असा म्हंटल जातं कि जोड्या स्वर्गात बनवल्या जातात, पण ह्याने आतापर्यंत तब्बल लाखो जोड्या बनवल्या

आपल्या भारत देशात असे अनेक यशस्वी लोक आहेत ज्यांनी आपला व्यवसाय केवळ भारतातच नव्हे तर देशाबाहेर सुद्धा विकसित केला आणि त्याचा फायदा संपूर्ण जगाला घेता आला. टाटा,बिरला,अंबानी अशी जगविख्यात मंडळींचा तर यात समावेश आहेच पण याशिवाय विनिता सिंह,फाल्गुनी नायर अशीही कित्येक नावे आपल्याला घेता येतील ज्यांनी केवळ भारतातच नाही तर जगात आपल्या व्यवसायाची ओळख निर्माण करून दिली. ऑनलाईन व्यवसायाचा एक नवा ट्रेण्ड जगासमोर आणला. अशाच एका व्यावसायिकाची आपण ओळख करून घेणार आहोत.जोड्या स्वर्गात बांधल्या जातात असे म्हणण्याऐवजी जोड्या शादी डॉट कॉम वर बांधल्या जातात असे म्हणायला भाग पाडले त्या शादी डॉट कॉमचे संशोधक आणि संस्थापक अनुपम मित्तल (Anupam Mittal biography in Marathi) यांची.
अनुपम मित्तल हे पिपुल ग्रुपचे संशोधक,संस्थापक आणि सीईओ सुद्धा आहेत.विवाहासाठी अग्रगण्य अशा ऑनलाईन शादी डॉट कॉमचे संस्थापक असून सध्या देशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करत आहेत.
मित्तल यांनी त्यांच्या कामाची छाप केवळ व्यवसाय पुरती मर्यादित ठेवली नसून बॉलिवूड मध्ये सुद्धा ती दाखवली आहे.त्यांनी फ्लेवर आणि ९९ अशा दोन चित्रपटांची निर्मिती केली आहे आणि सध्या सोनी टीव्हीवर व्यवसाय प्रसिध्दी हा मुख्य हेतू असलेल्या शार्क टेंक इंडिया या वास्तववादी कार्यक्रमात सहभागी असलेल्या प्रसिद्ध व्यावसायिक पैकी एक आहेत.
१. अनुपम मित्तल विषयी माहिती (Anupam Mittal biography in marathi)
२. वैयक्तिक जीवन (Anupam Mittal Personal Life)
मित्तल यांचा जन्म २३ डिसेंबर १९७१ मध्ये मुंबईत झाला.त्यांच्या वडिलांचे नाव कृष्ण मित्तल आणि आईचे नाव भगवती देवी मित्तल आहे.त्यांच्या बायकोचे नाव आचल कुमार असून त्यांना एक मुलगी आहे.राजस्थान मध्ये ४ जुलै २०१३ मध्ये त्यांचे लग्न झाले आहे.
३. अनुपम मित्तल ह्यांचे शिक्षण (Anupam Mittal Qualification)
मित्तल हे बोस्टन कॉलेजचे विद्यार्थी असून १९९४-१९९७ मध्ये संचालन आणि सामाजिक प्रबंधन या विषयात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले.शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी उद्यमी स्वरूपात प्रवास सुरू केला आणि पीपल ग्रुपची सुरुवात झाली.
४. शादी डॉट कॉम ची स्थापना कशी केली?
१९९६ मधली गोष्ट आहे तेंव्हा मित्तल सर अमेरिकेत होते.त्यावेळी पीपल्स ग्रुप मध्ये त्यांनी खूप यश मिळवले होते आणि आता लग्न करून सेटल व्हावे असा त्यांच्या मनात विचार आला,खरतर या विचाराचे त्यांचे त्यांनाही नवल वाटले होते.पुढे हाच विचार त्यांनी प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला आणि शादी डॉट कॉमची सुरुवात झाली.११९७ मध्ये ऑनलाईन भारतीय विवाह सेवेची सुरुवात करण्यात आली आणि ती म्हणजेच शादी डॉट कॉम.याचे सुरुवातीचे नाव होते सगाई डॉट कॉम नंतर मित्तल यांनी बदलून शादी डॉट कॉम असे ठेवले.
शादी डॉट कॉमल सुरुवातीच्या काळात जे काही यश मिळाले ते अनिवासी भारतीयांनी मिळवून दिले असे म्हणायला हरकत नाही.कारण त्यावेळी ऑनलाईन लग्न जमवण्याची संकल्पना खूप नवीन होती,त्यामुळे आपले भारतीय परंपरावादी लोक अशा नव्या स्टार्ट अपच्या माध्यमातून लग्न जमवण्यासाठी घाबरत होते.
सुरुवातीच्या काळात आलेल्या अडचणींना तोंड देऊन २००८ पर्यंत शादी डॉट कॉम आशियाई लोकांसाठी जगातील अग्रानिय वैवाहिक वेबसाईट बनली.तर २०११ पर्यंत या वेबसाईटचे वापरकर्ते करोडोंच्या घरात गेले होते.सध्या कंपनीचे जगभरात तीस करोड पेक्षा जास्त वापरकर्ते असून ३.२ मिलियन लोकांचे यशस्वी रित्या लग्न जमले आहेत.
हेही वाचा:
बँकेची नोकरी सोडून ५० वर्षे वयामध्ये सुरु केली कंपनी आता आहे तब्बल ८०० कोटी कंपनीची मालक
५. शार्क टांक इंडिया
सध्या सोनी लिव या चॅनल वर व्यावसायिकांच्या साठी खास कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे,या कार्यक्रमात सहभागी झालेले व्यावसायिक आपले विचार या मंचावर सादर करतात,येथील जजेस ना शार्क या रुपात ओळखले जाते.येथे सहभागी झालेल्या जजच्या कामाचे त्यांच्या व्यवसायाचे मूल्यांकन केले जाते.जे व्यावसायिक आपले विचार मांडतात जे विचार सगळ्यात जास्त आवडतात त्यावर हे शार्क चर्चा करतात.
अशनिर ग्रोवर,विनिता सिंह,पियूष बांगल,नमिता थापर,अनुपम मित्तल,गजल अलग आणि अमन गुप्ता ही शार्क म्हणून कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांची नावे आहेत.
६. अनुपम मित्तलह्यांची गुंतवणूक (Anupam Mittal Investments)
अनुपम मित्तल हे पीपल्स ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ,शादी डॉट कॉमचे संस्थापक आणि सध्या देशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुपात कार्यरत आहेत.
फक्त एकच व्यवसाय करून मित्तल थांबले नाहीत तर शादी डॉट कॉम नंतर त्यांनी मकान डॉट कॉम,मौज मोबाईल अँप आणि पीपल पिक्चर्स यासारखे व्यवसाय सुद्धा सुरू केले ज्यामुळे लोकांना घरी बसून घरे खरेदी करता आली,करमणूक करता आली.
आज मित्तल यांच्या एक सोडून अनेक कंपन्या आहेत आणि सगळ्याच लोकप्रिय आहेत.
त्यामधील शादी डॉट कॉम सोबतच मकान डॉट कॉम ही ऑनलाईन घर घेण्यासाठी लोकप्रिय असलेल्या साईट पैकी एक आहे.
टिक टॉक च्या बंदी नंतर मित्तल यांनी मौज अँप सुरू केले ज्यामुळे शॉर्ट व्हिडिओ पाहून मनोरंजन करता आले
इंटरनेट एंड मोबाईल असोसिएशन चे संस्थापक सदस्य आणि पूर्व अध्यक्ष h२ इंडियाचे संस्थापक आहेत मित्तल.
अनेक व्यवसायांमध्ये यश मिळवून आज करोडोंची संपत्ती मिळवणारे मित्तल आपल्या देशाचे तरुण पिढीचे आदर्श म्हणायला हवेत.
===============
1 Comment
Shubham kumar
Whenever I read your articles, I like it very much, you keep writing articles like this.Shark tank India Registration 2022 Apply Online,SonyLiv.in