Ritbhatmarathi

Search
Close this search box.

माहित आहे का? रिफाईंड तेल आरोग्यासाठी खूप घातक आहे. उत्तम आरोग्यासाठी आजच आहारात हे कूकिंग ऑइल समाविष्ठ करा (which cooking oil is good for health)

which cooking oil is good for health: आपली भारतीय खाद्यसंस्कृती तेलाशिवाय अपूर्ण आहे. जेवण बनवताना आपण तेल हा घटक प्रामुख्याने वापरतो. जेवणात तेलाचा वापर जितका जास्त तितके जेवण चविष्ट असे मानले जाते बऱ्याच ठिकाणी. पण आपण जे तेल वापरतो ते कोणत्या प्रकारचे आहे,किती वापरावे,त्यातील घटक कोणते,त्याचे गुणधर्म,फायदे याचा फारसा विचार आपण करत नाही. आपण फक्त पदार्थावर असलेला तेलाचा तवंग आणि चव इतकाच विचार करतो आणि ताव मारत पोटभर खातो. तेल जसे जेवणात महत्त्वाचे आहे तसेच ते आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे पण त्यासाठी योग्य आणि पोषण देणाऱ्या तेलाचा प्रमाणात वापर होणे खूप गरजेचे आहे.

सगळ्याच तेलात फॅट्स म्हणजेच प्रथिने खूप असतात.जसे की saturated, mono-saturated आणि poly-saturated फॅटी एसिड. आपले मानवी शरीर हे प्रथिने जास्त प्रमाणात पचवू शकत नाही कारण त्यामुळे हृदयविकार आणि रक्तदाब सारख्या आजारांचा धोका संभवतो. ब्रिटन सरकारच्या मार्गदर्शनानुसार पुरुषांनी दिवसभरात ३० ग्रॅम आणि महिलांनी दिवसभरात फक्त २० ग्रॅम तेलाचा वापर करायला हवा,यापेक्षा जास्त तेल आहारात घेणे टाळले पाहिजे.

————————

तेलामधील फॅट्स हे फॅटी एसिड या कणांने बनलेले असतात,हे एसिड जर सिंगल बॉन्डने जोडले असतील तर त्यांना saturated फॅट्स म्हणतात आणि डबल बॉण्डने जोडले असतील तर unsaturated फॅट्स असे म्हणतात. छोट्या साखळीने बांधलेले हे एसिड थेट रक्तात विरघळतात,रक्तात मिसळू शकतात आणि शरीराला असलेली ऊर्जेची गरज त्यांच्यामुळे पूर्ण होते पण हेच एसिड जर लांब साखळीने जोडले गेले असतील तर फॅटी एसिड थेट यकृतात जातात त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते जे शरीरास घातक ठरते.

जेवणात बरेच लोक रिफाइंड म्हणजेच शुद्ध तेलाचा वापर करतात पण या तेलाला शुध्द करताना केमिकल्सचा वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का ?

जरा सविस्तर माहिती घेऊया रिफाईंड तेल शरीरास कसे घातक आहे याची :

रीफाइंड तेल शुध्द करताना आधी ३०० डिग्रीसेल्सिअस या उच्च तापमानावर उकळले जाते आणि नंतर ४६४ डिग्रीसेल्सिअस या तापमानावर उकळले जाते. या प्रक्रियेत दोनदा तीनदा तेल उकळल्याने अनावश्यक घटक तेलात समाविष्ट होतात जे मानवी शरीरास अपायकारक ठरतात असे आरोग्य तज्ञ अभिषेक मिश्रा म्हणतात. त्यामुळे याचा अतिवापर शरीरासाठी घातक आहे. या तेलाच्या नेहमीच्या वापरामुळे शरीरातील चरबी वाढते आणि हृदयविकार सारख्या गंभीर आजारांचा धोका संभवतो. यातील केमिकल्स शरीरास हानी पोहचवतात,याच्या अती सेवनाने शरीरात ब्लॉकेज होतात आणि वात विकार असंतुलित राहतात.

-अनेक प्रकारचे घातक केमिकल्स वापरल्या शिवाय हे तेल तयार होत नाही.

