
आई SSSSSSS!! It’s Playing Time!!
जेव्हा मुलं अशी शिफारस करतात त्यावेळी आईकडून होकार मिळताच मुले पटकन खुश होतात… पण आज इथेच एका वेगळ्या विषयाची उत्पत्ती होते, खेळ म्हणता मुले पटकन मोबाइल घेतात आणि गेम सुरु करतात, मुलांची पटापट चालणारी बोटे पाहून अभिमान जरी वाटत असला तरी हा प्रश्न गंभीर आहे, आधी मैदानी खेळ खेळले जायचे. पकडापकडी,लपंडाव,टिपरी पाणी, कब्बडी,खो खो या मुळे शरीराची हालचाल होयची, एखाद्या च्या पाठी आपण जीव तोडून धावायचो आणि आऊट करताच आपल्याला जग जिंकल्याचा आनंद होयचा, असा आनंद मोबाइलवरच्या गेम मध्ये येतही असेल पण शरीराला घाम आणण्याची ताकद फक्त मैदानातच आहे.
खेळ आपल्या शरीराचा कस वाढवतो. मन प्रसन्न ठेवायला मदत होते. मुख्यतः आजराला लांब ठेवण्यात आपण यशस्वी होतो, मोबाइलला गेमिंग मुले लहान मुलांच्या डोळ्यावर परिणाम होत आहे. याच बरोबर सतत बसून खेळल्यामुळे पोटाचे विकार, मानेचे विकार जास्त होत आहेत.
आपण जशी जशी प्रगती करतोय त्याच बरोबर साथीचे आजार वाढत आहेत. अश्या काळात शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवणे महत्वाचे आहे, कोरोनामुळे जरी जास्त बाहेर जाऊ शकत नाही तरी मात्र शक्य होईल तितका व्यायाम आणि मैदानी खेळ काळजी घेऊन हा करायलाच हवा.
मैदानाची मज्जा जेव्हा लहान मुलांना समजेल तेव्हा आपोआपच मुळे मोबाइल पासून लांब होतील, आणि उद्याची पिढी जास्तीत जास्त सशक्त होईल, शेवटी जी मजा मनगटाला लाळ लावून Time Please म्हणण्यात आहे ती Game Pause करून निघून जाण्यात नाही…….
Playing time हा “Game playing time” नसून “Outdoor gaming time” होईला हवा…
======================
प्रिय वाचकहो आमच्या कथा तुम्हाला वाचायला आवडत असतील तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करून लेखकांना प्रतिसाद नक्की द्या. जेणेकरून नवोदित लेखकांना प्रेरणा मिळेल.
https://www.facebook.com/ritbhatmarati/
तसेच तुम्हालाही लिहायची आवड असेल तर आमच्याशी संपर्क साधा.
ritbhatmarathi@gmail.com
फोटो साभार – गूगल
आमची स्टोरी आमच्या/लेखकाच्या नावासकट शेयर केल्यास आम्हास काही हरकत नाही
=============
हेही वाचा
Post navigation

सारिका सोनवणे
नमस्कार मी सारिका. पुण्यातल्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयातून (COEP) संगणकाची पदवी घेतली. आणि गेली १० वर्षे आयटी मध्ये जॉब करते आहे. गेल्या १० वर्षांत आयटी मध्ये खूप काही शिकायला मिळालं. परदेशातही जायची बऱ्याचदा संधी मिळाली. पण आता १० वर्षे होऊन गेली आणि कुठंतरी मनात खोलवर रेंगाळत असलेली स्वप्ने जागी झाली आणि ठरवलं कि आता बास करायचं आणि स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा. वाचनाची पहिल्यापासूनच आवड होती. वाचता वाचता असं वाटलं आपणही लिहू शकतो आणि मग रीतभातमराठीच व्यासपीठ सुरु केलं. आणि हळू हळू स्वतःसोबत इतर लेखकांना जोडत गेले. लिखाणासाठी नवोदित लेखकांना रीतभातमराठीच्या माध्यमातून उत्तम व्यासपीठ मिळावं हीच सदिच्छा.