
गर्द हिरवळ आणि फेसाळलेलं पाणी पाहून सर्वांची मन कशी प्रसन्न वाटत होती…अलखनंदा ताईंनी तर आपला कॅमेरा आणला होता म्हणून निसर्गाचं विहंगम असं दृश्य टिपण्यात त्या व्यग्र होत्या…शकू मात्र सगळ्या सामानावर लक्ष ठेवत बसली होती…सत्यजित आणि कैलास पाण्याचा मनसोक्त स्रोत पाहून थक्क झाले…अपेक्षा पण शकुशेजारीच बसली होती…अपेक्षाचा फटकळ स्वभाव शकूला माहिती असल्याने शकूही जास्त बोलत नव्हती…अपेक्षा मग स्वतःहून शकूबरोबर बोलू लागली…
अपेक्षा – शकू…काय ग सत्यजितभाउजी बोलतात का तुझ्याशी…?
शकू – होय…बोलतात ना…का बरं..असं का अचानक विचारता तुम्ही…आता नवीन-नवीन थोडंच एवढं बोलणार…स्वभाव माहिती पाहिजे ना…
अपेक्षा – हो ना नाहीतर कसं होत…बोलणं जुळत नाही की काही नाही…
शकू – वहिनी…किती सुंदर दिसत आहात तुम्ही या जीन्स वरती…भाऊजींना खरंच आवडत…
अपेक्षा – नाही ग काही आवडत नाही यांना फारच बोअरिंग आहेत हे…पण तू घालत जा की…तुझं तर वयही नाहीय एवढं…
शकू – नाही वहिनी…मला नाही आवडत माझी आई म्हणायची…लग्न झालं ना एकदा की साडीच नेसावी…म्हणजे समोरचा आपल्याकडं आदरानं बघतो…
अपेक्षा – पेहरावावरून काही ठरत नसत ते…त्यासाठी एक लकब लागते….ज्याला आपण अटीट्युड असं म्हणतो..
शकू – काय…मला काही कळलं नाही…!
अपेक्षा – जाऊ दे…तुला नाही समजणार…
इतक्यात सत्यजितला जखमी अवस्थेत घेऊन कैलास येताना दिसतो…सत्यजितला असं पाहताच शकूच्या मनात धस्स होत…तेवढयात शकू पटकन पुढे होते…सत्यजितचा हात आपल्या खांद्यावरती घेते…पटकन एका चांगल्या जागेवर नेऊन शकू आपल्या नवऱ्याला बसवते…प्रथमोपचाराची पेटी सोबत असल्याने….कैलास पटकन घेऊन आला..नंतर शकुने प्रथमोपचाराची पेटी घेऊन जखमा स्वछ केल्या…संपूर्ण वेळ शकू व्यवस्थित शुश्रूषा करत होती…रात्री घरी परतल्यावरसुद्धा शकू काळजी घेण्यात कमी पडली नाही…आपल्या सुनेचं आपल्या माणसांप्रतीच प्रेम पाहून वीणाताई मात्र खूप भारावून गेल्या …नव्या सुनेचं कौतुक येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला अगदी तोंड भरभरून सांगत असे…सत्यजितच्याही कानावरती आपल्या बायकोची स्तुती ऐकायला येत असे…शकूच्या शुश्रुषेमुळे असंच काही दिवसांनी सत्यजित अगदी ठणठणीत बरा होतो…एक अशी प्रसन्नता सत्यजितच्या चेहऱ्यावरती नव्याने दिसून येते…६० % तरी सत्यजित शकूविषयी सकारात्मक दृष्टिकोन आखू लागतो…घरात शकूविषयी आपुलकी वाढणार आणखी एक माणूस वाढलं…लोणावळ्याला झालेली दुखापत सत्यजितच्या मनात,शकूविषयी एक हवीहवीशी जखम करून गेली म्हणून….तरीही आकांक्षा अजूनही शकूला आपली मैत्रीणरुपी आई स्वीकारायला तयार नव्हती…आता आकांक्षाचा बारावीचा निकाल आठवडाभरावर येऊन ठेपला होता…म्हणून आकांक्षालाही मनातून अशी हुरहूर वाटत होती…शकू दहावी पास असल्याने निकालाची उत्सुकता काय असते हे तिला चांगलंच माहिती होतं…म्हणून शकू आकांक्षाला दिलासा द्यायला म्हणून जावं कि नाही असा विचार करते…कारण मागच्या वेळेसारखं आपण फाट्यावर पडू म्हणून खूप घाबरतच जाते…
शकू – आकांक्षा ताई…आत मध्ये येऊ का…?
आकांक्षा – आता आलीच आहेस तर ये कि आत…आणि गरजेपुरतंच बोल…
शकू – नाही म्हटलं…चार दिवसांनी निकाल आहे ना तुमचा…
आकांक्षा – मग काय अगोदरच अभिनंदन करायला आलीस की काय…?
शकू – नाही हो…माझी ही दहावी झालीय…तेव्हा मला माहिती आहे हुरहूर काय असते ती…
आकांक्षा – काय गं किती टक्के मिळाले होते तुला दहावीत असताना…
शकू – अहो…मी जिल्हा परिषदेच्या शाळेमधून पहिली आले होते…मला ९० % मिळाले होते…माझ्या मावशीनं तर माझ्यासाठी एक मस्त घड्याळ घेतलं होतं…खूपच आठवण येते आत्ता मला तिची…
आकांक्षा – बाई गं…तुझं मावशीचं कौतुक आता मला सांगू नकोस…तुझं काम झालं असेल तर जाऊ शकतेस तू…माझ्या डॅडी च आणि माझं नातं खूप चांगलं होतं यापूर्वी पण तू आलीस आणि त्यात कडवटपणा आलाय आमच्यात…
शकू – ताई रागावू नका…माझं चुकलंच…तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणायला आले होते…जाते मी…
रडवेली होऊन शकू तिथून जाते पण वीणाताईंच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाही …वीणाताई शकूला एक नैतिक आधार देतात…आणि समजावतात…
वीणाताई – सुनबाई…जाऊद्यात येईल गाडी हळू-हळू रुळावरती मेन माणूस तर बोलतोय ना थोडं थोडं…मग नको विचार करुस जास्त…
शकू – आई…पण घरातले सगळे तितकेच महत्वाचे आहेत…तुम्ही माझ्यावर आणि माझ्या माहेरच्यांवर खूप उपकार केलेत…त्याची परतफेड करण्याची एक संधी देताय तुम्ही असंच समजेल मी…
वीणाताई – उपकाराची भाषा करायची नाहीस हा…नाहीतर माझ्याइतकं वाईट कुणी नसेल…
शकू – आई…चुकलं माझं…काय करू मी म्हणजे माझी चूक पदरात घ्याल तुम्ही…
वीणाताई – काही नको करुस…फक्त एक कप चहा करून आण माझ्यासाठी…[ वीणाताई असं म्हणतात आणि हसतात ]
शकूही पटकन चहा घेऊन येते…अशापद्धतीने घरात आकांक्षा सोडून सगळे मस्त हसून-खेळून राहत असतात…दोन दिवसांनीच आकांक्षाचा निकाल जाहीर होणार असतो म्हणून…सगळ्यांच्या मनात एक प्रकारची हुरहूर दाटलेली असते…अखेर निकालाचा दिवस उजाडतो…सकाळी लवकरच उठून आकांक्षा तयार असते..पण त्यातल्या त्यात शकूचीही धावपळ चालूच असते कारण निकालाची उत्सुकता आकांक्षापेक्षाही शकूला जास्त असते म्हणून सर्वांचा नाश्ता…जेवण असं सगळं उरकून शकूही बाहेर येरझाऱ्या मारत असते…दुपारचे बारा वाजलेले असतात…ऑनलाईन निकाल जाहीर होणार असतो…म्हणून आकांक्षाही बेचैन असते निकाल जाहीर होतो…‘ ‘आपण पास झालो…‘ हे कळताच आकांक्षा अगदी वेडीपिशी होऊन घरभर धावत-पळत सुटते…आणि पहिलं ही आनंदाची बातमी शकूला सांगते…
आकांक्षा – मी पास झाले…मला डिस्टिंक्शन मिळालं…
शकू – ताई अहो…हो…हो…या इकडे या…[शकू आकांक्षाचा हात पकडून नर्मदाताईंच्या तस्विरीपुढे जाते आणि म्हणते ] ” ही बातमी सर्वात आधी नर्मदाताईंना समजली पाहिजे…साखर आणते मी…तुम्ही तुमच्या हाताने या नर्मदाताईंच्या तस्विरीपुढे ठेवा..”
आकांक्षा…एकटक शकूकडे पाहतच राहते…कारण आकांक्षाला कळून चुकते की…शकू एक खूप चांगली मैत्रीण म्हणून आपल्याला मिळालीय…आपण सारखा सारखा तिचा दुस्सास करायला नको…खरंच आपण शंकूंशी याआधी खूपच वाईट वागलोत…असा विचार करतानाच आकांक्षांच्या डोळ्यातलं पाण्याचं टिपूस आपल्या आईच्या म्हणजे नर्मदेच्या तस्विरीपुढे पडतं…शकू लगेच आकांक्षाला म्हणते-
शकू – आकांक्षा ताई…हे घ्या…साखर ठेवा…आणि हे काय तुमच्या डोळ्यात पाणी…एवढी चांगली बातमी सांगितलीत…आणि तुम्ही रडताय…
आकांक्षा – शकू मी खूप चुकले गं…मला माफ करशील जमलं तर…
शकू – त्यात माफी कसली मागताय ताई…
आकांक्षा – मला अहो…जाहो…नको करुस गं…
शकू – बरं…आकांक्षा…माफी आपल्या माणसांना मागत असतात का…असं म्हणून आता तूच मला परकं करतेय..
अशा प्रकारे शकू हळू हळू सर्व घर आपल्या स्वतःच्या बाजूने पूर्णपणे करते…दुसरीकडे मात्र सत्यजितला शारीरिकदृष्ट्या दुखणी अंग वर करू लागतात….असेच एक दिवस…अचानक अर्धशिशीचा त्रास सत्यजितला होऊ लागतो…म्हणून सत्यजित आपलं डोकं दोन्ही हातानी पकडून बसलेला असतो…अगदी सकाळपासून खोलीचा दरवाजा बंद असतो…खोलीचा दरवाजा अजूनपर्यंत बंद म्हणून घरातले सगळेजण काळजीत असतात…वीणाताईही काळजीने खोलीबाहेर येऊन थांबतात…शकूही घाबरी-घुबरी झालेली असते…
शकू खरंच या आजारातही अशीच कायम सत्यजितबरोबर असणार की नाही….उत्सुकता अशीच असू द्यात….भेटूयात पुढच्या भागात….
Post navigation

प्रतिभा सोनवणे
मी प्रतिभा. गृहिणी आहे. लिहायचा अनुभव नव्हता पण लिहिता लिहिता लिखाणाची आवड निर्माण झाली आणि मनात असलेल्या भावना रीतभातमराठीच्या व्यासपीठावर कथा स्वरूपात छापल्या.