Skip to content Skip to sidebar Skip to footer

हे परिधान केल्याने सौंदर्य तर वाढतेच शिवाय आरोग्यदायी लाभ होतात असे काय आहे? जाणून घेऊया …

16 Shringar List:

ज्याच्या शिवाय स्त्रियांचे सौंदर्य अपूर्ण तर आहेच, शिवाय हे परिधान केल्याने सौंदर्य तर वाढतेच शिवाय आरोग्यदायी लाभ होतात असे काय आहे ? जाणून घेऊया ……

नटने मुरडणे हा तर स्त्रियांचा जन्मसिद्ध अधिकारच असतो. स्त्रिया उपजतच दिसायला सुंदर असतात. त्यात नटून थटून छान मेकअप करून तयार झाल्या तर त्यांच्या सौंदर्यात कमालीची भर पडते. बहुतांश स्त्रियांना नटण्याची खूपच हौस असते. त्या फक्त नटण्यासाठी निमित्त शोधत असतात.

ज्या शृंगाराशिवाय स्त्रियांचे सौंदर्य अपूर्ण आहे, जे शृंगार स्त्रियांच्या आयुष्यातील प्रिय व्यक्ती, सुखी कौटुंबिक जीवन आणि त्यांचे दीर्घायुष्य जपण्यास मदत करतात, केवळ पुराणातच नाही तर आयुर्वेदातही या शृंगाराना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे त्या सोळा शृंगाराविषयी आज जाणून घ्या.

हे सोळा शृंगार चंद्राच्या सोळा टप्प्याशी संबंधित आहेत. सोळा शृंगार म्हणजे एक संस्कृतिक विधी आहेत. हा विधी केवळ स्त्रियांच्या सौंदर्याशी निगडित नाही तर रोजच्या उपजिविकेत भर घालतो. तर काही दागिने दुष्ट आत्म्यापासून किंवा शक्तिंपासून स्त्रियांचे रक्षण करतात.

जाणून घ्या लग्नात सात फेरेच का असतात? सप्तपदीचे महत्व काय आहे?

लग्न आणि त्याच्याशी निगडीत अशा परंपरा ऐकून हसाल, घाबराल नाहीतर थक्क व्हाल….

केस हा स्त्रियांच्या सौंदर्यातील अतिशय महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच स्त्रीचे सौंदर्य तिच्या केसात असते असे म्हणतात. केसांना स्त्रियांचा दागिना म्हटले जाते. केसात गजरा किंवा फुले माळल्यामुळे त्यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. हा गजऱ्याचा किंवा फुलांचा सुगंध मनाच्या आरोग्यावर चांगला परिणाम करते. शिवाय मन प्रसन्न आणि आनंदी ठेवते.

बिंदी डोक्याच्या मध्यभागी लावल्याने तिसरा डोळा जागृत होतो. त्यामुळे स्त्रियांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. शिवाय बिंदी लावण्याचा स्त्रियांच्या शरीरावर मनोवैज्ञानिक परिणाम होतो. बिंदी लावल्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास वाढतो आणि मन शांत रहाते.

सिंदुर लावल्यामुळे स्त्रियांचा चेहरा विलक्षण सुंदर दिसतोच. पण शरीरशास्त्रानुसार जिथे सिन्दुर लावला जातो ती जागा खूपच मऊ असते. ही जागा ब्रह्मरंध्र आणि अहिम नावाच्या मर्मस्थळाच्या अगदीच वर असते. तिथे सिन्दुर लावल्यामुळे त्या भागाचे रक्षण होते. तसेच सिन्दुर मधील काही घटक चेहऱ्यावरील सुरकुत्यांचा प्रभाव कमी करतात आणि शरीरातील विद्युत उत्तेजनावर नियंत्रण ठेवतात.

मंगळसूत्र हे सौभाग्याचा अलंकार म्हणून ओळखले जाते. हे अंगात घातल्याने मंगळसूत्र आणि मण्यांमधून बाहेर येणारे वारे स्त्रियांची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. आयुर्वेदनुसार गळ्यात सोनेरी धातू घातल्याने छाती आणि हृदय निरोगी रहाते. शिवाय त्यातील काळे मणी स्त्रियांचे वाईट नजरेपासून रक्षण करतात.

कानाच्या खालच्या भागात एक बिंदू असतो. ज्याद्वारे डोळ्यांच्या नसा म्हणजेच शिरा जातात. कानाच्या या बिंदूला छेदल्यावर आणि कानातले घातल्यावर दृष्टी वाढण्यास मदत होते. त्यामुळे कानातले घातल्यावर दृष्टी सुधारते.

बांगड्या जेंव्हा हाताच्या मनगटावर आदळतात तेंव्हा रक्तप्रवाह सुधारतो. तसेच स्त्रियांच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात बांगड्या.

हा बाजूबंद हातावर असलेल्या केंद्रावर दबाव आणतो ज्यामुळे स्त्रिया खूप काळ सुंदर आणि तरुण राहतात.

हा कमरेत बांधल्यावर कंबर खूप आकर्षक दिसून येते. स्त्रियांच्या हलाचाली सोबत लयीत हालचाल करणारा कंबरपट्टा आकर्षणाचे केंद्र ठरतो. हा दागिना घातल्याने हर्नियाचा धोका कमी होतो.

लहान मुलींच्या पायातील घुंगरांचे पैंजण किती लक्षवेधी ठरते ना ?? पावलाबरोबर होणारा छुम छुम आवाज वेगळाच गोडवा देतो. तसेच स्त्रियांच्या पायातील पैंजनामुळे गोरे गोरे पाय जास्तच उठून दिसतात. हे पैंजण पायातून बाहेर पडणारी भौतिक विद्युत ऊर्जा जपते. तसेच पोट आणि खालच्या अंगात चरबी होण्यास प्रतिबंध करते. पैंजणाचे पायात घर्षण होत असल्याने पायांची हाडे मजबूत होतात.

हे अक्युप्रेशर उपचार पद्धतीवर काम करते. मज्जासंस्था आणि शरीराच्या खालच्या भागाचे स्नायू याने मजबूत राहतात. हे पायाच्या एका विशिष्ठ शिरेवर दबाव टाकत जे गर्भाशयात योग्य प्रकारे रक्त परिसंचरण करते आणि चांगल्या गर्भधारणेस मदत करते.

आजकाल नथ अनेक प्रकारात पाहायला मिळतात. नाजूक नथ नाकात खूप गोड दिसते आणि सौंदर्यात भर टाकते. आपण जिथे नथ घालतो त्या ठिकाणी एक प्रकारचा एक्यूप्रेशर पॉइंट असतो, ज्यामुळे प्रसूतीच्या वेळी वेदना कमी होते.

आपण ज्या बोटात अंगठी घालतो ती सरळ हृदयाशी जोडलेली असते. बोटांत अंगठी घातल्याने आळस आणि सुस्ती कमी होते. नवा उत्साह संचारतो.

कोणत्याही समारंभात आवर्जून मेहंदी काढली जाते. रंगलेल्या मेहांदीचे हात फारच छान दिसतात. लग्नात तर मेहांदीचा एक वेगळा कार्यक्रम असतो. ओल्या मेहंदीचा वास मन प्रसन्न करणारा असतो. मेहंदी लावल्याने उष्णता कमी होते. मेहंदी तळवे सुशोभित करते तसेच शरीर थंड ठेवते. तसेच त्वचारोग बरे करण्यास मदत करते.

काजळ डोळ्यांना थंडावा देते. आपले डोळे अजुनच आकर्षक दिसतात आणि डोळ्यांशी संबंधित अनेक समस्या दूर होतात.

महावर हा सोळा शृंगारापैकी एक शृंगार आहे. याच्याशिवाय शृंगार अपूर्ण मानले जातात. महावर हा कुंकाने दोन्ही पायांवर काढला जातो. दोन्ही पाय ओल्या कुंकाने चारही बाजूंनी रंगवले जातात. याला सौभाग्याची खूण मानले जाते. यामुळे पायाचे आणि पर्यायाने स्त्रियांचे सौंदर्य खुलून येते. लग्नात मुलींच्या पायावर हे काढले जाते.

डोक्याच्या मध्यभागात लावलेला टीका सौंदर्य वाढवतो. तसेच मेंदूशी संबंधित कार्ये संतुलित आणि नियमित ठेवतो.

तर या सोळा शृंगारामुळे सौंदर्य तर खुलून दिसतेच पण आरोग्यही उत्तम रहाते. त्यामुळे नेहमीच हे शृंगार करायला हरकत नाही.

=============

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Leave a Comment

error: