Skip to content Skip to sidebar Skip to footer

कृष्णाला नैवेद्य म्हणून छपन्न भोगच का दाखवतात?

56 bhog list: मित्रानो ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तीन परमेश्वराचे मुख्य अवतार. याच देवांनी पुढे सृष्टीच्या कल्यानाकरता अनेक रूपे घेतली आणि लोकांचे रक्षण केले. यातील भगवान विष्णूंनी भाद्रपद अष्टमीला कंस सारख्या राक्षसाचा वध करण्यासाठी कृष्ण रुपात अवतार घेतला. भगवान कृष्ण यांच्या चरित्राचा किंवा जीवनाचा अभ्यास केला तर लक्षात येईल की त्यांच्या इतक्या यातना दुसऱ्या कोणत्याही देवाला झाल्या नसतील.

भगवान कृष्ण हे भगवंताचे विष्णूचे रूप होते. भविष्यातील घटना जाणणारे होते सुदर्शन चक्र धारी होते तरीही त्यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक दुःख भोगली आणि त्यातूनही आनंदी कसे रहावे याचे उत्तम उदाहरण जगासमोर कायम केले.

त्यांचा जन्म खरतर देवकी मातेला बंदिवान केलेल्या तुरुंगात झाला आणि जन्मा नंतर लगेच त्यांना आई पासून दूर व्हावे लागले जेंव्हा बाळाला सगळ्यात जास्त गरज आईच्या मायेची तिच्या उबदार स्पर्शची असते.

तिथूनच खरतर त्यांच्यावर एकामागून एक संकटे यायला सुरुवात झाली आणि त्यांनी ती हसत हसत झेलली पण. त्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या बाल लीलांची एक वेगळीच छाप जगावर पाडली. लोणी चोरणे, गोपींची मटकी तोडणे, माता यशोदेला तोंड उघडून ब्रह्मांड दाखवणे किंवा मग राधे सोबत केलेली रासलीला काय आणि कंसाच्या रुपात आलेल्या संकटातून ब्रीज वसियांचे रक्षण करणे काय सगळेच खूप अद्भुत आणि अविस्मरणीय ठरले. या सगळ्या मागे काही खास कारणे होती हा भाग वेगळा पण त्यांच्या लीला अद्भुत होत्या.

अपार दुःख भोगून कायम आनंदी कसे रहावे हे शिकवते कृष्णाचे जीवन. भगवान कृष्ण तर परम ईश्वर असून त्यांना त्रासातून सुटका मिळाली नाही तर मग आपण तर साधी माणसं. आपल्याला जरा दुःख झालं की आपण त्या विधात्या कडे गाऱ्हाणे घेऊन जातो आणि निवारण कर म्हणून कशाचे तरी आमिष दाखवतो. हे पाहून त्या ईश्वराला पण हसू येत असेल ना.

असो, आज आपण भगवान कृष्णाला प्रसाद म्हणून ५६ भोग का देतो आणि त्या मागची रंजक कारणे आणि कथा बघणार आहोत.

५६ भोग म्हणजे भगवान कृष्णसाठी केलेले ५६ प्रकारचे अन्न पदार्थ किंवा व्यंजन. त्यालाच ५६ भोग असे म्हणतात.

भात, सूप (डाळ), प्रलेह (चटनी), सदिका (कढी), दधिशाकजा (दह्याची शाकाची कढी), सिखरिणी (शिकरण), अवलेह (सरबत), बालका (बाटी), इक्षु खेरिणी (मोरब्बा), त्रिकोण (शर्करा युक्त), बटक (वडा), मधु शीर्षक (मठरी), फेणिका (फेणी), परिष्टाश्च (पूरी), शतपत्र (खजला), सधिद्रक (घेवर), चक्राम (मालपुआ), चिल्डिका (चोला), सुधाकुंडलिका (जिलबी), धृतपूर (मेसू), वायुपूर (रसगुल्ला), चन्द्रकला (पाकातली), दधि (महारायता), स्थूली (थुली), कर्पूरनाड़ी (लवंगपुरी), खंड मंडल (पाकातले शंकरपाळे), गोधूम (सांजा), परिखा, सुफलाढय़ा (बडीशेप युक्त), दधिरूप (बिलसारू), मोदक (लाडू), शाक (साग), सौधान (लोणचे), मंडका (मोठ), पायस (खीर), दधि (दही), गोघृत, हैयंगपीनम (लोणी), मंडूरी (साय), कूपिका, पर्पट (पापड), शक्तिका (सीरा), लसिका (लस्सी), सुवत, संघाय (मोहन), सुफला (सुपारी), सिता (वेलची), फळं, तांबूल, मोहन भोग, लवण, कषाय, मधुर, तिक्त, कटु, अम्ल।

आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हे भोग ५६ च का ?? त्याहून कमी किंवा जास्त का नाहीत ?? तर पाहूया.

सहा रस किंवा स्वाद अर्थात कडू, तिखट, कसैला, अम्ल, खारट आणि गोड याच्या मेळ करून 56 प्रकाराचे व्यंजन तयार करता येतात. 56 भोग अर्थात ते सर्व पदार्थ जे देवाला अर्पित करता येतात

पौराणिक कथेनुसार, आई यशोदा लहानपणी दिवसातून 8 वेळा कान्हाला खाऊ घालत असे. एकदा गावात चांगल्या पावसाची इच्छा पूर्ण करण्यासाठी नंद बाबा आणि सर्व लोकांनी मिळून इंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक मोठा कार्यक्रम आयोजित करत होते. हा प्रसंग कान्हाला कळल्यावर तो म्हणाला की, पावसासाठी पूजा करायची असेल तर गोवर्धन पर्वताची पूजा करा, इंद्रदेवाची नाही, त्यामुळे फळे, भाजीपाला मिळेल आणि जनावरांना चारा मिळेल. हे ऐकून भगवान इंद्र चिडले आणि त्यांनी खूप पाऊस पडायला सुरुवात केली.

तेंव्हा पावसापासून ब्रीज वासियंचे रक्षण करण्यासाठी भगवान कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि त्याखाली सगळ्या लोकांना सुरक्षित ठेवले. सात दिवस सतत पाऊस पडत होता त्यामुळे भगवान कृष्णाने सात दिवस अन्नच काय पण पाणी ही घेतले नाही. आठव्या दिवशी पाऊस थांबला तेंव्हा सगळे गोवर्धन पर्वता बाहेर आले. दिवसातून आठ वेळा जेवणारे भगवान कृष्णाला उपाशी रहावे लागले याचे माता यशोदेला आणि सगळ्या च ब्रीज वासियांना खूपच वाईट वाटले. त्यामुळे सगळ्यांनी सात दिवसांचे आठ वेळेच्या हिशोबाने 56 भोग अर्पण करण्याची परंपरा कशी सुरू झाली.

56 संख्या आहे 56 भोग. पौराणिक मान्यतेप्रमाणे गोलोकात श्रीकृष्ण राधा सोबत एका दिव्य कमळावर विराजित होते, ज्या कमळावर ते विराजित होतात त्या कमळाच्या 3 थरांमध्ये 56 पाकळ्या असतात. प्रथम थरात 8, दुसर्‍यात 16 आणि तिसर्‍यात 32 पाकळ्या असतात. आणि प्रत्येक पाकळीवर एक प्रमुख सखीसह मध्ये प्रभू विराजित असतात. येथे 56 संख्येचा हाच अर्थ आहे. 56 भोगामुळे श्रीकृष्ण आपल्या सखींसह तृप्त होतात.

४.३. ५६ भोग तृतीय आख्यायिका

श्रीमद्भागवत कथेनुसार कृष्णाच्या गोपिकांनी त्यांना पती रूपात प्राप्त करण्यासाठी 1 महिन्यापर्यंत यमुनेत सकाळी फक्त स्नान केले तर कात्यायिनी देवीची पूजा -अर्चना देखील केली. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांची मनोकामना पूर्तीसाठी सहमती दर्शवली. तेव्हा व्रत समाप्ती आणि मनोकामना पूर्ण झाल्यावर गोपिकांनी 56 भोगाचे आयोजन केले होते.

या काही कारणांमुळे श्री कृष्णाला ५६ च भोग देण्याची प्रथा आहे.

=========================

नमस्कार वाचकहो🙏🙏,

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आवड असूनही आपले छंद आपल्याला जोपासता येत नाही. आवड असूनही पुस्तकं वाचता येत नाही. त्यामुळे वेळेअभावी आपल्यासारखे खूप सारे वाचक वाचनापासून वंचित राहतात. आणि म्हणूनच वाचकांना कुठेही सहज वाचता येतील असा कथासंग्रह आम्ही रीतभातमराठी ह्या डिजिटल व्यासपीठावर घेऊन आलो आहोत.

उत्कृष्ट लेखकांनी लिहिलेल्या marathi katha, marathi moral story, marathi stories, marathi short stories, bodh katha marathi मध्ये आपल्याला रीतभातमराठीवर वाचायला मिळतील.

Leave a Comment

error: