आनंदीमोदक (लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

“#रीतभातमराठी_लघुकथा_स्पर्धा _जाने_२२”
©️®️ रोहिणी पांडे
आज आनंदी चा विलगीकरणाचा चौथा दिवस होता. कोरोना झाल्या पासून ती इथे हॉस्पिटलच्या विलगीकरणा च्या कक्षात एकांतवास भोगत होती. तिला स्वत:ला हा भयंकर आजार झाला होता याचा तान येण्यापेक्षा घरचे सगळे सुरक्षित आहेत याचा तिला जास्त आनंद झाला होता. प्रचंड आशावाद हे तिचं सामर्थ्य होतं. यावरच तिचा एकांतवास सुसह्य होत होता. भरपूर वाचन,आवडीची गाणी ऐकण असा ती वेळ घालवत होती. सध्या तर तिने ऑनलाइन बेसिक गायन ही शिकायला सुरुवात केली
होती. आज काय झालं.. तिला पहाटे चारलाच जाग आली होती. गाण्याच्या लिंक बघणे… ती स्वामी समर्थाचा जप … पारायण वगैरे गोष्टी करत असे,त्या ही करून झाल्या … वाचन करणे..असं सगळं झालं नि बारा साडे बाराच्या आसपास तिचा डोळा लागला तो पर्यंत जेवण येऊन गेलं होतं. तिची खोली तिस-या मजल्यावर होती आणि जेवण मिळण्याची सोय सर्वात खाली होती.आता जेवण आणायला तिला जावचं लागणारं होतं.ती खाली गेली तिच्या सारखे वेळेवर न जेवणारे काही महाभाग तिथं सोशल डिस्टेंस ठेवून रांगेत जेवण घेतं होते..ती ही तिथे रांगेत थांबली.तिचं लक्ष एका गृहस्थाकडे गेलं त्याला थोडी धाप लागली होती म्हणून तो तिथं थोडा एका बैंचवर बसला होता.श्वास घ्यायला खुपच त्रास झाल्यामुळे त्याने मास्क काढला नि आनंदीला खात्री पटली की तो तिचा वर्गमित्र सचिन आहे…ज्याला कॉलेज मध्ये सगळे मोदक म्हणायचे. अर्थात त्याच्या जाडजुड शरीरामुळे! तिच्या चेह-यावर हसू उमटलं.पण या क्षणी तिला मात्र तिला त्याचं “मोदक” हेच नावं आठवलं.आणि आनंदाच्या भरात तिने त्याला त्याचं नावाने हाक मारली.
“ये ss मोदक…!”
त्याला आश्चर्य वाटलं आपल्याला इथे कोण मोदक म्हणातयं .. तो ही स्त्री चा आवाज! तो इकडे तिकडे पाहू
लागला पण हिच्या तोंडाला मास्क लावलेला… त्यामुळे त्याला काही समजले नाही की कोण आवाज देतयं ते….!
तिने पुन्हा आवाज दिला…
“ये मोदक….इकडे…इकडे…”
असं म्हणतं तिने हात दाखवला तिने त्याला तिथेच थांबण्याचा इशारा केला. मग त्याचे तिच्याकडे लक्ष गेले.
तो पर्यंत तिथला एकजन सचिनला म्हणालाच,
“ओ ss भाऊ…मास्क घाला ना..!इथे तरी काळजी घ्या…!”
त्याने पटकन मास्क चढवला. तेवढ्यात आनंदी पण आली आणि मिस्कीलपणे हातवारे करत म्हणाली,
” तू मास्क लावण्याने याचा कोरोना काय आता कमी होणार आहे का..यडचाप कुठला ?”
“तू आनंदी ना..! मला मोदक म्हणता म्हणता तू केवढी जाडूबाई झालीयस बघ..!”
“ये ss तू मला कसं काय ओळखलंस… इतक्या वर्षांनी ते पण माझ्या चेह-याला मास्क असताना..!”
“हे खोडकर डोळे कोण विसरेल..!” हे मात्र तो मनात ल्या मनात म्हणाला. पुढचं उघडपणे म्हणाला,
” तुझा आवाज…तुझं टोनींग आणि तुझी “यडचाप”म्हणाय ची सवय..यावरुन….!”
हा ss हा s हा… ती हसत म्हणाली,
“तुला लक्षात आहे अजून माझी सवय”
असं त्यांचं बोलणं चालू होतं तोच वार्ड बॉय आला नि म्हणाला,
“ओ ss,चला…चला …तुमच्या खोलीत..इथं थांबायचं नाही.”
आता त्यांचा संवाद बदलला… खोलीच्या दिशेने जात जात त्याने विचारलं…
“तुझी रुम कुठं आहे…?कधी पासून आलियस इथे..? तुला असं व्हायला नको होतं या ss र..!”
त्याचा कंठ रुद्ध झाला होता..ती म्हणाली,
” अरे तुझ्यासारखीच मी पण आवडली असेल त्या कोरोनाला…पण काळजी नको करूस…चारदिवसा च्या सहवासाने कंटाळून जाईल तो निघून दूर … दोघांपासुनही!”
तो उसनं हसत म्हणाला,
“हं ss तशीच आहेस अजून… अजिबात बदलली नाहीस.. आपण यातून बरे झालो ना..की मी भेटेन तुला निवांत… एक मनात राहून गेलेली गोष्ट सांगायची आहे तुला..!”
असं बोलत बोलत ते स्वत:च्या रुम जवळ पोहोचले तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या खोल्या एकमेकां समोरच होत्या. भरल्या डोळ्यांनी तो म्हणाला,
“आनंदी तू भेटल्याचा आनंद मानू की इथे अश्या परिस्थिती त आपण भेटतो य याचं दु:ख मानू हेच समजत नाही! “
ती म्हणाली,
“अरे ss, मी आनंदी आहे ना…मग तू दु:खी नाही व्हायचं.”
तेवढ्यात पुन्हा आवाज आला.
“चला …मध्ये व्हा…बाहेर गप्पा मारू नका.”
ते दोघे ही मध्ये गेले.पण सचिनची नजर खिडकीतून सारखी तिला शोधत होती.पण तिची खिडकी मात्र
बंद होती.रात्री दहा वाजले असतील तिच्या रुम वर थाप पडली.तिला वाटलं.. गोळ्या वगैरे देण्यासाठी कोणी आलं असेल पण तो सचिन होता.तिने पटकन त्याला आत घेतलं नि दार बंद केलं नि लटक्या रागात म्हणाली,
” काय रे मोदका, काय हा बालिश पणा…!आता लहान नाही आहोत आपणं…!”
तो म्हणाला,
“मरतानाच जर “जगणं ” सापडलं तर वेडेपणा का करू नये..!”
“म्हणजे ss…?” ती म्हणाली
“म्हणजे काही नाही तुझा फोन नंबर दे…अन ही खिडकी जरा उघडी ठेव..जरा दिसलो एकमेकांना तर ..जीवंत
आहोत याची जाणीव होईल.”
तो म्हणाला.फोन नंबर घेतला नि पटकन निघून गेला.आता फोन वर बोलणं..खिडकीतून एकमेकांची दखल ,काळजी घेण …सुरु झालं .क्वारन्टाईन रुम च्या खिडकीतं त्या दोघांनाही त्यांचं हरवलेलं आभाळ सुखाचा आभास होउन सुखावत होतं.
पण या आभाळातले “आनंदी घन” फार काळ टिकले नाहीत.कोरोनारुपी आक्राळ विक्राळ राक्षसाला आनंदी
चा “आनंद मोदक” बघवलाच नाही आणि त्याने आनंदीवर झडप घातली च…आणि तिला हिरावून घेतलं…मृत्यूच्या कवेत आनंदी एकटीच निपचित पडली होती.
सचिन सारखा खिडकीतून पहात होता…पण खिडकी सामसूम दिसत होती..तिला त्याने फोन लवाला तो फोन ही कोणी उचलत नव्हतं त्याच्या काळजाचा ठोका चुकला.त्याने पटकन स्वत:च दार उघडलं निआनंदी चा दरवाजा ठोठावू लागला पण काही च प्रतिसाद नव्हता
…त्याच ओरडणं ऐकून पी.पी.ई.कीट घातलेले कर्मचारी आले आणि त्यानी दार उघडलं…तिथे पाहिलं तर आनंदी जमिनीवर मृताव स्थेत पडली होती.
सचिन ने टाहो फोडला पण तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करु लागला पण कर्मचा-यांनी त्याला त्याच्या खोली त नेलं नि कोंडून ठेवलं.तिच्या मृतदेहाला तिथून घेऊन जाता ना तिच्या बॉडीवर सेनिटाइज़ करण्यासाठी कितीतरी केमिकल स्प्रे करत होते…त्याला हे सगळं भयं कर वाईट वाटतं होतं..! जिथे प्रेताला चंदन,शुद्ध तुप हे सगळं लावायचं तिथे असल्या केमिकलच्या थारोळ्यात त्याच्या लाडक्या मैत्रिणीचा मृतदेह पडला होता.
तो सतत त्या खिडकीत बघत असे.त्याला उगाच “ये ss मोदका” असा आवाज ही यायचा.तिचं हसणं, तिचं मिस्कील बघणं,लटकं रागावणं,असं अवचित भेटण नि असचं निघूनही जाणं..त्याला सहन झालं नाही.त्याचं
तिच्यावर किती प्रेम होतं…हे मात्र सांगायचं राहून गेलं होतं..हा सगळा तान त्याला असह्य झाला आणि त्याचं
रात्री त्याला हृदयविकाराचा झटका आला.. आणि तो ही आनंदीच्या मागोमाग अज्ञाताच्या वाटेवर निघाला.
कोरोनाला आनंदी होता आलं नाही म्हणून तो तिलाचं घेऊन गेला. मोदकाचं भरलेपण त्याच्याच हृदयाला सहन झालं नाही म्हणून कदाचीत”मोद…क” तो घेऊन गेला.त्या दोघांच्या क्वारन्टाईन “खिडकीतलं आभाळ” मात्र आज अवकाळीच कृष्ण मेघांनी भरून आलं होतं.
©रोहिणी पांडे
======================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/