आधार कार्डसाठी कसं अप्लाय करावं? | apply for adhar card

- १. आधार म्हणजे काय ?
- २. आधार कार्डसाठी कसे अप्लाय कराल ? (apply for adhar card )
- ३. आता घरबसल्या आधार कार्डसाठी अर्ज करा (apply for adhar card)
- ३.१ आधार नोंदणी फॉर्म किंवा सुधारणा फॉर्म भरताना पाळावयाच्या काही खास सूचना
- ३.२ आधारकार्डसाठी लहान मुलांची नावनोंदणी म्हणजेच एनरोलमेंट फॉर्म कसा भराल ?
- ३.३ आपल्या आधार कार्डचे स्टेट्स कसे पडताळून पाहाल ?
- ३.४ एनरोलमेंट नंबर ने आधार कार्डचे स्टेटस तपासून पहा
- ३.५ एनरोलमेंट नंबरशिवाय आधार कार्डची स्थिती तपासून पहा
१. आधार म्हणजे काय ?
apply for adhar card: आधार म्हणजे मुख्यत्वे ज्याला आपण भारतीय हिंदी भाषेत ‘पाया’ असं संबोधू. वर्ष २००९ पासून आपल्या भारतात सामान्य माणसाचा समजला जाणारा मुख्य घटक म्हणजे आधार कार्ड ला मान्यता मिळाली आहे. अगदी नवजात जन्मलेल्या बालकापासून ते जेष्ठ नागरिकांपर्यंत आधार कार्डसाठी आपण नोंदणी करू शकतो. युआयडीएआय द्वारे दिल्या जाणाऱ्या बारा अंकी असलेल्या विशेष क्रमांकाला आधार नंबर असे म्हणतात.
२. आधार कार्डसाठी कसे अप्लाय कराल ? (apply for adhar card )
आधार कार्डसाठी अप्लाय करताना आपण पुढील प्रमुख बाबी पाहणार आहोत-
१. आधारकार्डसाठी ज्याठिकाणी अर्ज करणार आहोत त्या ठिकाणाला भेट देणे
२. आधारकार्डसाठी नोंदणी अर्ज भरणे
३. जनसांख्यिकीय आणि जैवसांख्यिकीय सर्व तपशील नोंदवणे
४. ओळखीचे प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला म्हणजेच आपला कायमस्वरूपी पत्ता सादर करणे.
वरील बाबींची आता सविस्तर स्वरूपात आपण माहिती पाहणार आहोत –
२.१ आधार नावनोंदणी केंद्राला भेट देणे
आपण जर ऑफलाईन स्वरूपात आधार नावनोंदणीची प्रक्रिया करत असाल तर कुठल्याही अधिकृत आधार नावनोंदणी केंद्रात आपण ओळख व पत्त्याच्या पुराव्यासह जाऊ शकतो.
२.२ आधार कार्डसाठी नावनोंदणी अर्ज भरणे
आधार कार्डसाठी नावनोंदणी निःशुल्क आहे म्हणजेच आधार नावनोंदणीची कुठलीही फी आकारली जात नाही.
२.३ जनसांख्यिकीय आणि जैवसांख्यिकीय सर्व तपशील भरणे
आधारकार्डसाठी ज्यावेळी आपण अर्ज करतो त्यावेळी आपल्याला एक फॉर्म देण्यात येतो त्यामध्ये सर्व तपशील म्हणजेच आपली सर्व माहिती भरून दयावी लागते ज्यामध्ये आपली जन्मतारीख,आपले वय,आपला रक्तगट,रहिवासी पत्ता सर्व तपशील अचूक भरावा यालाच जनसांख्यिकीय तपशील असे म्हणतात आणि जैवसांख्यिकीय म्हजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये बायोमॅट्रिक्स असे म्हणतो यामध्ये आपल्या दहा बोटांचे ठसे,दोन्ही डोळ्यांच्या बुबुळांचे स्कॅन आणि चेहऱ्याची छबी म्हणजेच चेहऱ्याचे छायाचित्र याचा समावेश जैवसांख्यिकीय अहवालामध्ये होतो.
२.४ ओळखीचे प्रमाणपत्र आणि रहिवासी दाखला म्हणजेच कायमस्वरूपी पत्ता सादर करणे
युआयडीएआय प्रक्रिया ओळखीचा पुरावा आणि पत्त्याचा पुरावा या मुख्य दोन गोष्टींवर अवलंबून असते. त्यातील पॅनकार्ड, वोटिंग कार्ड त्याचप्रमाणे सरकारी ओळख असलेलं एखादं कार्ड आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून सादर करता येतं. ओळखीच्या प्रमाणपत्रांखेरीज आपला रहिवासी असल्याचा पत्ता सादर करणेही अनिवार्य असते म्हणून पाणी बिल, वीज बिल किंवा टेलिफोन बिल यांचे बिल भरलेली पावती किंवा फक्त बिल रहिवासी पत्ता म्हणून आपण सादर करू शकतो. म्हणजेच याला आपण पीओआय ( प्रूफ ऑफ आयडेंटिटी ) आणि पीओए (प्रूफ ऑफ ऍड्रेस ) असे म्हणतो.
२.५ प्रस्तावकांवर आधारित
जर आपल्याकडे सर्वसामान्यपणे वापरले जाणारे पुरावे नसतीलच तर राजपत्रित अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या लेटरहेडवर फोटोकॉपीसह दिलेले ओळखीचे प्रमाणपत्र हे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून ग्राह्य धरले जाते. याउलट कुटुंबातील एखाद्याकडे जर वैध कागदपत्रे नसतील तर त्या कुटुंबातील कुटुंबप्रमुखाने सर्वप्रथम सर्व दस्तावेजांसही नावनोंदणी करावी.
वरील सर्व बाबी लक्षात घेतल्या तर आपल्याला असे सूचित होते की आधार नावनोंदणी ही थोडक्यात तीन प्रकारे करता येते
* कागदपत्रांवर आधारित
* कुटुंबप्रमुखावर आधारित (हेड ऑफ फॅमिली ‘HOF’ )
* प्रस्तावकांवर आधारित
हेही वाचा
बँकेत खाते खोलण्याची सोपी प्रक्रिया
पासपोर्ट काढण्यासाठी दिवसभर रांगेत उभे राहण्याचे दिवस आता गेले. पासपोर्ट काढणे आता झाले सोपे
Bitcoin : जाणून घ्या बिटकॉईन म्हणजे काय? क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ? (bitcoin in marathi)
म्युच्युअल फंड म्हणजे काय? | म्युच्युअल फंड गुंतवणूक कशी करावी? | types of mutual funds
३. आता घरबसल्या आधार कार्डसाठी अर्ज करा (apply for adhar card)
घरबसल्याही आता आपण आधारकार्डसाठी अर्ज करू शकतो यासाठी रांगेत उभे राहण्याचीही गरज नाही याआधी आपण ऑफलाईन पद्धतीने आधार कार्डसाठी अर्ज करावा याची माहिती पहिली आता ऑनलाईन पद्धतीने आधारकार्डसाठी अर्ज कसा करावा याची माहिती आपण पाहणार आहोत.
आधार नोंदणी फॉर्म आणि आधार सुधारणा फॉर्म अशा प्रकारचे दोन मुख्य फॉर्म याठिकाणी भरावे लागतात. आधार नोंदणी फॉर्म म्हजेच एनरोलमेंट फॉर्म भरण्यासाठी खालील काही खास गोष्टी भराव्या लागतात
– पूर्ण नाव.
– पत्ता.
– वय.
– लिंग.
– टीआयएन क्रमांक / एनपीआर पावती क्रमांक
– प्री-नोंदणी आयडी.
– वडील/ आई / पालक याची माहिती
– सादर केलेल्या समर्थन दस्तावैजांचे तपशील
– HOF म्हजेच हेड ऑफ द फॅमिली चा तपशील
– अर्जदाराच्या अंगठ्याचा ठसा किंवा स्वाक्षरी
– नोंदणीची वेळ आणि तारीख
१. आधार कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला एक फॉर्म भरावा लागतो आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच https://uidai.gov.in/ या वेबसाईट वर जाऊन आधार कार्डसाठी अर्ज करू शकतो. त्यासाठी ‘माझा आधार’ या पर्यायावर क्लिक करा.

२. त्यांनतर ‘ आधार नावनोंदणी ‘ या पर्यायावर करावे.

३. उजव्या बाजूला आधार एनरोलमेंट फॉर्म याठिकाणी सिलेक्ट करावे आणि एनरोलमेंट फॉर्म डाउनलोड करावा.

४. अर्जदार जर पाच वर्षांपेक्षा कमी वयाचा असेल तर त्याच्या किंवा तिच्या पालकाने आधारची माहिती सबमिट करावी.
५. आपला ईमेल आणि मोबाईल नंबर त्या फॉर्म मध्ये ऍड करा.
६. एकदा का मोबाईल नंबर एंटर केला कि तो आपोआप आधारशी जोडला जातो.
७. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा.
८. नावनोंदणी दुरुस्ती असल्यास त्या नव्वद तासांच्या आत केल्या जातात आणि त्या दुरुस्त्या विनामूल्य केल्या जातात त्यांचा कुठलाही शुल्क भरावा लागत नाही. परंतु ९० तासांच्या नंतर जर दुरुस्तीसाठी आपण गेलो तर मात्र त्याचा शुल्क भरावा लागतो याची खबरदारी नागरिकांनी जरूर घ्यावी.
९.आधार कार्ड मध्ये सुधारणा कारवायची असल्यासही हाच फॉर्म भरावा लागतो परंतु सुधारणा करायची असल्यास जुनी माहिती न भरता नवीन आणि ताजी माहिती त्या सुधारणा फॉर्म मध्ये भरावी.
३.१ आधार नोंदणी फॉर्म किंवा सुधारणा फॉर्म भरताना पाळावयाच्या काही खास सूचना
– तपशील कॅपिटल लेटरसहित आहे की नाही याची खबरदारी घ्यावी.
– जर जन्मतारखेमध्ये सुधारणा असेल तर त्याची दुरुस्ती एकाच वेळी केली जाते.
– नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकणे गरजेचे आहे.
– सुधारणा फॉर्म भरत असाल तर कुठल्याही प्रकारची जुनी माहिती भरू नये त्यात नवीन माहितीचाच उल्लेख असावा.
३.२ आधारकार्डसाठी लहान मुलांची नावनोंदणी म्हणजेच एनरोलमेंट फॉर्म कसा भराल ?
पाच वर्षांखालील मुलांसाठी कुठल्याही प्रकारची जैवसांख्यिकीय चाचणी घेतली जात नाही. त्यांच्या यूआयडी वर जनसांख्यिकीय माहितीच्या आधारे प्रक्रिया केली जाते. त्यांच्या चेहऱ्याचे छायाचित्र त्यांच्या पालकांच्या यूआयडी बरोबर जोडलेले असेल तरच त्यांचा फॉर्म आधार कार्डसाठी ग्राह्य धरला जातो. या मुलांना वयाची ५ ते १५ वर्ष पूर्ण झाल्यांनंतरच त्यांची दहा बोटे,डोळ्यांच्या बाहुलींचा बायोमॅट्रिक्स म्हणजेच जैवसांख्यिकीय अहवाल घेतला जातो.
३.३ आपल्या आधार कार्डचे स्टेट्स कसे पडताळून पाहाल ?
आपल्या आधार कार्डचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी चौदा आकडी एनरोलमेंट नंबर म्हणजेच ज्याला आधार नोंदणी क्रमांक असे आपण म्हणतो जो क्रमांक आपल्याला आधार कार्डसाठी अर्ज केल्यानंतर पावतीच्या स्वरूपात मिळतो. याच एनरोलमेंट क्रमांकाची गरज याठिकाणी आपल्याला लागते. तर याठिकाणी आपण एनरोलमेंट नंबर ने आधारकार्डचे स्टेटस तपासू शकतो त्याचप्रमाणे एनरोलमेंट नंबरशिवायही आधारकार्डचे स्टेट्स तपासून पाहू शकतो.
३.४ एनरोलमेंट नंबर ने आधार कार्डचे स्टेटस तपासून पहा
१. https://uidai.gov.in/ युआयडीएआय च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. यानंतर आपल्याला एनरोलमेंट नंबरची आवश्यकता लागेल.
३. आपल्या दिल्या गेलेल्या पावतीवरती १४ आकडी एनरोलमेंट क्रमांक म्हणजेच नोंदणी क्रमांक असतो तो याठिकाणी टाकावा.
४. नंतर ‘माझा आधार’ या पर्यायावरून ‘चेक स्टेट्स’ म्हणजेच ‘स्थिती तपासा’ हा पर्याय निवडावा.

५. त्यानंतर आपला एनरोलमेंट नंबर किंवा युआयडीएआय ने दिलेला आधार क्रमांक टाकून आपले आधार कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता

३.५ एनरोलमेंट नंबरशिवाय आधार कार्डची स्थिती तपासून पहा
१. https://resident.uidai.gov.in/ या ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन EID किंवा UID यापैकी हवा असलेला पर्याय निवडावा
२. आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ओटीप येण्यासाठी आपले नाव,ई-मेल टाकावा
३. रिक्त असलेल्या ठिकाणी ओटीप टाकावा आणि ‘व्हेरिफाय ओटीपी’ या पर्यायावर क्लिक करावे.
४. ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर आपला आधार क्रमांक आणि एनरोलमेंट क्रमांक पाठवला जातो.
५. याच पाठवलेल्या एनरोलमेंट नंबरचा वापर करू आपल्या आधार कार्डचे स्टेट्स आपण पडताळून पाहू शकतो.
===============
1 Comment
Darrel
Very rapidly this web site will be famous amid all blogging and site-building
visitors, due to it’s nice articles or reviews