Skip to content Skip to sidebar Skip to footer

Arranged Marriage – भाग १०

कृत्तिका आणि आदित्य यांनी सगळे समान यांची जुळवाजुळव करून सगळे घर नीट आवरून घेतले. हे सर्व काम करत त्यांना दुपार होऊन गेली होती.

” मला खूप भूक लागली आहे आदित्य” कृत्तिका च्याच पोटात मात्र कावळे ओरडत होते. सकाळ पासून हे सर्व काम करत ती थकून गेली होती.

” हो मला पण ” आदित्य त्याच्या पोटावरून हात फिरवत म्हणाला.

” पण मला आत्ता कंटाळा आला आहे जेवण बनवण्याचा ..”
कृत्तिका इतकं सगळं काम करून परत जेवण बनवण्याच्या मनस्थितीत नव्हती.

” हो मला माहीत आहे …मी तरी कुठे बोललो तुला जेवण बनवायला.” आदित्य तिच्याकडे एक बॉक्स फेकत म्हणाला.

” मग काय ??”

” अरे ऑनलाईन ऑर्डर करू ना आपण. काय खाऊया बोल?”

” मला पिझ्झा खायचा आहे.” कृत्तिका च्याच तोंडाला पाणी सुटलं.

” ओके डन ” अस म्हणत आदित्य ने त्यांच्या साठी ऑनलाईन पिझ्झा ऑर्डर केला.

काही वेळात त्याची ऑर्डर आली. आणि त्या दोघांनी मिळून मस्तपैकी पिझ्झा खाल्ला. कृत्तिका ला खूप दिवसांनंतर पिझ्झा खाऊन मस्त वाटत होते.

तो दिवस त्यांचा असच कामात गेला. रात्र होताच कृत्तिका ला झोपने विळखा घालायला सुरुवात केली.

आदित्य मात्र लगेच झोपायच्या मूड मध्ये नव्हता. कृत्तिका आणि आदित्य यांनी फ्रेश होऊन आपले कपडे बदलून ते दोघे आता त्यांच्या बेडरूम मध्ये असलेल्या मोठ्या बेड वर जाऊन लोळून घेतल.

” मला आता बर वाटत आहे ….” कृत्तिका उसासा टाकत म्हणाली.

” मी पण आज खूप थकून गेलो. ” आदित्य त्याचं कपाळ चोळत म्हणाला.

कृत्तिका वळून तिने आदित्य मिठी मारली, आणि आदित्यने तिच्या कपाळावर चुंबन करत तिच्या गालावरून आपला हाथ हळुवार पने फिरवत होता.

” आय लव्ह यू ” कृत्तिका गोंडस पने म्हणाली.

” आय लव्ह यू टु ” आदित्य तिचा ओठांवर चुंबन करत म्हणाला.

दुसऱ्या दिवशी कृत्तिका ला आपल्या मोबाईलच्या गजराने जाग आली. तिने पटकन उठून तो बंद केला आणि पुन्हा आदित्यच्या कुशीत जाऊन तिने आपले डोळे मिटून घेतले.

काही मिनिटात आदित्यला जाग आली. त्याचे डोळे उघडताच त्याच्या नजरेस परी सारखी असलेली कृत्तिका दिसली. ती त्याला मिठी मारुन होती. आदित्यच्या मनात हे बघून आनंद झाला. त्याने हळुवार पने तिच्या केसांवरून आपला हाथ फिरवला. तो तिचा चेहरा करु वाळत होता. तिच्या कपाळावर चुंबन देऊन त्याने हळूच तिला स्वतः पासून दूर करत तो उठून आपल्या पावलांचा आवाज न करता बाथरूम मध्ये गेला.

कृत्तिका खरतर जागीच होती. तिने आपले डोळे मिटून झोपी असल्याचे नाटक केले. पण तिला हे जाणून बरे वाटले की आदित्य चे तिच्यावर खूप प्रेम आहे.

तिची नजर आदित्य वर पडली, आदित्य नुकताच अंघोळ करून बाहेर आला होता. त्याचे केस अजूनही ओले होते. तो फार आकर्षक दिसत होता. कृत्तिका त्याचा ह्या उत्कृष्ठ बांधा असेल्या आकृतीकडे पाहत होती.

आदित्य तिचा जवळ जाऊन बसला ” झाली झोप ??”

” हो ” कृत्तिका आळस देत म्हणाली.

” उठा मग फ्रेश व्हा “

कृत्तिका आपली मान होकारार्थी हलवली आणि ती बाथरूम मध्ये गेली.

थोड्या वेळात ती बाहेर आली आणि किचन मध्ये गेली. तिला आदित्य नाश्ता टेबल वर आणून ठेवताना दिसला.
ती हे बघून थोड चकितच झाली होती. तिने कधीच आदित्य ला अस काम करताना पाहिलं नव्हत .

” जान नाश्ता रेडी आहे ” आदित्य खुर्चीवर बसत म्हणाला.

” वाव स्मेल तर खूप मस्त येत आहे ….” कृत्तिका पोह्यांचा वास घेत म्हणाली.

” ते चवीला पण छान आहे ” आदित्य एक घास घेत म्हणाला.

” अच्छा …मला खाऊन पाहू दे मग ” कृत्तिका ही पोह्यांचा घास घेत म्हणाली. ” हम मस्त आहे ..मला माहित नव्हत तुला स्वयंपाक येत असेल म्हणून आदित्य. “

” सगळ नाही फक्त थोड थोड येत ” आदित्य प्रामाणिकपणे उत्तर देत म्हणाला.

त्या दोघांनी नाश्ता करत गपपागोष्टी केल्या. आणि उरलेला दिवस त्यांना बाकी सामान अवरण्यात गेला. रात्री कृत्तिका ने जेवण तयार केलं. आणि ती मिसेस सुजाता यांच्या सोबत कॉल वर गप्पा करत होती.

काही वेळाने त्या दोघांनी जेवण करण्यास सुरुवात केली.

” उद्या मी माझ्या नवीन ऑफीस ला जाणार आहे ” अस आदित्य म्हणाला.

” अच्छा मी पण आमच्या कंपनी मध्ये जॉईन होणार आहे. “

” म्हणजे उद्या आपण दोघे ही सोबत नसू ” आदित्य आपला चेहरा उदास करत म्हणाला.

” आदित्य इकडे पुण्यात पण फिरण्या सारखं असेल ना ?”
कृत्तिका उत्सुकतेने म्हणाली.

” हो इकडे शनिवार वाडा, झू आणि अजून बरीच ठिकाणे आहे.”

” मस्त मग तुला कधी सुट्टी असते ??”

कृत्तिका ने केलेल्या प्रश्नावर आदित्य दोन सेकंद विचार करून ” रविवार ” म्हणाला.

” माझी सुट्टी पण…मग आपण ह्या रविवारी शनिवार वाडा पाहायला जाऊ. ” कृत्तिका म्हणाली.

” ओके ” आदित्य पण खुश होता. त्याला कृत्तिका सोबत वेळ घालवणे छान वाटत होते.

जेवण करता करता त्यांनी काय काय करायचं हे ठरवून घेतले आणि ते आता येणाऱ्या रविवार साठी उत्सुक होते.

जेवण केल्या नंतर ते दोघे आपल्या बेडरूम मध्ये असताना आदित्यला कोणाचा तरी कॉल आला. त्याने आपला मोबाईल घेऊन तो गॅलरी मधे बोलण्या साठी गेला. कृत्तिका आजही बरीच काम करून तिला थकल्यासारख वाटत होत. उद्या तिला कंपनी मध्ये जॉईन करायचं होत म्हणून तिने लवकर झोपण्याच विचार केला.

त्या मऊ बेड वर लोळून घेताच आणि गरम ब्लँकेट मधे शिरताच तिला झोप लागून गेली. आदित्य जेव्हा आपला कॉल संपवून रूम मध्ये आला तेव्हा त्याने कृत्तिका ला शांतपणे झोपलेल पाहिलं.

तीच ते निरागस चेहरा पाहून त्याच्या ओठांवर स्मित झळकले आणि तो ही तिच्या बाजूला जाऊन ब्लँकेट मध्ये शिरून त्याने कृत्तिका ला आपल्या मिठीत घेऊन तोही झोपी गेला.

दुसऱ्या दिवशी ते दोघे ही लवकर उठले. दोघे ही लवकर तयार होऊन त्यांनी सोबत नाश्ता केला. कृत्तिका ने दोघांचे टिफीन तयार केले होते. निघताना तिने दोघांच्या बॅग मध्ये टाकले. आणि सगळ नीट आवरल्या नंतर ते दोघेही आपापल्या कामासाठी घराबाहेर पडले.

आदित्यने कृत्तिका ला तिच्या नवीन कामाच्या ठिकाणी सोडले आणि तो पुढे आपल्या कंपनी कडे निघाला.

©RoyamCharm

Leave a Comment

error:

Warning

सध्या युट्युब वर कथा चोरी करून वाचून दाखवण्याचे धंदे चालू आहेत लोकांचे. आमच्या वेबसाईट वरची कथा कुठल्याही युट्युब चॅनेलवर बेकायदेशीररित्या आढळल्यास त्या चॅनेलला लगेच रिपोर्ट करण्यात येईल ह्याची कृपया दक्षता घ्यावी. तसेच आपल्या वाचकांपैकी कुणालाही असे बेकायदेशीर चॅनेल्स आढळल्यास आम्हाला ritbhatmarathi@gmail.com ह्या ई-मेल वर त्वरित कळवावे.