आकाश ठोसर विषयी माहिती | Akash Thosar biography in marathi

Akash Thosar biography in marathi : झुंड या सिनेमाची सगळीकडे खूप चर्चा सुरू आहे. प्रेक्षकवर्ग या चित्रपटाची आतुरतेने वाट पहात आहे. त्याचे कारणही तसेच आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सैराट फेम नागराज मंजुळे यांनी केले असून यात आरची परशाच्या रुपात सुप्रसिद्ध झालेले कलाकार रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर हे अभिनय करत आहेतच. पण याचे अजून एक आकर्षण म्हणजे बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी यात खूप महत्त्वाची भूमिका साकारली आहे. मराठी सिनेमाचे दिग्दर्शन आणि हिंदीतील महानायक यांचा अभिनय बघण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
याच चित्रपटाच्या निमित्ताने या चित्रपटात फुटबॉल संघातील खेळाडू ही भूमिका साकारणारा अभिनेता आकाश ठोसर याच्याबद्दल थोडेसे जाणून घेऊया.
१. आकाश ठोसर विषयी माहिती | Akash Thosar biography in marathi
आकाश ठोसर हे पुण्याचे असून अभिनय करण्यापूर्वी तो भारतीय संघाचे माजी कुस्तीपटू होते. सैराट मधील परशा या भूमिकेने त्यांना रातोरात स्टार बनवले आणि त्याचे आयुष्य बदलून गेले.
२. वैयक्तिक जीवन
आकाश ठोसर यांचा जन्म पुण्यात दिनांक २४ फेब्रुवारी १९९३ रोजी झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण पुण्यातील ssvm येथे पूर्ण केले तर उर्वरित शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घेतले. कॉलेजमध्ये असताना त्यांनी काही नाटकात भाग घेतला होता. तिथूनच त्यांना अभिनयाची आवड होती हे दिसून येते.
३. कौटुंबिक जीवन
आकाश ठोसर यांच्या परिवारात आई,वडील,भाऊ आणि दोन बहिणी यांचा समावेश आहे. त्यांच्या दोन्ही बहिणी विवाहित असून, आई गृहिणी आहेत तर वडील गवंडी काम करत आहेत.
४. व्यावसायिक जीवन
आकाश ठोसर हे कुस्ती खेळण्यात मग्न असताना सैराट चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या भावाने आकाशचा फोटो काढून नागराज सरांना पाठवला. तो फोटो नागराज सरांना खूप आवडला आणि सैराट चित्रपटासाठी नायक म्हणून घेतले. अशा पद्धतीने आकाश यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. आकाश कुस्तीपटू असल्यामुळे त्यांची तब्येत चांगली होती पण चित्रपटात परशा भूमिका साकाण्यासाठी त्यांना तब्बल तेरा किलो वजन कमी करावे लागले होते. त्यांची ही भूमिका सर्वांना इतकी आवडली की याच चित्रपटासाठी आकाश ठोसर यांना २०१७ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी तिसरा जियो फिल्मफेअर मराठी पुरस्कार (पुरुष) देण्यात आला होता.
हेही वाचा
आयुष्यात थोडे हादरे बसले, म्हणून काही संपूर्ण आयुष्य वाया जात नाही – अजय पुरकर
५. सैराट नंतरचे जीवन
आकाश ठोसर यांनी सैराटमध्ये प्रशांत काळे म्हणजेच परशा ही भूमिका साकारली. ही भूमिका शाळेत शिकत असणाऱ्या एका गरीब कुटुंबात राहणाऱ्या शाळकरी मुलाची होती. जो शाळेत एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन लग्न करतात आणि शेवटी क्रूरपणे त्यांचा खून करण्यात येतो. यातील त्यांची भूमिका इतकी आवडली की प्रेक्षकांनी या अरची परशाल डोक्यावर घेतले. यामुळे आकाश ठोसर यांचे जीवन पूर्णपणे बदलले. या चित्रपटात काम करण्याआधी ठोसर कधीही मुंबईला आले नव्हते. पण या चित्रपट नंतर त्यांनी यू ट्यूब आणि टेलिव्हिजनवर तब्बल १०० च्या वर मुलाखती दिल्या. इतकेच नाही तर हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा त्यांनी पदार्पण केले. यासोबतच चला हवा येऊद्या, कॉमेडी नाईटस विद कपिल यासारख्या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली.
६. झुंड आणि आकाश ठोसर
सध्या आकाश ठोसर यांचा येणारा “झुंड” हा सिनेमा खूपच चर्चेत आहे. झोपडपट्टीतील फुटबॉल खेळणाऱ्या मुलांची संघर्ष कथा यात मांडली गेली आहे. हा चित्रपट विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. विजय बारसे हे पेशाने शिक्षक असून त्यांनी संपूर्ण आयुष्य झोपडपट्टीतील लोकांसाठी खर्च केले आहे. याच विजय बारसे यांची व्यक्तिरेखा बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारली आहे तर आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू संघातील खेळाडू आहेत.
७. आकाश ठोसर ह्यांची कारकीर्द
आकाश ठोसर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात सुद्धा काम केले आहे.
सैराट २०१६ मध्ये, फ्रेंडशिप उनलिमि टेड २०२७ मध्ये, लास्ट स्टोरी ज २०१८ मध्ये आणि झुंड आता येत्या ३ मार्च २०२१ मध्ये प्रदर्शित होत आहे.
यातील लस्ट स्टोरीज हा नेटफ्लिक्स वर प्रदर्शित झाला होता आणि यात आकाश ठोसर राधिका आपटे यांच्या सोबत दिसले होते. आकाश ठोसर यांनी तेजस नावाच्या विद्यार्थ्याची भूमिका साकारली होती.
सैराट करण्याआधी मुंबई कधीही न पाहिलेल्या आणि अचानकपणे एका संधीमुळे आपले संपूर्ण आयुष्य बदललेल्या कलाकाराला महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळणे ही किती भाग्याची गोष्ट आहे.
================