-सिंगल रिफाइंडसाठी Gasoline, Synthetic Antioxidants, Hexane अशी घातक केमिकल्स वापरली जातात.

-याचा वास येत नाही,कारण यात एकही प्रोटीन शिल्लक रहात नाही.

-यातील फॅटी एसिड आधीच बाहेर काढले जात असल्यामुळे तेलाला चिकटपणा नसतो.

-यामध्ये व्हिटॅमिन ई आणि मिनरल नसतात.

मग आपल्या शरीरास योग्य तेल कोणते, त्याचे प्रमाण किती असावे आणि आपल्या खिशाला ते परवडेल का ?? चला बघुया.

आपल्या शरीरास उपयुक्त असलेल्या तेलापैकी ऑलिव्ह ऑईल हे एक तेल आहे. हॉवर्ड विद्यापीठात टी.एच चेन शाळेतील पब्लिक हेल्थ मध्ये एक संशोधन करण्यात आले होते, तेंव्हा ऑलिव्ह ऑईलचे सेवन करत असलेल्या एक लाख लोकांचा २४ वर्षे अभ्यास करण्यात आला आणि त्यांच्या संशोधनानुसार तेथील शास्त्रज्ञ मार्ट गोष फेरे यांच्या म्हणण्ाप्रमाणे ऑलिव्ह ऑईलचे जेवण बनवण्यात वापर करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका १५% कमी झाल्याचे निदर्शनास आले तसेच याचा वापर केल्याने शरीरास धोकादायक ठरणाऱ्या फॅटी एसिड पासून दूर रहाता येते.
कारण ऑलिव्ह फोडून त्यातील आतल्या भागातून ऑलिव्ह तेल काढले जाते आणि त्यामुळेच हे तेल सगळ्यात जास्त आरोग्यदायी मानले जाते.

पोटातील जंतुसाठी हे फायदेशीर असते.
शिवाय कर्करोग आणि मधुमेह सारख्या गंभीर आजारांपासून हे तेल संरक्षण करते.

  • ऑलिव्ह ऑइल मध्ये असलेले मोनोसा फॅटी एसिड असते त्यामुळे ते शरीरास फायदेशीर ठरते.
  • ऑलिव्ह ऑईल मध्ये vitamins, minerals, polyphenols आणि झाडांत आढळणारे मायक्रो nutrient असतात जे शरीराला योग्य ते पोषण देतात.

इतके पोषण देणारे हे तेल महाग असेल असेच वाटले असेल ना तुम्हाला पण याची किंमत केवळ १९९ रू प्रती लिटर अशी आहे.

लाकडी घाणा वापरून काढलेले शेंगदाणा तेल हे कोणतेही केमिकल्स न वापरता पूर्णपणे नैसर्गिक आणि शास्त्रीय पद्धतीने तयार केले जाते. हे तेल तेलबियांवर भर किंवा दाब देऊन काढले जाते. तेल काढताना घाणा एका मिनिटात फक्त चौदा वेळा फिरतो ,त्यामुळे यातील एकही नैसर्गिक घटक नष्ट होत नाही. शुद्ध तेलाला पर्याय म्हणून हे तेल एक उत्तम पर्याय आहे.

  • या तेलात सर्व प्रकारचे फॅट्स असतात.
  • यात नैसर्गिक अँटी ऑक्सिडेंट्स असल्यामुळे शरीरात तयार होणारे मोकळ्या पेशींचा समूह रोखला जातो आणि कर्करोग पासून बचाव होतो.
  • तसेच या तेला मुळे शरीरात वाहणारे कलेरेस्तोल कमी होण्यास मदत होते.

याची किंमत १६८ रू प्रती लिटर इतकी आहे.

हिजाब आणि मग किताब असा संभ्रम का?

गड आला पण सिंह गेला” असे उद्गार शिवाजी महाराजांच्या तोंडातून का निघाले

करडईचे तेल आहारात वापरावे. याचेही शरीराला खूप फायदे होतात कारण आवश्यक असलेली सगळी पोषणतत्वे यात समाविष्ट असतात. शिवाय हे तेल फार महाग नसून याची किंमत २००-२२० प्रती लिटर इतकी आहे.

  • वजन कमी करण्यासाठी मदत करते.
  • पेशींचे आवरण मजबूत करण्यासाठी मदत करते. त्यामुळे पेशींमध्ये विषारी घटकांस आत जाण्यास मज्जाव होतो.
  • रोगप्रतिकरकशक्ती वाढते.
  • रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांसाठी फायदेशीर ठरते.

आपल्याला शक्य असेल तर सेंद्रिय रेफाइंड न केलेले वनस्पती तेल वापरावे. कच्चे तेल वापरायचे असेल तर शुद्ध ऑलिव्ह ऑईल च वापर करा पण या तेलाचा उपयोग अन्न शिजवण्यासाठी करू नका.
याची किंमत २००-२२० रू प्रती लिटर इतकी आहे.

हे तेल दोन प्रकारचे असते. शुद्ध आणि शुद्ध न केलेले. हे तेल तयार केलेल्या अन्नाला सुगंध देते.

  • या तेलात विरघळणारे anti-oxidants जे मोकळ्या पेशींची निर्मिती थांबवते.
  • या तेलात कोलेस्ट्रोलची पातळी कमी करण्याचा गुणधर्म असतो.
  • हे तेल नस आणि हाडांच्या रोगांवर फायदेशीर आहे.
  • रक्तप्रवाह सुरळीत करून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास हे तेल मदत करते.
  • पोटाशी निगडित कोणत्याही समस्येवर हे तेल रामबाण उपाय आहे.
  • याच्या नेहमीच्या वापराने ताण तणावावरही मात करता येते.
  • या तेलात कॅल्शिअमचे प्रमाण जास्त असल्यामुळे सांधेदुखी आणि वात यावर उपयोगी आहे.

कच्च्या तिळाचे तेल आपण वापरत असाल तर त्याची किंमत १४०-१५० आणि धुतलेल्या म्हणजेच वॉश केलेल्या तिळाची किंमत १६५-१७० प्रती लिटर आहे.

आपल्या भारतीय खाद्य संस्कृती मध्ये या तेलाचा आवर्जून वापर केला जातो. हे तेल आरोग्यासाठी फायदेशीर तर आहेच शिवाय सौंदर्यवर्धक सुद्धा आहे. यातील पोषक तत्वांमुले त्वचेचे आणि शरीराचे योग्य पोषण होते. याशिवाय केसांच्या वाढीसाठी,तसेच केसांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी याची मदत होते.

Rash म्हणजेच अलर्जी पासून सुटका :
या तेलात anti-fungal आणि anti-bacterial गुणधर्म असतात त्यामुळे त्वचेवरील आलार्जी दूर करण्यासाठी मदत होते. यासाठी मोहरीच्या तेलात खोबरेल तेल मिसळून मसाज करा.

सनस्क्रीम :
उन्हापासून संरक्षण करण्यासाठी याहून दुसरा उत्तम आणि परिणामकारक उपाय असूच शकत नाही. यात असलेले व्हिटॅमिन ई सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते आणि सूर्कुत्यांवर सुद्धा परिणामकारक ठरते.

त्वचा उजळण्यासाठी :
त्वचा उजळण्यासाठी आवश्यक असलेले गुणधर्म या तेलात असतात. मोहरीच्या तेलामळे त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही यासाठी मोहरी तेल खोबरेल तेलात मिसळून चेहऱ्यावर लावा यामुळे त्वचा विकार दूर होतील शिवाय मसाज केल्यामुळे रक्तप्रवाह सुधारून त्वचा उजळ होईल.

केसांच्या तक्रारीसाठी :
केस कोरडे होणे,खाज येणे,केस गळणे,कोंडा या सगळ्यांवर मोहरीचे तेल खूप गुणकारी आहे. यासाठी आठवड्यातून एकदा मोहरीचे तेल कोमट करून केसांना मसाज करा आणि अर्ध्या तासाने शाम्पू लावून धुवून टाका याने केसांच्या समस्या दूर होतील आणि केस चमकदार होतील.

याची किंमत २०८ रू प्रती लिटर आहे.

तर अशा आरोग्यास हितकारक तेलांचा जेवण बनवताना वापर करा आणि आरोग्यदायी जीवन जगा.
मस्त खा आणि स्वस्थ रहा.

=====================

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *