कधीही क्षय न होणारी अक्षय तृतीया

akshaya tritiya marathi:
वैशाख महिना हा मराठी महिन्यातील दुसरा महिना, या वेळी सूर्याची प्रखरता तीव्रतेने जाणवते त्याचा परिणाम सभोवतालच्या सृष्टीवर पडलेला दिसतो. याच महिन्यात वैशाख शुक्ल पक्षातील तृतीया हि अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणूनही अक्षय तृतीया या सणाची ओळख आहे. या दिवशी भरपूर दान करावे असे म्हटले जाते.
जेवढ्या गोष्टी आपण दान करतो त्या गोष्टींचा कधीही क्षय होत नाही, तिचा कधीही लोप होत नाही, उलट ती गोष्ट वाढत–वाढत जाते, त्या गोष्टीची वृद्धी होते. दान करायचे झाल्यास पाण्याचे दान केले जाते, अन्न दान केले जाते, ब्राह्मणांना तिळतर्पण केले जाते,वस्त्रदानाही केले जाते,याचदिवशी अन्नपूर्णादेवीची जयंती, नर–नारायण या जोड देवांची पूजा केली जाते, विष्णू अवतारातील परशुराम या अवताराची जयंतीही साजरी केली जाते. अक्षय तृतीया हा सण आखिदी,आखाजी अशा कितीतरी नावानी साजरा केला जातो.
या दिवशी पाणी दान करण्याची प्रथा आहे.वाळा घालून म्हणजे सुगंधित तृण मातीच्या घागरीत घालून त्यात थंड पाणी घातले जाते आणि हे पाणी ब्राह्मणाला दान केले जाते आणि असे केल्यास ते आपल्या पितरांपर्यंत पोहोचते. अक्षय तृतीयेपासून अनेक ठिकाणी आपल्या पूर्वजांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक ठिकाणी पाणपोया सुरु करतात.
महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना व पूजा करतात. चैत्रातील एखाद्या दिवशी हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावून मोगऱ्याची फुले, आंबे डाळ आणि पन्हे देतात. त्या हळदीकुंकू समारंभांचा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सांगता करतात.
पुराणकथेत तर महाभारतापासून या मुहूर्ताच्या अनेक आख्यायिका आहेत, याच दिवशी महाभारताचे युद्ध संपवून महर्षी व्यासांनी महाभारतासारख्या ग्रंथाची रचना केली आणि लिहिण्याचे कार्य श्रीगणेशाने केले, अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगास्नान केले जाते असे केल्यास आपली सगळ्या पापातून मुक्तता होते असे म्हटले जाते.
हेही वाचा
होळी सणाची माहिती | holi information in marathi
गुढीपाडवा सणाची संपूर्ण माहिती आणि महत्व | Gudi Padwa Information in Marathi
या सणाची महती सांगणारी एक कथाही आहे, शाकल नगरात धर्म नावाचा एक वाणी रहात होता, तो सत्यवचनी होता, देवाब्राह्मणांची तो अगदी मनोभावे पूजा करत असे,एकदा असेच एका ब्राह्मणाने त्याला अक्षय तृतीयेचे महत्त्व सांगितले आणि त्याला ते पटले.
ब्राह्मणाने सांगितल्याप्रमाणे,नदीवर जाऊन स्नान करून,पितरांना तिळतर्पण करून ब्राह्माणाला दक्षिणा दिली, अशाप्रकारे प्रतिवर्षी दान–धर्म त्या वाण्याने चालू ठेवला आणि त्यात खंड पाडला नाही, कुठल्याही विघ्नाची किंवा संकटाची पर्वा न करता हा दान धर्म त्याने अविरत चालूच ठेवला.
त्या वाण्याचे भाग्य थोर म्हणून देवाचे स्मरण करतानाच त्याला मरण आले,पुढच्या जन्मी याच पुण्यायीच्या जोरावर राज्यपद मिळाले, पण यावर गर्व न करता त्याने दान–धर्म चालूच ठेवला. त्यात खंड पडू दिला नाही, याच पुण्य म्हणून त्याचा खजिना कधीच रिक्त झाला नाही,रिकामा झाला नाही उलट त्यात वृध्दीच होत गेली.
म्हणूनच, अक्षय तृतीयेच्या दिवशी भरपूर दान करावे अशी प्रथा आहे, कधीच क्षय न होणारी अक्षय तृतीया असंही या सणाला संबोधतात.
जाणून घ्या अक्षय तृतीया शुभ मुहूर्त २०२१:
दि. ३ मे २०२२
☉ सकाळी ५ वाजून ३९ मिनिटे पासून ते दुपारी १२ वाजून १८ मिनिटे पर्यंत
=======================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============