

सत्यजित नेहमीप्रमाणे आपल्या टेबलवर बसलेला असतो तेवढयात त्याला समोर एक दृश्य दिसतं…एक मुलगी एका वयस्कर गृहस्थाला आपल्या हाताने खाऊ घालत असते….सत्यजित ते दृश्य पाहण्यात इतका गुंग असतो की आपल्या ऑफिसमधले अग्रवाल सर केव्हा मागे येऊन उभे राहतात हे सत्यजितला कळतही नाही…तेवढयात सत्यजितला अग्रवाल सर म्हणतात…
अग्रवाल सर – काय सर…काय पाहत आहात…?
सत्यजित – सर….तुम्ही केव्हा आलात…
अग्रवाल सर – हे काय आत्ताच आलो…तुम्ही.. दोघांना पाहण्यात किती गुंग होतात तुम्हाला कळलंही नाही मी कधी आलोय ते…
सत्यजित – अरे हो किती जीव आहे ना त्या मुलीचा आपल्या वडिलांवर….अशा मुली पाहिजेत आत्ताच्या जगात… आपल्या नवऱ्या पेक्षाही जास्त काळजी घेतीय आपल्या वडिलांची…
अग्रवाल सर – सर…हळू बोला…कुणी ऐकलं तर बोलतील तुम्हाला…
सत्यजित – का बरं बोलतील मी काय चुकीचं बोलतोय…
अग्रवाल सर – अर्थात…कारण ते दोघेही ऑफिशिअली नवरा-बायको आहेत…
सत्यजित – बाप रे…केवढी काळजी घेतात एकमेकांची…नाव काय त्यांचं…आणि कुठे राहतात…?
अग्रवाल सर – कामडेन ब्लूम्सबेरी…इथे राहतात आणि खूप प्रतिष्ठित घराणं आहे त्यांचं…त्यांचं आडनाव आहे हेनरीआणि वाइफ नेम आहे जेनिफर हेनरी…
सत्यजित – बाप रे वयामध्येही खूप सारा फरक असेल त्यांच्या…
अग्रवाल सर – हो वय म्हटलं तर…मॅम आहेत ४० च्या आस-पास आणि सर आहेत पासष्ठीच्या आस-पास…मॅम चाळिशीतल्या वाटतही नाही…हो ना…?
सत्यजित – हो ना…खूप चांगलं ट्युनिंग आहे दोघांचं…
अग्रवाल सर – पण आपल्या भारतात असं चालत नाही…कितीही झालं तरी मानसिकता वेगळीच असते देशातल्या लोकांची…पण कितीही काहीही झालं तरीही आयुष्यात शेवटी सोबत लागतेच…!
सत्यजित – हो ना…पण पहिल्या बायकोची आठवण येत असेल त्यांनाही…
अग्रवाल सर – माहित नाही…पण असतात आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात जशाच्या तशा…नाही सांगत तोंडावर आपल्या…आता तुमचंच पहा ना सर…[ अग्रवाल सर एकदम ओघात बोलून गेले सत्यजितला पुढे बोलावलंच नाही ]
बराच वेळ सत्यजित शांत बसून राहिला…एकदम अग्रवाल सर म्हणाले…
अग्रवाल सर – सत्यजित सर…क्या हुआ…कहा गुम हो गये हो आप…? कुछ तो बोलो…
सत्यजित – नाही सर…काहीच नाही एकदम जुने दिवस आठवले…म्हणून एकाएकी शांत झालो…बाकी काही नाही..
अग्रवाल सर – होता है…पुरानी यादे आदमी को अक्सर ख्वामोश करती है…मै क्या बोलता हू सर…आपको ऐतरेज ना हो तो बताता हू…
सत्यजित – हा बोलो भी…!
अग्रवाल सर – आप शादी क्यू नही कर लेते…?
सत्यजित – क्या…मुझे इस उम्र मे कौन देगा लडकी…
अग्रवाल – सर…हेनरी को मिल सक्ती है बीवी…तो आपको क्यू नही…!
सत्यजित – चला हे सगळी चेष्टेची काम आहेत…न बोललेलंच बरं…
एवढे बोलून सत्यजित त्या रेस्टोरंटमधून निघू पाहतो…सत्यजितच्या मनात मात्र अग्रवाल सरांचे शब्द घुमू लागतात…’ आयुष्यात शेवटी सोबत लागतेच….’ आपल्याच तंद्रीत लंडनमधल्या रस्त्यावर सत्यजित चालत असतो तेवढ्यात एक भरधाव चार-चाकीची धडक सत्यजितला बसते…सत्यजित रस्त्याच्या कडेला फेकला जातो….अग्रवाल सर तिथेच असल्यामुळे सत्यजितला लागलीच हॉस्पिटलमध्ये भरती करतात…सत्यजित बेशुद्धावस्थेत असतो…चार-पाच दिवस चांगली ट्रीटमेंट सुरु असते सत्यजितची… …कारण आजारी माणसाला एका भावनिक आधाराची गरज होती…लंडनमध्ये सगळ्या सोयी-सुविधा असतील पण भावनिक आधार देणार असं कुणीच नाही याची खंत सत्यजितला असायची…कारण सत्यजित जेव्हा एकटा होता त्यावेळी सत्यजितला कुणाच्यातरी सोबतीची….आधाराची गरज वाटू लागली…आपण भारतात असताना आईची…मुलांची सोबत आणि सहवास असल्याने भावनिक आधार देणार असं कुणीच तेव्हा सत्यजितला सापडलं नाही…ठरलेला आपल्या फोर्जिंग कंपनीचा करार बरोबर दोन वर्षात पूर्ण होणार असल्याने….सत्यजितला भारतात जाण्याची ओढ लागू लागली…
वर्ष संपत आलं असल्याने सत्यजित लागलीच मायदेशात जाण्याची तयारीही करतो…तयारी करून झाल्यावर सत्यजित आपला आणि आपल्या सहकाऱ्यांचा निरोप घेऊन ठरलेल्या फ्लाईट ने जातो ….सत्यजित लंडन वरून घरी पोचतो तेव्हा वीणाताई साग्र संगीत सत्यजितच्या येण्याची म्हणजेच स्वागताची तयारी करूनच ठेवतात…विशेष म्हणजे सत्यजित ज्या दिवशी येणार आहे तो दिवस शकूचा अठराव्या वाढदिवसाचा दिवस असल्याने…वीणाताई आनंदित असतात…ही गोष्ट सत्यजितला माहिती नसते…म्हणून सत्यजितला सुरुवातीला थोडं विचित्र वाटत…कारण खूपच जंगी स्वागत समारंभ ठरवलेला असतो……शकूला पाहताच सत्यजित लग्नासाठी होकार देईल की नकार देईल…उत्सुकता अशीच असू द्यात…पाहुयात पुढच्या भागात…


प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.