Ritbhatmarathi

Search
Close this search box.

बघता बघता कृत्तिका आणि आदित्य ला आता पुण्यात रमून पाच महिने झाले होते. कृत्तिका ही तिच्या कामामध्ये गुंतून गेली होती. तिथे तिची आणि समिधा ची चांगली घट्ट मैत्री झाली होती.

आज रविवार होता आणि आदित्य ला आपले काम वाढल्याने रविवारी ही तो आता आपल्या कंपनी मध्ये जात होता. कृत्तिका मग रविवार आराम करत तर कधी समिधा आणि तिच्या मित्रमैत्रिणी सोबत बाहेर फिरून वेळ घालवत असे.

आज कृत्तिका आणि समिधा शॉपिंग साठी त्या दोघी पुण्यातील कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण एफसी रोड इथे गेल्या होत्या.

त्या दोघी एका ठिकाणी सुंदर रंगाचे टॉप पाहत होत्या.

” समु हे कस दिसत आहे???” कृत्तिका एक गुलाबी रंगाचं टॉप आपल्या अंगाला लावून विचारले.

” नको …दुसरा बघ ” समिधाला ते तितकस छान नाही वाटल.

” मग हा कसा?” कृत्तिका ने आता एक निळ्या रंगाचं टॉप हातात घेतल.

” हा….हे थोड छान वाटत आहे “

अस करत त्या दोघींनी मनभरुण कपड्यांची खरेदी केली. कृत्तिका ला खरेदी करणे आवडत होते.


” मला खूप भूक लागली आहे समू….” कृत्तिका आपल्या पोटावर हात फिरवत म्हणाली.

” हो मला पण ……चल आपण इकडेच काहीतरी खाऊ घरी जाऊन आता काही बनवण्याची मला इच्छा नाहीये ” समिधाने सुचवले.

त्या दोघी तिथेच एका हॉटेल मध्ये जाऊन त्यांनी आपले जेवण करायचं ठरवलं. हॉटेल मध्ये जाताच त्यांनी एक टेबल बुक केला आणि तिथे जाऊन त्यांनी आपली ऑर्डर केली.

मस्तपैकी जेवत असताना ” कृत्तिका तुझा नवरा आजकाल काय करतो??? ” सामिधाने कुतुहलाने विचारले.

” तो आजकाल त्यांच्या कामात खूप बिझी असतो ….आता तर रविवारी पण तो त्याच्या ऑफीस ला जातो ” कृत्तिका आपला घास गिळत म्हणाली.

” अच्छा …खूप काम असेल मग तिथे. “

” हो ना तो तिथला मॅनेजर आहे म्हणून तर त्याला इतकी काम असतात. “


” कृत्तिका तुझे पप्पा काय करतात??”

” माझे आई वडील दोघेपण बिझनेस करतात. “

” अच्छा …..बर झाल मग तू तरी वेगळी वाट निवडली…..नाहीतर आपली भेट कधी झालीच नसती.” सामिधाला कृत्तिका सारखी मुलगी आपली मैत्रीण झाल्याचं आनंद होता.


” हो मला पण….नाहीतर इतकी मस्ती मला तरी एकठीला नसती जमली…” कृत्तिका त्या गोष्टीला दुजोरा देत म्हणाली.


असच गप्पागोष्टी करत त्यांनी आपले जेवण संपवले. बिल देऊन त्या दोघी आता आपल्या घराच्या दिशेने निघाल्या.


त्या दोघी एका अरुंद रस्त्यावरून चालत होता. तिथे फार गर्दी होती. रात्री तिथे सर्वत्र छोटे चमकते विजेचे दिवे लावून त्यांच्या प्रकशमध्ये तिथे खरेदी करण्याची काही वेगळीच मजा आहे .

समिधा चालत असताना तिला रस्त्याच्या पलिकडच्या बाजूस एक व्यक्ती एका मुलीचा हाथ पकडून चालताना दिसला. तिने त्या गोष्टीला फार काही महत्व दिले नसते पण ती व्यक्ती कृत्तिका चा नवरा आदित्य सारखा दिसला.

समिधा तिच्या डोळ्यांवर विश्वास करू शकत नव्हती पण तिला नजरेचा धोका नक्कीच नव्हता झाला. तिला खात्री नव्हती की तो नक्की आदित्य होता की नाही म्हणून तिने कृत्तिका ला काही या बद्दल सांगितले नाही.


कृत्तिका तिच्या घरी आली तरी आदित्य पोहोचलेला नव्हता. तिने सोफ्यावर सामान ठेवून ती फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली. तिने आपले कपडे बदलले आणि ती बेड वर लोळून गेली. तेवढ्यात तिला दरवाजा उघडल्या चा आवाज आला. ती उठून समोरच्या रूम मध्ये गेली तर तिला आदित्य दिसला.

” अरे जान तुझी झोप मोड झाली का??” आदित्य तिला पाहत म्हणाला.

” नाही…. पण तू आजकाल उशिरा का येतो ??”

” कृत्तिका सॉरी मला खूप काम असतात म्हणून….”


” ओके फ्रेश हो मग मी जेवायला वाढते ” कृत्तिका किचन मध्ये जात म्हणाली.

” नको मी आज बाहेरून जेऊन आलो.” तो त्यांच्या बेडरूम मध्ये जात म्हणाला.

” नको खात जाऊ जास्त बाहेरच”

” ओके नंतर नाही खाणार परत ओके…मी फ्रेश होतो”

कृत्तिका आता बेड वर लोळून होती तिला झोप लागत होती, तिला आदित्य रूम मध्ये आल्याची चाहूल लागली. आदित्य आपले कपडे बदलून तो ही बेड वर जाऊन त्याने कृत्तिका ला आपल्या कुशीत घेऊन त्याने आपले मिटवले.

दुसऱ्या दिवशी ते दोघेजण आपली काम आवरून आपल्या ऑफीस ला गेले.

कृत्तिका कंपनी मध्ये जाऊन आपल्या नेहमीच्या टेबल वर जाऊन बसली. तिला समिधा येताना दिसली…ती आज फार खुश दिसत होती.

” समू तू आज का इतकी खुश???” कृत्तिका ने विचारले.

” मी हाफ डे घेतला आहे…” समिधा सुर लावून म्हणाली.

” का बर??” कृत्तिका जाणून घ्यायला उत्सुक होती.

” मी आज माझ्या बॉयफ्रेंड सोबत बाहेर जाणार आहे…” समिधा आपल्या चेहऱ्यावर लाली आणत लाजून म्हणाली.

” अरे बापरे ….आज कोणी तरी मग जास्तच खुश आहे” कृत्तिका तिला चिडवत म्हणाली.

त्या दिवशी त्यांनी त्यांचे काम पूर्ण केले आणि ठेवल्या प्रमाणे समिधा लवकर घरी निघून गेली.

तिने घरी पोहोचताच ती फ्रेश होऊन तिने कपडे बदलले आणि तिचा मेकप करून ती तिच्या प्रियकराची वाट पाहत होती.

ती सोफ्यावर बसली असताना तिच्या दरवाज्याची बेल वाजली. तिने दरवाजा उघडताच तिच्या नजरेस एक देखणा मुलगा समोर उभा होता.

” तू लवकर आला आकाश ….” अस म्हणत समिधा ने त्याला आत येण्याचा इशारा केला.

” हो मग आपल्या पण थोडा वेळ मिळेल बोलायला म्हणून” आकाश सोफ्यावर बसत म्हणाला.

” आपण कुठे बाहेर जाणार आहोत???” समिधा उत्सुकतेने म्हणाली.

” आज माझ्या कंपनी मध्ये एका स्टाफ चा वाढदिवस आहे आणि तो साजरा करणार आहे तर म्हणून मी तुला पण सोबत नेणार म्हणजे तुझी माझ्या बाकी मित्रमैत्रिणी सोबत ओळख होईल. ” आकाश समजावून सांगत होता.

” चल मग निघुया” आकाश घड्याळाकडे पाहत म्हणाला.

काही वेळात आकाश आणि समिधा एका आलिशान हॉटेलात मध्ये होते. तिथे बरीच लोक होती. आकाश ने समिधाची ओळख करून दिली. नवीन लोकांसोबत बोलत असताना समिधची नजर एका व्यक्तीवर गेली आणि तो आदित्य होता. ” आदित्य जर इथे आहे तर कृत्तिका पण असेल ….” अस मनात बोलून समिधने कृत्तिका ला फोन लावला.

” हॅलो कृत्तिका ….तू कुठे आहेस??”

” समिधा मी घरी आहे …”

” अच्छा ….” समिधा ला हे ऐकुन थोडे विचित्र वाटले. कृत्तिका घरी आहे मग आदित्य का एकठाच आला आहे.

” ओके मी नंतर बोलते तुला कृत्तिका, बाय” अस म्हणत समिधा ने कॉल ठेवला. तिची नजर आता आदित्य ला शोधत होती. समिधाचे डोळे अविश्र्वासाने विस्फारले गेले जेव्हा तिने आदित्य ला एका मुलीचा हाथ पकडून एका कोपऱ्यात उभा असलेले पाहिले.

समिधा अशी एकठी पाहून आकाश तिच्या जवळ गेला.
” समिधा काय झालं?? “

” आकाश …ते कोण आहे??” समिधा आदित्य कडे बोट दाखवले.

” ते आमचे बॉस आहे आणि ती त्यांच्या गर्लफ्रेंड आहे वाटते , ती पण आमच्या कंपनी मध्ये काम करते. कंपनी मध्ये त्यांच्या अफेअर ची चर्चा असते…”

आकाश जे सांगत होता त्यावर समिधा चा विश्वास बसेना.
तिने बाजूला घेऊन आकाश ल सगळी हकीकत सांगितली आणि ती सरळ कृत्तिका च्या घरी निघाली.


कृत्तिका ने तीच सगळी कामं आवरून ती टीव्ही पाहत होती. दरवाज्याची बेल वाजताच ती उठून गेली. तिला आदित्य असेल अस वाटत होत पण तिच्या समोर समिधा होती.

” समिधा तू तर बाहेर जाणार होती.” कृत्तिका ने तिला घरात घेत म्हणाली.

” कृत्तिका मला तुला काहीतरी सांगायचं आहे”

” बोल ना ” कृत्तिका ला आता थोडी शंका येत होती.

” कृत्तिका त्या दिवशी आपण खरेदी ला गेलो तेव्हा मी जिजु आणि एका मुलीला सोबत पाहिले. मी तुला सांगितलं नाही कारण तो माझ्या नजरेचा धोका पण असू शकतो म्हणून…..पण आज “

” आज काय ??? बोल ना पटपट ” कृत्तिका चा धीर सुटत होता.

” मी आज आकाश सोबत त्याच्या एका फ्रेंड चा बर्थ डे पार्टी ला गेली होती आणि तिथे मी आदित्यला त्याचं मुली सोबत पाहिले. “

” ते ही फ्रेंड असू शकतात ” कृत्तिका ह्या गोष्टीला नकार देत होती.

” कृत्तिका समज प्लीज ….आंधळी होऊ नकोस मी त्याला दोन वेळा पाहिले हातात हाथ घेऊन …..” समिधा ला आदित्यचा प्रचंड राग येत होता आणि कृत्तिका बद्दल वाईट ही वाटत होतं.

कृत्तिका ला काय बोलावं ते सुचेना.

” कृत्तिका हे बघ वेळ घे विचार कर पण अशी अंधारात राहू नको. ” अस म्हणून समिधा तेथून निघून गेली.


कृत्तिका मात्र विचारात पडली, तीच कुठे चुकल हे तिला समजेना. अस काय कमी पडल की आदित्य तिच्याशी खोटं बोलून बाहेर त्याचे अफेअर चालू आहेत. आपल्या मोबाईल मध्ये तिने टाईम पाहिलं तर साडे अकरा झाले होते. आदित्य अजून कसा आला नाही. आज पर्यंत तिने कधीही त्याच्या बद्दल तसा विचार केला नव्हता पण आज ती मजबूर झाली होती.

तिचे मन आता प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करत होते. बरेच दिवस झाले आदित्य रात्री उशिरा येतो, कधी कधी जेवण ही करत नाही. कृत्तिका चा त्याच्यावर तिने कधी जास्त विचार केला नाही. ती चा स्वभाव खूप निरागस आहे म्हणून तिने आदित्य वर डोळे झाकून विश्वास ठेवला पण आता तिला ह्या गोष्टींबद्दल विचार करायची गरज आहे.

कृत्तिका तिच्या विचारात मग्न असताना दरवाजाची बेल वाजली. तिने जाऊन दरवाजा उघडताच तिला आदित्य दिसला. तो थकलेला दिसत असला तरी त्याच्या चेहऱ्यावर अलगद तेज तरंगत होते.


आदित्यने कृत्तिका कडे पाहून एक स्मितहास्य केले आणि तो सरळ बाथरूम मध्ये गेला. तो फ्रेश होऊन बेडरूम मध्ये जाऊन बसला.

” तू जेवणार नाहीये??” कृत्तिका ने विचारले.

” नाही मी खाऊन आलो .”

” कुठे??”

” कुठे म्हणजे??? हॉटेल मधूनच “

” पण घरी येऊन जेवायचं ना…..”

” कृत्तिका प्लीज थकलो आहे मी मला उद्या पण जायचं आहे ” आदित्य आपली कुशी वळवत म्हणाला.

” ओके गुड नाईट ” कृत्तिका ला त्यांच्यात भांडणं नको होती म्हणून तिने तूर्तास विषय टाळला.