पॅन कार्ड आणि आधार कार्ड कसं लिंक करायचं ? | adhar card pan card link

१. पॅन कार्ड आणि आधार कार्ड कसं लिंक करायचं ?
adhar card pan card link: मागील लेखात आपण आधार कार्डविषयी जाणून घेतलं या लेखात सर्वात आधी आपण पॅन कार्डविषयी माहिती करून घेणार आहोत. पॅन कार्ड म्हणजे पर्मनंट अकॉउंट नंबर जो नंबर आपला कायमस्वरूपी असा खाते क्रमांक असतो. ज्याचा वापर आपल्याला शासकीय व्यवहारात होतो. पॅन कार्ड असे एक कार्ड आहे ज्यावर लिहिलेल्या नंबरच्या माध्यमातून तुमची म्हणजेच पॅनकार्डधारकाची संपूर्ण माहिती काढली जाऊ शकते. हि माहिती इन्कम टॅक्स डिपार्मेन्टसाठी आवश्यक असते.
१.१ पॅन कार्डचे स्वरूप
– पॅन कार्डवर १० अंकाचा विशेष कोड असतो किंवा नंबर असतो ज्यामध्ये इंग्रजी अक्षरे आणि इंग्रजी अंक दिलेले असतात
– पॅन कार्ड लॅमिनेटेड कार्डच्या रूपात येते. पॅन कार्डसाठी अर्ज केलेल्या नागरिकासाच आयकर विभाग पॅनकार्ड देते
– पॅनकार्डवर खातेधारकाचे नाव आणि जन्मतारीख लिहिलेली असते. आपले आडनाव हे पॅनकार्डच्या नंबरमध्ये लपलेले असते
– पॅनकार्डवरील १० नंबरपैकी पाचवा अंक तुमचे आडनाव दर्शवत असतो
१.२ पॅनकार्डचे महत्व
– आयकर विभागाशी कोणताही पत्र व्यवहार करताना पॅनकार्डचा वापर केला जातो
– आयकर विवरण भरताना,टीडीएस दाखवताना,टीडीएसचा परतावा मागताना पॅनकार्ड वापरले जाते
– कुठल्याही प्रकारची आथिर्क गुंतवणूक करताना पॅनकार्ड नंबर असणे आवश्यक आहे जसे कि नवीन खाते उघडायचे झाल्यास पॅनकार्ड असणे अनिवार्य आहे,टेलिफोनची नवी जोडणी हवी असल्यास पॅनकार्ड आवश्यक आहे
– परकीय चलन खरेदी करताना किंवा ५० हजारांपेक्षा रक्कम बँकेत ठेवताना किंवा काढताना पॅनकार्ड असणे आवश्यक आहे.
हेही वाचा
आधार कार्डसाठी कसं अप्लाय करावं?
जन्मनोंदणीसाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
२. आधार कार्ड आणि पॅनकार्ड कसे लिंक करावे
adhar card pan card link:
दोन्हीही महत्वाची कागदपत्रे असणे अनिवार्य आहे कारण आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून दोन्ही कागदपत्रे जरूर लागतातच त्यामुळे पॅन आणि आधार दोन्ही लिंक करणे अनिवार्य आहे. अगदी घरबसल्याही आपण आधार आणि पॅन लिंक करू शकता ते आपण पुढे पाहुयात –
१. इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन म्हणजेच ”www.incometaxindiaefiling.gov.in” या वेबसाईट वर जावे लागेल
२. यानंतर सर्वात वरच्या बाजूस ‘ Quick Link ‘ हा पर्याय दिसेल त्यामध्ये ‘ Link Adhar ‘ या पर्यायावर क्लिक करा
३. पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या कॉम्पुटर स्क्रीन वर एक नवीन पेज ओपन होईल तर या पेजवर आपल्याला पॅन नंबर,आधार नंबर आणि नाव असे पर्याय दिसतील, योग्य ती माहिती त्याठिकाणी टाईप करावी.
४. योग्य ती माहिती टाईप केल्यांनतर आपल्याला एक ओ टी पी देण्यात येईल.
५. ओ.टी.पी एंटर केल्यानंतर आपलं आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक होऊन जाईल
६. आधार कार्ड आणि पॅनकार्ड वैध आहे कि अवैध हे पडताळून पाहण्यासाठी आयकर विभाग क्रॉसचेक करत असतो.
पॅन-आधार लिंक आहे कि नाही हे कसे तपासून पाहावे ?
१. इन्कम टॅक्सच्या इ-फीलिन्ग वेबसाईटवर जाऊन म्हणजेच ‘ www.incometaxindiaefiling.gov.in’ या संकेतस्थळास भेट द्यावी
२. सर्वात वरच्या बाजूला म्हणजेच ‘क्विक लिंक्स ‘ या पर्यायावर जाऊन ‘ लिंक आधार ‘ हा पर्याय सिलेक्ट करावा.

३. यानंतर आपल्या कॉम्पुटर स्क्रिनवर एक नवीन पेज ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला आधार नंबर आणि आपला पॅन नंबर टाकावा लागेल त्यानंतर ‘व्हॅलिडेट’ या पर्यायावर क्लिक केल्यास आपल्याला आपला आधार पण नंबर बरोबर लिंक आहे की नाही हे समजेल अथवा तसा मेसेज आपल्याला आपल्या कॉम्पुटर किंवा लॅपटॉप स्क्रिनवर दिसेल.

४. ‘ व्हियू लिंक आधार स्टेटस ‘ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कि पॅन आधार लिंक आहे अथवा नाही याबद्दलचे स्टेट्स समजू शकते
३. पॅन-आधार लिंक करा एसएमएस च्या मदतीने
जो पॅन कार्ड धारक आपल्या आधार कार्डला लिंक करू इच्छित आहे त्याने आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून ५६७६७८ किंवा ५६१६१ या नंबरवर एसएमएस पाठवावा. ज्याचं स्वरूप म्हणजे UIDPAN <स्पेस बार ><१२ आकडी आधार नंबर ><स्पेस><१० आकडी पॅन नंबर > नंतर ५६७६७८ किंवा ५६१६१ या नंबरवर एसएमएसच्या स्वरूपात पाठवून दयावे.
=============
हेही वाचा