Ritbhatmarathi

Search
Close this search box.

नाशिक जिल्ह्यातील वणी येथे सप्तशृंगी देवीचा गड आहे.पुराणात उल्लेख असलेल्या १०८ देवींच्या शक्तिपीठांपैकी वणी हे अर्धपीठ आहे.ब्रह्मदेवाच्या कमंडलूमधून निघालेल्या गिरीजा मातेचं रूप म्हणजे सप्तशृंगी देवी असे मानले जाते.देवीचे अष्टभुजा रूप येथे आपल्याला पाहावयास मिळते.आठ फूट उंची असलेली देवीची मूर्ती ही स्वयंभू आहे.मूर्ती पूर्णपणे शेंदुराने लिंपलेली आहे देवी सप्तशृंगीच्या हातामध्ये वेगवेगळी आयुधे आपल्याला दिसतात. सप्तशृंगी देवी या पर्वतावर कशी काय आली याची आख्यायिका पुराणात सांगितलेली आहे साडेतीन पीठांपैकी सप्तशृंगी माता हे अर्धे शक्तीपीठ आहे. जाणून घ्या सप्तशृंगी (saptashrungi) देवीची संपूर्ण माहिती. सप्तशृंगी पर्वत नेमका कसा काय अस्तित्वात आला याचीही एक आख्यायिका पुराणात सांगितलेली आहे.

सप्तशृंगी पर्वत नेमका कसा काय अस्तित्वात आला याचीही एक आख्यायिका पुराणात सांगितलेली आहे.रामायणात म्हणजेच त्रेतायुगात ज्यावेळी राम आणि रावण या दोघांमध्ये युद्ध झाले तेव्हा त्या युध्याच्या वेळी लक्ष्मण ज्यावेळी इंद्रजिताच्या शस्त्राने मूर्च्छित झाले त्यावेळी हनुमानाने जो द्रोणागिरी पर्वत उचलून आणला त्या पर्वताचा थोडासा भाग जिथे पडला तोच पर्वत आज आपण सप्तशृंग पर्वत म्हणून ओळखतो आहोत.नाथ संप्रदायामध्येही नवनाथ भक्तिसार या पोथीत दुसऱ्या अध्यायात या पर्वताचे वर्णन केले आहे.

महादेव आणि श्रीदत्त गुरु भ्रमण करत असताना त्यांनी शाबिरी विद्येची खरी सुरुवात याच पर्वतावरून केली आहे कारण देवी जगदंबा मच्छिन्द्रनाथांना विद्या आत्मसात करण्याची इच्छाशक्ती प्रदान करते म्हणूनच नाथसंप्रदायामध्ये सप्तशृंगार गडावरून या शाबिरी विद्येची सुरुवात पहिल्यांदा झाली अशी कथा आहे. सप्तशृंगी पर्वताबद्दल सांगायचे झाल्यास नाशिकपासून ६५ किमी अंतरावर कळवण तालुक्यात सप्तशृंगी गड आहे.देवीचे मंदिर सात शिखरांनी वेढलेले असून समुद्रसपाटीपासून ४६५९ फूट उंचीवर आहे.

सप्तशृंगी देवी हे रूप देवीला धारण करावे लागले याचीही आख्यायिका पुराणात सांगितलेली आहे.ज्यावेळी भगवान शंकराच्या वराने उन्मत्त झालेला महिषासुर नावाचा दैत्य सर्व देवांना मिळालेल्या वराने हैरान करून सोडत होता त्यावेळी सर्व देव त्रिदेवांकडे म्हणजेच ब्रह्मा,विष्णू आणि शंकर यांच्याकडे मदतीची याचना करण्यासाठी गेले यावेळी तिन्ही देवांनी आपले सामर्थ्य एकवटून एक तेज निर्माण केले ते तेज अंबेच्या रूपाने पृथ्वीतलावर अवतरले आणि याच काळात महिषासुर सप्तशृंग गडाच्या जवळ होता.

‘कुठल्याही पुरुषाकडून आपल्याला मरण नाही ‘ या वराने मग्रूर असलेला महिषासुर मात्र देवीच्या म्हणजे साक्षात अंबेच्या रूपात त्याचा मृत्यू निश्चित होता.म्हणूनच महिषासुराचा वध हा देवी सप्तशृंगीने याच गडावर केला आणि सर्व देवांना महिषासुराच्या जाचातून मुक्त केले.या गडाला चारशे बहात्तर पायऱ्या आहेत.

गडाच्याच पायथ्याशी नांदुरी हे गाव आहे.याच गडाच्या शिखरावर नांदुरी हे गाव आहे.गडाच्या शिखरावर विविध वनस्पती आढळतात गडावर कालीकुंड,सूर्यकुंड,दत्तात्रय कुंड अशी कुंड आढळतात.गडाचा पूर्व भाग हा खोल दराने वेढलेला असून तेथे मार्कंडेय डोंगर आहे.याच ठिकाणी दुर्गासप्तशतीची रचना केली गेली आहे. .आता गडावर असणाऱ्या विविध कुंडांबद्दल आपण माहिती घेऊयात कारण प्रत्येक कुंडाची अशी काही ना काही वैशिष्ट्येय आहेत –

हे कुंड गडावर पेशव्याच्या छत्रसाल ठोकेनी बांधली आहेत.पूर्व दिशेला दाजीबा मंदिरापासून जवळच हि कुंडे आहेत.

कपारीमध्ये जलगुंफा आणि शिवतीर्थ नावाचे कुंड आहेत हि गुंफा देवीच्या लत्ताप्रहारांन निर्माण झाली असल्याने त्यात पाण्याचा साठा आहे असे मानले जाते आणि त्यालाच जलगुंफा असे म्हणतात.

देवीने ज्यावेळी पानाचा विडा खाल्ला आणि विडा खाऊन झाल्यावर ते ज्या ठिकाणी थुंकली त्याचे कुंड तयार झाले त्यालाच तांबूल तीर्थ असे म्हणतात, तिथले पाणी हे लाल रंगाचे असते.

या कुंडामध्ये देवीने आपले काजळ घातलेले डोळे धुतले म्हणून हे पाणी काळसर रंगाचे दिसते.

शिवालयापासून जवळच शितकडा आहे.येथील दारी बाराशे फूट खोल आहे. या काद्यालाच शितकडा किंवा सतीचा कडा असेही म्हणतात.एखादी वस्तू जर कड्यावरून पडली तर तिचे शितासारखे तुकडे होतात म्हणून या कड्याला शितकडा असे म्हणतात.या शीतकड्यासमोरच मार्कंडेय पर्वत आहे.सप्तशृंगी ट्रस्टच्या कार्यालयापासून महाकालेश्वर मंदिराकडे जाता येते.महाकालेश्वर मंदिर हे पूर्ण काळ्या खडकात बांधेलेलं असून गुजरातमधल्या धर्मपुरी इथल्या राजाने ते महाकाळेश्वराचे मंदिर बांधलेले आहे.

सप्तशृंगी देवी हि शृंग वंशातला राजा हर्षवर्धनची पत्नी होती.याच देवीबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात.महाकाली,महालक्ष्मी,महासरस्वती या तिन्ही देवींचे परब्रम्हस्वरूपिणी रूप म्हणजे माता सप्तशृंगी देवी असे मानले जाते.एक आख्यायिका अशीही सांगितली जाते पूर्वी दक्ष राजाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला.या यज्ञात भगवान शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावण्यात आले.शिवपत्नी सती मात्र या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. या यज्ञात शंकराला योग्य तो मान दिला गेला नाही.

त्यामुळे सतीने म्हणजेच पार्वतीने रागाने यज्ञात उडी घेतली.शंकराला हे कळल्यानंतर रागाने यज्ञाचा विध्वंस केला.माता पार्वतीचा देह हातात घेऊन भगवान शंकर त्रैलोकात हिंदू लागले.ही स्थिती पाहून भगवान विष्णूने सुदर्शन चक्र सोडले आणि माता पार्वतीच्या शरीराचे ५१ तुकडे झाले आणि हेच ५१ तुकडे ज्या-ज्या ठिकाणी पडले तेच ५१ आदिशक्तिपीठं म्हणून आजही ओळखली जातात. सप्तशृंग याचा अर्थ सात शिखरे म्हणजेच या गडावर सात देवींचा वास आहे नारसिंह,इंद्राणी,वाराही,कार्तिकेयी,चामुंडा आणि शिवा या सात देवता,या सर्वांची थोरली जगदंबा म्हणजेच सप्तशृंगी असेही म्हंटले जात.

महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर माहिती व इतिहास

जाणून घ्या महाराष्ट्रातील देवींचे साडेतीन शक्तिपीठे आणि त्यांचा इतिहास

Source

सप्तशृंगी देवीला अकरा वार साडी लागते आणि चोळीला तीन खण लागतात. डोक्यावर सोन्याचा मुकुट,कर्णफुले,नथ,गळ्यात मंगळसूत्र आणि पुतळ्याचे गाठले आहे त्याचप्रमाणे कमरपट्टा आणि पायात तोडे असे शृंगारिक रूप देवीचे आहे.

संत निवृत्तीनाथांना श्रीगुरु  गहिनीनाथांकडून महान असा नाथ परंपरेचा वारसा लाभला होता संत निवृत्तीनाथ हे नाथपरंपरेचे शिष्य होते हा गुरुपरंपरेचा वारसा आपल्या भावंडाना  देण्याची  गुरूंची  आज्ञा  असल्याने आपल्या भावंडाना उपदेश करून आपले शिष्य बनवले. .गुरुपरंपरेने मिळालेले सगळे ज्ञानभांडार निवृत्तीनाथांनी आपल्या भावंडाना देऊन टाकले आणि स्वतः सर्वांमधून निवृत्त झाले आणि संजीवन समाधी घेतली पण समाधी घेण्याआधी निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरी पर्वतावर उपासना केली मगच समाधिस्थ झाले.

समाधी घेण्यापूर्वी  निवृत्तीनाथ सप्तशृंग गडावर मातेचे दर्शन घेतले होते म्हणून चैत्र नवरात्र उत्सवात मातेला खण,नारळ,साडी,चोळी असा कुळाचार दरवर्षी आळंदी देवस्थानाकडून मिळतो त्याचप्रमाणे खान्देशी बांधवांकडूनही मातेला साडी चोळीचा मान भेटतो तेव्हा देवीला चैत्री नवरात्रोत्सवात माहेरची माणसं भेटल्याचा आनंद देवीच्या चेहऱ्यावर झळकताना आपल्याला दिसतो.               

संत श्रेष्ठ निवृत्तीमहाराजांना नाथसंप्रदायाकडून दीक्षा मिळाली असल्याने शाबिरी विद्येसाठी लागणारी शक्ती माता सप्तशृंगीने दिली असल्याने माता सप्तशृंगी देवीला नाथ संप्रदायाची कुलस्वामिनी असे म्हणतात.

जय देवी सप्तश्रृंगा अंबा गौतमी गंगा

नटली ही बहुरंगा उटी शेंदुर अंगा

जय देवी सप्तश्रृंगा  ॥ धृ ॥

                              पूर्व मुख अंबे ध्यान जरा वाकडी मान

                             मार्कंडेय देई कान सप्तशतीचे पान

                             एके अंबा गिरि श्रृंगा,  अंबा गौतमी गंगा

                             जय देवी सप्तश्रृंगा  ॥ १ ॥

माये तुझा बहु थाट देई सगुण भेट

प्रेम पान्हा एक घोट भावे भरले पोट

करू नको मनभंगा,  अंबा गौतमी गंगा

जय देवी सप्तश्रृंगा  ॥ २ ॥

                               महिषीपुत्र म्हैसासुर दृष्टी कामे असुर

                               करि दाल समशेर क्रोधे उडविली शिर

                               शिवशक्ती शिवगंगा,  अंबा गौतमी गंगा

                               जय देवी सप्तश्रृंगा  ॥ ३ ॥

निवृत्ति हा राधासुत अंबे आरती गात

अठराही तुझे हात भक्तां अभय देत

चरणकमल मनभंगा,  अंबा गौतमी गंगा जय देवी सप्तश्रृंगा  ॥ ४ ॥

उत्तर – सह्याद्रीच्या पठारावर असलेला सप्तशृंग गड समुद्रसपाटीपासून सुमारे ४५६९ फूट उंचीवर आहे.

उत्तर – नाशिकचे जुने बाध्यवर्ती असलेले बसस्थानक येथून आणि दिंडोरी नाका येथून बस गाड्या मिळतात.गडावर जाण्यासाठी फेनिक्युलर बस उपलब्ध आहेत.त्याचप्रमाणे रोप वे सुद्धा सप्तशृंगार गडावर जाण्यासाठी उपलब्ध आहे.तरीही रोप वे साठी लागणारे शुल्क म्हणजे प्रौढांसाठी ९० रुपये प्रत्येकी आणि मुलांसाठी ४५ रुपये प्रत्येकी आहे.

उत्तर – भाविकांना गडावर राहण्यासाठी सप्तशृंगी ट्रस्ट ने धर्मशाळा बांधल्या आहेत.धर्मशाळा कार्यालय हे २४ तास खुले असते तरीही धर्मशाळेच्या खोलींसाठी आरक्षण पद्धत नाही.गडावर आल्यानंतर खोली एका दिवसासाठी मिळते.गडावर संस्थेतर्फे १५ रुपये देणगी देऊन पोटभर जेवणाची सोय संस्थेने केलेली आहे.पौर्णिमा,नवरात्र आणि चैत्री नवरात्र या दिवसात भाविकांना मोफत अन्नदान करण्यात येते.प्रसादालयात भाविकांसाठी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत आणि रात्री ७ ते ९ वाजेपर्यंत जेवणाची व्यवस्था केलेली आहे.

उत्तर – मुखात पानाचा विडा घालणे म्हणजे अर्थातच मुखात तांबूल घालणे असेही म्हणतात…असे म्हणतात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये विड्याच्या पानाला अनन्यसाधारण असे महत्व आहे.विड्याच्या पानाच्या टोकावर देवतांची स्थाने असतात. जसे कि,पानाच्या टोकावर इंद्र आणि शुक्र असतात,पानाच्या मध्यावर सरस्वती म्हणजेच विद्येची देवता असते तर पानाच्या शेवटच्या टोकावर महालक्ष्मी असते.तर जेष्ठालक्ष्मी पानाच्या देठामध्ये वास करते याच कारणासाठी पूजेसाठी लागणारी पाने ही देठासकट मांडली जातात. तर देठ कापलेली पाने पूजेसाठी मांडली जात नाही.तशी पाने केवळ खाण्यासाठी वापरली जातात.

त्याचप्रमाणे भगवान विष्णू विड्याच्या पानातच वास करतात पानाच्या बाहेरील बाजूस भगवान शंकर आणि कामदेव असतात तर पानाच्या डावीकडे पार्वती आणि मांगल्यादेवींचा वास असतो तर उजवीकडे भूमाता असते म्हणून पानाचा विडा पूजेसाठी हमखास ठेवला जातो.

विड्याचं पान हे ताजेपणा,टवटवीतपणा आणि भरभराटीचे चिन्ह मानले जाते. तरीही समुद्रमंथनाच्या वेळेला शिल्लक राहिलेल्या अमृताच्या कलाशामधून जी वनस्पती उगवली गेली ती वनस्पती नागवेळ म्हणजेच विड्याचे पान होते या पानांमुळे सर्व देवतांना आल्हाददायक वाटले आणि खाण्यासाठी पानाचा उपयोग झाला.म्हणूनच देवीला पानाचा विडा मुखी घालतात.

उत्तर – पहाटे पाच वाजता देवीचे मंदिर उघडते,सहा वाजता काकड आरती होते आठ वाजता देवीच्या महापूजेला सुरुवात होते या पूजेमध्ये देवीला पंचामृताने स्नान घालून पैठणी किंवा शालू नेसवून तिचा साज-शृंगार केला जातो.पानाचा विडा मुखी दिला जातो त्याचप्रमाणे पेढा ,वेगवेगळी फळे यांचा नैवेद्य दिला जातो.बारा वाजता महानैवेद्य केला जातो आणि आरतीही होते संध्याकाळी शेजारती होऊन मंदिराचे दरवाजे साडेसात वाजता बंद होतात.

उत्तर – मंदिर हे पहाटे पाच वाजता उघडले जाते.तसे भाविकांसाठी मंदिर २४ तास खुले असते.पण पहाटे पाच ते संध्याकाळी ७:३० पर्यंत खुले असते.या दरम्यान देवीचे स्नान,पूजा,महाप्रसाद,आरती आणि संध्याकाळी शेजारती होत असते.   

==============

हेही वाचा

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

                                    

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *