Ritbhatmarathi

Search
Close this search box.

बँकेची नोकरी सोडून ५० वर्षे वयामध्ये सुरु केली कंपनी आता आहे तब्बल ८०० कोटी कंपनीची मालक | nykaa owner Falguni Nayar biography in Marathi

nykaa owner Falguni Nayar biography in Marathi : उत्तमोत्तम करीयर करणे आणि नाव कमावणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते.आजकाल केवळ पुरुषच नाही तर महिलाही खूप छान करीयर घडवत आहेत शिवाय सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या जोडीने किंबहुना त्यांच्यापेक्षा सरस आणि  प्रभावी काम करताना दिसून येत आहेत.आज असे कोणतेच क्षेत्र नाही जिथे स्त्रियांनी त्यांचे कर्तृत्व दाखवले नाही.सगळ्याच क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तृत्वाने यशाचा झेंडा रोवला आहे.

आजची स्त्री प्रगत आहे, स्वतंत्र आहे आणि सुशिक्षित तर आहेच शिवाय घर आणि काम ( नोकरी ) दोन्ही जबाबदाऱ्या अगदी सहजपणे पेलत आहे.व्यवसाय करताना बरेच लोक संभाव्य धोक्याचा जास्त विचार करून होणाऱ्या नफ्याकडे दुर्लक्ष करतात.भांडवल गुंतवणूक, व्यवसाय चालेल का, वेळेचे नसलेले बंधन या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मग व्यवसाय सुरू केला जातो.

व्यवसायात जम बसण्यास काही वेळ लागू शकतो,पण एकदा ही घडी सुरळीत बसली की मग त्यातील मजाच काही वेगळी असते.आपल्या देशात असे बरेच व्यावसायिक आहेत ज्यांनी त्यांच्या कामामुळे पैसे तर कमावलेच पण खूप नाव सुद्धा मिळवले.

अशाच एक महिला आहेत ज्यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी बँकेतील प्रबंध निर्देशक या पदाची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आणि फक्त निर्णय घेतला नसून आज शून्यातून विश्व निर्माण करून स्वतःच्या कर्तृत्वावर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मध्ये त्यांचे नाव आज दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्यापैकी काही महिलांना त्यांचे नाव माहीत नसले तरी त्यांच्या प्रॉडक्ट्स नक्कीच माहित असेल आणि आपण ते वापरले असेल यात शंका नाही.

भारतीय व्यावसायिका आणि सौंदर्य प्रसाधनची सुरुवात करणाऱ्या नायका (Nykaa) ची संशोधक (nykaa owner) अशी ओळख ज्यांनी निर्माण केली आहे त्या म्हणजे “फाल्गुनी नायर (Falguni Nayar)”.

१. फाल्गुनी नायर ह्यांचा जन्म आणि शिक्षण | nykaa owner birthdate and qualification

फाल्गुनी नायर यांचा जन्म मुंबई येथे १९ फेब्रुवारी १९६३ मध्ये एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण “द न्यू एरा” स्कूल येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण कॉमर्स साईड मध्ये  त्यांनी मुंबई विश्वविद्यालयामध्ये तर आय. आय. एम अहमदाबाद येथून मॅनेजमेंटची पदवी घेतली.

२. करिअर:

त्यांच्या करिअरची सुरुवात त्यांनी नोकरी करून केली, त्या फर्गुसन एंड कंपनीत आधी काम करत होत्या पुन्हा त्यांनी कोटक महिंद्रा बँकेत प्रबंध निर्देशक या पदावर १८ वर्षे काम केले.पण तरीही त्या आनंदी नव्हत्या.त्यांना सुरुवातीपासून काहीतरी स्वतःचे आणि वेगळे करायचे होते.त्यांच्या वडिलांची बॉल बियरींग ची कंपनी होती,फाल्गुनी लहान असल्यापासून त्यांच्या घरात व्यवसायाच्या चर्चा नेहमीच होत असे त्यामुळे फाल्गुनी यांना व्यवसायाची समज आणि त्यातील  बारकावे याची जाण होती.

३. व्यवसाय सुरु करण्याची प्रेरणा कशी मिळाली:

त्यामुळे नोकरीत त्यांचे मन रमले नाही.त्या एकदा सेफोरा नावाच्या दुकानात खरेदीसाठी गेल्या होत्या,ते एक सौंदर्य प्रसाधन मिळणारे दुकान होते,खरतर फाल्गुनी यांना सौदर्य प्रसाधनांची फारशी आवड नव्हती आणि त्या वापरत ही नव्हत्या पण तेथील सर्व्हिस इतकी छान आणि प्रभावी होती की त्यांनी खूप वस्तू खरेदी केल्या.त्यावेळी त्यांना अशी कल्पना सुचली की आपण अशी सर्व्हिस ऑनलाईन का देऊ नये?? जिथे लोकांच्या चेहऱ्याचा प्रकार आणि पोत लक्षात घेऊन त्या माध्यमातून वस्तू उपलब्ध करून दिल्या जातील.खरेतर त्यावेळी महिलांच्या सौदर्य प्रसाधनाशी संबंधित अशी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नव्हती आणि तीच गरज फाल्गुनी नायर यांनी ओळखली.

शिवाय त्यांच्या नोकरीच्या काळात त्यांनी पाहिले होते की नवीन नवीन व्यवसायांची सुरुवात होते आहे,लोक काही महिने मेहनत घेतात,स्वतःचा ब्रँड बनवून प्रसिद्ध करतात आणि व्यावसायिक होतात.इथूनच मग त्यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी नायकाची सुरुवात केली.

वयाच्या पन्नासाव्या वर्षी त्यांनी जॉब सोडला आणि ज्या वयात लोक निवृत्त होऊन आराम घेतात त्या वयात फल्फुनी यांनी व्यवसायाला सुरुवात केली म्हणून त्यांचे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक त्यांना वेडे म्हणत.

पण त्यांनी कोणाकडेही लक्ष दिले नाही.आता त्यांना त्यांचे ध्येय दिसत होते, काय करायचं आहे हे स्पष्ट होते आणि त्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्यातील दुसरे पर्व सुरू झाले. फाल्गुनी यांना एक असे प्लॅटफॉर्म म्हणजेच मंच उभा करायचा होता की जिथे स्वस्तातील स्वस्त आणि महागतील महाग अशा सगळ्या वस्तू म्हणजेच सौदर्य प्रसाधने असतील, जे ग्राहकांपर्यंत पोहचवले जातील तेही ऑनलाईन यामुळे फक्त शहरातच नव्हे तर खेड्यात आणि गावात सुद्धा या प्रसाधनांचा वापर लोकांना करता आला पाहिजे.या पद्धतीने नायकाची सुरुवात झाली.हे एक असे ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म आहे जिथे आज त्यांच्याकडे दोन हजारपेक्षा जास्त ब्रँड तर २ लाख पेक्षा जास्त वस्तू आहेत.

४. नायकाचे उपक्रम | Nykaa Ventures

नायका हे ऑनलाईन दुकान आहेच पण  फाल्गुनी नायर इथेच थांबल्या नाहीत तर त्यांनी स्वतःचे सौंदर्य प्रसाधन आणि पर्सनल केअर ब्रँड उभे केले.त्यांच्या नायका फॅशन मध्ये अपेराल आणि फॅशनशी निगडित वस्तू आहेत. ती संख्या ४००० हजार पेक्षा जास्तच आहे.

फाल्गुनी नायर यांच्याकडे आज १६०० पेक्षा लोक काम करतात आणि फाल्गुनी त्यांचे नेतृत्व करतात.आपल्या प्रॉडक्ट सोबतच बाकी नामांकित कंपनीचे पण प्रॉडक्ट त्यांच्या दुकानात मिळतात. लॅकमे (Lakme), काया स्किन (Kaya), लोरियाल(Loreal) आणि मॅक(Mac) ही त्यातील काही उदाहरणे आहेत.

नायकाच्या ऑफलाईन दुकानाचे तीन प्रकार आहेत:-

नायका लक्स

नायका ऑन ट्रेण्ड

आणि नायका ब्युटी किऑस्क

त्यांचे स्वतःचे सौंदर्य आणि नैसर्गिक प्रसाधने, काया प्रसाधने आहेत ज्याची स्थापना त्यांनी २०१५ मध्ये केली आहे. पुढे २०१९ मधे मासाबा गुप्ता सोबत त्यांनी मसाबा बाय नायका सौंदर्य प्रसाधन अशी सुरुवात केली आणि याच वर्षी २० ड्रेसेस ची सुरुवात झाली. यामध्ये महिलांसाठी लागणारे नव्या पद्धतीचे कपडे होते, याच सोबत फाल्गुनी यांनी कलाकारांसोबत भागीदारीत काम केले ज्यांचे नाव होते काया ब्युटी आणि कलाकार होती कतरिना कैफ.

५. नायका कंपनीचे मूल्यांकन आणि शाखा:

आज नायकाचे दिल्ली,पुणे,हैदराबाद,कोलकत्ता आणि बेंगलोर या ठिकाणी wear house आहेत. नायकाच टर्न ओव्हर २०२० मध्ये १७७७८ मिलियन च्या जवळपास होता. २०२१ मध्ये तो २४५३६ मिलियन इतका होता.या घवघवीत यशामुळे पहिल्या पासून सुरु असलेल्या खूप मोठ्या आणि नामांकित कंपन्यांना फाल्गुनी यांनी मागे पाडले आहे. ज्या कंपन्यांचे valuation एक मिलियन डॉलर म्हणजेच १०० करोडला एक्झिट केले जाते, १० नोव्हेंबर २०२१ मध्ये नायकाने Initial Public Offering मध्ये कमाल केली एक मिलियनचा टप्पा पूर्ण केला आणि नायका ही स्टार्टअप करणारी कंपनी ठरली,तसेच फाल्गुनी यांचे नाव श्रीमंताच्या यादीत समाविष्ट करण्यात आले इतकेच नव्हे तर २८ ऑक्टोंबर २०२१ मध्ये बुधवारी शेअर बाजारात समाविष्ट झाले.

अशा प्रकारे फाल्गुनी यांनी दाखवून दिले की व्यवसाय करण्यास वयोमर्यादा, पैसे आड येत नाही.गरज असते ती फक्त धाडस,चिकाटी आणि जिद्दीची.तेच त्यांनी दाखवले आणि यशाचे सर्वोच्च शिखर गाठले.आपण ठरवले आणि आपले निर्णय ठाम असतील तर कोणत्याही वयात व्यक्ती काहीही करू शकतो आणि याच उत्तम उदाहरण आहेत फाल्गुनी नायर.

फक्त सकारात्मक विचार करून धाडस करा आणि उज्वल यशाकडे पाहिले पाऊल टाका. यश तुमची वाट पहात आहे.सर्वांना सदिच्छा!!!!

====================

marathi goshta

marathi story

marathi moral stories

marathi love story

marathi motivational stories

Share your love
Facebook
Twitter

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *