अनामिक भिती…(लघुकथा_स्पर्धा_जाने_२२)

#रीतभातमराठी_ लघुकथा_ स्पर्धा_ जाने_२२
©️®️ अनुजा धारिया शेठ
प्रत्येक व्यक्तीच्या मनात नेहमीच एक अनामिक भीती असते मग् ती कोणत्याही वेळी वाटते… काल, आज, उद्या कधीच ही भीती मनातून जात नाही हे मात्र खरे, चांगली वेळ असली तरी भीती वाटते अन् वाईट वेळ असली तरी भीती ही वाटतेच… कसली भीती काय तें काही सांगता येत नाही, पण कसली तरी अनामिक भीती असतेच.. या कथेतल्या आपल्या नायिकेला अशीच अनामिक भीती वाट्ते…
सुरभी आज शांत बसून तिच्या आयुष्याचा विचार करत होती तिचे संपूर्ण आयुष्य तिच्या डोळ्यासमोरून जात होते.. कालची ती कशी होती? अन् आज ती कुठे येऊन पोहचली… खरच वेळ किती बदलून जाते नाही…
तिचे लहानपण एका छोट्या गावात गेले.. रंगाने जरा सावळी.. त्यामुळे कायम कमी लेखली गेली होती.. त्यात वडील कडक.. कायम तिच्या मनावर त्यांचे दडपण असायचे, त्यामुळे कधीच मोकळेपणाने वागलीच नाही ती… तिची आवड, तिचे छंद यांवर कायम मुरड घालत गेली… वडील सतत तिला अभ्यास करायला लावत, सतत बंधनात ठेवी त्यामुळे ती कायम शांत असे, तिच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला होता, तिला सतत कसली तरी अनामिक भीती वाटायची…
जरा काही झाले तरी तिला रडायला येई… सगळे तिला हसायचे, कमी लेखायचे.. दिसायला काळी- सावळी त्यामुळे ती बाजूनी गेली की ए काले$$$, “हम काले है तो क्या हुआ..!!” असे गाणे बोलले जायचे.. बिचारी चेहरा टाकायची…
तिच्या काकूसोबत एकदा ती बाहेर गेली होती तेव्हा तर बाळाला सांभाळायला ही मुलगी ठेवली आहे का असे म्हणत काकूंच्या मैत्रीणींनी तिची खिल्ली उडवली… खूप खचून गेली ती.. सतत ती स्वतःला कमी लेखू लागली.. तिचा आत्मविश्वास कमी झाला.. तिचे कशात लक्ष लागायचं नाही.. अभ्यास केला नाही की बाबा ओरडत असत.. खायला कार भुईला भार.. असे काहीस चिडून बोलले की ती अजून खचून जायची.. तिचे आयुष्य नीरस झाले होते.. तिच्या वयाच्या मुलींपुढे ती पोक्त वाटायची.. कारण एकच होते सतत डोक्यात कसले ना कसले विचार.. अन् मनावर असलेल्या दडपणामुळे वाटणारी अनामिक भीती…
घरात तिने काही केले तरी कौतुक कधी व्हायचं नाही… पैसा टाकला की झाले असेच वडिलांना वाटत असे.. घरातील कॊणी किंमत देत नाही म्हटल्यावर नातेवाईक पण नाव ठेवायचे.. तिने कितीही चांगले वागले तरी तिच्या हातून झालेल्या चुका आधी बघितल्या जायच्या.. सर्वांच्या अशा वागण्यामुळे ती कोणाचे काही ऐकेनासी झाली.. स्वतःच्या विश्वात असायची.. त्यावरून पण बोलणे.. पण आता ती अशा वयाच्या टप्प्यावर होती की तिला त्याचा काही फरकच पडत नव्हता..
दहावी झाली, कॉलेजला गेल्यावर जरा मोकळीक मिळेल म्हणून ती खुश होती.. मार्क छान मिळाले होते.. पण तरीही तिला नाव ठेवण्याचा चान्स कॊणी सोडला नाही…
कॉलेजला ऍडमिशन झाली पहिला दिवस कॉलेजचा पण तिच्या मनात असलेला न्युनगंड अन् तिच अनामिक भीती…
—————————————————————–
मनात तोच न्युनगंड घेऊन, अनामिक भीती घेऊन आज सुरभीने कॉलेज मध्ये पाऊल ठेवले… मनात असणारी भीती, कमी असलेला आत्मविश्वास यामुळे ती आतून थरथरत होती…
पहिल्याच दिवशी स्वतःची ओळख आणि स्वतः मध्ये असलेला कलागुण सादर करायला सांगितल गेले, कॊणी गाणे म्हणत होते, कॊणी जोक सांगत होते… सुरभी मात्र घाबरून गेली होती… मी काही करू शकते हा विश्वास तिला नव्हता.. आता इथे पण सर्व हसतील मला, नाव ठेवतील, मी काय करू?
घाम आला तिला.. शेवटी तिने ठरवले, आज आपण नाटक करायचे.. खूप इच्छा असून सुद्धा वडलांच्या दडपणामुळे अन् गावात राहायला असल्यामुळे तिला स्टेज असे कधी मिळाले नव्हते.. जिद्दीने तिने मोठा श्वास घेतला.. डोळे बंद केले.. अन् स्वतःला शांत केले.. ही वेळ अशीच होती की हायपर होऊन काही उपयोग नव्हता.. तिच्या मनातल्या त्या अनामिक भीतीला बाजूला सारून तिने मोठ्या आत्मविश्वासाने खणखणीत आवाजात स्वतःची ओळख करून दिली.. अन् नाटक सुद्धा केले.. सुरभीचे नाटक संपेपर्यत अख्खा क्लास एकदम शांत होता.. मंत्रमुग्ध होऊन ऐकत होता.. नाटक संपताच जोरात टाळ्यांचा कडकडाट झाला.. सर्वानी तिचे खूप कौतुक केले..
तिच्याकडे असलेली अभिनयाची कला जी तिने कालपर्यंत वाटणा-या अनामिक भीतीमुळे कधी सादर केलीच नव्हती… त्यामुळे तिला सुद्धा या सर्वच गोष्टींचे अप्रुप वाटले.. अन् स्वतःचं कौतुक सुद्धा.. खूप खुश होती ती.. विचारात हरवली.. तेवढ्यात रीसेसची घंटा झाली अन् ती भानावर आली…
थोड्या वेळात सर्वांनी तिच्या भोवती गलका केला… प्रत्येक जण तिच्या सोबत मैत्री करून घ्यायला स्वतःहून पुढे येत होता.. आतापर्यंत सर्वानी तिला तिच्या रंगावरून, राहणीमानावरुन हिणवले होते.. असे तिचे कौतुक कधी झाले नव्हते.. आज पहिल्यांदा तिला खूप छान वाट्त होते.. थोड्या अंशाने तरी तिच्या मनातील न्युनगंड कमी झाला होता..
कॉलेजमध्ये संस्कॄती नावाचे एक दालन होते, वेगवेगळ्या कला असणा-या मुलांसाठी असा तो कक्ष होता.. कलेची आवड असणारे काही शिक्षक त्याचे नेतॄत्व करायचे.. तिला हे सर्व नवीन होते, मनात असलेली भीती तिला परत आड येत होती.. पण तिच्या त्या अफाट अभिनयामुळे तिला न विचारता तिचे नाव एन्ट्री करून घेतले गेले. शिक्षक वर्गापुढे काय बोलणार म्हणून सुरभी गप्प बसली.. हळूहळू या संस्कॄती ग्रुपमुळे तिच्या मधील बऱ्याच कला गुणांना वाव मिळाला.. कॉलेजमध्ये डान्स, नाटक या साऱ्यात तिला बक्षिस मिळत गेली.. हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळाला..
पण तिच्या घरात मात्र या गोष्टींना अगदी तुच्छ लेखले जाई… सुरभी घरात गप्प असली तरी तिच्या मनात खूप काही चालू असायचे.. बकेट लिस्ट तिच्या मनात तयार असायची.. कधी तरी माझी ही लिस्ट नक्की पूर्ण होईल असा तिला विश्वास वाट्त होता.. तो दिवसेंदिवस वाढत होता… आत्मविश्वास वाढला तसे ती अनामिक भीती कमी होत गेली…
तिच्या गुणांनी तिचे कर्तॄत्व उजळून निघाल होते.. तिच्या सावळ्या रंगामुळे आतापर्यंत कमी लेखणारे मित्र-मैत्रिणी तिचे कौतुक करू लागले.. पण घरात अजून काही फरक नव्हता.. त्या रंगावरून बोलणारे नातेवाईक मात्र अजून तोंडसुख घेत होते.. जखमेवर मीठ चोळत होते.. नुसते गुण असून काय उपयोग? लग्नासाठी रंग बघितला जातो…
बाबा खूप टेन्शनमध्ये असायचे, आईच काही चालत नसे, सुरभीला पुढे शिकायच होते, नोकरी करायची होती.. पण, बाबांच्यापुढे तिचे काही चालत नसे.. बाबा सतत उद्याचा विचार करायचे? लग्न कसे होईल याची काळजी त्यांना लागून राहायची.. पण या उद्याचा विषय निघाला की तिच्या मनात परत एकदा उभी राहिली एक अनामिक भीती….
आता माझे येणारे आयुष्य कसे असेल? ही येणारी वेळ माझ्यासाठी चांगली असेल का?
—————————————————————–
जवळचं एक स्थळ आले, त्यात ओळखीचे.. सौरभ आणि सुरभी यांचे लग्न जमले. सौरभ तसा दिसायला छान त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले की याने सुरभीला कसे काय पसंत केले?
सुरभीची मात्र सर्व स्वप्न मोडून पडली.. आता कुठे पंखात बळ येत होते तिच्या.. अन् बाबांनी तिचे तें आत्मविश्वासाचे पंखच छाटून टाकले होते..
मनात एक अनामिक भीती घेऊन तिने नवीन घरात पाऊल टाकले.. सतत दडपण असे तिच्या मनावर.. सौरभ तिला हसवण्यासाठी खूप प्रयत्न करायचा.. त्यांचे नाते हळूहळू खुलू लागले.. खुप् प्रेम होते एकमेकांवर मनातले न बोलता कळू लागले…
सुरभीनं बोलता बोलता तिचे सर्व आयुष्य त्याच्यासमोर उलगडले, त्याने तिला जवळ घेतले अन् प्रत्येक बाबतीत तिला सपोर्ट करायची तयारी दाखवली.. मी नेहमीच तुझ्या सोबत आहे..
त्याच्या या वाक्याने तिला प्रेरणा मिळाली, तिचे छंद ती नव्याने जोपासू लागली.. तिच्या हर एक कला-गुणांना वाव देणारा नवरा तिला भेटला.. जगायची एक नवीन दिशा तिला सापडली..
आयुष्यात आलेल्या अनेक चांगल्या-वाईट अनुभवांनी तिला उत्तम लेखिका बनवले.. अनेक कला असलेली खाण होती सुरभी… तेवढीच प्रेमळ, मनस्वी, लाघवी होती.. पण हा समाज फक्त बाह्यरंग बघत आला कायम तिच्या रंगावरून तिला कमी लेखत आला होता..
उद्या तिचा सत्कार होता, म्हणून तयारी करताना तिला तिचे आता पर्यंतचे सर्व आयुष्य डोळ्यासमोरून गेले.. तेवढ्यात सौरभ खोलीत आला तशी ती भानावर आली.. तिच्या मनातले भाव सौरभने ओळखले..
सौरभ तिला म्हणाला.. सुरू, तुला एक सांगू तू अशी अस्वस्थ झालीस की मला एकच गाणे आठवते बघ, एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख… होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक…
तुझी अवस्था सर्वांनी तशीच करून टाकली होती बघ, तू तर राजहंस आहेस, आता ही अनामिक भीती काढून टाक बर…
या भीतीचा राक्षस कधीच तुझी साथ सोडणार नाही, प्रत्येकवेळी तुझ्या सोबत राहणार आहे हा राक्षस… तू कशी वागलीस तरी लोकं नाव ठेवणारच ग… कोणीतरी खुश होणाऱ, कोणीतरी नाराज… प्रत्येक वेळी तू का सगळ्यांचा विचार करतेस? तू तुला जे पटेल तेंच कर हे सर्व विचार काढून टाक आपोआप ही तुझी भीती जाईल…
तिला त्याच बोलणे पटले, उद्याच्या कार्यक्रमासाठी ती परत एकदा आत्मविश्वासाने तयार झाली…
कार्यक्रम खूप छान झाला… सुरभीला खऱ्या अर्थाने काळ-वेळ चा अर्थ समजला… तिच्या मनातली ती भीती कमी झाली..
या कथेतून मला एवढेच सांगायचं आहे की, नेहमीच कोणतीही वेळ असो चांगली नाहीतर वाईट, ही अनामिक भीती नेहमीच माणसांच्या मनात असते, वाईट गोष्टी असतील तरी कसे होणाऱ काय होणार म्हणून… अन् चांगले झाले तरी कोणाची नजर नाही ना लागणार याची… म्हणून प्रत्येक व्यक्तीने कालचा अन् उद्याचा जास्त विचार न करता आता आहे तें आयुष्य भरभरून जगायला हवे… तुम्हाला सुद्धा पटतय ना..??
कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.
आणि अभिप्राय द्या.. अर्थात तुमच्या कंमेंटमधून..
अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका….
साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे ह्याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.
©®अनुजा धारिया शेठ
======================
फोटो साभार – गूगल
तुमच्याकडेही अशाच लघुकथा असतील तर आम्हाला नक्की कळवा. स्पर्धेत भाग घेण्यासाठी कोणतेही शुल्क नाही….पाहिजे ती फक्त मजबूत शब्दांची मांडणी. तर मग विचार कसला करताय लवकरात लवकर तुम्हीही भाग घ्या.
हि स्पर्धा दि. ३ जानेवारी ते २९ जानेवारी आयोजित करण्यात येणार आहे.
विजेत्या स्पर्धकांना खाली दिल्यानुसार मानधन देण्यात येईल.
पहिला विजेता – १००१/-
दुसरा विजेता (अनुक्रमे २ विजेते काढण्यात येतील) – ५०१/- प्रत्येकी
तिसरा विजेता (अनुक्रमे ३ विजेते काढण्यात येतील) – २५१/- प्रत्येकी
बाकी सर्व सहभागी स्पर्धकांना RitBhatमराठीच्या वतीने डिजीटल प्रमाणपत्र देण्यात येईल.
स्पर्धेचे नियम जाणून घेण्यासाठी खालील ई-मेल अथवा फेसबुक मेसेंजर वर संपर्क साधा.
ई-मेल : ritbhatmarathi@gmail.com
फेसबुक पेज : https://www.facebook.com/ritbhatmarati/