आमच्याबद्दल
मित्रांनो आणि माझ्या प्रिय भगिनींनो, आजकाल खूप धकाधकीचं जीवन आपण जगत आहोत. खूप लोक शाळा, कॉलेज किंवा ऑफिस मध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतात. माझे काही प्रिय बंधू आणि भगिनी तर १-२ तासांचा प्रवास रोजच करतात. अशावेळी ह्या देखील वेळेचा उपयोग करून घ्यावा असं सर्वांनाच वाटतं.
वाचाल तर वाचाल हि म्हण सर्वांनी ऐकली हि असेल आणि खरंच सांगायचं तर वाचन हा सगळ्या प्रॉब्लेम्स वर एक प्रभावी उपाय आहे.
मग तुम्ही कुठलाही धार्मिक ग्रंथ वाचा, कथामालिका वाचा किंवा कुठलंही पुस्तक. वाचन ही एक अशी सवय आहे ज्यामुळे मनात असलेलं विचारांचं वादळ कुठेतरी बंद होतं. माणूस अध्यात्मिक होतो. ते म्हणतात ना ध्यान आणि ज्ञान कधीही वाया जात नाही आणि वाचनातून ह्या दोन्ही गोष्टी आपणास आत्मसात करता येतात.
आणि म्हणूनच रीतभात मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे डिजिटल माहिती जिथे तुम्हाला उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या कथा , बोधकथा, प्रेमकथा, धार्मिक माहिती, पर्यटन, भारतातील सणवार, नित्यसेवा, उखाणे, सुविचार आणि बरंच काही…. वाचायला मिळेल. ज्यातून नक्कीच वाचकांना काहीतरी शिकायला मिळेल. तसेच लेखकांनाही एक व्यासपीठ मिळेल. बऱ्याचदा घराघरात लेखक असतात ज्यांना लिहिण्याची आवड असते पण त्यांना व्यासपीठाअभावी पुरेशी संधी मिळत नाही आणि त्यांचा छंद आणि ज्ञान कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यामध्ये दडून बसतं.
अशाच नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळवून देणं आणि त्यांना त्याबदल्यात पुरेसा मोबदला देणं हेही पाऊल रीतभातमराठीने उचललं आहे. मला खात्री आहे कि एक दिवस हजारो लेखक रीतभात मराठीवर लिहितील आणि अशाच हजारो लेखकांना रोजगार मिळवून देणं हे रीतभात मराठीचं स्वप्न तुम्हा वाचकामार्फत नक्कीच पूर्ण होईल. त्यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा आहे
साइट, जाहिरात आणि इतर कोणत्याही समस्येबाबत तुम्हाला काही प्रश्न असल्यास, कृपया ritbhatmarathi@gmail.com वर मोकळ्या मनाने संपर्क साधा.