहीत बसली. ते पूर्ण होताच तिने ते टेबल वर ठेवून आपल्या बॅग घेऊन निघाली.
आदित्यला काही सुचत नव्हत. त्याच्या हातून हे काय झालं याचा तो त्याला दोष देत होता. कृत्तिका त्याच्यामुळे किती दुःखी झाली असेल याचं त्याला वाईट वाटत होत. त्याला ऑफीस मध्ये काही करमत नव्हत त्याला कृतिकाची माफी मागायची होती म्हणून तो तुरंत घरी निघाला.
तो घरी पोहोचतच त्याने ” कृत्तिका ” असा तिला आवाज दिला पण काही उत्तर आले नाही. तो त्यांचा बेडरूम मध्ये गेला आणि कपाटातील कृत्तिका चे कपडे तिथे नव्हते.
” कृत्तिका कुठे निघून तर नाही गेली ….” या विचाराने त्याचे मन पार घोंगावत होते.
तो कृत्तिका ला कॉल करत होता पण उत्तर नव्हते येत म्हणजे कृत्तिका ने त्याला ब्लॉक केले असेल. आदित्यला काही सुचत नव्हते की काय करावे. तो समोरच्या घरात येताच त्याला टेबल वर ठेवलेले एक पत्र दिसले…. त्याने ते घाईत उघडले. त्या पत्रात लिहिले होते
” आदित्य आपण काही महिने जे सोबत घालवले ते सर्वात सुंदर दिवस होते माझ्या आयुष्यातले. पण आता मला तुझ्यावर विश्वास नाहीये तू जे केलं ते फार चुकीचं केलं. तू मला अंधारात ठेवलं. मी हे असल्या गोष्टी सहन करू शकत नाही. हो माणूस मला असा विश्वासघात करत असेल त्यांच्यासोबत मी माझ आयुष्य नाही काढू शकत. मी हे घर सोडून जात आहे आणि मी जिथे कुठे असेल सुरक्षित असेल. तू मला शोधण्याची गरज नाही तू तुझ आयुष्य सुखात रहा आणि मलाही राहुदे. “
आदित्य ते पत्र वाचून थंडगार झाला होता. त्याला त्याची चुकी समजली पण त्याला आता त्याची माफी मागायची वेळ निघून गेली होती.
५६७८९
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.