Skip to content Skip to sidebar Skip to footer

आंधळं प्रेम

स्मिता अगदी साधन घरातली . भाऊ आणि बहीण दोघेच सो खुप लाडात वाढलेली मुलगी . अत्यंत देखणी, सगळ्या कलागुणां मध्ये निपुण, सरस्वती, सौन्दर्य, आणि लक्ष्मी तीनही गोष्टी असल्याने काहीच कमी नव्हते . दहावी, बारावी बोर्डात येऊन Dr होण्याचे स्वप्न पूर्ण करून आता मास्टर्स ला ऍडमिशन घेतली होती. अत्यंत मनमिळाऊ म्हणून सगळीकडे प्रसिद्ध होती .😘

मास्टर्स होताना एक accident ची केस आली खुप चांगल्या पद्धतीने तिने ही केस हाताळली आणि त्या मुलाला वाचवले. रोज राऊंड ला येऊन येऊन दोघांची छान मैत्री झाली . मुलगा ही चांगला उंचापुरा ,देखणा, स्मार्ट असा होता दवाखान्यातुन बाहेर पडून नोकरीवर जॉईन व्हायचे आहे असे तो वारंवार म्हणायचा. तिला तो कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी नोकरीला असेल याची खात्रीच वाटली . तिने कधीच त्याला विचारले नाही कुठे काम करतोस म्हणून? त्याला डिस्चार्ज मिळाला तो निघून गेला.

काही दिवसांनी त्याने हिला कॉल केला ओळ्खलेत का Dr मी जीवन तुमचा पेशंट आवाजावरून तिने ओळखले हो हो बोला कसे आहात एकदम मस्त Dr. तुम्हाला ट्रीट द्यायची होती मला माझ्या पायावर परत उभे केले बद्दल 😊 आज तुमच्याच हॉस्पिटल च्या कॅन्टीन मध्ये देतो भेटाल का? ती आधी नकोच म्हणाली पण तो वेळ ऍडजस्ट करतो , फार वेळ घेत नाही वैगेरे वगैरे म्हणत राहिला हिला वाटले इथेच तर जायचे तिने होकार कळवला.

संध्याकाळी भेटून चहा , वडा खाल्ला तो इतका स्मिताचे कौतुक करत होता, गोड गोड बोलत होता ही पार भुलूनच गेली . जीवन तू किती छान बोलतोस रे भेटत जाऊ मधून मधून दोघेही एकदम बोलले.

हळू हळू भेटी वाढत गेल्या स्मिता कधी जीवन च्या प्रेमात पडली कळलेच नाही .😍 ती इतकी त्याच्यात गुंतली होती की आजूबाजूचे भान देखील राहिले नाही . तिच्या मैत्रिणीने आईच्या कानावर ही गोष्ट घातली . लग्नाचे बघतच होते आईने घाई करायला सुरुवात केली कारण स्मिताच्या मैत्रिणीला जीवन फारसा बरा मुलगा असावा असे वाटत नव्हते . पण स्मिता इतकी प्रेमात आंधळी झाली होती की तिला कशाचेच भान नव्हतं.

त्यात 14 फेब्रुवारी प्रेमाचा दिवस जीवन ने स्मिता ला propose केले ती लगेच हो म्हणाली . इकडे मुले बघायची घाई होऊ लागली . स्मिता ला ते आवडले नाही तिने घरात जीवन बद्दल सांगितले पण घरचे कोणीच तयार झाले नाही तिला त्यानी अनेक प्रश्न विचारले हिला एकाचेही धड उत्तर देता आले नाही इतकी ती प्रेमात आंधळी झाली होती.

आई ने धोक्याचा इशारा दिला त्याने तुला त्याच्याबद्दल फारसे काहीही सांगितले नाहीये तुही विचारून घेतले नाहीस यातच काहीतरी गोलमाल दिसते पण ते तिच्या डोक्यावरून गेले.

खरे तर शेवटची सेमिस्टर जवळ आली होती उत्तम गुणांनी आतापर्यंत ती पास होत आली होती हत्ती गेला आणि शेपूट राहिले असे झाले होते, याचा पण विसर स्मिताला पडला बहुतेक आणि एक दिवस जीवन बरोबर ती पळून गेली.

दोघांनी देवळात जाऊन लग्न केले त्याने महिनाभर तिला इकडेतिकडे फिरवले छान मजेत हनिमून करून दोघेही परत आली. या सगळ्यात आईचा BP वाढला, माईल्ड अटॅक येऊन गेला, भाऊ शिकत होता तो सैरभैर झाला, बाबांनी अंथरूण धरले, हिला काहीच पत्ता नाही एक चिट्ठी लिहून स्मिता पळून गेली होती.

परत आल्यावर जीवन ने तिला एका घरात आणले बांधीव घर होते एकच खोली ,एकच दार, तिला तिथे सोडून बाहेरून कुलूप लावून हा निघून गेला. आजूबाजूला वस्ती पण दिसत नव्हती.

स्मिताला हे काही कळेचना तिने जीवनला विचारले इथे का आणले आहेस तुझा मोठा फ्लॅट आहे ना तिथे घेऊन चल मला असे राहायची सवय नाही .ऐकायला तो आहे कुठे? गेला निघून 😇

मधेच येऊन काहीबाही खायला देऊन गेला. स्मिताच्या लक्षात आले ती पूर्णपणे फसली गेली आहे तिला आई बाबांचे शब्द आठवू लागले पण काहीच करता येईना रडून रडून नुसते हाल झाले पण आता करणार काय? तो रोज त्याला हवे तेंव्हा यायचा हिच्या शरीराचे लचके काढायचा भागले की निघून जायचा खायला मात्र द्यायचा तिच्यात ताकत राहण्यासाठी.

तिच्या शरीराची पार चाळण झाली पण तो थांबायला तयार नाही असेंच एके दिवशी त्या खोली जवळून एक बाई जाताना दिसली स्मिताने तिला हाक मारली आणि कहाणी सांगितली ती तिच्या नवऱ्याला घेऊन आली आणि दोघांनी मिळून कुलूप तोडून काढले आणि तिला तिच्या आईकडे नेऊन सोडले . मुलीला बघून तर आईवडील वेडेच व्हायचे राहिले फक्त .

त्यानी तिला जवळ घेऊन तिच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या तिच्यावर उपचार केले आणि पोलिसात तक्रार नोंदवली . काही दिवसांनी जीवन पकडला गेला पण तो इतका निर्दयी होता की त्याने सांगितले ही बया पहिलीच नाय माझ्या आयुष्यात धा तरी झाल्या असतील . स्मिताला भयंकर धक्का बसला तो असाच देखण्या मुली शोधून काढतो बहाण्याने त्यांना भुलवतो आणि हवा तसा अत्याचार करतो नंतर धमकी देतो घरच्यांना मारेन म्हणून त्यामुळे मुली कॅम्पलेंट करत नाहीत. हे ऐकून पोलिसांनी मार मार मारला आणि त्याला जबर शिक्षा द्यायचे काबुल केले.

स्मिताला यातून बाहेर पडायला तिच्या घरच्यांनी खुप खुप मदत केली. नंतर काही काळाने तिने मास्टर्स पूर्ण केले आणि वसा हाती घेतला मुलींच्या कॉन्सलिंग चा. शाळा, कॉलेज, क्लास, इथे ती मुलींना, मुलांना कोन्सलिंग करायची.

जे तिच्या बाबतीत झाले ते कोणाही बाबतीत होऊ नये अशी तळमळ तिच्या मनात होती .

खरेतर आता या गोष्टीला अनेक दिवस होऊन गेले पण स्मिताला तिच्या मानाच्या प्रश्नाचे उत्तरच मिळत नाहीये आपण प्रेमात इतके कसे आंधळे झालो🤔

टीप – मुलींनो प्रेमात जरूर पडा पण डोळे उघडे ठेवून.

– सौ विशाखा कित्तुर

==========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: